मला चुकीची ऐकू आलेली गाणी

Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53

काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.

या आधीची गाणी ईथे पहा.

जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हल्ली सिनेमात व ईतरत्र पंजाबी गाणी बरीच चालतात. बरेचदा त्यातिल शब्द नक्की काय आहेत ते कळत नाहीत. "सिंग ईज किंग" या सिनेमातिल गाणे मला असे ऐकु येते.
की करदा भई की करदा तैनु फोर पजामा की करदा,
ईक वारी, हो ईक वारी, तू सिके नाळे रख गोरीये.
(नाळे मधिल "ळ" चा उच्चार "ळ" आणी "ड" यांच्या मधला)

गाणे ऐकताना माझ्या डोळ्यासमोर असे चित्र उभे रहाते.
कतरिनाने अक्षय कडे एकदम ४ "पजामा" घेण्याचा लाडिक हट्ट धरला आहे. अक्षयने जात्याच धाडसी व साहसी असल्याने सामान्य नवर्‍या प्रमाणे "पुढच्या महिन्यात बघू" असे गुळमुळीत उत्तर न देता तो सरळ तिला "तुला एकदम चार-चार "पजामा" काय करायचेत असा प्रश्न विचारतोय." वर ऐनवेळेस "नाळी(डी)" तुटल्याने वांधा होत असेल तर "तू एकदाच जास्तिचे "नाळे" शिवुन ठेव असे सांगतोय.

उचपती...

हा हा पु वा ग ब लो......
_______
नमस्ते लंडन

आईशप्पत... आता अजीबात कंट्रोल होत नाहीये... :हहपुवा:

**********************
नजरेला काय हवी... स्वप्न थोडी जास्त !

abhijeet_2074, Santino, uchapatee Happy Happy हसून हसून जीव गेला Happy

आओ बच्चो तुम्हे दिखाए झाकी हिंदुस्तान की
इस मिट्टी से तिलक रोए ये धरती है बलीदान की
मला सारख वाटायचे की मातृभुमीला स्वातंत्र मिळाले नाही म्हणुन लोकमान्य टिळकांना रडू येते असा काही तरी अर्थ असेल याचा.
ते खर बहुदा 'इस मिट्टी के तिलक करो' असे आहे पण मी नेहमीच माझी आवृती म्हणत आलेय. Proud

ते गाणं आहे ना "कोई चंचल शोख हसिना दिल धूंड रहा है" त्यात तो माणूस मध्येच काहीतरी चावल्यासारखा काय ओरडतो? मला आत्तापर्यंत "रिफ्लेक्टर", "इनस्पेक्टर" आणि "डिस्टेंपर" असं ऐकू आलेलं आहे Happy

उचापती Rofl
स्वप्ना Happy
डर चित्रपटात गाण आहे ना ' तू मेरे सामने' त्यात 'तूट गयी तूट के मै चूर हो गयी ' हे मला ' तूट गयी तूटके मोतीचूर हो गयी' ऐकायला यायच आणि भूक आणखी प्रज्वलीत व्हायची त्यातच 'मेरे होठोसे गुलाब मांग ले ' हे ही सोयीस्कर रीत्या ' मेरे हातोसे गुलाबजाम ले' अस ऐकायला यायच.
पब्लीकला ही असच ऐकू आल असेल. उगाच नाय गाणी गाजली एवढी Proud

रुनि, केदार Rofl

केदार Happy

हे बा.फ्. च्या विषयाला धरुन नाही तरी पण लिहीतो आहे.
"हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी - दिसशी तू नवतरुणी काश्मिरी" हे गाणे मला नेहेमीच विचित्र वाटत आले आहे. या गाण्यातुन ध्वनित होणारा अर्थ
"हे (गावठी) चिंचेचे झाड मला चिनार वृक्षापरी (म्हणजे देखणे, सुंदर वगैरे) दिसते आहे (त्याच प्रमाणे) तू (गावठी/अतिसामान्य असलिस तरी) नवतरुणी काश्मिरी (देखणी) दिसते आहेस.

उचापती, मला काश्मिरी ह्या शब्दाचा अर्थ देखणी आहे हे आजच कळले.. मला वाटायचे की नवतरुणी ही कश्मिरी मुलींसारखी सुंदर आहे.. इंजिनीअरींग मध्ये असे पर्यंत सर्वात सुंदर मुली ह्या काश्मिरी मुलीच असतात असे वाटायचे ना Happy

-------------------------
उत्तम व्येव्हारे जोडोनिया धन
उदास विचारे 'सेव्ह' करी

"जिया जले जा जले , नैनो तले" या गाण्याच्या सुरवातीला काही तमिळ (बहुतेक) शब्द आहेत. कोणी ते नक्की काय आहेत सांगेल काय? मी फार विचित्र ऐकायचो.
लिहीताना विचित्र वाटतंय पण लिहीतो.

धुवा दिक्कीळ ये , धुवा दिक्कीळ ये ,
कीटकीट किळी , कोविल्लाळे कुटविळीक्के मे,
नान लिंदे , किळी किळी कुटविळीक्के मे,
नानू कौसल्ले , कुइलल्ले , माळद मईलल्ले....

||||||||पु||||||||ष्क||||||||||र|||||||||||||||||||||||||||
काय डेंजर वारा सुटलाय
डोस्क्यात कचरा, धूळ धूळ डोळ्यात...

इंजिनीअरींग मध्ये असे पर्यंत सर्वात सुंदर मुली ह्या काश्मिरी मुलीच असतात असे वाटायचे ना >>> हायला तुझ्या सारखी मुलं त्यांना ह झा चढवायची आणि त्यांना पण,"आपणच सुंदर" असे वाटायचे Uhoh

खरा अर्थ असा आहे- बायको मागे लागली आहे कश्मिरला जाण्यासाठी. नवरा न जाण्याचे बहाणे बनवतो आहे जसे की हे चिंचेचे झाड चिनार वृक्ष आणि तु काश्मिरी तरुणी असताना मग अजुन कश्मिरला जायची काय गरज Wink

हायला तुझ्या सारखी मुलं त्यांना ह झा चढवायची आणि त्यांना पण,"आपणच सुंदर" असे वाटायचे >>>> खोटं खोटं.. धादांत खोटं.. Happy संपूर्ण भारतात सरासरी सुंदर मुली ह्या काश्मिरीच आहेत.. ह्यावर दुमत होणे नाही..

आणि आम्ही काय झाडावर चढवणार त्यांना..ढुंकुन पण बघायच्या नाहीत आमच्याकडे.. त्याचा राग म्हणुन आम्ही उत्तरेकडच्या विशेषतः काश्मिरी आणि बिहारी पोरांबरोबर हाणामार्‍या करायचो..

-------------------------
उत्तम व्येव्हारे जोडोनिया धन
उदास विचारे 'सेव्ह' करी

बिहार उत्तरेत ? मला वाटत होते की माझाच भूगोल अशक्त आहे Wink

ह्यावर दुमत होणे नाही..>>> मी एकमताने सांगतेय तर दुमत येतेच कुठे Wink

अँकी,
गाण्याची गीतकार एकता कपूर आहे वाटतं. सगळी कडे कुरकुर, कौविक असलेच शब्द आहेत. Proud

हा हा

खरंच....
पण अर्थ फार मस्त आहे....
_______
नमस्ते लंडन

मस्तच ह..!!!!...
खरा गीतकार तोच... Happy

हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी - दिसशी तू नवतरुणी काश्मिरी >>>

हे गाणे आम्ही असे ऐकायचो लहानपणी

'हे चिन्चेचे झाड दिसे मज छिनाल वृक्षापरी..

कारण तोपर्यनत आम्ही चिनार हा शब्दच ऐकला वाचलेला नव्हता....

---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

दिलसे मधील या गाण्याच्या देवनागरी ओळी पूर्वी कोणीतरी हितगुजवर टाकल्या होत्या. इन्ग्रजीतून नीट उच्चार कळत नाही . इथले देवनागरी सापडेल काय?

---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

कोणितरी नाही...
मीच टाकल्या होत्या...

गाणे ओळखा बी बी वर...
आणि अंताक्षरी बी बी वर....

आत्ता तेवढे कष्ट घ्यायला वेळ नाहिये... त्यामुळे क्षमस्व...
_______
नमस्ते लंडन

ब्बाप्प रे.. हसुन हसुन वाट लागली रे Happy
माझी मुलगी एक गाणे म्हणते, 'बेडकीच्या पिल्लानं वैल पाळिला...'

कुणाला अख्खंच्या-अख्खं गाणंच चुकीआलं ऐकू आलं तर काय व्हावं?

http://in.youtube.com/watch?v=sdyC1BrQd6g

जर तुम्ही हे अजूनही पाहिलं नसेल, तर शर्थ आहे...
मी हसून-हसून गुदमरून मरेन अशी भीति मला वाटू लागली होती!

>>> 'हे चिन्चेचे झाड दिसे मज छिनाल वृक्षापरी..>>>>
टोणग्याचा नाद खुळा!!!!
*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

आमच्या शेजारील कॉन्वेंट कुमार्(वय-१०वर्र्श)

उठी उठी गोपाळा....ऐकुन तेव्हापासून,

'बेबी ऑन द झोपळा....' हे गातोय. हसुन पुरेवाट झाली!!!

Pages