कृष्ण व अर्जुन यांचे ते चित्र

Submitted by जागोमोहनप्यारे on 29 May, 2011 - 02:59

महाभारतामधील कृष्ण व अर्जुन यांचे ते चित्र घरात लावू नये असे म्हणतात. त्याने घरात वाद निर्माण होतात, असे काही लोकांचे मत आहे. आपणास काय वाटते? ते चित्र घरात असावे की असू नये? वास्तुशास्त्रवाले तर असे सांगतात, पण वास्तुवर विश्वास नसणारेही बरेच लोक असेच मत मांडतात. याबाबत कुणाला काही अनुभव आहे का?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जामोप्या एक काम करा...................... तुम्हाला असले प्रश्न पडतात ना ते सगळे एकाच धाग्यावर लिहित जावा........उगाच अ‍ॅडमिन चे काम वाढवु नका.....इथली जागा तुमच्या प्रश्नाला वाया घालवत जाउ नका..
एकच धागा काढा आणि लिहा त्यात तुमचे सगळे प्रश्न लिहित जावा...आम्ही तुम्हाला तिथे पण प्रतिसाद देउ आणि आपले शंका निरासन करत जाउ

तुम्ही आजवर एकाही शंकेचे निरसन केलेले नाही. त्यामुळे एकच धागा काय अनेक धागे हा विचार तुम्ही कशाला करताय?

जामोप्या हे जे काही म्हणत आहेत ते बरोबर आहे. वेगवेगळ्या धाग्यांपेक्षा एकाच धाग्यात एक मोठी प्रश्नांची यादी बनवून टाका, कारण तुमचे सगळे प्रश्न हे हिंदू धर्माच्या रूढी परंपरांशी संबंधित आहेत.
तसेही अशा प्रकारचे धागे आधीच अस्तित्वात असतीलही, त्यावर लिहिलेत तरी चालेल.

जामोप्या,

उगाच रोज १७६० धागे निर्माण करण्यापेक्षा, तुम्हाला हिंदू धर्माविषयी ज्या ज्या शंका आहेत (अगदी "हिंदू नावाचा धर्म अस्तित्वात आहे की नाही?" इथपासून "जेवण झाल्यावर किती चुळा भरणे शास्त्रसंमत आहे?" किंवा "जानवे उजव्या कानावर अडकवायचे की डाव्या कानावर?" अशा सर्व लहान-मोठ्या, साध्या-अवघड, महत्वाच्या-बिनमहत्वाच्या, खर्‍या-खोट्या शंका), त्या त्या एकाच धाग्यावर लिहून मिळालेल्या उत्तरांचा संग्रह "हिंदू धर्माविषयी FAQ" अशा शीर्षकाखाली wikipedia वर टाका. ही प्रश्नपेढी पुढच्या अनेक पिढ्यांना नंदादीपासारखी मार्गदर्शक ठरेल. भावी पिढ्या तुमच्याविषयी कायम कृतज्ञ राहतील.

विशेषत: काही गूढ प्रश्नांची उत्तरे (उदा. "घराबाहेर पडताना पहिल्यांदा डावे पाउल टाकावे की उजवे की उंबरठ्यावरून रस्त्यावर एकदम उडी मारावी जेणेकरून दोन्ही पावले एकदम जमिनीला टेकतील?", "लहान मुलाला करगोटा बांधताना तो मंत्रून बांधावा की न मंतरता नुसताच काळा दोरा बांधावा?") हिंदू समाजाला नीटशी माहित नसल्याने त्यांच्याकडून नीट धर्माचरण होत नाही. तुम्ही अशी धर्मविषयक प्रश्नांना समर्पक उत्तरे असलेली प्रश्नपेढी तयार केली तर हिंदू बंधुभगिनींकडून नीट धर्माचरण होऊन भारताची उत्तरोत्तर उन्नती होईल. Biggrin

आणि हे नाही पटलं तर हलकेच घ्या. Light 1

चित्रावरून भांडण होते का, याचा संबंध हिंदू ध्रर्माशी कसा काय येतो बुवा? असा उल्लेख कुणा जुन्या धर्मग्रंथांत आहे का?
कठीण आहे. हिंदू धर्माविषय एफेक्यू वर कसे पोहोचले लोक्स?

>>> आता पुढची शंका वळवळली की असा एक धागा काढूया.

छे! छे!! अजिबात नवीन धागा काढू नका. आतापर्यंत जे धागे काढले त्यातल्या प्रश्नोत्तरांचे संकलन करून FAQ तयार करा.

Happy

>चांगली आयडिया आहे.. आता पुढची शंका वळवळली की असा एक धागा काढूया
आहो तुम्ही आख्खेच्या आख्खे वळवळताय. ते थांबवा आधी.

चांगली आयडिया आहे.. आता पुढची शंका वळवळली की असा एक धागा काढूया
आहो तुम्ही आख्खेच्या आख्खे वळवळताय. ते थांबवा आधी.
----- मंदार... Happy

>>>> उगाच रोज १७६० धागे निर्माण करण्यापेक्षा, तुम्हाला हिंदू धर्माविषयी ज्या ज्या शंका आहेत ....
मला तर जामोप्या हे पक्के विज्ञानवादी, पुरोगामी विचारांचे वाटतात. केवळ रंजन व्हावे म्हणून ते असले धागे काढतात.

>>>> मला तर जामोप्या हे पक्के विज्ञानवादी, पुरोगामी विचारांचे वाटतात. केवळ रंजन व्हावे म्हणून ते असले धागे काढतात. <<<<
नाही! मी सहसा व्यक्तिगत कॉमेण्ट देणे टाळतोच. पण अगदीच रहावले नाही म्हणून... तात्विक चर्चा म्हणून, मला तसे वाटत नाही. उलट त्यान्चा त्रिशन्कु झालाय असे वाटते. एकीकडे धार्मिक रुढीपरम्परान्बद्दल कमालिचे आकर्षण, तर दुसरीकडे विद्यानवादी बुद्धिभेदामुळे हे करु के ते करु अशी झालेली मनाची अवस्था, त्यातुनची घालमेल, अन त्यावर पुस्तके वाचुन अभ्यास करण्या ऐवजी शोधलेला सहज सोपा उपाय म्हणजे येथे प्रश्न विचारुन माहिती काढणे.
हे म्हणजे आपण नै का? एखाद्या बिनापाटीच्या चौकात येऊन थाम्बतो अन प्रश्न पडतो डावीकडे जाऊ, उजवी कडे जाऊ, सरळ जाऊ की आलोतसा माघारी फिरू? मग आपण काय करतो? जो दिसेल त्याला प्रश्न विचारत सुटतो, माहिती विचारतो.... जामोप्याचे धागे मला अगदी याच चौकात रस्ता माहित नसल्याने गोन्धळलेल्या व्यक्तिच्या प्रश्नाप्रमाणे वाटतात.
असो. हे असेच असेल तर जामोप्या सान्गेलच हो वा नाही ते.
नसेल तर माझ्या नावाने शन्ख करायला एक धागाही उघडू शकेल हव तर! Proud
त्याचबरोबर "शन्ख करणे" म्हणजे काय असाही धागा उघडू शकेल, हो की नॉट जामोप्या? Wink

एखाद्या विषयाची माहिती हवी असेल, आणि तो धागा जर मायबोलीवर नसेल तर, सर्वाना माहिती व्हावी, म्हणून मी धागे काढतो. Proud अगदी व्यक्तीगत सांगायचं झालं तर तो फोटो माझ्याकडे नाही, त्यामुळे तो लावायचा की काढायचा हा प्रश्नच नाही. कुठेतरी याबद्दल वाचलं आणि धागा काढला.

मला वाटते दशरथ राजाने हॉल मधे हे चित्र लावले असणार ....त्या मुळेच बिच्चार्‍याच्या घरात इतके वाद विवाद भांडणं झाली Proud

मला वाटते दशरथ राजाने हॉल मधे हे चित्र लावले असणार ....त्या मुळेच बिच्चार्‍याच्या घरात इतके वाद विवाद भांडणं झाली
---- दशरथ राजाने दरवाजावर लिंबू - मिरची (किंवा काळी बाहुली, पायताण, कोळसा) लावली नव्हती Happy आणि अमुलेट त्या काळात मिळत नव्हते.

Biggrin

एखाद्या विषयाची माहिती हवी असेल, आणि तो धागा जर मायबोलीवर नसेल तर, सर्वाना माहिती व्हावी, म्हणून मी धागे काढतो. <<<
एक चांगला उपक्रम राबवतोयस, मोहन प्यारे त्यासाठी तुझ हार्दीक अभिनंदन.....:खोखो:

धागा उकरून काढल्याबद्दल क्षमस्व.

एक जुनी आठवण या निमित्ताने सांगावीशी वाटली.
हे महाभारताचे चित्र घरात लावू नये असे मी प्रथम १९९२ साली ऐकल्याचे आठवते.

तेव्हा सातार्याला आमच्या माजघरात सदरचे चित्र होते.

मातोश्रींचा चित्र काढण्यास सख्त विरोध होता तर वडिलांचे म्हणणे असे की एवढे लोक सांगत आहेत ते काही तरी अनुभव असतील म्हणूनच.

चित्र काढण्यावरून आमच्या घरात महाभारत व्हायची वेळ आली तेव्हा आम्ही मुलांनी एक स्टीलचे कपाट चित्राच्या पुढे सरकवून ठेवले. आता चित्र तर होते परंतु ते कपाटामागे असल्याने दिसत नव्हते.

यात एक घोळ असा झाला की अर्जुनाच्या रथाचा एक घोडा कपाटामागून थोडासा बाहेर आला होता. प्रथम पाहणार्याला असे वाटे की कपाटामागे रथ आहे व तो घोडा त्याला बाहेर खेचायचा प्रयत्न करतो आहे.
दिवसभर ते दृश्य पाहून आमच्या आजीबाईंना रात्री स्वप्नात घोडे दिसू लागले व एकदातर म्हणे त्यांनी सांगितले की आमचा श्वास कोंडतो आहे तेव्हा आम्हाला मोकळे करा !

पर्यायाने ते चित्र तर गेलेच पण आजीच्या आदेशावरून आमचीही चांगलीच धुलाई झाली.

तात्पर्य: चित्र हानिकारक नसून चित्रावरून चालणारी चर्चा जास्त हानिकारक असते !

सनातनवाल्यानी या चित्राचे सात्विक वर्जन तयार केले आहे. त्या चित्रामुळे कोणते दोष उत्पन्न होत नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे.

Pages