कृष्ण व अर्जुन यांचे ते चित्र

Submitted by जागोमोहनप्यारे on 29 May, 2011 - 02:59

महाभारतामधील कृष्ण व अर्जुन यांचे ते चित्र घरात लावू नये असे म्हणतात. त्याने घरात वाद निर्माण होतात, असे काही लोकांचे मत आहे. आपणास काय वाटते? ते चित्र घरात असावे की असू नये? वास्तुशास्त्रवाले तर असे सांगतात, पण वास्तुवर विश्वास नसणारेही बरेच लोक असेच मत मांडतात. याबाबत कुणाला काही अनुभव आहे का?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुस्तक आणि चित्रांनी अभद्र काही होत असते तर ती बनवायच्या जागीच आधी प्रताप नसते का दिसले? प्रिंटींग प्रेस, विक्रीची दुकाने इथे? >> आशूडी, २००% अनुमोदन.. Happy

चित्रं बित्रं लावून असं नुकसान आणि कल्याण होत असतं तर लोकांनी घराची पार रसवंतीगृह करून टाकली असती.. Proud

पुस्तक आणि चित्रांनी अभद्र काही होत असते तर ती बनवायच्या जागीच आधी प्रताप नसते का दिसले? प्रिंटींग प्रेस, विक्रीची दुकाने इथे? >> आशूडी, २००% अनुमोदन.. Happy

चित्रं बित्रं लावून असं नुकसान आणि कल्याण होत असतं तर लोकांनी घराची पार रसवंतीगृह करून टाकली असती.. Proud

झक्की Biggrin
त्या चित्रातून इश्वर माणसाला मार्गदर्शन करतोय या पलीकडे काही अर्थ निघतो असे मला वाटत नाही, त्यामुळे हे चित्र लावायला हरकत नाही.

आजवर माणसानी जितकी माणसं मारलेली आहेत, तितकी तर कुठल्या रोगाने किंवा दुष्काळानेही आजवर मारलेली नाहीत, असं कुठेतरी वाचलय

>>> कारण खरे तर या विषयातले मला काही कळत नाही. (हे वाक्य आता सर्वत्र आपो आप लिहील्या जाईल असे काही करता येईल का? म्हणजे मी लिहायला घेतले रे घेतले की पहिले वाक्य हे!)

झक्की,

याहू, जीमेल वगैरे ईमेल प्रोव्हायडर, ईमेल लिहिताना आपली सिग्नेचर आपोआप लिहायची सोय देतात. तशी मायबोलीच्या अ‍ॅडमिनननी व्यवस्था केली तर तुमची वरची पंचलाईन तुमच्या प्रत्येक प्रतिसादात आपोआप उमटेल.

हे बघा जामोप्या, सध्या मी गजानन महाराजान्ची पोथीच तेव्हडि घरात वाचतोय! परवाच गुरुपुष्यामृताच्या दिवशी लिम्बीने एका दिवसात वाचून काढली.
रामायण महाभारता बाबत असे काहीही नाहीये. मात्र "अरण्यक" घरात वाचू नये, (अशा अर्थाचा उल्लेख सावरकर चरित्रातही कुठेतरी आहे असे पुसटसे आठवते)
मला वाटते की असे आक्षेप, मागे नै का एक बीबी निघालाय की "राक्षस मारण्याच्या हिन्दु पौराणीक कथा लहान मुलान्ना कशा काय ऐकवाव्या? त्याने "हिन्सेची" भलामण होत नाहीका? बालमनावर काय परिणाम होईल? वगैरे वगैरे" चिन्तेने पीडलेल्या लोकान्च्या सुपिक मेन्दूतुन वरील बन्द्या आल्या असाव्यात! Proud तर असो.
अरण्यक सोडले तर बाकि कशालाही असे बन्धन शास्त्रानुसार माझ्या माहितीत तरी नाहीये.
हां, दाह सन्स्कार व दहाव्व्यापर्यन्तचे स्मशानातिल विधी स्मशानातच करावेत, किमान घराच्या बाहेर करावेत असेही बन्धन आहे. (पाळाच असा काही माझा आग्रह नै बरका.... Wink ) मात्र दाहसन्स्कारासहित दहाव्यापर्यन्तचे विधी शिकताना मात्र त्या मन्त्रान्ची सन्था घरातही घेता येते.

आरण्यकाचे मलाही माहीत होते.. महाभारत घरात वाचायचे नसेल तर गीताही घरात वाचता येणार नाही ना? Proud या आठवड्यात धार्मिक प्रश्न फारच पडलेत बुवा.. कुंडली बघा जरा माझी.. Proud

बुध्दीप्रामाण्य जरा बाजुला ठेउ या.

विनाश सूचक असे काही आपल्या घरात नसावे या पलिकडे कृष्णार्जुनांच्या चित्रा बद्दलच्या समजात काही नसावे.गृहस्थाच्या शयनगृहामधे राधाकृष्णाचे प्रेम दर्शवणारे चित्र असावे अस वास्तूशास्त्र जाणणारे सांगतात ते ही या करताच की तसे प्रेम पतीपत्नी मधे राहो.

असेच आपल्या भाषेतील संकेतात ही आहे . बांगड्या फुटल्या न म्हणता बांगड्या वाढल्या म्हणाव, नारळ फोड न म्हणता नारळ वाढव, दिवा फुंकुन विझव न म्हणता दिवा मालव/ दिव्याला निरोप दे ( बे-चिराग= बेचिराख शब्द आठवला ना? ) इत्यादि.......वडिल मंडळी आवर्जून सांगत ते या साठीच.

शयनगृहामधे राधाकृष्णाचे प्रेम दर्शवणारे चित्र असावे अस वास्तूशास्त्र जाणणारे सांगतात ते ही या करताच की तसे प्रेम पतीपत्नी मधे राहो.

राधा कृस्श्णाची बायको होती का?

>>>
जागोमोहनप्यारे | 24 September, 2011 - 21:07

शयनगृहामधे राधाकृष्णाचे प्रेम दर्शवणारे चित्र असावे अस वास्तूशास्त्र जाणणारे सांगतात ते ही या करताच की तसे प्रेम पतीपत्नी मधे राहो.

राधा कृस्श्णाची बायको होती का?
>>>>

अग्ग्ग्ग्ग्गागा!
जामोप्या,
खरंच तो चरणकमलांचा फोटो इमेल करा हो

हेच ते चित्र .... मीही आधी वरती टाकले होते. नंतर घाबरुन इथे भांडणे होऊ नयेत म्हणून काढून टाकले... Happy .. देवा, मायबोलीवरच्या धाग्यांचे आता तूच रक्षण कर Proud

हे चित्र न लावलेल्या घरांत वाद होत नाहीत असा एखाद्या सर्वेक्षणाचा निष्कर्श आहे का?

याचा काय संबंध? दारु न पिणारादेखील मरतोच म्हणून दारु पिण्याचे समर्थन करता येत नाही ... ( बघा, फोटो लावला आणि लगेच वाद सुरु झाला...तसा फोटो नव्हता तेंव्हाही वाद होताच . Proud )

नंतर घाबरुन इथे भांडणे होऊ नयेत म्हणून काढून टाकले...
चित्राला घाबरून ?? घाबरण्यासारखं काये त्यात??

आपण एक आयडिया करू. ते राधाकृष्ण वालं पण टाकतो. मग प्रेम पण नांदेल. मग सगळं कसं बॅलन्स्ड होईल

राधा ही कृष्णाची बायको होती का? >>>>> मी वाटच बघत होतो या प्रश्नाची Lol ती बायको नव्हती म्हणून च कदाचित राधा कृष्णा मधे प्रेमाची परमसीमा गाठली गेली असावी. Lol रुक्मिणी व सत्यभामा दोघीही कृष्णा वर रुसल्याच्या / भांडल्याच्या कथा सापडतात पण राधेबाबत तशी कथा मी तरी वाचलेली नाही.कोणी वाचली असेल तर कळवा.
विनोद जाउदे, पण राधा नक्की कोण होती ?, की ती शृंगार व शारीर प्रेमाच्या पलीकडे जाणारी एक उदात्त अशी कविकल्पना आहे? मायबोली वर अनेक जण अतिशय अभ्यास पूर्ण लेखन करणारे आहेत, त्यांना विनंती की हा एक चांगला लेखाचा विषय आहे जरा मनावर घ्यावे.

श्रीकान्त... Lol मस्त उत्तर, दोन्ही पोस्ट्स्ना अनुमोदन Happy
>>>> विनोद जाउदे, पण राधा नक्की कोण होती ?, की ती शृंगार व शारीर प्रेमाच्या पलीकडे जाणारी एक उदात्त अशी कविकल्पना आहे? मायबोली वर अनेक जण अतिशय अभ्यास पूर्ण लेखन करणारे आहेत, त्यांना विनंती की हा एक चांगला लेखाचा विषय आहे जरा मनावर घ्यावे.<<<
राधेच्या अनेक कथा प्रचलित आहेत, पण त्याचा मूल गाभा समजायचा झाला तर भक्त पुन्डलिक वा लहानपणी हट्टाने विठ्ठलाला जेवू घालणारे सन्त नामदेव यान्च्या सारख्या गोष्टीन्मधील प्रेमभाव समजला तरच राधाक्रिष्ण समजू शकतील, अन्यथा एकवीसाव्या शतकातील बुप्रा लोक, त्या प्रेमभावाला देखिल व्यवहाराच्या व स्त्रीपुरुष लिन्गभेदाच्या चाकोरीत आजमावत बसुन निरर्गल विधाने करत सुटतील. असो. हल्लीच्या काळी काय? विसाव्व्या एकविसाव्व्या शतकातील भान्डवलवादी व प्रत्येक बाबीची पैशात स्ट्याटिस्टीकद्वारे मोजदाद करु पहाणार्‍या यच्चयावत जनांस माणसाची उपयोगीता सम्पली की तो टाकाऊ समजण्याची जिथे सवय आहे, आईबाप देखिल नकोसे होतात, पतीपत्नीपोरेबाळेमित्रमैत्रिणीसगेसोयरे, सगळी नाती केवळ व्यवहारात मोजली जातातच पण श्रद्धा/विश्वास इत्यादीन्चे मोल देखिल पैशातच ठरवले जाते, तिथे आध्यात्मिक प्रेमाच्या उदात्त कल्पना वर्णन करुन काय उपयोग? जाऊदे झालं, तुमच चालूद्यात

प्रेमभाव समजला तरच राधाक्रिष्ण समजू शकतील>>>>>>
सत्यवचन लिम्बूदा अगदी सत्य वचन!!
निरर्गल विधाने>> तुमकरो तो रासलीला मै करु तो कॅरेक्टर ढीला सारखी बिभत्स शब्द रचना करणारांना व तसं काव्य(?) आवडणारांना रासलीला/ प्रेमभाव काय कळणार? ( आता पिंजरा मधील गाण्यांचे दाखले देउन कुणी प्रतिवाद पोस्ट टाकू नका ही नम्र विनंती.)
माणसा माणसां मधील प्रेमभाव लोपणे, स्नेह, ममता, ह्या नेमक्या काय भावना आहेत ते समजूच न शकणे ( जणूकाही लिंगभेदा पलिकडे काही नातं नाहीच ) हा यूज अ‍ॅण्ड थ्रो संस्कृती चा मोठाच वाईट भाग आहे.
पण असे सिनीकल होउन कसे चालेल, शेवटी कृष्णमेघालाही चंदेरी किनार असतेच.

अर्जुनाच्या रथावर राधा कृष्णाचा फोटो लावायला हवा होता.. म्हणजे युद्ध घडलेच नस्ते.. Proud

बघा जामोप्या!
नुस्तं राधाकिसनांचं चित्र टाकतो म्हटलं तर धाग्यावरली भांडणं संपून प्रेमाबद्दलची बोलणी सुरू झालीत.

हे चित्र न लावलेल्या घरांत वाद होत नाहीत असा एखाद्या सर्वेक्षणाचा निष्कर्श आहे का?

याचा काय संबंध? दारु न पिणारादेखील मरतोच म्हणून दारु पिण्याचे समर्थन करता येत नाही ... ( बघा, फोटो लावला आणि लगेच वाद सुरु झाला...तसा फोटो नव्हता तेंव्हाही वाद होताच . )

जामोप्या चित्र लावल्याने वाद होतात आणि न लावल्याने वाद होत नाहीत असे आहे का?

Pages