मेथी पुलाव

Submitted by सशल on 10 July, 2008 - 17:19
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बासमती तांदूळ, धुवून अर्धा तास पाण्यात भिजवून
कांदा
लसूण
आलं
हिरव्या मिरच्या
कोथींबीर
नारळाचं दूध/canned coconut milk
टोमॅटो
मटार दाणे
कसूरी मेथी
लवंग
दालचीनी
थोडी हळद
मीठ
आवडत असल्यास काजू
पुलाव शिजवण्यासाठी लागेल तसं पाणी

क्रमवार पाककृती: 

नारळाचं दूध घरी करायचं असेल तर तांदळाच्या दुप्पट पाणी मोजून ठेवावं .. आणि तेच पाणी वापरावं म्हणजे पाण्याचा अंदाज चुकणार नाही .. canned वापरायचं असेल तर शक्यतो मोजून घ्यावं .. थोडक्यात संपूर्ण रेसिपी मध्ये वापरल्या जाणार्‍या पाण्याचं प्रमाण तांदळाच्या दुप्पट हवं हे ध्यानात ठेवावं ..

तर सगळ्यात आधी, कांदा, लसूण आणि आलं वाटून घ्यावं .. थोडा कांदा बारीक चिरून घ्यावा ..
ह्याननंतर अजून एक वाटण लागेल ते म्हणजे कोथींबीर, मिरच्या, चिमूटभर हळद, लवंग आणि दालचीनी ..
ही दोन्ही वाटणं तयार ठेवावीत ..
तेल गरम करून त्यात अख्ख्या लवंगा आणि दालचीनी परतून घ्यावी .. त्यात चिरलेला कांदा घालून परतावा .. मग त्यात कांदा, आलं आणि लसूण वाटण घालून व्यवस्थित परतून घ्यावं .. Next, चिरलेला टोमॅटो घालावा .. परतणं चालूच ठेवावं .. हे सगळं मिश्रण छान परतून झालं, अगदी तेल सुटेपर्यंत की मग त्यात मटार दाणे, कोथींबीरीचं वाटण, नारळाचं दूध, गरज असल्यास जास्तीचं पाणी, मीठ, कसूरी मेथी आणि तांदूळ घालून एकजीव करून उकळी आणावी .. ह्याननंतर मग झाकून ठेवून, पुलाव शिजवावा ..

आवडत असेल तर काजू तेलात fry करून वरून घालता येतील serve करताना .. मला नेवैद्य दाखवून मेथी पुलाव चा आनंद घ्यावा .. :p

वाढणी/प्रमाण: 
मला रेसिपी देताना exact measurements देता येत नाहीत, त्याबद्दल क्षमस्व .. :)
अधिक टिपा: 

ह्या रेसिपीत, कांदा दोन प्रकारे लागतो, एकदा वाटणासाठी आणि मग नुसताच चिरून तेलात परतण्यासाठी .. तसंच लवंग, दालचीनी ही, वाटणात आणि मग अख्खी तेलात परतावी ..

ह्या पुलाव बरोबर कांदा, टोमॅटो किंवा आवडीप्रमाणे आणखी कशाचंही दह्यातलं रायतं serve करावं .. दह्यातलं रायतं हे छान complement आहे, पुलाव मसालेदार असल्यामुळे ..

माहितीचा स्रोत: 
एक कन्नड मैत्रीण
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी १.५ वाटी तांदुळ आणि त्यात १.५ नारळ दुध घेतले होते पण जरा जास्त झाल्या सारखे वाटले. पण चव मस्त झाली होती. नेक्स्ट टाईम १ वाटी टाकेन. मेथी एवजी केल टाकली होती.

माबो रेसिपीचा धडाका चालु आहे, काल मॅन्गो पाय आज मेथि पुलाव केला, ताजी मेथि वापरली- नारळ दुध नव्हत त्यामुळे ते वगळल, मस्त वेगळ्या चविचा पुलाव खायला मिळाला.
फोटो काढला नाहीये पण मी पुणेकर च्या फोटोसारखाच दिसत होता.

मी १ कप तादुळ, धुवुन चिरुन साधारण दिड कप मेथि अस घेतल होत, अगदि कपात घेवुन मोजली नाही पण साधारण बघुन अन्दाज येतो

Pages