इस्त्राईल पॅल्स्टाईन वाद काय आहे?

Submitted by नंद्या on 15 May, 2011 - 14:17

इस्त्राईलच्या सीमेवरील हल्ले. इस्त्राईल निर्माण झाल्याबद्दल शेजारी देश "दुखवटा" दिवस पाळतात. हे असे का? याची पार्श्वभूमी काय आहे? याबद्दल जाणकार लोक माहिती हवी होती. जुन्या मायबोलीतला धागा सापडला तर तो देखील चालेल.

धन्यवाद !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी (फार खोलात जाऊन नाही) बघितलं जुन्या हितगुजवरचा बीबी मिळतोय का ते .. (मुकूंद ने माहिती लिहीलेली आठवते) .. पण नाही मिळाला ..

थोडक्यात.. जेरुसलेम (इस्त्राईल) म्हणजे ज्यू लोकांचा मुळचा प्रदेश... तो मुसलमानांनी काळाच्या ओघात घेतला. (त्याबद्दल माहिती मला वाचावी लागेल)

हिटलर ने ज्यू लोकांवर केलेले अत्याचार बघता दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांच्यासाठी एक वेगळा प्रदेश काढून देणे अमेरिकेला महत्वाचे वाटले असावे जिथे ते स्वतः:च्या मर्जीने राहू शकतात. ज्यू लोकांची पुण्यभूमी जो जेरुसलेमचा परिसर तोच त्यांना परत देण्यात आला.. तो प्रदेश तेंव्हा पलेस्ताइनचा होता. इथून नवा वाद सुरू झाला. सभोवतालची अरब राष्ट्रे आणि ज्यू इस्राईल...

भू-मध्य समुद्राच्या सर्वात उजव्या टोकाला इस्राईल हा देश आहे... नकाशा पाहिला तर आपल्या कोकणासारखा. अतिशय मोक्याचे हे ठिकाण अमेरिकेने हेरले आणि ज्यू लोकांच्या नावाखाली अजून एक राजकारण खेळले.

थोडेसे अवांतर ... तुला माहित आहे का बेने इस्राईल म्हणजे काय?? 'जुदाव मराठी' म्हणजे काय?
माहित नसेल तर ही लिंक बघ... http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%...

aani ho.. Dont Mess With Zohan चित्रपट पाहिला आहेस का? भारी आहे...:)

थोडक्यात असे
हिटलरच्या उदयानंतर त्याचा ज्यू द्वेश जसजसा भडकू लागला तसतसे जर्मेनी आणि आसपासच्या देशातले ज्यू त्यात होरपळत गेले. त्याकाळी हे ज्यूज युरोपात वेगवेगळे लहानात लहान आणि मोठ्यात मोठे उद्योगधंदे चालवत. जर्मन्सच्या (हिटलरच्या भाषेत 'आर्यन्स') मानाने हे लोक बरेच यशस्वी होते.

मग हिटलरने 'आपण जर्मन आर्यन्स आहोत' हे ज्यू आपल्या देशात उपरे आहेत, आपण ह्यांना संपवले पाहिजे असे काहीसे वेगवेगळ्या थिसरीज मांडून जर्मन लोकांना पटवून द्यायला सुरूवात केली, ह्या ज्यू लोकांची मानसिकता ही जास्तीकरून नफेखोरी आणि उद्योग याभोवतीच केंद्रीत आहे. (म्हणजे जसे आज भारतात आपण म्हणतो...'राजकारण्यांना जात नसते पैशासाठी ते देशही विकायला काढतील') असेच काहीसे हिटलरने जर्मनांच्या गळी उतरवले. आपसूकच वैफल्यग्रस्त जनतेने(?) हिटलरला आपला नेता घोषीत करून पाठिंबा दिला. मग ज्यूंबरोबरच त्याने त्याला नको असलेल्या आणि फॅसिस्ट विचारसरणीला विरोध करणार्‍या किंवा त्याला न पटणार्‍या ज्यूएतर लोकांचा सुद्धा काटा काढलाच. आणि ही अशी सर्व युद्धसदृष्य मोहीम चालू करून त्याने आपली साम्राज्यवादाची आणि युरोपावर एकछत्री अंमलाची योजना मोठ्या हुशारीने प्रत्यक्षात आणण्यास सुरूवात केली.

आता ह्या दरम्यान युरोपातून पळ काढलेल्या जर्मन लोकांनी आश्रयासाठी आकाराने प्रचंड मोठ्या आणि बर्‍यापैकी विचारस्वातंत्र्य असणार्‍या अमेरिकेकडे धाव घेतली नसती तर नवलच. कारण युरोपात कुठेही रहाणे धोकादायकच होते. तसाही पूर्व युरोप त्यांच्या गिणतीत अविकसितच होता. अमेरिकेने सुद्धा संपत्ती आणि बुद्धीमत्ता घेऊन येणार्‍या ह्या लोकांचे स्वागतच केले.

ह्या सगळ्या रणधुमाळी दरम्यान ज्यूसमाजही संघटीत आणि जागरूक होतच होता. आपल्याला रहाण्यासाठी हक्काची जागा नाही म्हणूनच आज ही वेळ आपल्यावर आली हे त्याने ओळखले होतेच.
दुसर्‍या महायुद्धाच्या आधीपासून सुरू झालेले हे स्थलांतर सलग कितीतरी वर्षे चालूच होते. ह्यादरम्यान जात्याच हुश्शार ज्यू लोकांनी अमेरिकेतही तंत्रज्ञान, उद्योगधंदे आणि राजकारणातही आपला चांगलाच दबदबा निर्माण केला होता. आपल्याला आता स्वतंत्र राष्ट्र निर्माणाची गरज आहे हे ओळखून त्यांनी अमेरिकेकडून मदत मिळवण्यासाठी मोठा दबाव आणण्यास सुरुवात केली.
अमेरिकन राजकारण्यांनाही बहूतेक हिटलर प्रमाणेच 'हे लोक आपल्यापासून लांब राहिले तर बरेच' असे वाटत होते की काय कोणास ठाऊक त्यांनीही मदत देण्याचे कबूल केले. मग वसाहती वाढवण्यासाठी ज्युंनी त्यांची त्याकाळी पॅलेस्टाईन प्रांतामध्ये असलेल्या त्यांच्या धार्मिक शहर जेरूसलेमचा रस्ता धरला. असे ही म्हणता येऊ शकते की अमेरिकेनेच ह्या जागेचे भौगोलिक स्थान बघता त्यांना तो दाखवला किंवा हाच रस्ता निवडण्यास भाग पाडले. जेरुसलेमला सुद्धा आपल्या भारतावर झालेल्या यवनी आक्रमणासारखा इतिहास आहेच. ह्या दरम्यान दुसरे महायुद्ध होऊन अमेरिका एक महासत्ता म्हणून उदयाला आली होती.
त्याकाळी इथे रहाणारी पॅलेस्टाईन जनता गरीब अशीच होती, जमीनही ओसाड उजाड होती. आमिषांना भुलून ह्या पॅलेस्टाईन प्रांतातल्या लोकांनी एकर चे एकर जमीन ज्यू लोकांना लिहून दिली. (त्याकाळी बहूतेक ही जमीन पुढे तेलाच्या रुपाने सोनं उगवेल हे ज्ञात नसावे किंवा खनिज तेलाची बाजारपेठही एवढी जोमात नसावी)
दुसर्‍या महायुद्धानंतर काही दोन्-पाच वर्षे गेली आणि मग एके-दिवशी (रात्री) अमेरिकेने पुरवलेल्या पैसा, तंत्रज्ञान आणि शस्त्रास्त्रांच्या जोरावर ज्यू लोकांनी 'हा इस्त्राईल आहे आणि हा आमचा देश आहे आणि आम्ही ह्याचे मालक आहोत आणि आता इथेच रहाणार' असे घोषित करून टाकले.
हे ऐकून सौदी अरेबिया, इजिप्त, जॉर्डेन, येमेन, सिरिया हे सगळे अरब देश खडबडून जागे झाले आणि त्यांची धाबे दणाणले. त्यांच्या संयुक्त फौजा दुसरे दिवशीच इस्त्राईलवर चालून आल्या पण इस्त्राईलने त्यांना लीलया लोळवले.

मग तेव्हा पासून आजतोवर ब्लॅक सप्टेंबर, म्युनिक ऑलिपिंक्स, युएन मधले वाद, इस्ट जेरुसलेम सीमावाद, फिदाईन्स, स्यूसाईड बॉम्बर्स , वेस्टबँक वाद, गाझापट्टी हे आणि अजून अगणित अशा बर्‍याच गोष्टी घडून गेल्या आणि घडत आहेत.

ही माहिती केवळ गोषवारा म्हणूनच आहे, नक्की घटनाक्रम थोडाफार वेगळा असू शकतो.

अमेरिकन राजकारण्यांनाही बहूतेक हिटलर प्रमाणेच 'हे लोक आपल्यापासून लांब राहिले तर बरेच' असे वाटत होते की काय कोणास ठाऊक
त्या काळचे अमेरिकन लोक या बाबतीत हुषार होते!
पण ज्यू लोक त्याहून हुषार, ते अमेरिकेतच राहिले नि अमेरिकेचे पैसे मात्र इस्राएल कडे वळवले!
आता इस्राएल पेक्षा जास्त ज्यू लोक अमेरिकेत रहातात, नि अमेरिकेचे हि दिवाळे वाजले आहे! Happy

त्याकाळी इथे रहाणारी पॅलेस्टाईन जनता गरीब अशीच होती, जमीनही ओसाड उजाड होती. आमिषांना भुलून ह्या पॅलेस्टाईन प्रांतातल्या लोकांनी एकर चे एकर जमीन ज्यू लोकांना लिहून दिली. (त्याकाळी बहूतेक ही जमीन पुढे तेलाच्या रुपाने सोनं उगवेल हे ज्ञात नसावे किंवा खनिज तेलाची बाजारपेठही एवढी जोमात नसावी)>>> हे बरोबर वाटत नाही. कारण इस्त्राईल मधुन काहीच तेल निघत नाही. (रे. हा तेल नावाचा इतिहास आहे)

दुसर्‍या महायुद्धानंतर काही दोन्-पाच वर्षे गेली आणि मग एके-दिवशी (रात्री) अमेरिकेने पुरवलेल्या पैसा, तंत्रज्ञान आणि शस्त्रास्त्रांच्या जोरावर ज्यू लोकांनी 'हा इस्त्राईल आहे आणि हा आमचा देश आहे आणि आम्ही ह्याचे मालक आहोत आणि आता इथेच रहाणार' असे घोषित करून टाकले.

रायडर.. तू म्हणतोस त्याच प्रमाणे नक्की घटनाक्रम थोडाफार वेगळा आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर लगेचच १९४८ साली अरब - ज्यू युद्धा सुरू झाले. तेंव्हा पासून हा वाद कायम आहे..

कारण इस्त्राईल मधुन काहीच तेल निघत नाही.
>>> mandard ... मी ते पुस्तक वाचलेले नाही पण वाचायला आवडेल. कुबेराचे आहे का? 'तेल अवीव'ला तेलाचे साठे आहेत. मी स्वतः याच्याशी निगडीत नोकरीत आहे. मी गेल्यावर्षी ८ महिने इस्राईलदेशी तेल अवीव येथे होतो. तिथे तेल नाही हे चुकीचे आहे असे मला स्पष्ट सांगावेसे वाटते. 'अदीरा एनर्जी' ही तिथली कंपनी तिथे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून तेलाचे अजून साठे शोधते आहे...

(हा प्रतिसाद सर्वोत्तम असल्याने सगळ्यात वर तारांकित केला आहे.)

>>> त्या लिंक वरील लिखाण मला इंग्रजी आणि काहीसे अगम्य भाषेत दिसत आहे... देवनागरी नाहीये... Sad
आधी वाटले कोणी हिब्रू भाषेत लिहिले आहे की काय... Happy

mandard ... मी ते पुस्तक वाचलेले नाही पण वाचायला आवडेल. कुबेराचे आहे का?>> हो. त्यात त्यांनी असा उल्लेख केला आहे. त्यांना बहुतेक सौदीच्या संदर्भात म्हणायचे असेल. पण ते पुस्तक मस्त आहे. जरुर वाच. मी पण oil & gas वालाच आहे पण भारतातला. असो हे जरा विषयाला सोडुन होतेय.

त्या लिंक वरील लिखाण मला इंग्रजी आणि काहीसे अगम्य भाषेत दिसत आहे... देवनागरी नाहीये... अरेरे
आधी वाटले कोणी हिब्रू भाषेत लिहिले आहे की काय...>>>
इंटरनेट एक्स्प्लोररमध्ये लिक उघडल्यास सगळे कोडे उघडेल Happy

रायडर, हजारो वर्षापूर्वी पॅलेस्टिनी लोकानी ज्यूना पॅलेस्टाईनमधून हाकलून लावले होते. व हे परागन्दा ज्यू बहुतेक सर्वच देशात गेले व अंगभूत गुणांवर तगून राहिले. प्रगतही झाले. वेगवेगळ्या शास्त्रात तज्ञही झाले. भारतातही हे ज्यू आले होते. यांची वस्ती रायगद जिल्ह्यात जास्त आहे . मुम्बैत तर आहेतच. अलिबागेत तर आजही इस्त्रायल आळी आहे. अगदी मुन्डासे धोतरावाले शेतकरी ज्यू देखील सुधागड तालुक्यात मी पाहिले आहेत. नस्सेम इझिकेल हे मुम्बईचे कवि प्रसिद्धच आहेत. ज्यू हजारो वर्षे परगन्दा असले तरी मात्र त्यांच्या सर्वाच्या प्रार्थनेत 'पुढच्या वर्षी जेरुसलेम येथे भेटू या' या ओळी गायल्या गेल्याने हजारो वर्ष पॅलेस्ताइनमधली स्वभूमी मिळवण्याची इर्षा हजारो वर्षे तेवत राहिली.
दुसर्‍या महायुद्धात ज्यूंचा अनन्वित छळ झाल्याने या राष्त्राची गरज अगदी ऐरणीवर आली. ज्यू शास्त्रज्ञानी दुसर्‍या महायुद्धात जर्मनी विरोधात नवीन शस्त्रे, अस्त्रे, अणुविज्ञानाची व संशोधनाची दोस्त राष्ट्राना मदत केल्याने, ज्यूंची धुरिणानी ब्रिटीश सरकारला त्यांच्या राष्ट्रासाठी भूमी या बदल्यात मिळवून देण्याची विनन्ती केली. त्यासाठी त्यानी १९१७ मध्ये ब्रिटीश पररष्ट्रमंत्री बाल्फोर याने एका ओळीचे भोंगळ अश्वासन दिले होते की ज्यूना स्वतःची भूमी देण्यासाठी ब्रिटन प्रयत्न करील., त्याची आठवण करून दिली. ब्रिटीशानी नेहमीप्रमाने टाकलेल्या या 'काडीचा' पुढे वडवानल झाला.(हा 'बाल्फोर जाहीरनामा 'म्हणून प्रसिद्ध आहे.) ब्रिटीशानी मध्यपूर्वेतून जाताना परस्पर पलेस्टाईनमधाली भूमी इस्त्रायल साठी स्वतःच आखून दिली व तेथे इस्त्रायल हे ज्यू राष्ट्र होइल असे जाहीरही केले. जमीन देताना न्याय वाटप केले असते तर कदाचित पुढचे प्रश्नही निर्मान झाले नसते.८० टक्के पेलेस्टाइनाना २० टक्के भूमी व २० टक्के ज्यूना ८० टक्के भूमी अशी पाचर त्यानी मारली. त्यामुळे पॅलेस्टीनी आणि शेजारचे अरब याच्या विरोधात एकत्र आले. आणि ज्या क्षणी मध्यरात्री इस्त्रायलच्या निर्मीतीची घोषणा झाली त्याच क्षणी चारही बाजूनी ते राष्ट्र नष्ट करण्यासाठी अरब लीग व पॅलेस्टीनीनी हल्ले सुरू केले. पण अमेरिकेच्या मदतीमुळे व आस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाल्याने इस्त्रायलने आधुनिक तन्त्रज्ञानाच्या मदतीने सर्वांचाच पराभव केला. यासर अराफतने ही पॅलेस्टीनी भूमी मुक्त करण्यासाठी जंग जंग पछडले पण इस्त्रायलच्या बळाला (आणि त्याला असलेल्या अमेरिकन पाठिम्ब्याला) कंटाळून अरब लीगमधल्या बर्‍याच लोकानी कॉम्प्रोमाईज केले. आज तर इजिप्त सारखे देश इस्त्रायलचे आस्तित्व अपरिहार्य मानून त्यांच्याशी व्यापारी करारही करीत आहे.

त्यामुळे इस्त्रायल निर्मीतीत अमेरिकेचा राजकीय रोल फारसा नाही. ती आग ब्रिटीशानी तिथला ताबा सोडताना लावलेली आहे. ब्रिटीशानी आपल्या वसाहती सोडताना कायमस्व्रूपी आगी लावल्या भारत आणि पाकिस्तानचेही उदाहरण तर आपन भोगतोच आहोत. तसेच अफगाणिस्तान आणि पाकिस्तानाच्या वजिरीस्तान , सरहद्द प्रान्त याना अफगाणिस्तान ऐवजी पाकिस्तानात टाकून कायमची धुनी पेटवून दिली आहे Proud

भारतातही हे ज्यू आले होते. यांची वस्ती रायगद जिल्ह्यात जास्त आहे .

>>> होय.. त्यांनाच बेने इस्राईल म्हणतात. ते 'जुदाव मराठी 'ही मराठी भाषेची बोली भाषा वापरतात.

सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या काही कारणांनी ज्यु लोक परागंदा झाले होते. काही लोक भारतात आले होते ते दररोज जेरुसलेम चे स्मरण करत असत. पुढच्या वर्षी ज्युंच्या महत्वाच्या सणाला आपण जेरुसलेम मध्ये असु अशी प्रार्थना रोज केली जात होती. भुमी नव्हती पण प्रखर राष्ट्रवाद किंवा संकल्पना किमान २०० वर्षे टिकुन होती.

पुढे सर्व देश्यातले ज्यु एकत्र आले. सुरवातीच्या काळात आठ तास उपजिवीकेसाठी नोकरी आणि चार तास देशाचे संरक्षण असे अनेक वर्षे कष्ट्प्रद जीवन त्यांनी सोसले. याकरता १०० माणसांचे कुटुंब. सामाईक स्वैपाक आणि लहान मुलांचे संगोपन या शंभर माणसातल्या वृध्दांची जबाबदारी अश्या सामाजिक नव्या संकल्पना सुरवातीच्या काळात देशप्रेम म्हणुन स्विकारल्या गेल्या.

त्यांनी मुख्यम्हणजे त्यांची भाषा विकसीत केली आणि अनेक वेगवेगळ्या देशातुन आलेल्या ज्युंनी वाद न करता ती स्विकारली.

मुस्लिमांना वाईट वाटेल म्हणुन बहुदा आपले इस्त्राईलशी चांगले संबंध नव्हते. त्यातुन पॅलेस्टाईन नेता यासर अराफात यांचे इंदिराजींशी सख्य होते म्हणुन की काय इस्त्राईलचे भारताचे राजनैतीक संबंध नव्हते.

राजीव गांधींची हत्या हा अतिरेकी कारवायांचा भाग आहे हे लक्षात आल्यावर नरसिंहरावजींच्या काळात हे संबंध सुधारले कारण अतिरेक्यांशी सामना करण्याचे तंत्र एका इस्त्राईलने अनेक वर्षांपुर्वी विकसीत केले आहे.

इस्त्राईल मधले पाण्याचे नियोजन आणि फुलांची शेती हा एक वेगळाच धाग्याचा विषय होऊ शकतो.

भारतात आलेल्या ज्यू लोकांपैकी अनेक लोक परत गेले. त्यांना तिथे सरकारने घर - जमीन असे सर्व काही दिले. जे लोक गेले त्यांचे अनेक नातलग अजूनही मोठ्या संखेने ठाणे - रायगड मध्ये राहतात.

माझे एक सर ज्यांचे नाव मोझेस कोलेट होते. ते ज्यू होते आणि उत्तम मराठी बोलत. त्यांनी मला जुदाव मराठी आणि बेने इस्राईल बद्दल सांगितले होते.
बेने इस्राईल ही आता दक्षिण इस्राईल मध्ये राजकारणात सक्रीय असा गट आहे..

मुस्लिमांना वाईट वाटेल म्हणुन बहुदा आपले इस्त्राईलशी चांगले संबंध नव्हते. त्यातुन पॅलेस्टाईन नेता यासर अराफात यांचे इंदिराजींशी सख्य होते म्हणुन की काय इस्त्राईलचे भारताचे राजनैतीक संबंध नव्हते
>> मुस्लीमाना वाईट वाटण्याचा प्रश्न नाही. दुसर्‍या महायुद्धानन्तर दोन्ही महासतांच्या आहारी न जाता तिसर्‍या जगाची पुनर्मांडणी करण्याचा प्रयत्न नेहरूंनी अलिप्त राष्ट्र चळवळ (नॅम) आधारे केला होता त्यात युगोस्लाव्हियाचे मार्शल टिटो, नेहरू,इंडोनेशियाचे डॉ सुकर्णो, घानाचे क्रुमाह यांचे सह इजिप्तचे गमाल अब्देल नासरही होते. अमेरिकेच्या कच्छपि न लागल्याने वर पुन्हा आण्खी अलिप्त राष्ट्राना संघटीत करण्याच्या प्रयत्नामुळे अमेरिका भारताला पाण्यात पहात होती. त्यामुळे भारत इजिप्तशी कमिटेड राहणे अगदी साहजिक होते. शीतयुद्धाच्या काळात रशियाशी केलेल्या करारांमुळे अमेरिकेचे भारताशी सख्य नव्हतेच. त्यामुळे अमेरिकेचे लाडके बाळ असलेल्या इस्त्रायलला भारत जवळ करील याची शक्यता नव्हतीच. त्यामुळे बराच काळ भारताने इस्त्रायलला मान्यताच दिली नव्हती. त्यांची एक कॉन्स्युलेट मुम्बईत होती.त्यात तेलाच्या बाबतीत आपण पूर्णतः अरब देशांवर अवलम्बून असल्याने इस्त्रायलसाठी आपण आपली तेलाची आबाळ करण्याचे कारण नव्हते.भारतातल्या उजव्या शक्ती आणि भांडवली व्यवस्थेचे कौतुक करनारी मोरारजी देसाईंसारखी माणसे इस्त्रायलची भलामण करीत. जनता पक्षाच्या काळात इस्त्रायलचे मोशे दायान गुपचूप राजकीय प्रोटोकॉल न पाळता मोरारजीना भेटून गेल्याने त्या काळी मोठा गहजब उडाल्याचे आठवते. अर्थातच इन्दिरा गांधी आणि यासर अराफत यांचे सख्य असणे ओघाने आले. इन्दिरा गांधींच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या अराफात यांचे साश्रु फोटोही प्रसिद्ध झाले होते. आमची बहीण आज गेली असे काहीसे उद्गार त्यानी काढले होते.
हिटलरने केलेल्या छळामुळे व प्रखर राष्ट्रवादी वृत्तीमुळे बहुतेक लोकांची सहानुभूती इस्त्रायलला होतीच. पण कॅम्प डेविड करारानन्तरही इस्त्रायलने पॅलेस्टीनींच्या विरुद्ध जो हिंसाचार चालू ठेवला आहे व पॅलेस्टीनी लोकांच्या मानवी हक्कांची पायमल्ली चालवली आहे त्यावरून इस्त्रायली हिटलरपेक्षा तसूभरही कमी नाहीत हेच दिसून येते. पॅलेस्टीनी सरकारशी मवाळपंथी वाटाघाटी करणार्‍या आपल्याच नेत्याना मारण्याचे सत्र त्यानी सुरू केले आहे.शीतयुद्धाच्या समाप्तीनन्तर गरज राहिली नसल्याने इस्त्रायलला अगदी प्रोफेशनल असलेली अमेरिकाही कंटाळली आहे.

हो, पण त्यात अर्वाचीन घटना क्रम नाही शिवाय ते फिक्शन आहे त्यातून बर्‍याच गोष्तींचा उलगडा होत नाही. वरच्या चर्चेतून आज भारताशी इस्त्रायल या राश्ट्राचे संबध कसे आहेत ते कळत नाही.पेलेस्टिनी लोकाना फिलिस्तानी ही म्हनतात ते का? ते अरब आहेत का?

या वादाचे मूळ काय आहे हे कळायला लागते ते पुस्तक वाचल्यावर!! यात १९७० नंतर ची हकिकत नाही कारण त्याच सुमारास ते प्रकाशित झाले !!