Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
या शनिवारी
या शनिवारी मला ५० जणांच्या बार्बेक्यू पार्टी साठी तंदूरी चिकन न्यायचे आहे. फक्त चिकन नाहिये त्या मुळे प्रत्येकी २-३ पीसेस आले तरी चालतील. किती चिकन लागेल? मी शेरवूड ची तयार पेस्ट दह्या मधे मिक्स करून करावे असे म्हणत आहे. ठीक होईल का? कोणी आधी नेले असतील आणि काही अजून टिप्स असतील तर नक्की द्या. मी आधी कधी केले नाहिये त्या मुळे जरा भीती वाटत आहे.
अंदाज मला
अंदाज मला देता येणार नाही पण शेरवूडपेक्षा पाटक्सची तंदूरी पेस्ट बरी वाटते.
पाटक्सची
पाटक्सची तंदूरी पेस्ट इथे मिळेल का माहित नाही.
मी तोक्यो मधे आहे. इथे शेरवूड पण अलिकडेच मिळायला लागले आहे.त्यामुळे इलाज नाही.
घरी एवढे सगळे वाटण-घाटण करायची इच्छा नाही आहे.
गौरी, इथे
गौरी, इथे पहा -
http://www.maayboli.com/node/7485
वेगवेगळ्य
वेगवेगळ्या फळांचे शोर्बे, किंवा मूस करता येईल. यात दूध नसते.
कोणाला
कोणाला ब्रोकोलीची भाजीची रेसिपी महित आहे का? प्लिज मला सांगा.
ब्रोकोलीच
ब्रोकोलीची भाजी - http://www.maayboli.com/node/7497
उत्तर
उत्तर भारतात दिल्लीकडे आलू टिक्की चना म्हणून एक चाटचा प्रकार मिळतो. त्याची कृती कोणाला माहीत आहे का? मला शनिवारी मैत्रिणीकडे करून न्यायचा आहे. शिवाय त्यांची 'इमली की मीठी चटनी' ची पण कृती सांगा कोणाला माहीत असेल तर.
आलू टिक्की
आलू टिक्की चना म्हणजे मुंबईचा रगडा पॅटीस.
उकडलेल्या बटाट्यात आलं लसूण कांदा कोथिंबीर हिरवी मिरची बारीक चिरून, मीठ, थोडा लिंबू किंवा आमचूर मिसळून घेऊन त्याचे ब्रेड क्रंब्स मधे घोळून पॅटिस तळायचे. त्यावर काबुली चणे भिजवून उकडून छोल्यांपेक्षा जरा कमी मसालेदार अशी ग्रेव्ही करुन घ्यायची. पॅटिसवर ही ग्रेव्ही, बारीक चिरलेला कांदा , टॉमेटॉ, इमलीची चटणी, दही, पुदिना कोथिंबीरची हिरवी चटणी, थोडा चाट मसाला घालायचा वरून.
इमली चटणी साठी समप्रमाण चिंच, खजूर, अन चिंचेच्या अर्धा ( साधारण) गूळ , मीठ , थोडं तिखट , पाणी घालून उकळायचं १०-१२ मिनिटं. गार झालं की हँड ब्लेंडर ने एकजीव करून गाळून घ्यायचं. फ्रीझमधे १०-१५ दिवस आरामात टिकते .
कोणी मला
कोणी मला कार्ल्याची भाजीची रेसिपी सांगु शकेल का?...माझी ही भाजी नेहमी फसते
दिनेशदा
दिनेशदा आणि बाकी इतर जाणकार मंडळी..मला बार्बेक्यू पार्टी साठी तंदूरी चिकन न्यायचे आहे ते किती लागेल हे सांगा ना.५० लोक आहेत.आणि कसे करू? कोणी आधी केले असेल तर अनुभव शेअर करा ना.
सावली,
सावली, http://www.maayboli.com/node/3058 ही भाजी हमखास छान होते.
५०
५० लोकांपैकी सगळेच चिकन खाणारे आहेत का ?
तंदूरी चिकनमधे फॅट नसल्याने जास्त खाल्ले जाते. साधारण ४ माणसाना एक चिकन असे प्रमाण घ्यावे लागेल.
बाकिचे पदार्थ असतीलच ना ?
कोणी Mango
कोणी Mango मलाई बर्फीची recepie सा॑गु श़़़़़़़़़़केल का ?
धन्यवाद!
प्रिया,
प्रिया, तुम्ही मेक्सिकन फ्लान बनवू शकता. आदल्या दिवशी करून ठेवता येतो.
पन्ना यांनी लिहिलेली कृती मधे.
सॅम्स क्लब
सॅम्स क्लब मध्ये मिळणारा बासमती तांदुळ कोणी वापरता का तुम्ही??कसा आहे? तिथला जास्मीन राइस आंबेमोहोर सारखा लागती, हे खरं आहे का??
खुप असतो ना(quantity)..आणुन फसायला नको म्हणुन ही आगाऊ चौकशी....:)
मी सध्या
मी सध्या वापरत आहे, सॅम्स क्लब मध्ये मिळणारा बासमती तांदुळ छान आहे.
मी देखील
मी देखील सॅम्स क्लब मध्ये मिळणारा बासमती तांदुळच वापरते. नेहमीच चान्गला निघतो.
केकमधे
केकमधे बटर न वापरता कनोला ऑईल वापरले तर चालत का? चव तशिच लागते का?(कुणाला रेसिपि माहित असेल तर द्या)
प्राजक्ता
प्राजक्ता
हो केकमध्ये मी कनोला ऑइल वापरलेले आहे. मला स्वतःला चवीत फारसा फरक वाटला नाही. तुला कुठल्या प्रकारच्या केकेची कृती हवी आहेत?
http://www.maayboli.com/node/6682 इथे मी लिहीलेल्या अॅपल-सिनेमन केकच्या कृतीत तेल वापरायचे आहे. कनोला ऑइल वापरुन मी हा केक केलेला आहे.
अगदि सिंपल
अगदि सिंपल रेसिपि हवी
केक फक्त लेकिला खुप आवडतो..बाकि मला फारसा आवडत नाहि..तु दिलेली लिंक बघते.
कोणी
कोणी शिरखुर्मा कसा करतात सांगु शकेल का?? एकदा प्रयत्न केला होता पण दुध आटत जात तसतशी शेवया घट्ट होतात. मला अगदी पातळ, पिता येईल असा हवाय.
-------------------------
दुष्परिणाम माहीत असुनही केलं जाणारं व्यसन म्हणजे कट्टा.
शिरखुर्मा
शिरखुर्मा घट्टच असतो. त्याला खसखस, बडिशेप वगैरे वाटून लावलेले असते. साध्या खीरीची सविस्तर चर्चा इथे आहे.
गुलकंदाची
गुलकंदाची कृती हवी आहे. लवकर लिहा. आभारी आहे.
सालीच्या
सालीच्या मूगडाळीऐवजी सालीची उडीद डाळ आणली आहे चुकून. तिचं काय करता येईल?
- गौरी
http://mokale-aakash.blogspot.com/
वेगवेगळ्य
वेगवेगळ्या वरणांमध्ये वापरता येईल, दाल माखनी मध्ये अख्ख्या उडदाऐवजी अशी डाळ चालु शकते. मी इथेच मा-चनेकी दाल अन मिक्स दाल अश्या दोन कृती लिहिल्या होत्या. त्या दोन्हींमध्ये अशी डाळ वापरता येते.
प्राजक्ताने मिसळीच्या वरणाची कृती लिहिली आहे, त्यात पण ही डाळ वापरली आहे..
http://www.maayboli.com/node/4922
http://www.maayboli.com/node/4861
http://www.maayboli.com/node/4966
धन्यवाद
धन्यवाद अल्पना. नवरोबाला मा की दाल आवडत नाही. मी मिसळीचं वरण केलं एकदा, ते मस्त होतं ... पण डाळ फारच थोडी संपली त्यात. (या वेगाने अजून दोन वर्षे लागतील ती संपायला
) त्यामुळे अजून काही करता येईल का याचा विचार करत होते.
- गौरी
http://mokale-aakash.blogspot.com/
मला
मला स्वत:ला पण मा की दाल आवडत नाही..पण मिक्स डाळीत अन चण्याबरोबर, मिसळिच्या वरणात आवडली होती काळी दाळ.. बाकी अजुन काही आठवल तर सांगेन.
घरी गुलकंद
घरी गुलकंद करायला फार वेळ लागतो रे बी. त्यापेक्षा तयार गुलकंद का नाही आणत. पुण्यात नक्की चांगला गुलकंद मिळत असणार.
घरी करायचा असेल तर गुलाबाच्या पाकळ्या धुवून सुकवून त्या पाकळ्या व साखर असे आलटून पालटून थर लावून बरणी बरेच दिवस उन्हात ठेवायची असते.
कोणाला
कोणाला उ.भा. मध्ये मिळणारी पुरी/कचोडी -सब्जी मधली सब्जी ची पा.कृ. माहिती आहे का?
ही बहुतेक आलु-टमाटर ची रस वाली भाजी असते आणि चटपटीत चव असते.
हल्दीराम मध्ये मस्त मिळते...
----------------------------------------
मै जिंदगी का साथ निभाता चला गया ...
Pages