मां चनेकी दाल

Submit to kanokani.com

रेसिपी वाटतेय तरी चांगली. पण मां की दाल म्हणजे मराठीत कुठची डाळ??

साधना.

ऍशबेबी,
आपली आई जी जास्तीत जास्त वापरते, ती आपल्यासाठी 'मां की दाल' असते. अर्थातच ती प्रत्येकीसाठी वेगवेगळी असणार. कुणाची आई मूग जास्त वापरत असेल तर कुणाची आई तूर... फिदीफिदी

विनोद बाजूला ठेवून,
मा (मां नाही!) की दाल म्हणजे अख्ख्या उडदांची डाळ.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
बेबस पे करम कीजिये सरकार-ए-कविता...

श्रद्धा म्हणतेय ते बरोबर आहे...अख्ख्या उडदाची डाळ किंवा काळी साल असलेली उडदाची डाळ...
ए पण माझी आई तुरीची डाळ वापरते जास्त... स्मित

अल्पना, रेसिपी छान आहे.
एक शंका/प्रश्न आहे, डाळ घोटायची का थोडीफार अख्खी दिसायला हवी?

हि मा कि दाल शिजवल्यावर चिकट आणि थोडी बुळबुळीत होते न.. मागे उडदाच वरण केलेल पण फारस आवडल नाही .
पण हि मा चनेकि दाल एकदा ट्राय करेन. स्मित

हि मा कि दाल शिजवल्यावर चिकट आणि थोडी बुळबुळीत होते न.. मागे उडदाच वरण केलेल पण फारस आवडल नाही .
>>> नुसती उडिद डाळ चिकट्च होते त्यासाठी इतर डाळि जस तुर्,मुग्,हरभरा डाळी (शक्य असल्यास सालिसहित घ्याव्या) घालुन करावे. 'मिसळिचे वरण' करता येईल, ते जरा कमि चिकट होते.

उडीद, मूग यांच्या डाळी तांबूस भाजून घेऊन मग शिजवल्या तर बुळबुळीत होत नाहीत.

धन्यवाद सुगरणींनो स्मित

थोडीशी घोटायची, नेहेमीच्या वरणाप्रमाणेच.

हाय अल्पना करून बघणार.

रेसिपी मस्त.. करून बघेन.. स्मित
काळी साल असलेली उडदाची डाळ.. माझी आई (बहुतेक) यालाच उड्दाचा डोळ म्हणते.

साल असलेल्या डाळीला, डोळ असा शब्द वापरतात.

धन्यवाद अल्पना, आजच करुन बघते स्मित

आज केली होती, छान झाली.फक्त मी स्लो कुकर मधे शिजवून घेतली, आणि गरम असतानच थोडी हॅन्ड ब्लेंडर ने घोटून घेतली. ह्यालाच दाल माखनी म्हणतात ना?

नाही.. दाल माखनी वेगळी. इथे दाल माखनीच्या बर्‍याच कृती आहेत जुन्या माबोवर.
अशात करणं झालं तर माझी कृती पण टाकेन.

उडीद, मूग यांच्या डाळी तांबूस भाजून घेऊन मग शिजवल्या तर बुळबुळीत होत नाहीत.>>> मी नेहमी मुगाची करते, पण उडदाची बुळबुळीत होत नाही ?? का?

अल्पना यात चण्याच्या डाळिऐव़जी राजमा सुद्धा पहिला आहे बर्‍याचदा.