Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
डाळ वाटुन,
डाळ वाटुन, वाटली डाळ, भजी, वडे करता येतील, ते घालुन मसाल्याची आमटी करता येइल. फलाफेल करता येइल. डाळ परोठा / कचोरी करता येईल किंवा मनुस्विनीचे लाडू ही करता येतील.
भिजवलेल्य
भिजवलेल्या डाळीचे पिठले, चटणी अप्रतीम लागते.
मनुस्विनी
मनुस्विनीचे लाडू करायचे तर डाळ कशाला ? :p
पण कैरीचीच डाळ करा ना ? बाकी कशाला पाहिजे ?
धन्यवाद ..
धन्यवाद .. मनु , अश्विनी, सिन्ड्रेला.
मिलिन्दा
पूनम, चिंच
पूनम, चिंच आणि टोमॅटो घालुनही बिसिबेळेभात आंबट नसतो. ह्याबरोबर कांदा-टोमॅटोची दह्यातली कोशिंबीर छान लागते. हॉटेलात मागवलात तरी हीच कोशिंबीर, लोणचं आणि तळलेला पापड देतात. चिंचभाताबरोबर गोडसर दही किंवा ताक चांगलं लागतं. तिखट आणि आंबट भाताची जळजळ जाणवत नाही.
आस, त्याची
आस, त्याची आमटी करू शकतेस. वाटलेल्या डाळीची आमटी छान लागते. डाळ वाटली नसेल तर एक टोमॅटो टाक वाटून सूप झाले की. नाहीतर सारू बनव. रेसीपी आहे जुन्या माबो मी टाकलेली.
वाटलेल्या
वाटलेल्या डाळिच खमण छान होईल. किंवा ढोकळा.
सारु बघते
सारु बघते करुन.
धन्यवाद मनु आणि आर्च.
धन्यवाद
धन्यवाद दिनेश आणि मृण्मयी.
भरलेली
भरलेली हिरवी मिरची कशी करतात?
दोन
दोन प्रकारे करता येते(मला माहित असलेले)
१. बटाटे उकडुन स्मॅश करुन, जीरे,धने पुड, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ घालुन फोडणीत परतुन घेणे. हे स्टफिंग सिम्ला मिरचीचे देठ काढुन भरणे आणि फोडणी करुन पाणी न घालता बारीक गॅसवर शिजवुन धेणे.
२.बेसन भाजुन त्यात जीरे,धने पुड, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ, आमचुर पावडर किंवा लिंबु घालुन वरील प्रमाणे स्टफिंग भरुन, नॉनस्टिक भांड्यात फोडणी करुन मिरच्या झाकुन ठेवुन शिजवुन घेणे.
दोन्ही प्रकार मस्त लागतात.
भरलेली
भरलेली हिरवी मिरची कशी करतात?>>मला वाट्ले सिम्ला मिरची म्हणुन मी वरील पाककृती लिहील्या.
तुम्हाला, जी तोंडी लावतात ती म्हणायचे आहे का?
टिकाऊ
टिकाऊ सांडगी मिरच्या वाळवण मधे असणार. एरवी भरली भेंडी वगैरे जे प्रकार आहेत, त्यात ताज्या भरल्या मिरच्या असणार.
जरा जास्त डिटेल्स मिळाले तर आणखी सूचवीन.
मी लिहायला
मी लिहायला चुकले... मिरची च लोणच मला विचारायच होत...
सुरभी ,
सुरभी , तुमची एक चूक अन त्यावर चार पोस्ट्स
**********************************************
ऐसी चले जब हवा ........ इश्क हुआ ही हुआ !!
आता पाचवी
आता पाचवी पोस्ट..
वर लिहिलेल्या सिमला मिर्ची प्रकार दोन मध्ये मी भरण म्हणुन डाळींब्या +इतर मसाला भरुन शिजवते.. मस्त लागतात...
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...
पांढरे
पांढरे ढोकळे ( पातळसर स्लाईसेस असतात पिवळ्या ढोकळ्यापेक्षा ) कसे करायचे कोणाला माहित असल्यास कृती लिहा प्लीज
शोनू, मी
शोनू, मी गिट्स चं 'खट्टा ढोकला मिक्स' आणून बनवते. त्यात साखर, आल-हिरवी मिरची पेस्ट, कॉर्न दाणे घालते. वरून अख्ख्या हिरव्या मिरच्यांची चरचरित फोडणी. चांगले लागतात.
शोनू, इथे
शोनू, इथे माज्या एका मैत्रिणीने लिहिली आहे बघ - http://www.anothersubcontinent.com/forums/lofiversion/index.php?t2352.html
मी पण
मी पण खट्टा ढोकला मिक्स आणून बनवते. छान बनतात.
कोणाला
कोणाला व्हेज. कोल्हापुरीची कृती माहीती आहे का?
प्राजक्ता
पाच पोस्ट
पाच पोस्ट झाल्या पण हव ते कोण सांगतच नाही....
हिरव्या
हिरव्या मिरच्यांना स्लिट द्यायची. त्यात मोहोरीची पुड, मीठ, लिंबाचा रस घालायचा. भरपुर तेलाची फोडणी करुन गार झाल्यावर सगळं मिसळायचं. ४-५ दिवसात मुरेल.
थॅन्क्स...
थॅन्क्स... हे सगळे प्रकार पहिल्यांदाच करतीये... आधी नेहमी आईकडून बाटल्या येत....
सुरभी,
सुरभी, मिरच्यांच्या लोणच्याच्या बर्याच कृति आहेत माबोवर , अर्थात शोधाव्या लागतील.
प्रजा, व्हेज कोल्हापुरी हा हॉटेलवाल्यांच्या सुपीक डोक्यातून आलेला एक प्रकार आहे. काहितरी तिखटजाळ करुन त्याला हे नाव देतात, प्रत्यक्ष कोल्हापुरातल्या घरात हा प्रकार होत नाही. तिथे होणार्या भरली वांगी, भरली दोडकी, मटकी, झुणका यांची सर क्वचितच कुठल्या हॉटेलमधल्या खाण्याला येते.
परंपरा चा एक तयार मसाला मिळतो, तो वापरुन हॉटेलसारखी व" व्हेज कोल्हापुरी " बनु शकते.
धन्यवाद
धन्यवाद दिनेश!
प्राजक्ता
हाय सुरभी,
हाय सुरभी, मी खर तर ह्या ग्रुपची सदस्य नाहीये पण माझ्या आईला एक रेसिपी शेअर कराविशी वाट्तीये,हे लोणचं अफलातून बनतं!
१/४ कि. हि. मिरच्या
१ वाटी तेल
१ वाटी लिंबू रस
३/४ वाटीला थोडे कमी मीठ
१/२ वाटी मोहोरीची डाळ
२ टि.स्पू. मेथ्या
२ टि.स्पू. हळद
२ टि.स्पू. हिंग
* मेथ्या तेलावर लालसर भाजून बारीक पूड करणे
* मोहोरी डाळ लिंबाच्या रसात फेसून त्यात १ च. हळद व १ च. हिंग , मीठ , मेथी पूड घालणे. त्यातच मिरच्यांचे तुकडे कालवावे.
*तेल गरम करुन त्यात दिड चमचा मोहोरी, १ च. हिंग व १ च. हळद घालून फोडणी करावी व पूर्ण गार झाल्यावर मिरच्यांवर ओतावी. मस्त होते. try करुन कळवा नक्की!
थॅन्क्यू..
थॅन्क्यू.. चकली, अम्रुता,, उद्या नक्की करुन बघीन आणि कळवीन...
मोहरी
मोहरी फेसणे, तुप फेसणे वगैरे भरपुर वेळा वाचलेय. पण हे नेमके करायचे कसे?
मी तुप फेसताना पाहिलेय. ताटात तुप घेऊन ते चमच्याच्या पाठीने खुप वेळ घासले होते. फेसायची क्रिया अशीच करायची असते काय? आणि तुप/मोहरी बरोबर आणि पुर्ण फेसली गेलीय हे कसे ओळखायचे?
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...
मोहरी
मोहरी फेसण्यासाठी साधारणपणे मोहरीची डाळ घेतात. ती मिक्सरमधे घालुन जरा वाटून घ्यायची. मग मिक्सरमधेच पाणी ( आणि इतर जिन्नस ) घालायचे आणि थोडा थोडा वेळ मिक्सर फिरवत रहायचा. ( व्हीपींग ) थोड्या वेळाने घट्ट्सर द्राव तयार होतो. साधारण कढीसारखा. आणि त्याचा जपुन वास घ्यायचा. हा वास एकदम डोक्यात शिरतो. मोहरी फेसली गेल्याची हिच खुण आहे. पुर्वी मोहरी हाताने फेसत असत. पण त्याला वेळ लागतो. त्या मानाने मिक्सरमधे लवकर फेसली जाते.
यात मग बाकिचे जिन्नस घालतात. बंगाली बायका मोठ्या प्रमाणावर अशी मोहरी फेसून ठेवतात. ( त्याला बहुतेक कोसुंदी म्हणतात ) ती बरीच टिकते. (फ्रीजबाहेरही ) मोहरीचा स्वाद पाण्यात फेसल्यानेच बाहेर येतो. ( माझ्या रंगीबेरंगी वर जास्त माहिती असेल बहुदा )
Pages