पोळी - चपाती - फुलके इत्यादी संदर्भात चर्चा

Submitted by क्ष... on 28 April, 2011 - 17:04

मायबोलीवर दर दोन महिन्यांनी पोळ्या नीट होत नाहीत, तवा कोणता वापरू? पीठ कोणते वापरू अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. ते सगळे एकत्र करण्यासाठी हे पान.

भाकरी आणि फुलक्यांचा व्हिडीओ - http://www.maayboli.com/node/14935

जुन्या मायबोलीवरील पोळ्यांची चर्चा इथे आहे - http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/4519.html

अजुन एक चर्चा इथे पण मिळेल - http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/111686.html?1225813423

माझे काय चुकले? आणि युक्ती सांगा या दोन्ही बा.फ. वर यासंदर्भात असंख्य वेळा विचारले गेले आहे. तेच सर्व इथे डकवले जाईल.

पोळ्यांसाठी कोणता तवा चांगला? ते इथे सापडेल
- http://www.maayboli.com/node/25369
जुन्या मायबोलीवरची तव्यासंदर्भातली चर्चा इथे आहे - http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/103164.html?1157632534

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या भाकरी ला पापुद्रा काही केल्या येत नाही, फुलका स्टाईल केले तरी.>>> परातीत पीठ टाकून त्यावर भाकरी थापायची. मग ती खालची बाजू वर येईल अशी भाकरी तव्यावर ठेवायची. त्यानंतर भाकरीला पाणी लावायचे. ते पाणी पुर्ण सुकू द्यायचे नाही. जरा कोरडे झाले कि भाकरी उलटी करायची. ती बाजू भाजली कि भाकरी टम्म फुगते. छान पापुद्रा येतो.

अभिनंदन आदू.

माझ्या पहिल्या एक दोन पोळ्या नेहमी तव्याला चिकटतात. तवा जास्त तापतो का? पुरेसे तापलेला आहे की नाही ते कसे ओळखायचे? जास्त तापला असेल तर डोसा करतो तसे पाणी (बिनमिठाचे) शिंपडून होईल का?

माझ्या पहिल्या एक दोन पोळ्या नेहमी तव्याला चिकटतात. तवा जास्त तापतो का?>>>>>>>>>
हो,तवा जास्त तापला आहे.सुरुवातीला मध्यम आचेवर ठेवा. चपातीला आच जास्त मोठी नको भाकरीला चालेल.हे मी लोखंडाच्या तवा आहे हे समजून लिहिलय.

भाकरी सॉफ्ट होण्या साठी काय करता येईल ?
सॉरी खूप बेसिक प्रश्न - - पाण्यात कणिक टाकून ते फ्रिज मध्ये ठेवायचे कि बाहेर ?

Submitted by शोधक on 5 July, 2022 - 16:46
जर नवशिक्या असाल तर दररोजएक भाकरी करत राहा हळूहळू जमेल.
शाळू मिळाले तर बघा सगळीकडे मिळते का ते माहीत नाही पण सांगली कडे नक्की मिळेल.शाळवाच्या भाकरी कुणालाही लवकर जमतील.याला उतोनी/उतवनी काही लागत नाही कारण पीठात चिकटपणा अंगचाच असतो.पीठ दळून आणले की लगेच केल्या भाकरी तर एकदम पाच ते सहा भाकरीचे पीठ मळून ठेवता येते.शाळवाच्या भाकरी पांढर्याशुभ्र, पातळ आणी पापुडाही छान येतो.

@सोना पाटील म >> खूप धन्यवाद !!

शाळू हे ज्वारीचेच नाव आहे ना ? कि ज्वारी चा वेगळा प्रकार आहे ?
पुण्यात पाहतो मिळतंय का ..
तुम्ही सांगितल्या प्रमाणे करून पाहतो ..

शोधक, शाळु म्हणजेच ज्वारी. पण उत्तम प्रतिची ज्वारी. ज्वारीचच अधिक चांगल वाण. (महाग पण)पण सायंटीफिकली काय असेल ते मला नाही माहित. साधा गहु vs शरबती गव्हासारखा फरक.
तुम्ही पुण्यात असाल तर सोहमचे ज्वारीचे पीठ वापरून बघा. उत्तम भाकरी होते. अलिकडे अमेरिकेत ते मिळते आणि मी तेच आणते.
पीठ चांगले मळुन घ्या. आणि अगदी छोट्या फुलक्या एवढ्या भाकरी करा. पीठ चिकट असते त्यामूळ लाटले तरी चालते.

दूधात पीठ भिजवलं तर चपाती मऊ होते. त्यालाच दशम्या म्हणतात ना?

नवीन Submitted by सामो on 15 July, 2022 - 21:33

होय. पण दशम्या चपातीपेक्षा जाड करायच्या असतात.

शाळू हे ज्वारीचेच नाव आहे ना ? कि ज्वारी चा वेगळा प्रकार आहे ?
पुण्यात पाहतो मिळतंय का ..
तुम्ही सांगितल्या प्रमाणे करून पाहतो ..

Submitted by शोधक on 15 July, 2022 - 21:58

शाळू ज्वारीचाच एक प्रकार आहे.जसे जुंधळे,हायब्रीड,कारजुंधळे.
माहेरी शाळू आणी सासरी जुंधळे,हायब्रीडच्या भाकरी करतात.त्या जमिनीत जे वाण पिकेल चांगले ते पिकवतात.
इकडे शुगर पेशंट हायब्रीडच्या भाकरी खातात.शाळू जरा गोडसर असते.आणी भाकरी खूपवेळ मऊसर राहाते.कठीण येत नाही लवकर.

घडीच्या मऊसुत पोळ्या (चपाती) हव्या असतील तर कणीक घट्ट मळून पुर्ण बुडेल इतक्या पाण्यात ठेवतो रात्री. सकाळी कणीक पुन्हा मळून पोळ्या केल्या तर कशाही दर्जाचा गहू असला तरी पोळ्या रेशमासारख्या मऊ होतात. >> म्हणजे कणिक ज्या भांड्यात ठेवली आहे ते भांडे बुडेल इतक्या पाण्यात रात्री ठेवायचे असेच ना ?

<<तासभर ठेवलं तरी पुरतं>>
ओके, याने अजून सोयीस्कर झाले.
सध्या पोळ्या केव्हातरी करत असल्याने आणि ते सकाळी ठरत असल्याने असे करून बघायचे राहून गेले. पुढल्या वेळी करूनच बघतो.

Pages