नावात काय आहे ? ( पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे )

Submitted by मेधा on 28 April, 2011 - 13:19

जवस= अळशी का याबद्दल वर्षानुवर्षे प्रश्न येत आहेत. त्याच अनुशंगाने ढेमशे म्हणजे काय ? वाळकी भोकरं हा प्रकार शाकाहारी की मांसाहारी ? तिसर्‍या म्हणजे क्लॅम्स की स्कॅलप्स ? भारतात चक्क्याला कॉटेज चीझ म्हणतात तर अमेरिकेत मिळणारे कॉटेज चीझ वापरून श्रीखंड करता येईल का ?
चिलगोझा म्हणजे काय ? इत्यादी प्रश्न सतत येत असतात. पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे. कधी कधी एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक
या संबंधी माहिती देण्याघेण्यासाठी हा धागा .

जवस = अळशी = फ्लॅक्स सीड्स याबद्दल धागा http://www.maayboli.com/node/9103

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेधा शिर्षकावरुन काहीही बोध होत नाहीये. ह्यामुळे हे सगळे प्रश्न 'पा कृ मा आ का?' ह्या धाग्यावरच येत रहातील. काही तरी अर्थपूर्ण शिर्षक दे प्लीज.

हे प्रश्न तुलाच पडले आहेत का? का उदाहरणे देते आहेस फक्त?

ढेमशे म्हणजे टिंडे (हिंदीत?)
चिलगोजा म्हणजे इंग्रजीत पाईन नट
भारतात कॉटेज चीज चक्क्याला म्हणत नाहीत. पनीरला म्हणतात.

दुसरं समर्पक नाव सुचवा ?
मदतसमिती - पाकृ माहिती आहे का अन युक्ती सुचवा च्या हेडर मधे या धाग्याचा दुवा देता येईल का ?

उदाहरणच आहे गं.
विमला पाटलांच्या कारकिर्दीत फेमिनामधे चक्क्याला पण कॉटेज चीझ म्हणत असत.

चिलगोझा अन pignoli हे सर्च करून पहा वेगवेगळे दाणे आहेत. पाइन नट्स हे नाव त्यातल्या त्यात जवळचे आहे.

भारतात दालचिनिच्या वृक्षाची पाने तेजपत्ता म्हणून वापरतो. भारतीय इंग्रजीत त्याला बे लीफ म्हणतात. अमेरिकेत, फ्रांसमधे बे लीफ म्हणजे लॉरेल नावाच्या झाडाची पाने ( सीझरच मुकुट याचाच असायचा ) .

दोन्ही पाने शेजारी ठेवून बघितली तर स्ट्र्क्चर अन वास यातला फरक नीट कळतो.

मी आजच सकाळी नेटवरून माशांबद्दलची ही लिस्ट शोधून काढली

(English Name) (Marathi Hindi Name)
----------------------------------------------------------------------------------
Mackerel Bangda
Black Pompret Halwa / Sagoti(Kayi)
Seer fish /King Mackerel Fish Surmai / Visonu/ Viswon
Indian Salmon Raus / Rawas
Butterfish /Pomfret Pomplet / Paplet
Prawn Jhinga / Chingri / Chemen/ Sungat
Clams Teesrya / shimplya
Crab Kekda / Kurlya
Indian dog shark Mori
Ghol (Jew fish) Ghol
Long fin cavalla Koncar
Gold spoted anchovy Capsali / Mandli
Sardines Pedvey
Reef cod/ Rock Cod Gobro
Pearl spot Kalundar / Karimeen
Whip fin majarra Shetki
Dhoma / Croakar Dodyaro (Hodki)
Common pony fish Khampi
Mangrove red snapper Tamoshi
Horse mackeral Hado bangdo
Mullet Shevtali / Shevto
Japanese thread fin bream Rano
Round bellied sardines Tarsulo
Indian oil sardines Tarlo
Railbow sardines Krishranchi peddi
Sead Konkoro
Barracuda Tonki
Hilsa ilisha Peddi
Hilsa species Vonog
Black tip shark Pilo
Ribbon fish Bale
Bombay duck Bombil
Sole Lep
Cat fish Sangot/Sangtam
Anchovy or silver belly Velli
Silver bar Korli
Kite or Ray fish Waghole
Lady fish Mudoshi/ Kane/ Nogli
Rock bream Haddo
Perch Palu
Giant sea perch Chonak
Naked head glassy perchlet Buranto
Red Snapper Fish Rane
Greas carp Fish Rohu
Muliet Fish Shevto

मेधा
वरच्या धाग्यात मिनोतीने लिहीलेल्या या धाग्याची लिंक देत येईल का? तिने जवस = आळशी = फ्लॅक्स सीड्स आणि इतर तत्सम पदार्थ असा धागा काढला होता हे बघ
http://www.maayboli.com/node/9103
आणि वरच्या शीर्षकात कंसात "खाद्यपदार्थांचे इंग्रजी-मराठी नावे" असे लिहीणार का म्हणजे पुढे धागा शोधणे सोपे जाईल.

दुधातले स्निग्ध घटक दुधापेक्षा हलके असल्याने वर तरंगून येतात - ते क्रीम. गायीचे ताजे दूध न ढवळता ठेवल्यास १२ ते चोवीसतासात क्रीम वरती तरंगून येते . १९ व्या शतकापर्यंत याच पद्धतीने क्रीम बनवले जात असे . ( हे युरोपात व अमेरिकेत - भारतात बहुतेक ठिकाणी दूध न तापवता इतका वेळ ठेवले की ते नक्की खराब होणार ). आता विकत मिळणारे क्रीम दूध सेंट्रिफ्युगल मशिन मधून फिरवून त्यातून काढले जाते.

क्रीम मधे किती टक्के फॅट आहे यावरून त्याला वेगवेगळी नावं आहेत.

अमेरिकेत सगळ्यात जास्त फॅट असलेले क्रीम हे हेवी व्हिपिंग क्रीम या नावाने विकले जाते . यात साधारण ३६ %च्या वर फॅट असते.

व्हिपींग क्रीम मधे ३०-३५% फॅट असते . हे फेटल्यावर द्रवरूप न रहाता (लोण्यासारखे ) घनरूप होते.
केक्स , पाय, पुडिंग अशा प्रकारात मूळ कृतीत किंवा वरतून सजावट म्हणून वापरले जाते.

लाइट क्रीम मधे १८ ते ३० % फॅट असू शकते. हे क्रीम सुद्धा फेटून सॉलिड होत नाही.

हाफ अँड हाफ हे सगळ्यात कमी फॅट असलेले क्रीम- यात १०-१८ % फॅट असते. हे साधारणपणे कॉफीत , सूप्स, व इतर द्रव खाद्यप्रकारात वापरतात.

डबल क्रीम ( ४८ % फॅट ) व क्लॉटेड क्रीम ( ५५ % च्यावर फॅट ) हे विकत मिळतानाच सेमी सॉलिड असतात. हे दोन्ही प्रकार युरोपात प्रचलित आहेत. अमेरिकेत काही दुकानात इम्पोर्टेड क्लॉटेड क्रीम मिळते, पण डबल क्रीम मी तरी आजवर कधी पाहिले नाही.

फ्रांसमधले crème fraiche हे देखील ३०-४०% फॅट असलेले क्रीम आहे पण ते दुधात / हेवी क्रीममधे ताकाचे विरजण लावून करतात. त्यामुळे त्याला थोडी आंबटसर चव असते.

अमेरिकेतल्या होल( फुल फॅट, ) दुधात साडेतीन टक्के फॅट असते. कमी फॅट चे १%, व २% असे प्रकारही इथे मिळतात. व पूर्णपणे फॅट विरहित दुध ही मिळते.

डबल क्रीम ही बहुतेक ब्रिटीश/ऑस्ट्रेलियन टर्म असावी. त्या त्या देशा प्रमाणे डबल क्रीम मधे किती टक्के फॅट असते, असावे याचे संकेत / नियम वेगळे असतील.

भारतात दूध तापवल्यावर जी साय येते ती कितिही घोटली तरी क्रीम फेटल्यावर जी कंसिस्टंसी येते ती येणार नाही. दूध तापवल्याने प्रोटीन मॉलिक्यूलस्ची काहीतरी इर्रिव्हर्सिबल रिअ‍ॅक्षन होत असणार.
अमेरिकेत मिळणारे दूध होमोजनाइझ्ड असते त्यामुळे ते तापवले तरी भारतात जशी 'मऊ दाट साय' येते तशी येत नाही.
८५-९० सालापर्यंत तरी मुंबैत काही निवडक दुकानातून क्रीम मिळत असे. आता बहुतेक बर्‍याच ठिकाणी मिळत असणार.

( फॅटची टक्केवारी हॅरॉल्ड मगी ( McGee ) यांच्या On Food and Cooking, The Science and Lore of the Kitchen' पुस्तकातून साभार. )

जरा वेगळी माहीती..
मराठीतील दालचीनीला इंग्रजीत सिनॅमन म्हणतात, पण आपल्याकडचे व्यापारी सिनॅमन नावाने कधीच बिल (बल्क परचेस साठी) करत नाहीत ते तज नावाने करतात....(कारण सिनॅमन ला टैक्स बसतो तज ला नाही.....) Wink

खुप धन्यवाद मेघा. ४ थ्या परिच्छेदाने माझे बरचसे संभ्रम दुर केले. मनापासून आभार!

तिरफळाला काय म्हणतात हिंदी व ईंग्रजी मधे? ह्यावर पण चर्चा झाली होती.
---
ओके, नाव तर कळले नाही पण लालु ने फोटो दिला होता मागे ह्याचा तो इथे आहे. http://www.flickr.com/photos/10597800@N05/1525771120/

तसेच हे अजुन परदेशात मिळत नाही असेही वाचले एका चर्चेत. ह्याचे बी कडु असते हे ही चर्चेत येउन गेले आहे.

छान आहे हा धागा..परवा फार्मर्स मार्केटात गेलेले. खुप ताज्या आणी वेगवेगळ्या पालेभाज्या दिसल्या. राजगिरा, मेथी, चार्ड असे २-४ प्रकारच ओळखीचे वाटले. ह्या धाग्यावर ईथे (अमेरिकेत..) मीळणार्या पालेभा़ज्यांची सचित्र माहिती देता येईल का कोणाला (आधीच असेल ईथे कुठे तर तसेही सांगा)?
वाटल्यास मी ह्या वीकांताला (मला) अनोळखी वाटलेल्या भाज्यांचे फोटो टाकते म्हणजे माहिती देणे सोपे जाईल.

'ताडगोळा' म्हणजे काय/ कसा दिसतो कोणी सांगेल का ?
ऋजुता दिवेकर चय ब्लॉग वर होत्म कि बेस्ट समर फुड..

राजगिर्‍याला बोली भाषेतल्या इंग्रजीत Amaranth म्हणतात. ग्रीन हाउसेसमधे लावलेला बघितलाय. पण फार्मर्स मार्केटात दिसला नाही.

मला राजगिरा बरेचदा मिळतो फार्मर्स मार्केटमधे. मागच्या आठवड्यात मी मुळ्याची पाने समजुन काहितरी भलतेच आणलेले. भली मोठी जुडी होती..परतुन भाजी, खुड्यासारखे करुन बघीतले पण चव फारशी आवडली नाही. मला पालेभाज्या भरपुर आवडतात त्यामुळे इथल्या भाज्यांशी जर ओळख झाली तर 'इथे भाज्याच मीळत नाही' कुरकुर तरी कमी होईल Happy

गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात मी फार्मर्स मार्केट मधल्या भाज्यांचे फोटो/रेसिपी टाकायला चालू केले होते त्यात इथल्या भाज्या माहिती करून घेणे हाच उद्देश होता. पण काही लोकांना ते फारसे न पटल्याने तो उद्योग बंद करावा लागला!

मिनोती, ती चांगली मालिका होती. लोकांच्या पटण्या-न पटण्याशी आपल्याला काय करायचंय. इथे त्या भाज्यांच्या माहितीची लिंक दे. आणि प्लीज पुन्हा लिखाण सुरू कर.

मिनोती,
थांबवलीस का तू ती सिरिज ???
टाक , पालेभाज्यांबद्दल वाचायला आवडेल अजुन.
इथे व्हॅलेरिटा मेक्सिकन स्टोअर मधे 'घोळीची भाजी' पण मिळते, काय नावाने मिळते ते लिहीन.

मिनोती, तू लिही प्लीज. भाज्यांची माहिती यात न पटण्यासारखे काय आहे? लोकं काहीही खुसपटं काढतातं.

आंबट चुका म्हणजे Green Sorrel. एकदा इथे कोरियन मार्केट मध्ये दिसलेला. पण माझ्या तेव्हा पटकन लक्षात आल नाही. green sorrel च्या बीया इथे शोधल्या. एका साईट वर दिसताहेत. पण नाही अजुन आणुन बघितल्या.
इथे पहा http://fenugreeklove.wordpress.com/2010/09/03/ambat-chuka-green-sorrel/

green chard घरी सहज येतो. माझ्याकडे मस्त आलाय.

मिनोती लिही गं ती मालिका परत. निदान सगळ्या पालेभाज्या एकत्र ठिकाणी मिळतील म्हणुन तरी लिही.

सीमा , धन्यवाद. आता आणतेच बिया ग्रीन सोरेल च्या. चार्ड, मायाळू ( मलाबार स्पिनॅच) , मुळा, लाल माठ ( कोल्हापुरात पोकळा म्हणतात का यालाच ) एवढ्या(च) पालेभाज्या लावल्यात आतापर्यंत.
सोनपरी, राजगिरा काय नावाने विकतात ? फोटो टाकायला जमेल का ?

आंबट चुक्याच्या बिया माझ्याकडे पण आहेत. पण इथे लावल्यावर उगवून नीट आल्या पण लगेच त्याला फुले/बिया आल्या!! यावर्षी त्याच लावल्यात पाहु काय होतेय.

Pages