नावात काय आहे ? ( पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे )

Submitted by मेधा on 28 April, 2011 - 13:19

जवस= अळशी का याबद्दल वर्षानुवर्षे प्रश्न येत आहेत. त्याच अनुशंगाने ढेमशे म्हणजे काय ? वाळकी भोकरं हा प्रकार शाकाहारी की मांसाहारी ? तिसर्‍या म्हणजे क्लॅम्स की स्कॅलप्स ? भारतात चक्क्याला कॉटेज चीझ म्हणतात तर अमेरिकेत मिळणारे कॉटेज चीझ वापरून श्रीखंड करता येईल का ?
चिलगोझा म्हणजे काय ? इत्यादी प्रश्न सतत येत असतात. पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे. कधी कधी एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक
या संबंधी माहिती देण्याघेण्यासाठी हा धागा .

जवस = अळशी = फ्लॅक्स सीड्स याबद्दल धागा http://www.maayboli.com/node/9103

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन विकीपेडियाची पाने -
http://en.wikipedia.org/wiki/Multilingual_list_of_edible_plants_used_in_...

http://en.wikipedia.org/wiki/List_of_common_leaf_vegetables

मायाळू - मलाबार स्पिनाच (Malabaar Spinach)
राजगिरा - अमॅरॅंथ (Amaranth or Chinese Spinach)
आंबट्चुका - Green Sorel

नाही रुनी, गवती चहा ला लेमन ग्रास म्हणतात. चायना ग्रास म्ह़णजे अगर अगर agar agar . समुद्रातल्या वनस्पतींपासून एक्स्ट्रॅ़क्ट केलेली ही पावडर गोड पदार्थांना दाट पणा आणण्यासाठी वापरतात. युरोपात / अमेरिकेत जिलेटीन वापरतात तसा साधारण अगर अगर चा वापर होतो.

लाल माठ म्हणजे पोकळा असं मीपण ऐकलंय. पण माझ्या माहितीत तरी दोन्ही भाज्या वेगळ्या आहेत. मी दोन्ही वेगळ्याच खाल्ल्या आहेत. लाल माठाची पानं पोकळ्यापेक्षा जरा लहान होती.

येस्स प्रज्ञा९.. पोकळा माझी भयंकर आवडती पालेभाजी Happy ठेचलेला लसुण, मिरच्या घालुन आई काय झकास भाजी करते..पोकळा निवडताना त्यच्या कोवळ्या काड्यापण आम्ही निवडायचो आणी पोकळ्याच्या काड्या आतुन पोकळ असतात, माठाच्या नाही (बहुतेक!).

धन्स मेधा, मी आता खिरीत वापरून बघेन. Happy पुडिंगमध्ये तर याचा वापर छानच होईल असं वाटतंय.

तिरफळाला Sichuan pepper असा शब्द आहे. ती या नावाने चायनीज दुकानात मिळायला हवी.
जिलेटीन, पुर्वी बैलाच्या नाहितर माशाच्या हाडापासून करत असत. गल्फ मधे त्यावेळी तरी जेली पावडरमधे बीफ जिलेटीनच असे. (बिस्किटात पण बीफ फॅट असे.) त्यामुळे जिलेटीन पेक्षा अगर अगर किंवा CARRAGEENAN वापरलेले चांगले.

तिरफळाला Sichuan pepper असा शब्द आहे<<< अरे, हे तर मला माहितच नव्हतं...धन्स दिनेशदा Happy
इथे मिळते Sichuan pepper , इन्फॅक्ट त्याचा सॉस पण मिळतो.

जिलेटीन, पुर्वी बैलाच्या नाहितर माशाच्या हाडापासून करत असत. >>> माझ्यामते आजही परिस्थिती तीच असावी.

हो सायो, म्हणून लेबल बघूनच घ्यायला पाहिजे. कार्गीनान पासून केलेले असेल तर चांगले.(त्याला जिलेटिन म्हणत नसावेत.) मला वाटतं भारतात कार्गीनानच वापरत असावेत.

Tirphal.JPG

यात डावीकडे आहे ते sichuan pepper. आकाराने लहान आहेत अन रंग थोडा लालसर गुलाबी असतो. उजवीकडे नाण्याच्या जवळ आहेत ते बहिणीने मुंबईत कुठूनतरी घेतलेले तिर्फळ - जरा लहान आहेत अन रंग काळपट आहे. सगळ्यात उजवीकडे आहेत ती कुमठ्याहून आलेली तिर्फळं आहेत. वर्ष होत आलंय तरी रंग जास्त हिरवा आहे. काळ्या बिया कुमठ्याच्या तिर्फळातल्या आहेत. नाणं ठेवलंय ते आकाराचा अंदाज यायला.

ज्यांनी दोन्ही कधी खाल्ले नाहीत त्यांना दोन्ही एकसारखेच वाटतील. ज्यांना तिरफळ खाउन सवय आहे त्यांना sichuan pepper ची चव ओळखीची वाटेल पण एखाद्या पाककृतीत तिर्फळाच्या जागी sichuan pepper वापरणे म्हणजे अमेरिकेत बर्‍याच बायका केलच्या पानांच्या अळूवड्या करतात अन ' अजिब्बात कळत सुद्धा नाही' म्हणतात तसा प्रकार Happy

केलच्या वड्या वाईट लागत नाहीत, पण त्या अळूवड्या नव्हेत ....

पुढील माहिती विकिवरून साभार
Zanthoxylum simulans (Chinese Prickly-ash or Flatspine Prickly-ash), is a flowering plant in the family Rutaceae, native to eastern China and Taiwan. It is one of several species of Zanthoxylum from which Sichuan pepper is produced (see that page for uses).

It is a spreading shrub or small tree growing to 7 m tall. The leaves are 7-12.5 cm long, pinnate, with 7-11 leaflets, the leaflets 3–5 cm long and 1.5–2 cm broad. There are numerous short (3–6 mm) spines on both the stems and the leaf petioles, and large (several cm) knobs on the branches. The flowers are produced in slender cymes, each flower about 4–5 mm diameter. The 3–4 mm berry has a rough reddish brown shell that splits open to release the black seeds from inside.

Zanthoxylum rhetsa : Chirphal, Teppal, Tirphal, Indian Pepper

गोव्याचे कॅथोलिक लोक तेफळां किंवा चिरफळ म्हणतात .

रच्याकने, रुटेसी मधलं सगळ्यात फेमस झाड म्हणजे आपला कढीपत्ता .

मेधा...ह्म्म्म... मी तिरफळं रोज खाणार्‍यातली नाही... वर्षातुन २-४ वेळा पण खल्ला जात नसेल तिरफळं घातलेला पदार्थ. त्यामुळे मला काही फरक कळलाच नसता बहुदा Happy

अमेरिकेत बर्‍याच बायका केलच्या पानांच्या अळूवड्या करतात अन ' अजिब्बात कळत सुद्धा नाही' म्हणतात तसा प्रकार << Lol

केलच्या वड्या वाईट लागत नाहीत, पण त्या अळूवड्या नव्हेत .... >>>> छान कुरकुरीत तळल्या नसतील तर केलच्या वड्या वाईट लागतात त्यातल्या शिरांमुळे. सॉरी विषयांतर.

नमस्कार,

मला घरगुती आंब्याच्या मुरंब्याची पाककृती पाहिजे आहे. कृपया कोणाकडे असेलतर देणे.

अक्षरा

मेधा, शैलजा, चिन्नु (आणि अजून कुणी कानडी असतील तर)

मी सीमेबदनीकाई म्हणून कर्नाटकात मिळते ती भाजी आणली आहे. त्याचे इंग्लिशमधील नाव चाऊ चाऊ असे लिहिले आहे. त्याला मराठीत काय म्हणतात?

Pages