बच्चेकंपनीसाठी सुट्टीतले उद्योग - १ - 'अळी मिळी गुपचिळी'

Submitted by लाजो on 26 April, 2011 - 10:39

"आई गं, कंटाळा आलाय घरात बसुन... बाहेर जाऊ का खेळायला??"

"अजिब्बात नाही... रणरणत्या उन्हात बाहेर जायचं नाही... जा पुस्तक वाच, नाहीतर टीव्ही बघ थोडावेळं"

वार्षीक परीक्षा संपुन उन्हाळ्याची सुट्टी लागली की घरोघरी होणारा हा आई आणि मुलांमधला कॉमन संवाद. बच्चे कंपनीला स्पेशली लहान मुलांना सुट्टीत बिझी कसे ठेवायचे हा आई-वडिलांना नेहमी पडलेला प्रश्न. सध्या माझ्याही लेकीला टर्म एंड म्हणुन २ आठवडे सुट्टी आहे. त्यामुळे तिला बिझी ठेवणे हे माझ्यापुढेही एक चॅलेंजच आहे.

यावर मला सापडलेला उपाय म्हणजे मुलांना काहितरी क्रिएटीव्ह करायला देणे, ज्यात त्यांचा भरपुर वेळही जाईल आणि काहितरी नविन करायला/शिकायला मिळेल Happy

ह्याच कल्पनेने मी इथे एक मालिका सादर करत आहे. या मालिकेत मी दर आठवड्याला एखाद-दुसरा सोपा, लहान मुलांना करता येण्याजोगा हस्तकलेचा नमुना दाखवेन. यात तुम्हाला फक्त सामान गोळा करुन देणे, थोडीशी सुपरव्हिजन आणि लागेल तिथे थोडीशी मदत एव्हढच कराव लागेल. बाकी मुलांनाच त्यांच्या आयडियाज वापरु देत. मुलांची क्रिएटीव्ह डेव्हलपमेंट व्हावी, त्यांना एकाजागी बसायची सवय लागावी आणि सुट्टीत काहितरी नविन केल्याचा आनंदही मिळावा हेच या मालिकेचे मुख्य उद्देश. वेळ असेल तर आई-बाबांनीही मुलांच्या बरोबर बसुन या वस्तु बनवाव्यात. आपल्यालाही खुप मजा वाटते. आपल्याही थोड रिलॅक्स व्हायला मदत होते.

सगळ्या पालकांना विनंती आहे की त्यांच्या लेकरांनी केलेल्या नमुन्यांचे फोटो इथे नक्की टाकावेत. त्यावरुन इतरांनाही वेगवेगळ्या आयडीयाज मिळतिल.

कुणाला काही सुचना असतिल तर त्याही जरुर कळवा म्हणजे मला पुढच्यावेळी त्यांचा उपयोग होईल.

इथे काही टाकाऊतुन टिकाऊ वस्तु केल्या आहेत. कुणाला डिटेल्स हवे असतिल तर सांगा.

http://www.maayboli.com/node/19858 - ऑल इन वन, वन इन ऑल (प्लॅस्टिक बॉटल चे उपयोग)

http://www.maayboli.com/node/19883 - 'प्रिय सखी' - (प्लॅस्टिक पिशव्यांचे उपयोग)

http://www.maayboli.com/node/19937 - 'कार मिरर डँगलर'

चला तर मग करुयात सुरु सुट्टीतले उद्योग Happy

----------------------------------------------------------------------

सुट्टीतला उद्योग १ - अळी मिळी गुपचिळी

वयोगट: ३ ते ८ वर्षे

लागणारा वेळ:
३० ते ४५ मिनीटे

साहित्यः

जुना रबरी ग्लोव्ह, झाकणं असलेला पुठ्ठ्याचा छोटा बॉक्स, पोस्टर / अ‍ॅक्रलिक कलर्स, सेलोटेप, कात्री, स्केचपेन इ.

IMG_0399.JPGकृती:

१. पुठ्ठ्याच्या बॉक्स ला तळाच्या बाजुने (बोट जाईल इतकेच) एक गोल भोक पाडा.
२. रबरी ग्लोव्हच्या ५ बोटांमधील एक बोट कापुन घ्या. या बोटाच्या बेस ला कात्रीने दोन चिरा द्या.
३. चित्रात दाखवल्याप्रमाणे ग्लोव्ह चे बोट बॉक्स च्या तळातुन बॉक्स मधे सरकवा आणि बॉक्सला तळाच्या बाजुला सेलोटेपने चिकटवा.

IMG_0400.JPG

४. आता ग्लोव्हच्या कापलेल्या बोटाला आपल्या आवडी प्रमाणे रंग द्या - जसे वळवळणार्‍या किड्यासाठी हिरवा, किंवा चॉकलेटी वगैरे. काळ्या स्केचपेनने डोळे रंगवा. लाल कागदाची जीभ चिकटवा. हवे तर डोक्यावर अँटेना लावा.

IMG_0402.JPG

५. बॉक्स च्या आतल्या बाजुला ग्लोव्हच्या बोटाच्या अवतीभवती रंगवा किंवा वाळु/गवत इ चिकटवा जेणेकरुन जास्त इफेक्टिव्ह वाटेल. हव असेल तर बॉक्स ला बाहेरुन जुना गिफ्ट पेपर चिकटवा.

IMG_0404.JPG

हे लेकीने केलेलं Happy

अन हे मी Proud

IMG_0408.JPG

६. झाले आपले सरप्राईज तयार. आता कव्हर लावुन बॉक्स च्या तळातुन बोट घालुन ठेवा आणि बॉक्स तुमच्या आजी/आजोबांना, मित्र/मैत्रिणीला गिफ्ट म्हणुन द्या पण तुमच्या हातातच उघडायला सांगा. बॉक्स चे कव्हर उघडताच बोट अळी वळवळत्येय असं फिरवा, त्यांना एक क्षणभर नक्कीच दचकायला होईल Biggrin

IMG_0406.JPGIMG_0410.JPG

चला, तुम्ही देखिल करा बरं आता अळी मिळी गुपचिळी Happy

----------------------------------------------------

सुट्टीतला उद्योग: २ : कडकु मडकु : http://www.maayboli.com/node/25526

सुट्टीतला उद्योग: ३ : 'ट्विंकल ट्विंकल लिट्टील जार' http://www.maayboli.com/node/25693

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार मंडळी,

ही मालिका उन्हाळ्याची सुट्टी लागल्या-लागल्या सुरु करणार होते परंतु काही कारणामुळे जमले नाही. अजुनही महिनाभर तरी सुट्टी असेलच ना मुलांना? आणि उन्हाळ्याची सुट्टी संपली तरी इतर सुट्ट्या असतातच की उद्योग करायला Happy

तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा Happy

ही मालिका माझ्या आईला समर्पित, जिच्याकडुन माझ्यात ही कलाकारी आलिये आणि जिने नेहमीच मला प्रोत्साहन दिलेन.

धन्यवाद.

Lol
मस्त गं लाजो. अगं इथे आता आताच सुट्ट्या लागल्यात. अजून किमान दीड महिना तरी बच्चे कंपनी घरी असणार आहे. त्यामुळे तू मालिका लिहिच Happy

भारी आहे Rofl रब्बर, तार आणि वीस पैश्याचं नाणं घ्यायचं. ते नाणं रब्बर मधे आडवं ठेवून त्या रब्बरची दोन्ही टोके वाकवलेल्या तारेच्या टोकाला बांधून मस्तपैकी नाण्याला रबरासहीत पिळ द्यायचा अगदी नाणं गुदमरेपर्यंत आणि मग ते व्यवस्थित पुडीत बांधायचं अन द्यायचं हातात .. हे सगळे लहानपणीचे उद्योग आठवले गं बयो..

सही आहे.. बाकी ते गवंड्याचे ग्लोव्हज ढापून आणले काय गं? Light 1 तू आहेस ना मग तुझ्या आईकडून मिळालेला हा ठेवा असाच वाढवत रहा.

ए भारी! Lol हिरवं आणि लाल काँम्बो अगदी खरं आणि घाबरवून टाकणारं दिसतंय.
बॉक्सच्या झाकणाला आणि त्या ग्लोव्ह्च्या बोटाला काहीतरी युक्ती करुन बांधता आलं तर? त्यात काडी, पेन्सिल असे घालून ठेवायचे म्हणजे आपण हातात धरायच्या ऐवजी, झाकण अर्धेमुर्धे उघडले तरी फिस्स्स्स्स्स! Proud

भारीए! Lol

वाह मस्त आहे धागा! मागच्या आठवड्यात मी हि लेकाबरोबर प्लॅस्टिकच्या बाटलिला अर्धे कापुन, पेन्सील स्टॅन्ड बनवला होता! सद्ध्या शास्त्रिय प्रयोगचं पुस्तक आणलं आहे आहे, घरच्या घरी करून बघता येणारे प्रयोग घरच्या सामुग्री सह, छोट्यांसाठी!

सद्ध्या शास्त्रिय प्रयोगचं पुस्तक आणलं आहे आहे, घरच्या घरी करून बघता येणारे प्रयोग घरच्या सामुग्री सह, >>> आमच्याकडे काल बोट बनवली होती Happy

जबरी ! ह्या विकांताला नक्की करून बघणार. पिलू खुष होईल.
मालिकेच्या पुढच्या भागांची उत्सुकतेने वाट पहात आहे. Happy

आळी मिळी गुप चिळी आता हे बनवायची आमची पाळी. लेकीला दाखवलंय पण तीला नीटसं समजलेलं नाहिए तेव्हा आज रात्री गोष्टी ऐवजी असं काहीतरी नीट समजावून शिकवायला लागणार. Happy

धन्यवाद.

भारी! नक्की लिही लाजो, आम्हाला जे जमतंय ते आम्हीही नक्की करणार.
कस्ला आहे तो साप डेन्जर!!! Lol लेकीचाही मस्त!

Pages