सुट्टीतले उद्योग

Submitted by लाजो on 6 June, 2011 - 03:25

"आई गं, कंटाळा आलाय घरात बसुन... बाहेर जाऊ का खेळायला??"

"अजिब्बात नाही... रणरणत्या उन्हात बाहेर जायचं नाही... जा पुस्तक वाच, नाहीतर टीव्ही बघ थोडावेळं"

वार्षीक परीक्षा संपुन उन्हाळ्याची सुट्टी लागली की घरोघरी होणारा हा आई आणि मुलांमधला कॉमन संवाद. बच्चे कंपनीला स्पेशली लहान मुलांना सुट्टीत बिझी कसे ठेवायचे हा आई-वडिलांना नेहमी पडलेला प्रश्न. सध्या माझ्याही लेकीला टर्म एंड म्हणुन २ आठवडे सुट्टी आहे. त्यामुळे तिला बिझी ठेवणे हे माझ्यापुढेही एक चॅलेंजच आहे.

यावर मला सापडलेला उपाय म्हणजे मुलांना काहितरी क्रिएटीव्ह करायला देणे, ज्यात त्यांचा भरपुर वेळही जाईल आणि काहितरी नविन करायला/शिकायला मिळेल Happy

ह्याच कल्पनेने मी इथे एक मालिका सादर करत आहे. या मालिकेत मी दर आठवड्याला एखाद-दुसरा सोपा, लहान मुलांना करता येण्याजोगा हस्तकलेचा नमुना दाखवेन. यात तुम्हाला फक्त सामान गोळा करुन देणे, थोडीशी सुपरव्हिजन आणि लागेल तिथे थोडीशी मदत एव्हढच कराव लागेल. बाकी मुलांनाच त्यांच्या आयडियाज वापरु देत. मुलांची क्रिएटीव्ह डेव्हलपमेंट व्हावी, त्यांना एकाजागी बसायची सवय लागावी आणि सुट्टीत काहितरी नविन केल्याचा आनंदही मिळावा हेच या मालिकेचे मुख्य उद्देश. वेळ असेल तर आई-बाबांनीही मुलांच्या बरोबर बसुन या वस्तु बनवाव्यात. आपल्यालाही खुप मजा वाटते. आपल्याही थोड रिलॅक्स व्हायला मदत होते.