पिशवी, रोजची गरजेची वस्तू. सामान ठेवायला पिशवी हवीच मग ती भाजीसाठी असो नाहीतर कागदपत्रांसाठी, कपड्यांसाठी किंवा मेक-अपचं सामान ठेवण्यासाठी काळ बदलला तसा कापडाच्या/कागदाच्या पिशव्यांची जागा प्लॅस्टिकच्या पिशव्यांनी घेतली. वापरायला 'कन्व्हिनियंट' अश्या या पिशव्या पर्यावरणासाठी मात्र 'प्रॉब्लमॅटिक' ठरल्या.
वेळोवेळी, हरतर्हेने या पिशव्यांचा वापर कमी करण्यासाठी संदेश, उपदेश केले जातात, परंतु तरीही या पिशव्या रोज वापरल्या जातात, कचर्यात फेकल्या जातात आणि पर्यावरणाच्या र्हासाला कारणीभूत ठरतात.
या पिशव्यांचा गैरवापर टाळून त्यांचा कसा परत उपयोग करता येईल यासाठी काही आयडियाज देत आहे.
--------------------------------
साहित्य:
प्लॅस्टिकच्या पिशव्या, पार्चमेंट्/ब्राऊन पेपर, इस्त्री, सुई-दोरा / शिवणयंत्र,
इतर ऐच्छिक वस्तू:
ड्रेसच्या बाह्या/जुनी जीन्स/जुने उशीचे अभ्रे/चादरीचे तुकडे, नाड्या/रिबीन्स, वेलक्रो/ प्रेस बटन्स/ साधी बटणं, सजावटीला उपलब्ध असेल ते साहित्य - घुंगरु, टिकल्या, लेसची फुलं वगैरे.
--------------------------------
पूर्वतयारी:
प्लॅस्टिकची बॅग टेबलवर नीट पसरावी. आता प्रचि मधे दाखवल्याप्रमाणे वरची हँडल्स आणि खालचा सील केलेला भाग कापावा, पण टाकून देऊ नये. मधला भाग उघडावा (खाली वर उघडे पण मधला भाग सलग). आपल्याला आवश्यक तेव्हढ्या पिशव्या या रितीने कापून घ्याव्यात.
आता ३ पिशव्या एकावर एक ठेवून नीट अरेंज करुन घ्याव्यात. खाली आणि वर पार्चमेंट्/ब्राऊन पेपर ठेवावा. इस्त्री लो सेटिंगवर ठेवून हलकेच या तयार गठ्ठ्यावरुन फिरवावी. इस्त्री फार गरम असू नये नाहीतर प्लॅस्टिक जळेल/सुरकुतेल. वरचा कागद हलकेच बाजूला करुन खालच्या पिशव्या एकत्र सील झाल्यात का हे चेक करावे. नसेल तर परत हलकेच इस्त्रि फिरवावी. आता गठ्ठा उलटा करुन दुसर्या बाजुनेही इस्त्री फिरवावी. वरचा आणि खालचा कागद थंड झाला की काढून टाकावा. आता प्रचि मधे दाखवल्या प्रमाणे पिशव्या एकत्र 'फ्युज' झालेल्या असतील. याला आपण 'गठ्ठा' म्हणू. हे झाले बेसिक प्लॅस्टिक कापड याचा विविध प्रकारे उपयोग करता येइल.
- पिशव्या घेताना वेगवेगळ्या रंगाच्या, डिझाईन वाल्या/प्लेन कश्याही वापरता येतील. चेकआउट काऊंटरवर मिळणार्या पिशव्या, थोडं भोक पडलंय, कोपर्यात फाटलीये अश्या कुठल्याही पिशव्या, ज्या एरवी टाकून दिल्या जातात, त्या वापरता येतील.
- कापलेली हँडल्स दोन पिशव्यांच्या थरावर अरेंज करुन त्यावर तिसरी पिशवी ठेऊन फ्युज करता येइल. अश्याप्रकारे कापलेले तुकडेही वापरता येतील.
- कापलेली हँडल्स उघडून पिशव्या फ्युज करताना गठ्ठ्यावर त्याचे डेकोरेशन करता येईल.
महत्वाचा संदेश:
- पिशव्यांवर इस्त्री ठेवायच्या आधी त्यावर वरती आणि खाली पार्चमेंट पेपर्/ब्राऊन पेपर (वॅक्स किंवा वॉटरप्रुफ टाईपचे नको) व्यवस्थित पसरावा. प्लॅस्टिक उघडे पडले आणि त्यावर चुकून गरम इस्त्री लागली तर इस्त्रीला प्लॅस्टिक चिकटेल, ते चिकटलेले प्लॅस्टिक काढताना लाजो आठवेल
---------------------
१. वॉटरप्रुफ डॉक्युमेंट होल्डर:
प्रत्येकी ३ फ्युज्ड पिशव्यांचे २ आयताकृती गठ्ठे बनवले. फ्युज करताना दोन पिशव्यांच्यावर कापलेल्या पट्ट्यांचे डिझाईन बनवून त्यावर शेवटची पिशवी (पांढरी/ट्रान्सपरंट) ठेवली व पिशव्या फ्युज केल्या. दोन्ही गठ्ठे डिझाइनची बाजू आत येईल अश्या रितीने एकावर एक ठेवले. डॉक्युमेंट्/फाईल चा साईज त्यावर आखून घेतला. आखून घेताना पाकिट फोल्ड करायला जागा राहिल अश्या अंदाजाने मार्किंग केले. आता वरची बाजू मोकळी ठेऊन तिन्ही बाजूंनी शिवण घातली. वरती मोकळ्या ठेवलेल्या भागातील एक भाग फोल्ड करुन आत शिवून टाकला. आता तयार पाकिट सुलट करुन घेतला (आतली बाजू बाहेर). उरलेल्या दुसर्या भागाला दुमडुन फ्युज करुन घेतले. कापलेल्या तुकड्यांना रिबीनीसारखे जोडून (फ्युज करुन) पाकिटाच्या वरच्या बाजुला आतून टाचले. साईडला दोन वेलक्रो चे तुकडे लावले. झाला वॉटरप्रुफ डॉक्युमेंट फोल्डर तयार
अश्या पद्धतीने वेगवेगळ्या साईजचे फोल्डर्स्/पाकिट बनवता येतील. पोस्टाने कागद/वस्तू पाठवताना अश्या फ्युज्ड पाकिटात घालून पाठवली आणि वरुन पोस्टाचे कागदी/कापडी पाकिट घातले तर पावसा-पाण्यात आतले कागद, वस्तू खराब होणार नाहीत. आणि वॉटरप्रुफ पाकिट विकत घ्यायला लागणारे पैसेही वाचतील
प्रवासात, पासपोर्ट, तिकीटे ठेवायलाही अशी पाकीटं वापरता येतील.
---------------------
२. मेक-अप बॅग्/टॉयलेट किट बॅग:
- ड्रेसबरोबर आलेल्या बाह्या, फ्युज केलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांचा एक गठ्ठा, वेलक्रो आणि सजावटीला सामान.
ड्रेसच्या बाह्या टेबलावर पसरुन त्यावर फ्युज केलेल्या ३ पिशव्यांचा गठ्ठा टाचणीने टाचून घेतला. बाह्यांच्या शेप मधे किंवा आवडेलल त्या शेप मधे आखून व कापून घेतले. कापडाच्या वरच्या बाजू दुमडून शिवून घेतल्या. आता प्लॅस्टिकचा भाग बाहेर राहील अश्या तर्हेने कापड दुमडून घेतले. कापलेल्या शेप प्रमाणे दोन्ही बाजुला शिवणयंत्र किंवा बारीक सुई व मजबूत धाग्याने शिवण घालून घेतली.
आता झालेली पिशवी ची बाहेरची प्लॅस्टिकची बाजू आत करुन घेतली. झाली वॉटरप्रुफ मेक-अप बॅग/टॉयलेट बॅग तयार
बॅग च्या वरच्या तोंडाला वेलक्रो लावली. वर २-३ घुंगरु लावून सजवले.
- याच पद्धतीने जुना उशीचा अभ्रा, ओढणी, चादर वगैरे आणि लागतील त्याप्रमाणे फ्युज्ड पिशव्यांचे गठ्ठे शिवुन भाजी, वाणसामान वगैरे आणायला मोठ्ठ्या पिशव्या बनवता येतील.
- चार फ्युज्ड गठ्ठे एकमेकांना शिवून मोठा आयत्/चौकोन तयार करुन त्यावर बाळाचे कापडी दुपटे ठेऊन कडा मुडपून शिवून घ्यावे. प्रवासात वगैरे न्यायला घरगुती मेणकापड तय्यार.
---------------------
३. बाळाची बीब/स्मॉक:
फ्युज्ड प्लॅस्टिकच्या एका गठ्ठ्यावर बीब्/स्मॉक चा शेप काढून, कापून घ्यावा. वरच्या भागाला, जिथे नाडी/रिबीन बांधतो तिथे, कापलेल्या हँडल्स च्या पट्ट्या फ्युज करुन घ्याव्यात. घरच्याघरी बिब्ज तयार. पुसुन घेतल्या की परत स्वच्छ. आणि खराब झाल्याच तरी पैसे वाया गेल्याचे दु:ख नाही.
---------------------
अशी ही प्लॅस्टिकची पिशवी री-यूज करुन अनेक प्रकारे वापरता येइल. मग ती 'वैरीण' न होता खरोखरची 'मैत्रिण' बनेल
पुर्वी टीव्हीवर एका होम आयडियाज शो मधे अश्या पद्धतीने बनवलेली हँडबॅग बघितली होती. तेव्हापासून हा प्रयोग करुन बघायचा होता. मायबोली गणेशोत्सव स्पर्धेच्या निमित्ताने योग जुळुन आला
मायबोली चे खास आभार
जो हे पण मस्त काय काय भन्नाट
जो हे पण मस्त
काय काय भन्नाट आयडिया येतात तुझ्या डोक्यात. :कौनसे चक्की का आटा खाती हो:
लाजो तुला टा तु टी चे
लाजो तुला टा तु टी चे विद्यापीठ म्हणले पाहिजे...
मस्तच!
नुसत्या शोभेच्या वस्तू नसून खरोखरीच्या उपयोगी वस्तू बनवतेयस ते सहीच.
हे पण भारी आहे. लाजो, तू जे
हे पण भारी आहे. लाजो, तू जे सलग लिहून मग प्रचि टाकले आहेस ना, त्याऐवजी एक एक स्टेप लिहून तसे तसे प्रचि टाकतेस का? जरा कळायला अवघड जातंय हे.
भयानक सुंदर झालंय हे पण !
भयानक सुंदर झालंय हे पण ! माझ्याकडे ड्रेसच्या बाह्या आहेत (पुर्वी लांब हाताचे टॉप्स होते त्यांचे हात कापून छोटे केलेत). बनवेन मी पण काहीतरी आता
लाजो.. ता तु टी सम्राज्ञी...
लाजो.. ता तु टी सम्राज्ञी...
कसल्या अफलातून आयडीया आहेत तुझ्या.. 
अरे काय ग्रेट आयडीया आहे....
अरे काय ग्रेट आयडीया आहे.... खरेच नुसत्या शोभेच्या वस्तू नसून खरोखरीच्या उपयोगी वस्तू आहेत या...
भयानक सुंदर झालंय हे पण !
भीषण सुंदर...
मलाही लाजो टातुटि किडा चावून एका भन्नाट आयडियेची कल्पना सुचली. माझ्या घरात मंडळींना डोक्याला रात्री मस्त तेल-बील चोपडुन मग झोपायची सवय आहे. यामुळे उशा लवकर खराब होतात. उशांच्या अभ्र्यांना आतुन हे असे प्लॅस्टीक लावले तर उशा खराब होण्याची प्रमाण कमी होईल. करुन पाहायला पाहिजे.
धन्यवाद मंडळी @आशुडी, अग इथे
धन्यवाद मंडळी
@आशुडी, अग इथे फक्त ४ प्रचि चे लिमीट आहे. मी वेळ झाला की हस्तकला मधे डिटेल्स आणि स्टेप बाय स्टेप फोटो देइन
@ साधना, तु उशीच्या अभ्र्यांना आतुन प्लॅस्टिक लावण्या ऐवजी, अश्या प्लॅस्टिकचाच अभ्रा शिव आणि वरतुन नेहमीप्रमाणे कव्हर घाल. कापडी कव्हर काढुन धुवायला सोपे पडेल. आणि प्लॅस्टिकचे कव्हर नुसते ओल्या फडक्याने पुसले की झाले
Amazing !!!!!!! ग्रेटच आहेस
Amazing !!!!!!!
ग्रेटच आहेस तू......!!
तिन्ही प्रकार आवडले.
वा मस्त कल्पना आहेत या
वा मस्त कल्पना आहेत या
खरंच, सही आहेस तू लाजो.. हे
खरंच, सही आहेस तू लाजो.. हे असे वापर करता येतील प्लॅस्टिकच्या पिशव्यांचे हे कधी डोक्यातही आले नाही! ती मेकप बॅग तर खास आहे.. करून पहायचा मोह होतोय
भारी आहे हे..
भारी आहे हे..
भारीच आहे हे....
भारीच आहे हे....
लाजो, पुन्हा एकदा भन्नाट
लाजो, पुन्हा एकदा भन्नाट कल्पना आणि त्यांना प्रत्यक्षात आणण्याची तुझी चिकाटी पाहून धन्य झाले! मस्त!:)
लाजो हे पण मस्त आहे.
लाजो
हे पण मस्त आहे.
लाजो, पुन्हा _/\_ तुझं नाव
लाजो, पुन्हा _/\_
तुझं नाव वाचलं की मला गोटॉल का कैतरी आठवायचं याची प्रामाणिक कबुली द्यायला पाहीजे. ते आता टोटली पुसलं जाऊन अमेझिंग कलाकरी म्हणून आठवेल.
कमाल!
कमाल!
हे पण लै भारी !!
हे पण लै भारी !!
मानलं तुला लाजो... मस्त
मानलं तुला लाजो... मस्त कल्पना आहे. वापरायला नक्की आवडेल.....
सहीच!!! एकदम भन्नाट आयडीया.
सहीच!!! एकदम भन्नाट आयडीया.
हे तर जबरी आहे एकदम लाजो.
हे तर जबरी आहे एकदम लाजो.
धन्यवाद रैना गोटॉल वाली ती
धन्यवाद
रैना
गोटॉल वाली ती मी नव्हे 
लाजो, तुला सान __/\__. कसल्या
लाजो, तुला सान __/\__. कसल्या भन्नाट आयडिया आहेत.
त्यांना प्रत्यक्षात आणण्याची तुझी चिकाटी पाहून धन्य झाले>>>>अरूंधतीजींना मोदक
लाजो मी पाहिल होत कालच पण
लाजो मी पाहिल होत कालच पण प्रतिसाद आज देतिये. मस्त जमतय मी आणि लेकिने एक मेकअप बॅग बनवली
लाजो, तुम्ही केलेल्या वस्तू
लाजो, तुम्ही केलेल्या वस्तू फार सुरेख आहेत.
यासाठीच एवढे दिवस गाय्बली
यासाठीच एवढे दिवस गाय्बली होतीस का ग लाजो.. हे पण मस्तच..
मस्तय लाजो
मस्तय लाजो
छान आयडिया आहे. हेच मोठ्या
छान आयडिया आहे. हेच मोठ्या आकारात करुन, गालिचा / बेड खाली ठेवायला उपयोगी पडेल. बाळा च्या अंथरुणाखाली पण ठेवता येईल.
अफलातून आयडीया आहेत
अफलातून आयडीया आहेत
जबरी! छानच उपयोग आहे प्लॅ पि
जबरी! छानच उपयोग आहे प्लॅ पि चा.
खूपच आवडलं.
लय भारी असतात तुझ्या
लय भारी असतात तुझ्या आयडियाच्या कल्पना!!!!!!
Pages