केसांचे आरोग्य

Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56

केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी आई व आजी दोघी मुंबईत राहूनसुद्धा शिकेकाई+रिठा+आवळा ह्याचे मिश्रण लावत बरीच वर्षे वापरत. का तर त्याने केस चांगले रहातात. दर मे महिन्या मध्ये आजी गावी जावून घरच्या नारळाचे तेल खास शुद्ध तेल घाण्यावर काढून आणी. त्यात मेथी दाणे, जास्वंद कळ्या घालून ठेवत. मग कळ्या काढून २-४ दिवसाणी ते तेल लावायचे. मग आम्ही मुली झाल्यावर, ई ई मला नाही आवडत करत आई शांपू आम्हाला लावत असे. आजी काय वैतागायची. देवाने चांगले केस दिलेत त्याची वाट लावता.
त्याच्या आधी लहानपणी एक मस्त खास केसाचा साबण मिळायचा, डिंपलचे चित्र होते. क्रॉउनींग ग्लोरी म्हणून. तो वापरला. मग १२- १३ वर्षापासून सनसिल्क शांपू. तरी केस चांगले होते. ते चांगले असताना सुद्धा भरपूर वेळ होता म्हणून उगाच नको नको ते केस पॅक थापायचे दर रविवारी,एक चेहर्‍यावर नी एक केसावर असे करत दुपारी १२ ला अंघोळ. कामवाली मग माझ्या नावाने बोंब ठोकत असायची. तिला बाथरूम साफ करावे लागायचे.(वर लिहिला आहे ना केस पॅक तो एक). आई अगदी येता जाता, काय ते नखरे. केस तर आहेत चांगले. त्यापेक्षा सरळ तेल लावून धू. ते दही, अंडे कशाला हवे. कधी मुलतानी मिट्टी व दही दुसर्‍या दिवशी प्रताप दाखवायची. तीन दिवस तरी डोकेदुखी व्हायची थंड पडून तर कधी मेंदी. त्या डोकेदुखीत मुलतानी मिट्टीने झालेले मऊ मुलायम बाल विसरून जायची. मग आईचे टोमणे चालू असत. उगाच ती मेंदी लावली. घाण रंग दिसतो वगैरे. आता औषध घे. Happy

इथे आल्यावर केसाचे पर्मिंग्,कलर लावणे, ड्रायर ने मग पालटूनच गेले.

क्रॉउनींग ग्लोरी >>>>> हम्म्म्म्म, त्याची जाहिरात पण मस्त होती. ते डिंपलचे केस बघून हेवा वाटायचा.

माझ्या सागरमधल्या पार्लरवालीने सांगितलेला पॅक - २ चमचे दही,१ चमचा मेंदी, १ चमचा मेथी पावडर, १ चमचा मध, १चमचा आवळापावडर,१ अंडे मिक्स करून लावायचे. अर्धा तास ठेवून मग धुवायचे. असे दर रविवारी(म्हणजे आठवड्यातून एकदा) करायचे. याने सगळे प्रॉब्लेम संपतील असे तिचे म्हणणे होते. मी तिकडे असताना करायचे आणि बराच फायदाही झाला होता. पण लेहला आल्यापासून बंद केलेय. Sad

>>>२ चमचे दही,१ चमचा मेंदी, १ चमचा मेथी पावडर, १ चमचा मध, १चमचा आवळापावडर,१ अंडे मिक्स करून लावा>>><<<

अरे बापरे हाच पॅक लावून माझे डोके दुखायचे.
पण खरेच क्रॉउनींग ग्लोरी मस्त होता साबण. वास एकदम सुंदर. बंद झाला नंतर तो वाटते.

मी उद्या हा पॅक लावीन म्हणते.
पण मला एक सांगा कुणीतरी की हा पॅक लावायच्या आधी केसांना तेल लावायचं का?
पॅक धुवून झाल्यावर शाम्पू करायचा का? किंवा निदान शिकेकाईचं पाणी तरी?
दुसरं म्हणजे मनस्विनीच्या पॅकमधे सांगितलेली कोरडी रोजमेरी भारतात/ मुंबईत कुठे मिळते?

केसाना कोरफडीचा गर लावलेला चान्गल असत का?
ईथे कोरफड लावण्यासम्बन्धी कोणीच माहीती दीलेली नाही..

मधामुळे केस पांढरे नाही होत का???....
कोरफडीचा गर डायरेक्ट स्कल्पला लावला तर केसांना चमक येते आणि मऊही होतात...

कोरडी रोसमेरी मुंबईत एका पार्लर मध्ये आईला मिळालेली व नंतर जिथे पार्लरचे सामान मिळते(वॅक्स पेपर्स्,वॅक्स वगैरे भरपूर काँटीटी मध्ये तिथे), आयुर्वेदीक साबण, शहनाझ हुसेनचे पॅक असे मिळतात हर्बल बुटीक मध्ये मिळेल. मला नाव माहीती नाही,आईने आणलेली.

हा पॅक मी तरी असा बन्वते व वापरते(मागे गेला होता म्हणून पुन्हा पेस्ट केला).
तसेही रविवारी अंड्याचे पदार्थ करते तेव्हा yolk आधी बर्‍याच वेळा सरळ फेकून देते.
आता कधीही अंड्याचे केले की yolk फ्रीज करते मग रविवारी मोठा प्रोग्रॅम होतो केस पॅकचा.

केस पॅकः
२ अंडी( कमरेपर्यन्त केस असतील तर) ,
२ चमचे रोस वॉटर,
३ चमचे मस्टर्ड ऑइल,
कोरडी रोसमेरी,
खोबरेल तेल लागेल तसे.(मिश्रण खूप पातळ नाही करायचे).
हे सर्व मिक्स करून छान घूसळून घ्यायचे. समजा रविवारी करणार असाल तर शनिवारी केस स्वच्छ धूवून घ्यायचे. रविवारी हे मिश्रण लावून केसाला छान चोळावे व शॉवर कॅप लावून बसायचे १ तास. मग नुसत्या कोमट पाण्याने धूवायचे. काहीही लावू नये नंतर.

माझे केस गळायचे बरेच थांबले. मूळचे तसेही काळेच होते ) काळे दिसतात.

केसाला मध चांगला नाही असे मी बर्‍याच जणाकडून एकलेय्.(खरे तर एका आयुर्वेदिक डॉ मैत्रीणीकडून व मग बाकीच्या कडून). मी वापरला नाही.

कोरफड पाने आहेत का पूड आहे?
पाने असतील तर तुला नेमका तो सफेद transfparent असा गर नीट जमायला पाहिजे काढायला. तो कडेचा दुसरा चिकट चीक नाही चांगला.

कोरफड, मेथी भिजवून वाटलेली + नारळाचे तेल असे मिक्स करून लाव. मग धूवून काढ. सौम्य शांपूने धू.
खरे तर आपल्या टाळूची/केसाची pH बर्‍याच शांपूने बिघडते मग ते तूटणे, कोरडे होणे असे होते. त्याबरोबरच वायटॅमिन्स कमी, कलरींग्,पर्मिंग, जिन्स(genetic) वगैरे पण कारणे असतात ठराविक वयात. म्हणून लहानपणी केस किती चांगले असतात जे मग खराब होतात.

कोरफडने गळती थांबते.

झुडप आहेत तर खूपच छान... गर काढुन डायरेक्ट लाव केसांना आणि टाळुला..

सध्या माझे केस प्रचंड गळतायत. तेल नाहिच लावत सहसा. आत इथल सगळ वाचुन निदान नियमित तेल लावायला तरी सुरवात करते.

कोरफडीचं पान मधे चिरून त्यात मेथीचे दाणे भरून ठेवायचे. ते त्या गराच्या पाण्याने टम्म फुगले की मग ते खोबरेल तेलात उकळून ते तेल लावायचं अशी पण एक कृती आहे. फक्त किती वेळ ते मेथीचे दाणे कोरफडीत ठेवायचे हे लक्षात नाहीये.

<<<<फक्त किती वेळ ते मेथीचे दाणे कोरफडीत ठेवायचे हे लक्षात नाहीये.>>>>>

त्या दाण्यांना मोड येइपर्यंत!

मेथीच्या दाण्याला मोड येईपर्यंत ! म्हणजे दोन दिवस आधिच हा प्रोग्राम ठरवून ठेवला पाहिजे.

हॅलो.
माझे केस कमरेपर्यंत लांब आहेत , पण खुप पातळ झाले आहेत. ( आधी असे नव्हते ) महिन्यातून एकदा मेंदि लावते. केस पांढरे झाले आहेत म्हणून .. (जास्त नाही ) ( नववीत दहावीत असल्यापासून केस पांढरे आहेत ) पहिले केसांची फार काळजी घ्यायचे, पण आता मुलगा झाल्यानंतर वेळच नाही मिळत...
माझ्या टाळूवरचे केस फार कमी झाले आहेत. अगदी तेल लावले असेल तर जास्तच वाटतात.. कधी कधी तर केस धुतल्यानंतर बरे वाटतात , पण लगेचच दोन तीन दिवसांनी केस तेलकट वाट्तात. केसात थोडाफार कोंडा आहे. टाळूवर जास्त खाज येते.. काय करू ?
तसे मी आठवड्यातून दोन वेळा केस धुते, कधी कधी तेल न लावताच धुते.
मी डॉ, कडे गेलेले त्यांनी मला सांगितले , केस जरा ड्राय आहेत, म्हणून खाज येते, आणि माझी मासिक पाळी व्यवस्थीत नसल्याने असे होते , थायरॉड्ची टेस्ट केलेली , पण टेस्ट नॉर्मल आहे. त्यांनी मला "डव " शॅम्पू दिला आहे , सध्या मी तोच वापरते.

नारळाच दूध रात्री लावले आणि सकाळी धुतले तर सर्दी नाही ना होणार...
केसाला मध लावल्याने केस पिकतात अस एकल होत , कितपत खर आहे ?

majhi mulgi lahan ahe 3 yrs chi.

mala tichya kesansathi kay kay kalji gheu ani kuthle tel wapru roj lawnaysathi he sangal ka pls.?
sadhya thandi khup aslyamule roj tel lawle jat nahi khup kami tel lawle jate. tyamule thandit pan waprata yeil tasech rojch waprata yeil ase tel ani ajun kahi upay sanga pls.
mi tila dabar awla che tel waprte.

mala marathit nit type karta yet naslyamule eng. madhech lihile.

beer and egg नावाचा एक शांपू आहे.. पुण्यात मिळतो - माझी मैत्रिण वापरायची - केस जबरी दिसायचे तिचे..
मला वाटतं - आहार चांगला (पौष्टिक - balanced) असेल आणि व्यायाम असेल तर सगळ्याच गोष्टी आपोआप चांगल्या राहतील (असं मला वाटतं) - म्हणजे right from हेल्थ, स्किन टू हेअर..

माझे केस खुप गळतात.. हेयर वॉश नंतर तर खुप जास्त गळतात.. केस विंचरतांना पण गळतात.. काय करु.. I tried many oils, shampoos... वायटामिन ई च्या कमि मुळे अस होत का? वायटामीन ई कश्यातुन मीलत?

माझे ही केस प्रचंड गळत होते, मी आता ट्रिटमेंट सुरु केली आहे हाय फ्रिक्वेन्सी ची....
शिवाय केस धुवायला गार्नियर चा फॉल फाईट शॅम्पू वापरतेय.... बराच फरक पडलाय. केस गळती
जवळ जवळ ८०% कमी झाली आहे. पुर्वी धुतल्यावर सुद्धा भयंकर गळायचे, आधीच पातळ त्यामुळे २ दिवसात तेलकट व्हायचे... आता वारंवार धुवुन ही गळती जवळ जवळ बंद झाली आहे.

दक्षिणा
हाय फ्रिक्वेन्सी .......काय आहे?
माझ्या पार्लरवालीने सांगितलं रोज आल्मंड ऑ.+खोबरेल लावा. व सकाळी ( अगदी रोज) डव्हने शांपू करा.
आधी माझे केस प्रचंड गळले पण आता गळणं कमी झालंय. व जरा बरे दिसायला लागलेत. मी शक्यतो १ दिवसाआड तरी हे करण्याचा प्रयत्न करते.

majhi mulgi lahan ahe 3 yrs chi.

mala tichya kesansathi kay kay kalji gheu ani kuthle tel wapru roj lawnaysathi he sangal ka pls.?
sadhya thandi khup aslyamule roj tel lawle jat nahi khup kami tel lawle jate. tyamule thandit pan waprata yeil tasech rojch waprata yeil ase tel ani ajun kahi upay sanga pls.
mi tila dabar awla che tel waprte.

mala marathit nit type karta yet naslyamule eng. madhech lihile.

भाग्या,
कोरफडीला मधे एक चिर देउन ती उघडायची आणि सालाच्या बाजुने हातात पकडुन डोक्यावर घासायची त्याने,
१. हात चिकट होत नाही
२. सगळा गर थेट त्वचेला लागतो
३. डोक्याला मसाज होतो.

केस गळत असतील, किंवा पातळ असतील तर आठवड्यातुन २ वेळा तरी एरंडेल तेल लावावे. रेग्युलर खोबरेल तेला बरोबर लावले तर ते पसरण्यास / जिरण्यास मदत होते.

किंवा खोबरेल तेलात मिक्स करुन ठेवले तर आपोआपच लावले जाते. अगदी हमखास केसांमधे बदल दिसतोच, चेहर्‍याची त्वचा पण चांगली होते.

Pages