Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56
केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जरा off-topic
जरा off-topic शंका आहे,त्याबद्दल सॉरी.पण आपल्याकडे भारतात कुठेही केस donate करता येतात का?म्हणजे देवस्थाने वगैरे नव्हे,chronic diseases मुळे रुग्णांचे केस जातात्,त्यान्ना विग बनवण्यासाठि ?
कृपया माहिती असेल तर इथे सांगू शकाल का कुणी?
धन्यवाद
मी अंडे +
मी अंडे + बेसन + १ चमचा तेल + दहि लावायचे. त्याने केस गलयचे थांबले.
कांद्याचा रस लावायचा नंतर शांपु. केस चमकदार होतात.
बाळांतपणा
बाळांतपणानंतर माझे केस खुप गळायला लागलेत.... सुरुवातीला प्रमाण कमी होते, पण गेल्या महिनाभरात केसामध्ये हात फिरवला तरी बचकभर केस निघतात... एवढे केस मी फक्त केमोथेरपी मध्ये गळताना बघितले होते... त्यातने मुळात केस पातळ आहेत्..आणि एक एक केस पण खुप पातळ किंवा बारिक म्हणावा असा आहे..त्यामुळे डोक्यावर केस उरतिल की नाही अशी शंका येतेय...थोडासा कोंडा पण आहे...काल नारळाचे दुध लावले होते...मस्त वाटले केस्..चमकदार झाले..पण केस गळणे कमी व्हावे म्हणुन काहीतरी उपाय सांगा.... सासुबाई म्हणतात आयाम हुंकारायला लागलाय म्हणुन केस गळतिल्..पण किति दिवस कुणास ठाउक्...सध्या तो साडेपाच महिन्याचा आहे....
अग अल्पना
अग अल्पना माझाहि मुलगा लहान होता तेव्हा माझे असेच खुप केस गळले..पण ते आपोआप थांबते मुल मोठि झाली कि...कोणि म्हणते की ते मुले हुंकारायला लागलि की होते..कोणि म्हणे कि बांळतपणात खुप अशक्तपणा येतो म्हणुन होते..पण एक खर कि ते कुठल्याहि उपायाने थांबत नाहि...
भारतात (
भारतात ( मुंबई, पुणे, बंगलोर ) स्ट्रेटनिंग आयर्न मिळतात का ? कुठल्या कंपनीच्या मिळतात? कुठल्या चांगल्या आहेत ? इथे Chi च्या चांगल्या असतात. तसल्या कुठे मिळतील ?
'केस खूप
'केस खूप गळतात' असे वाटते.
कारण प्रेग्नन्सीमध्ये केस गळत नाहीत (नेहमीपेक्षा कमी गळतात). नंतर सगळे पूर्वपदावर येऊ लागले की ते नेहमीप्रमाणे गळणे सुरु होते आणि 'खूप गळतात' असे वाटते. योग्य आहार आणि vitamis नंतरही चालू ठेवावीत काही काळ.
केस
केस गळण्याच कारण म्हणजे प्रोजेस्टेरॉन हॉर्मोन. प्रेग्नन्सि मध्ये हा हॉर्मोन आईच्या शरिरात प्रचंड प्रमाणात असतो (बाळाच संऱक्षण व्हाव, युटेरस योग्य वेळ येइपर्यंत बंद असाव हे मुख्य उद्देश) पण याचा साइड इफेक्ट म्हणजे लालु म्हणते तसे केस गळण थांबत आणि ते जास्त सुंदर चमकदार इ. इ. दिसायला लागतात. बाळाच्या जन्मानंतर प्रोजेस्टेऱोन लेव्हल्स प्रचंड प्रमाणात कमि व्हायला लागतात (नेहमिचा इस्ट्रोजेन प्रोजेस्टेरॉन बॅलन्स साधण्यासाठि) त्यामुळे केस खुप गळतात. अशक्तपणा वगैरे कारण हातभार लावु शकतात, पण बाळाच्या कुठल्याहि गोष्टिशि ह्याचा संबंध असेल अस वाटत नाहि. कदाचित टाइम फ्रेम म्हणुन असे वाक्प्रचार उपयोगात आले असतिल (बाळ ५/६ महिन्यांनाच होइपर्यंत आइच्या शरिरातिल प्रोजेस्टेरॉन चि पातळि केसांवर परिणाम होण्याइतकि खालि जाते).
मराठमोळी
मराठमोळी धन्यवाद.... मला हेच कळत नव्हते कि असे का होते...काहितरी कारण असणार पण कोणीच सांगत नव्हते...आणि सासुबाईंनी सांगितलेले कारण पटत नव्हते...माझी डॉ. पण फक्त म्हणते....डिलिव्हरीके बाद होताही है...पण का होता है हे सांगत नव्हती...आता खरे कारण समजल्यावर काळजी कमी झाली...
कदाचित
कदाचित टाइम फ्रेम म्हणुन असे वाक्प्रचार उपयोगात आले असतिल >>> हो हो हे मला पण मावशीने सांगितले होते. बाळ हसायला लागल्यावर काय होते,
ते अर्थातच चूक आहे असेही नाही.
हुंकारायला लागल्यावर काय होते वगैरे ह्याच्या चांगल्या पक्क्या व्याख्या आहेत आपल्याकडे
म्.मो. आणी
म्.मो. आणी लालूचं म्हणणं खरय.
बाळ हसतं तसे आईचे केस गळतात..
आणी आई आज्जी.. मावशी लोक असं सांगतातच...
माझ्या बाळाला मसाज करणारी मावशी तर ..
असं म्हणत माझ्या लांब वेणीने त्याची नजर काढायची रोज.... 
"लई चांगलं असतंय बाई आई-बाळाले नजर लागत न्हाई.. केस बी गळनार न्हाईत"
मजाच काहीतरी...
अल्पना तुझं बाळ साधारण आठ महिन्याचं होई पर्यंत थांबतिल तुझे केस गळायचे.
माझे हि
माझे हि केस डिलीव्हरी नंतर गळत आहेत, नि आता अमेरिकेत आल्यावर तर इथल्या पाण्याने जास्त च जात आहेत अस वाटत आहे...त्यासाठी कोरफड जेल चा उपयोग होइल का???कोंडा पण खुप असायचा १२ महिने..प्ण मी इकडे आल्यावर Selsun blue वापरला(मैत्रिणी ने सांगितले होते), आता मात्र कोंडा नाही अजिबात....:स्मितः
============================================
Write your Sad times in Sand, Write your Good times in Stone.
--GEORGE BERNARD SHAW
माझे केस
माझे केस तेल्कत आहेत केस धुतल्यापसुन २-३ दिवसातच केस इतके तेल्कत होतात कि परत धुवावेच लागतात....कोणी उपाय सुचवेल का?....आणी मला कोन्दा पण आहे.
-अनुश्का
माझे केस
माझे केस तेल्कत आहेत.....आणि मला कोण्डा पन आहे....दर २-३ दिवसात परत धुवावे लगतात...आणि केसहि खुप गलतात....मला प्लिझ कोणि उपाय सुचवु शकेल का?
-अनुश्का
ते
ते गरोदरापणानंतर केस गळायचे कारण हार्मोन्स तसेच शरीरात झालेले कॅल्शीयमचे प्रमाण्(कमी).
गरोदरपणात बर्यापैकी vitamins वगैरे घेतली जातात. पण जशी डिलीवरी होते तसे एकेक प्रकार दिसू लागतात केस गळणे,कोरडी त्वचा वगैरे वगैरे.(इती माझी डॉकटर आई).
पण ते वरचे वाचून गमम्त वाटली बाळाचे हसणे नी केस गळणं (हे असे एकले न्हवते कधीच)
जशी
जशी डिलीवरी होते तसे एकेक प्रकार दिसू लागतात>>>> काय काळजी घ्यावी हे टाळायला सान्गा बरे, माझ्या आइचेही खूप केस गेले होते माझ्या वेळी
हाय
हाय अनुष्का, तेलकट केसांकरता मेहेंदी + शिकेकाई + रीठा हे रात्रभर भिजव सकाळी लाव आणि १/२ तासाने धुवून टाक. कोंड्यासाठी पण हेच फक्त आवळा पुड + लिंबू रस add कर. donot use shampoo while washing hair.
केस
केस वाढ्ण्या साथि काय कराव्????घरगुति उपाय सुचवाना,प्लिझ.
नमस्कार
नमस्कार ..मी इथे नवीन आहे .Crown area pain बद्दल कुणाला काही माहीत आहे का? माझ्या crown area scalp खूप दुखतोय्.मी निय्मीत तेल लावते.
गौरी केस
गौरी केस वाढण्यासाठि आहाराकडे लक्श्य दे. शक्य असेल तितके sprouts खा. पाणी भरपुर पी. आठ्वड्यात २ वेळा तरी तेल लाव. हर्बल शाम्पु वापर
हाय
हाय लायटीन्गचा कोणाला अनुभव आहे का? बे एरियात चान्गले सलून सुचवा.
मला केस
मला केस वाढवायचे आहेत . मी गेले दोन वर्षे तरी केस कापलेले नाहीत . आता त्यांची वाढ (हळुहळू का असेना पण) होते आहे. पण आता थोडे थोडे दुतोंडी केस पण दिसू लागले आहेत. मग ते कापायचे म्हंटले तर त्याने माझ्या केसांच्या वाढीवर काही परिणाम होईल का?
आणि केस वाढण्याकरता काही विशिष्ट तेलं असतात का ?
रात्री झोपताना केस बांधून झोपणे चांगले की न बांधता? कारण सध्या उन्हाळ्यात खूपच त्रास होतो केस मो़कळे सोडून झोपले तर..
दुतोंडी
दुतोंडी झालेले केस कापणेच चांगले..खरतरं दुतोंडी होऊ नयेत म्हणूनच थोड्या काळानंतर केस ट्रीम करावे...
रात्री झोपताना हे पहावे की केस लसणार नाहीत...
माफ करा
माफ करा मनकवडा पण "लसणार" म्हणजे नक्की काय ?
टोचणे या अर्थानी का?
केस
केस दुखावणार नाहीत या अर्थाने...
कवड्या
कवड्या एक्दम बरोबर ..खर तर केस प्रतेक ६ आठवद्याने ट्रिम केलेच पाहिजेत्..त्या बरोबर्च प्रोपर शाम्पु आणी कंडिशनर पण अगदि जरूरी आहे..आनि दर आठवयाला डिप कंडीशनर ट्रिट्मेंन्ट पण महत्वाची..
आज्जुका
आज्जुका तुझा हा दुधाचा उपाय मी ट्राय करुन बघेन..
माझे केस कमरेपर्यंत लांब आहेत.. साधरण पाउण वाटी लागेल का हे???
रुपाली_राह
रुपाली_राहुल, पाऊण वाटि नाहि पुरणार. साधारण एक ते दिड वाटि लागते. माझेहि केस कमरे इतकेच आहेत. मी २ वाट्या जिरवते. आणि मग साधारण १ तासाने धुते सिल्केशा किंवा शिकेकाई+आवळा+रिठा पावडरिने. मस्त मऊ होतात.
====================================
कितीक हळवे, कितीक सुंदर, किती शहाणे....आपुले अंतर.....
धन्स सखी...
धन्स सखी...
काळेभोर व
काळेभोर व दाट केस जपण्यासाठी उडीद व मेथीच्या डाळीचे मिश्रण तयार करून केसांना लावून केस सुकवावे. सुकल्यानंतर केस धूवून घ्यावे. शिकेकाई, हिरडा, संत्रा व लिंबाची साल वाळवून पावडर करून घ्यावी. पावडर पाण्यात टाकून उकळून घ्यावी व अक्र उतरलेले पाणी चाळणीने गाळून केस धुण्यासाठी वापरावे. आठवड्यातून दोनदा केस धुतल्यास केस नरम़, मुलायम व काळे होवून केसांच्या सौदर्यात भर पडते....
हे मला खुप आवडले....
~~~//\\//\\//\\//\\//\\//\\//\\//\\//\\~~~
दिसलीस तू, फुलले ॠतू
हेअर स्टाईल
हेअर स्टाईल मेकओव्हर
Pages