Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56
केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो का. आता मी पण पळतेच ते तेल
हो का. आता मी पण पळतेच ते तेल आणायला मग.
मी कालच एरंडेल तेलाची बाटली
मी कालच एरंडेल तेलाची बाटली आणली, इथली चर्चा वाचून. आता केसांना अन् डोळ्याला लावणार.
किति लावायचे ए.तेल्?फ॑क्त
किति लावायचे ए.तेल्?फ॑क्त त्वचेला म्हणजे मुळाशी लावायचे का?किती वेळ ठेवायचे?
केसांना फाटे कशामुळे फुटतात?
केसांना फाटे कशामुळे फुटतात? यासाठी का उपाय
हसरी पार्लरमध्ये फाटे कट करुन
हसरी पार्लरमध्ये फाटे कट करुन देतात.त्यानंतर मुळापासुन शेंडया पर्यत तेल लावत जा .मेंह्दीसुध्दा शेंडयाला लावत जा यानेखुप फरक पडतो..........
भाई, नाही येत फारसा वास
भाई, नाही येत फारसा वास
दुसर्या एखाद्या तेलात मिक्स करुन लावले तर अजिबातच येत नाही.
केस गळणे बंद? आता काहीतरी
केस गळणे बंद? आता काहीतरी केलेच पाहिजे
आरती, किती तेल लावायचे आणि किती वेळा आठवड्यातून हे सांगशील?
पूनम, १. साधारण हाताच्या
पूनम,
१. साधारण हाताच्या खळग्यात मावेल असे तेल घेउन माथ्यावर लावावे. जिथे केस जास्त पातळ आहेत तिथे बोटांवर घेउन हलका मसाज करावा. प्रंमाण कमी जास्त झाले तरी फार फरक पडत नाही. [ धुताना कंटाळा येतो, इतकेच
]
२. एरंडेल तेल चिकट असते, लवकर पसरत नाही, त्यामुळे वरुन थोडे खोबरेल तेल लावावे म्हणाजे मसाज करणे सोप्पे जाते.
३. केस खुप पातळ असतील किंवा खुप गळत असतील तर, आठवड्यातुन २ वेळा लावावे. अन्यथा एकदा लावले तरी बास.
४. एरंडेल लावल्यामुळे केस चिकट होतात, त्यामुळे केसांना २ वेळा शॅम्पु लावावा लागण्याची शक्यता आहे.
माझी पद्धत ..
शनिवारी रात्रि TV बघताना दोन्ही [एरंडेल, पॅराशुट] बाटल्या घेउन बसायच्या. आधि माथ्यावर एरंडेल ओतायचे, मग साधे खोबर्याचे तेल पुर्ण डोक्याला लाउन घ्यायचे. बघत असलेला कार्यक्रम / चित्रपट संपे पर्यंत बोटांनी मसाज करायचे. [अन्यथा वेळ काढला जात नाही]
सक्काळी - सक्काळी कोरफडीचे एक पान घेउन, सगळा गर संपे पर्यंत, डोक्याला मसाज करायचा. आणि साधारण तासाभराने केस धुवायचे.
इतर अनेक फायद्यां बरोबर कोरफड लावल्याने तेलकट / चिकट पणा कमी होउन धुतानाचे कष्ट कमी होतात.
धन्यवाद आरती! हे करणार मी
धन्यवाद आरती!
हे करणार मी नक्कीच.. ह्या शनिवारपासून सुरूवात करतेच
मी ही इथली चर्चा वाचुन आणलय
मी ही इथली चर्चा वाचुन आणलय एरंडेल तेल, अजुन एकदाच लावलय ते ही चिकट लागल म्हणुन थोडच लावल आता नीट लावेन खोबरेल तेलाबरोबर........
माझ्या बाळाचेही केस खुप विरळ झालेत खुप गळत आहेत नी त्याला मुळातच पुढे कपाळावर केस नाहीत त्यामुळे कपाळ खुप मोठ दिसत तर ८ महिन्याच्या बाळाला एरंडेल तेल खोबरेल तेलात मिसळुन फक्त केसांवर लावले तर चालेल काय?
उत्तम चर्चा व माहिती.
उत्तम चर्चा व माहिती. कंडिशनर चा काय उपयोग असतो? मला तो हेअर डाय सोबत फुकट बाट्लीभर मिळाला आहे. शाम्पू केल्यावर लावायचा अन मग धुवायचे एवढेच ना. आपण वापरता काय?
हेअर स्ट्रेट्नर्स आज्काल मिळतात. ते गरम करायला ठेवले असताना त्यात धडपडून अगदी लहान मुलांना भाजू शकते.
ही वार्निन्ग बीबीसी न्युज च्या साइट वर आहे.
मी वाचले होते एरंडेल तेल
मी वाचले होते एरंडेल तेल भुवया व पापण्यांना पण लावतात दाट होण्यासाठी. कधी ट्राय नाही केला पण.
धन्यवाद आरती, माझही शिल्पा
धन्यवाद आरती, माझही शिल्पा सारखच झाल. आता तु सांगित्येस तस लावेन.
मामी, शांपू करुन झाल्यावर कंडीशनर लावायचा बरोबर आहे. कंडीशनरने केस मस्त मउ होतात. मी कधी कधी लावते.
मला एरंडेल तेलाची बाटली
मला एरंडेल तेलाची बाटली बघितली की पोटात मळमळायला लागतं. पण आता इतका लगेच फायदा होत असेल तर धीर गोळा करायला हवा.
मी आणलेल्या एरंडाच्या तेलाला
मी आणलेल्या एरंडाच्या तेलाला मुळीच वास नाही आहे. भेसळ असेल का? मी (ईथे मिळणारे) लक्ष्मी ब्रँड चे आहे. कश्या प्रकारचा वास येतो?
मागे याच ब्रँड्चे ऑमंड तेल आणले होते त्याला सरसोच्या तेलासारखा वास येत होता.
खेडेगावात मुलांच्या अंगात
खेडेगावात मुलांच्या अंगात उष्णता वाढल्यास डोक्याला एरंडेल लावुन वर एखादे मोठे पान ठेवायची पद्धत होती. उन्हाळ्याच्या दिवसात खुप लोक डोक्याला एरंडेल लावुन वर हिरवे पान ठेवुन फिरायचे. माझ्या लहानपणी मी हे पाहिलेले. आता बहुतेक लोक एरंडेलाला विसरले...
बेबे, आमचे आई-वडील आम्हाला
बेबे, आमचे आई-वडील आम्हाला कोठा साफ होण्यासाठी एरंडेल पाजायचे..
मामी - कंडिशनर ने केसांना एक प्रकारचा तजेला येतो, काही काही शॅम्पू वापरल्यावर केस थोडे कोरडे होतात. कंडिशनिंग ने केस मऊ, झुळझुळित होतात. केस धुऊन झाल्यावर हातावर थोडा कंडिशनर घेऊन तो सगळ्या केसांना लावून ५ मिनिटं ठेवून मग धुवायचा.. केस लगेच सुळसुळित होतात. फक्त एक खबरदारी, कंडिशनर वर वर लावावा. केसाच्या मुळाशी लावू नये. कारण मला माहित नाही. मुख्य म्हणजे घाईत आपण कधी कधी ओले केस विंचरतो तेव्हा जास्ती तुटतात. कंडिशनर वापरला असेल तर ओले केस विंचरणं सुद्धा खूप सोप्पं जातं.
माझ्या अनुभवानुसार कंडिशनर लावल्याने वरिल सर्व गोष्टी तर होतातंच पण एक तोटा म्हणजे दुसर्या दिवशी केस लगेच चप्प दिसतात, थोडे तेलकट पण दिसायला लागतात.
८ महिन्याच्या बाळाला शक्यतो
८ महिन्याच्या बाळाला शक्यतो बदामाचे तेल लावावे. डोक्याला पण आणि त्वचेला पण.
हिरवे पान >> साधना ते पान पण एरंड्याचेच ठेवतात खेड्यातली लोक, टोपीच्या आत आणि चप्पल च्या वर.
कोठा साफ होण्यासाठी एरंडेल पाजायचे >> बहुतेक लोकांना एवढा एकच उपयोग माहीती असतो.
आता बहुतेक लोक एरंडेलाला विसरले... >>
आता अचानक मागणी वाढुन तुटवडा नाही ना होणार
हो होणार ना.. माबो वाचुन सगळे
हो होणार ना.. माबो वाचुन सगळे धावत सुटले असतील एरंडेल घ्यायला... दुकानदारही अवाक होईल, अचानक एरंडेल स्टार कसे काय झाले म्हणुन....
इथुन प्रेरणा घेऊन शिकेकाई ने
इथुन प्रेरणा घेऊन
शिकेकाई ने केस धुतले, तेल अजिबात निघाले नाही 
माझे केस खुप राठ आहेत तेव्हा रीठा वगैरे वापरायला नको वाटतं.
शिकेकाईने डोक्यातलं तेल जाण्याकरता काही उपाय आहे का?
शिकेकाई मधला रिठाच तेल
शिकेकाई मधला रिठाच तेल काढण्याचे काम करतो. शांपूसारखा फेस होते व चमक येते.
अशुशी सहमत... मुग्धा, शिककाई
अशुशी सहमत... मुग्धा, शिककाई ने केस धुवायचे असतील तर चपचपून तेल लावणे टाळावे. फक्त मुळाशी लावून हल्का मसाज करावा आणि दुसर्या दिवशी कोमट पाण्याने धुवावेत केस...
हो..तिथेच चुकलं दक्षिणा. मी
हो..तिथेच चुकलं दक्षिणा.
मी जर रीठा लावला नं तर माझ्या केसांचा "भांडे घासायला" घासणी म्हणुन उपयोग करावा लागेल
मुग्धा असो, तु कंडिशनर
मुग्धा


असो, तु कंडिशनर नेटाने लावच मग, म्हणजे दर केस धुणिला... शिवाय मेंदी पण लाव, त्याने ही मऊ पडतात केस.
आता मेंदीचा विषय निघालाच आहे
आता मेंदीचा विषय निघालाच आहे तर विचारते - माझे माथ्यावरचे ७०% केस पांढरे झालेत, मी मेंदी लावते पण माथ्यावरचे लालच दिसतात त्यामानाने वाढलेले वेणीत येणारे केस जास्त रंगतात. माझे केस लांब असल्याने पार्लरमध्ये जाऊन केसांना मेंदी लावणे परवडणार नाही (मी दर आठवड्याला मेंदी लावायचा प्रयत्न करते)...
तर प्रश्न असा की मेंदीत अजुन काय काय घालावे म्हणजे अतिशय गडद रंग चढेल? (मी गोदरेज नुपुर वापरते, ती नवी ज्यात ९ घटक आहेत).
मी एकदा लोखंडी भांडयात मेंदी भिजवुन लावलेली, त्यामुळॅ हात काळे झाले पण केसांना अजिबात रंग चढला नाही (कदाचित मेंदीही खराब असु शकते, पण त्याआधी आणि नंतर असे कधीही झाले नाही)
अरे दक्षिणा मेंदीचा पण काही
अरे दक्षिणा मेंदीचा पण काही फायदा होत नाही..राठ ते राठच.. कंडीशनर दर वेळला लावते म्हणुन..सध्या ठीक आहेत..मध्येच हे शिककाईचं फॅड आलं आणि केस एक्दम विचित्र झाले...
मी आणलेल्या एरंडाच्या तेलाला
मी आणलेल्या एरंडाच्या तेलाला मुळीच वास नाही आहे. भेसळ असेल का? मी (ईथे मिळणारे) लक्ष्मी ब्रँड चे आहे. कश्या प्रकारचा वास येतो? >>> काल मी सामुहिक डोळ्यांभोवती एरंडेल फासण्याचा प्रयोग केला तेव्हा लेक म्हणाली 'ईई आई ह्याचा पादू सारखा वास येतोय'
आणि म्हणे वास येत नाही.
नाही हो भाई असा काही वास
नाही हो भाई असा काही वास नक्कीच येत नाही. थोडा कडु वास येतो इतक्च
साधना, मेंदी अशी भिजवून
साधना, मेंदी अशी भिजवून बघ.
१. पाणि उकळवायच.
२. त्यात २ चमचे ऑलिव्ह ऑईल टाकायच
३. त्यात २ चमचे कॉफी टाकायची
४. कॉफी विरघळली की मेंदी भिजवायची
ह्याने चांगला डीप ब्राऊन रंग येतो.
Pages