केसांचे आरोग्य

Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56

केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रात्री भरपूर तेल लावायचे. मुरवायचे. सकाळी एक दोन वाट्या नारळाचे दूध रिचवायचे डोक्याच्या त्वचेमधे आणि पूर्ण केसांना. मग अंघोळीला जायच्या आधी डोक्याच्या त्वचेवर लिंबू चोळायचे.
लिंबू हे वर्ष सहा महिन्यातून एखाद्या वेळेला करायचं प्रकरण आहे. तेव्हा अगदी अति कोंडा असेल तरच लिंबू लावावे. अन्यथा आठवड्यातून एकदा नारळाचे दूध वाट्या दोन वाट्या मुरवल्याने कोंडा हळूहळू जातोच.
बाहेर पोल्युटेड वातावरणात पाठवताना शक्यतो केस झाकलेले असावेत कोंडा बरा होईपर्यंत.
तिच्या रोजच्या जाण्यायेण्याच्या प्रवासात केसात फार धूळ जात नाहीये ना हे बघणे. शक्यतो रूमालाने केस झाकलेले बरे. प्रदूषणापासून थोडे वाचल्यास फरक पडू शकतो.

कोंड्यासाठी आंबट दही १-२ तास न्हान्या आधी लावावे... म्हणजे केसांच्या मुळाशी चोळावे .. ह्याने पण कोंडा कमी होतो आणि केस शाइन पण करतात.. Happy
माझ्या असे एकण्यात आहे की लिबु , संत्र्याच्या साल पण चोळावी पण मला त्यासंबंधी नक्की माहित नाही.. कोणाला माहित असेल तर प्लीज सांगणार का..

अजून एक चांगला उपाय आहे.खोबरेल तेलामधे थोडा कापूर मिसळून डोक्याला लावायचा,सकाळी धुवून
टाकायचे केस्.कोंडा,लिखा,तसेच overall च चांगल्या केसांसाठी उत्तम उपाय.

माझे केस प्रचंड राठ आहेत त्यामुळे मी आठवड्यातून दोनदा ironing करते..केस मऊ, मुलायम होण्यासाठी कायमस्वरुपी असा काही उपाय आहे का? सध्या प्रेग्नन्सीमुळे केस गळणंही कमी झालयं पण माझे केस झपाट्याने पिकत आहेत. मेंदीचा पर्याय खूपच चांगला आहे पण सध्या इथे थंडी सुरु झाल्यामुळे मेंदी लावावीशी वाटत नाही. यावर काही उपाय आहे का?

मी कुठेतरी वाचलेले की केस कोरडे असतील तर लिंबु लावु नये. केस टोकांशी दुभंगायचे प्रमाण वाढते. हे खरे आहे काय?? इथे लिंबु लावणा-या व केस कोरडे असलेल्या लोकांना काही फरक जाणवलाय का?

माझे केस कोरडे आहेत. कोंडा कधीच झाला नाही त्यामुळे लिंबु लावले नाही कधी. पण मुलीच्या केसात कोंडा होतो आणि तिचेही केस कोरडे आहेत.

हो कोरड्या केसांना शक्यतो लावायचं नाही लिंबू. आणि लावलंच तर भरपूर तेल आणि भरपूर नारळाचं दूध आधी मुरवलेलं असेल तर लावायचं.

मी हा उपाय विशेष करून थंडीत करते. कारण म्हणजे माझे केस थंडीत खूप कोरडे होतात. त्यात सतत ट्रॅवल असल्याने खराब होतात. असो.
खालील उपाय मध्ये खूप पेशन्स असावे लागतात. पण फाय्नल रिसल्ट ग्रेट आहे.
१) करण्यापुर्वी ४ तास ठेवा जवळ्(केसाच्या लांबी नुसार. लहान किंवा शोल्डर पर्यन्त साठी कमी लागतील).
२) घरात कोणी नसेल तर बरे.. नाहीतर ई ई.... काय हे.. असे एकावे लागेल्(कारण कळेल खाली).
३) बाथरून अंघोळी नंतर धुवायची तयारी असेल तरच...
तर मूळ उपाय,

थंडीत मी मस्टर्ड ऑइल( राई तेल?) वापरते. थंडी लागू नये म्हणून.
केस पॅकः
२ अंडी( कमरेपर्यन्त केस असतील तर) ,
२ चमचे रोस वॉटर,
३ चमचे मस्टर्ड ऑइल,
कोरडी रोसमेरी,
खोबरेल तेल लागेल तसे.(मिश्रण खूप पातळ नाही करायचे).
हे सर्व मिक्स करून छान घूसळून घ्यायचे. समजा रवीवारी करणार असाल तर शनिवारी केस स्वच्छ धूवून घ्यायचे. रवीवारी हे मिश्रण लावून केसाला छान चोळावे व शॉवर कॅप लावून बसायचे १ तास. मग नुसत्या कोमट पाण्याने धूवायचे. काहीही लावू नये नंतर.
विश्वास नाही बसणार अजिबात घाण वास येत नाही. केस काळे, तलम,जाड रहातात. चिकट तर बिलकून रहात नाहीत.
(ई ई चे कारण अंडे असे लोकांना वाटते. माझी बहिण हा प्रकार करायची तेव्हा मी तिला त्रासून सोडायची काय अंडे लावतेस. पण नंतर मी लावायला लागले तर कळले की काहीही वास येत नाही.
जर नुसते बलक लावले तरच येते.

कोणाला अंड्याची, तेलाची अ‍ॅलर्जी असेल तर करू नये. नाहीतर रोज नुसते खोबरेल तेल गरम करून त्यात रोसमेरी टाकून तेल बनवून ठेवायचे व लावून मग अंघोळ करायची. छान रहातात केस, वास मस्त येतो रोसमेरीचा.

करून पहा.... मस्त रहातात केस.... माझी केसाची जाडी अजून टिकून आहे.

वाव मस्तच... मी करुन पाहिन ह्या रविवारी.. माझेही केस थंडीत जरा जास्त कोरडे होतात..

(बाथरुम धुवायचाही त्रास नाही Happy मी माझ्या गच्चीतही नळ बसवुन घेतलाय. मेंदी घातली की मग सरळ गच्चीत नळाखाली डोके धरते. Happy )

माझा अनुभव असा आहे की शांपूमुळे कोंड्याची शक्यता वाढते आणि तो जर झाला असेल तर कोंडा आणखीनच होतो. तेंव्हा आधी शांपू लावणे कायमचे सोडावे.

दुसरा उपाय जो मला अगदी ८ दिवसात लागू झाला तो म्हणजे मी नागरमोथा, आवळाकंठी, जास्वंद, शिकेकई, कापडकचूरा, रिठा या वस्तू भरड कांडल्यात. मला माझ्या बहिणीने इथे सिंगापुरात मग ही पावडर पाठवली. मी ती तातडीने मागून घेतली. रात्रभर एक चमचा पावडर मी वाटीभर पाण्यात भिजवतो. अंघोळीच्या एक तास आधी ते पाणी खदखद उकळतो म्हणजे डोक्यावर घ्यायला गरम वाटतं नाही. ती पावडर आणि पाणी केसांच्या मुळांपर्यंत चोळतो. सुगंध एकदम छान येतो. माझा कोंडा एकदम नाहीसा झाला शिवाय मला बाकीचे फायदे देखील मिळत आहे. पुर्वी मी ४ आठवड्यातून एकदा कंटीग करायचो. आता ३ आठवड्यानंतर मला जावे लागते Happy

माझी आई तिच्या माहेरी गेली की माझी आजी तिचे डोके शेतातील चिकन मातीने धुवायची. तिचे केस चकचकायचे आणि पोत अगदी तलम रहायचे. आता आजी राहिली नाही. मी आता एकदा हा प्रयोग करुन पाहीन Happy आता माझी आई ७५ ची आहे. तिचे केस बगळ्यासारखे शुभ्र झाले आहेत. ते केस इतके सुंदर दिसतात तिला!!!! कारण केस गळले नाहीत. केसाची दाट घडी पडते.

मुलतानी मिट्टीचाही तोच फायदा आहे. फक्त त्यात दही नाहीतर नारळाचे दूध घालून लावायचे. आम्ही लहानपणी गावी गेलो की करायचो. आता थंडीत लावून हॉस्पिटलात जावे लागेल दुसर्‍या दिवशी. थंड सहन होत नाही त्यानी करू नये.
केस मात्र चमकदार्,काळेभोर खवडारहित होतात.

मनुस्विनी,
अजूनही म्हणजे? म्हातारी झालीस की काय तू? Happy

असो उपाय चांगला वाटतोय करून बघायला पाहिजे. रोजमेरी म्हणजे वास मस्तच येणार. ड्राय रोजमेरी भारतात कुठे मिळते कोणी सांगेल का? आणि ती किती वापरायची?

बाप्ये लोक केस छोटे ठेवत असल्याने शॅम्पू सोडू शकतात पण मोठे केस असतील आणि तेल लावायचे असेल रेग्युलर तर शॅम्पू करावाच लागतो. तो केला की कंडीशनर पण आलंच ओघाने. धावत्या लाइफस्टाइलमधे शिकेकाई उकळा, गाळा करत बसायला वेळ नसतो. आणि कुठल्याही दिवशी तेलकट दिसून चालत नाही. प्रेझेंटेबल दिसावेच लागते... माझ्या प्रोफेशनमधे तरी. लांबसडक केस असतील तर थोडे तेलकट राह्यलेले कळत नाहीत कारण ते बांधून ठेवलेले असतात. पण खांद्यापर्यंत किंवा थोडेसेच खाली असतील तर तेलकट केस लगेच पकडले जातात. असो...
तस्मात शाम्पू सोडता येणे अशक्य. कितीही पटलं तरी.

बी तुम्ही दिलेल्या ची पावडर आयुर्वेदिक दुकानात मिळेल का? आणि याने तेल जाते का?
माझे केस लांब आहेत पण आता खुपच गळतात लवकर उपाय सांगा

हसरी भारतात असशील तर काष्ठौषधी च्या दुकानात जाऊन हे सगळे विकत आण आणि ठराविक प्रमाणात एकत्र करून दळून घे. सगळ्यात शुद्ध. माझी आई करून घ्यायची माझ्यासाठी. ही अशी पावडर उकळून त्याचा वस्त्रगाळ अर्क घेऊन केस धुणे, त्यानंतर उर्जिता जैनचं जास्वंद जेल स्काल्पला लावून केस चोळणे आणि धुवून घेणे. असा उपाय केल्यावर महिन्याभरात फरक जाणवायला लागायचा. आईची रेसिपी - प्रमाण बाबा शोधून ठेवणार होते. ते सापडले तर इथे टाकते.
शिकेकाई-जास्वंद जेल आणि तेल शाम्पू कंडीशनर अल्टर्नेट वापरायचे उपयोग होतो.
पण याने तेल जात नाही एवढं नक्की.

हसरी, विकतची पावडर इतकी गुणकारक मला तरी वाटली नाही म्हणून परत त्या वाटेने गेलो नाही. माझी एक बहिणी जी नोकरी करते ती केसांचे तेल जावे म्हणून आधी शांपू लावते. मग शेवटी परत डोके या पावडरीने धुते. अर्क तर डोक्यावरुन घ्यावाच पण भरड चोथा जो असतो त्यानी केस मुळापासून चोळावे. ते फार महत्त्वाचे आहे. रिठा असल्यामुळे तेल एकदम निघते. अजिबात शिल्लक राहत नाही. दुसरे असे की केसांना अगदी मानेवरुन ओघळ येईपर्यंत तेल लावायची गरज नाही. माझी बहिण एकावेळेस अर्धा पॅराशूट संपवायची आणि मग सगळे टॉवेल्स, चादरी आणि उशा यांची वाट लावायची Happy आता २ मुलांची आई झाल्यावर एक मग अंगावर पाणी घ्यायला वेळ नाही म्हणून जेंव्हा म्हणते तेंव्हा मजा वाटते Happy

धन्यवाद
निधप मि मुंबईला राहते काष्ठौषधी दुकान म्हणजे नाही माहित (आयुवेदिकच माहिती आहे) आणि
उर्जिता जैनचं जास्वंद यांच तेल वापरते आणि काहि माहिती असेल तर द्या

हसरी, दादर जाणेयेणे असेल तर रानडे रोडच्या गल्लीत भानुपद्म (वामन हरी पेठे दुकानानंतरची गल्ली, स्टेशनच्या विरुद्ध दिशेने चालत जाताना) म्हणुन दुकान आहे. तिथे काष्ठौषधी चांगल्या मिळतील.

केसांची काळजी कशी घ्यायची याची आपण इतकी चर्चा करतो, केसांना अगदी जीवापाड जपतो. पण याच्या विरुद्ध एक आठवण सांगते.

माझ्या आईच्या माहेरी सगळ्यांचे बाईमंडळींचे - आई, आईची आई, आजी, मामेबहिणी, मावसबहिणी, सगळ्याजणी , माझी एक सख्खी मावशी फक्त अपवाद - केस काळे-चॉकलेटी रंगाचे, लांबी कमरेच्या खाली गुडघ्यापर्यंत पोचणारी, अतिशय दाट...... तर या बायका केस फक्त रविवारी धुत आणि धुवायला चक्क तेव्हा मिळणारा कपडे धुवायचा सोडा वापरत. गरम पाण्यात हा सोडा घालायचा आणि मग त्या पाण्याने आपण कपडे धुतो तसे केस धुवायचे. सगळ्या एकमेकींचे केस धुवुन देत, कारण स्वतःचे स्वतः धुवायचे म्हणजे हातांवर खुप ताण यायचा. कधीकधी रिठे वापरत, पण बहुतेक वेळा सोडाच वापरत. आता मी कल्पनाही करु शकणार नाही असले जिन्नस केसांना वापरण्याची. एकदा वापरले की मग परत वापरण्यासाठी केसच राहाणार नाहीत डोक्यावर.. Happy

धन्यवाद साधना
मला किती प्रमाणात (नागरमोथा, आवळाकंठी, जास्वंद, शिकेकई, कापडकचूरा, रिठा )घ्यायच्या ते सांगा? आणि हो पावडर कशी करायची ते पण सांगा

हे सगळे उपाय आयते करुन कुठे मिळतील? हे एवढे कष्ट करायचे म्हणजे अवघड आहे बुवा. नारळाचे दुध रेडीमेड मिळतं ते वापरलं तर चालतं का नी ?

हसरी, मी १:१:१:१:१:१:१ असे घेतले होते प्रमाण. प्रमाण खरे तर नसतेच. बाजारात जी गोष्ट महाग ती पावडरीत कमी टाकतात असा माझा अनुभव आहे. तू घरीच कर. भरड कर.

कोंड्यासाठी मला स्किन स्पेशलिस्टने डँगो नावाचा शाम्पू सांगितला होता. अजिबात कोंडा रहात नाही पण शाम्पू वापरायचा सोडल्यावर परत होतो.

नागरमोथा, आवळकाठी, गूळवेल आणि वडाच्या पारंब्या (या दुकानात मिळत नाहीत, विचारू नका!!) हे सर्व १०० ग्रॅम घेऊन एक लिटर तेल आणि एक लिटर पाणी याच्या मिश्रणात घालायचे. आणि ते तेल उकळायचे. सर्व पाण्याची वाफ होऊन जाते. उरलेले तेल गाळून घ्याय्चे आणि बाटलीत भराय्चे. य तेलाने केसांना नियमित मालिश केली तर केस लांब आणि घनदाट होतात. माझा अनुभव!

पण मुंबईच्या पाण्याने आणि प्रदूषणाने माझ्या केसाची भरपूर वाट लावली Sad

मला किती प्रमाणात (नागरमोथा, आवळाकंठी, जास्वंद, शिकेकई, कापडकचूरा, रिठा )घ्यायच्या ते सांगा? आणि हो पावडर कशी करायची ते पण सांगा<<
थोडी थांब. व्यवस्थित वैद्याकडून लिहून घेतलेले प्रमाण आहे पुण्यात घरी. १-२ आठवड्यात टाकते इथे. आपल्या मनाप्रमाणे प्रमाण घेऊ नकोस. ते केसाला सूट होईलच असं नाही.
बहुतेक पार्ल्यात पण अतुल मेडीकल मधे सगळी द्रव्ये चूर्ण स्वरूपात मिळतात.
पण द्रव्ये चूर्ण स्वरूपात घेण्यापेक्षा वाळवलेली मूळ रूपात घेतली (उदाहरणार्थ: शिकेकाईच्या वाळवलेल्या शेंगा, वाळवलेले रिठे इत्यादी) आणि सगळं भरड दळून घेतलं तर जास्त चांगलं आणि शुद्ध.

चांगल्या प्रतीचा मिक्सर असेल तर घरीच भरडलंस तरी उत्तम.

मीनू,
खवलेला नारळ रोज स्वैपाकात वापरतेस ना? तोच मिक्सर मधून काढायचा थोडं पाणी घालून की झालं.
तयार नारळाचं दूध मी कधी वापरलं नाही.

आमच्या घरी आई उन्हाळ्यात वरील सर्व जिन्नस टाकून शेकेकाई दळून आणते.घरी जास्वंदीची खूप फुले येतात्.आम्ही शेकेकाई दळताना फुले वाळवून टाकतो.ही शेकेकाई चांगली उकळून घ्यायची.उकळताना त्यात लिंबाची १ फोड् (कोंड्यासठी),गुळाचा खडा(केसांना चमक यावी म्हणून्),१ चमचा मेथ्या (नक्की माहीत नाही पण बहुधा केस गळणे थांबावे म्हणून) टाकायच्या.अंघोळीच्या सुरुवातीला उकळलेली शिकेकाई चांगली खसाखसा लावायची आणि शेवटी धुवायची.गरज पडली तरच थोडासा शांपू लावायचा.ह्याने बराच फायदा होतो.

मी अनेकदा शांम्पूने केस धुवून लगेच दुसर्‍या दिवशी शिकेकाई मिक्स ने धुवायचे. म्हणजे तेलकटपणा नाही, शाम्पूची केमिकल्स केसांवर राहून पोचणारी इजा नाही आणि वास पण मस्त.

जेव्हा संत्र्यांचा मोसम असतो तेव्हा संत्र्याची साल उन्हात वाळवून त्याची पाउडर वरील मिश्रणात घातली तर केस खुप चमकदार होतात.

मिक्सर मधे हे सर्व मीही करुन पाहिले आहे. एकतर फारचं कर्कश आवाज येतो आणि दुसरे म्हणजे ह्या गोष्टी मिक्सर मधे फुटतचं नाही. उन्हात खणखण वाळू द्यायचे मग लोखंडी खलबत्त्यात कांडायचे तर जास्त छान होते. जात्यावर मी दळून पाहिले नाही. आता पुढल्या वेळी आईला सांगेन की जाते टाकून घे म्हणून Happy

Pages