केसांचे आरोग्य

Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56

केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोन,
माझ्या अनुभवात तरी कशानेही केस वगैरे वाढत नाहीत. वाढत असते, ते पेटंट करुन लोकांने बिलियन्स कमावले असते गं. Happy
आहेत ते केस सुंदर आणि निरोगी राखण्यासाठी थोडाफार मेंटेनन्स आवश्यक आहे. काही लोकं थोडा करतात, काही फार. त्याचाच वृत्तांत इथे ७५० पोस्टींमध्ये आहे.

करेक्ट रैना. Happy
केसांची वाढ व्यक्तिगणिक बदलत असते. त्यात कसल्याही बाह्य उपचारांनी बदल घडल्याचे ऐकिवात नाही. Happy

हाय लोक्स,

औषधाच्या side effects मुळे गेलेले केस परत येतात का? माझे केस खूप गळाले आहेत औषधांमुळे ..ख्हूप टेंशन आलय.

वरचे थोडे थोडे उपाय करतेय.पण hair loss इतका झालाय.केस पुर्वीसार्खे होन्यासाठी किती वेळ लागेलकाअय माहीत.

कोणी पार्लर मधील हेअर ट्रीटमेंट बद्द्ल माहिती सांगाल का? कित्पत परिणामकारक असते?? किती चार्जेस वगैरे प्रत्येक सिटिंग्जचे असतात?? केस खुपच गळ्तायत....

काल केस धुण्याच्या आधी फ्रेश कोरफडीचा गर तास भर केसांना लाउन ठेवला आणि मग केस धुतले. मस्त मऊ झालेत केस. आता जमेल तेव्हा करत जाईन हा उपाय.

एरंडेल तेल उष्ण असते का?
मी २-३ वेळा खोबरेल तेलात मिसळुन केसांना लावले पण त्यानंतर डोक्यात बारिक पुरळ आल्यासारखे वाटत आहेत (उष्णतेने येतात तसे)

रुनी जी वाचलीयत मी पाने आधीच, सर्चही मारुन पाहीले, पण कुठेही चार्जेस (प्रत्येक सिटिंग्जचे) , ट्रीटमेंट संपल्यानंतर घ्यायची द्क्षता, कित्पत परिणामकारक याबद्द्ल कुठेही उल्लेख नाहीय... म्हणुनच विचारलेय...

लोक्स, तुम्ही आठवड्यातनं किती वेळा डोकं धुता? माझे केस इतके तेलकट होतात की आठवड्यातनं तिनदा तरी धुवावेच लागतात. दर वेळी शांपू-कंडिशनर वापरायची इच्छा नसते. फार वेळ जातो. काही झटपट उपाय आहे का कोणाकडे?

मी आज सकाळी कोरफड जेल लावून ठेवलं...वाळल्यावर धुतलं ...पण केस जड वाटतायत...म्हणजे हा उपाय फसला.

फास्टमधला एखादा उपाय असेल तर सांगा प्लीज. आठवड्यातनं एकदा शांपू-कंडि ओके वाटतं....इतका आल्हाददायक वेळ नसतो रोजच्यामध्ये...

माझे केस गळतायत, कोंडाही होतोय. दररोज तेल लावतोय, पण प्रमाण जास्त होतय, कारण केस चिपचिप होतात, कमी लावावे तर हेल्मेट घलून ऑफिस ला जात असल्यामुळे बर्‍यापैकी कोरडे होतात, जेल लावून तर पस्तावलोयच Happy राठ होतात एकदम केस वर कोरडे होतात.

आठवड्यातून दोनदा केस धुतो (पतंजलीच्या शँपूने) केस मऊ होतात, पण तेल लावले नाहीतर एकदम 'जुल्फ्या' दिसतो.

१) केस गळणे कमी होण्यासाठी काही उपाय? अनुवांशिकता नाहीये (कदाचित माझ्यापासूनच सुरु होईल)
२) कोंडा कमी व्हावा अथवा होऊच नये यासाठी काही उपाय?
३) तेल / जेल कुठले वापरु जेणेकरुन चिपचिप होणार नाही आणि केस नीट सेट करता येतील?

रंगासेठ, केसांना रात्री थोडे तेल लावून रोज सकाळी धुतलेले बरे असते. ता प्रदुषणमध्ये तेल लावून जाण्याने केस आणखी खराब होतात. बरेच लोक हेल्मेट घालण्या आधी डोक्याला रुमाल बांधतात.

नी Sad

मला केसांची वाढ थांबवण्यासाठी उपाय हवा.....वसवस वाढतात. काल कापले तर आठ दिवसात अगदी कापायला झालेत अशा छापाचे दिसतात...कोणाचं काय तर कोणाचं काय...लांबी ऐवजी जाडी वाढली असती तर काय बहार आली असती. Uhoh

नीधप जास्वंद जेल.. हे कंडिशनर आहे का ? ते कसे वापरावे ? ईथे परगावि (लंडन )ते मिळण कठिण आहे तर हे कोणते कंडिशनर चांगले ? कोणि सांगेल का? प्लिज

माझे केस खुप गळत आहे.. मला खुप टेंशन आलय.. मला दर दोन दिवसानि केस धुवायला लागतात.. नाहि तर खुप तेलकट होतात..असे हि माझे केस पातळ आहेत.. आणि असे च तर ते गळत राहिले .. तर माझ काहि खर नाहि.. प्प्लिज उपाय सांगा

व्हिटामिन सप्लिमेन्ट्स, आयर्न, डायेटमधे प्रोटीन्स वाढवणे हे उपाय आधी करा दीपा चव्हाण. केस गळायचे आपोआप कमी होतील. कोंडा नाही ना ते तपासा. बेबी शाम्पू वापरा. ब्लो ड्राय करु नका.

जास्वंद जेल हे कंडीशनर सारखं वापरता येतं.
हेअर मास्क मधेही वापरता येतं.
परदेशात मिळेल की नाही हे परदेशवासीच सांगू शकतील. पण माझ्यामते लंडनमधेही उर्जिता जैनांची प्रॉडक्टस मिळत असावीत. अन्यथा इथून कोणी येणारं असेल त्यांच्याबरोबर मागवू शकता.

केस गळणे, कोंडा यासाठी महिन्यातून एकदा तरी भरपूर नारळाचं दूध स्काल्पमधे जिरवून मग केस धुवायचे हे केल्यास बरे.
नारळाच्या दुधात शिकेकाई आणि इतर केश्य द्रव्यांच्या पावडरी रात्रभर भिजत घालून सकाळी त्याने केस धुतल्यास पण उपयोग होतो असे ऐकले आहे.
मात्र केस थोडे चिकट रहाणार त्यामुळे हे शक्यतो कुठे जायचं नसेल अश्या वेळेला करावे. एखादा दिवस ठेवावे आणि मग माइल्ड शांपू करावा.

धन्यवाद .. नीधप .. मी शोधेन.. ईथे... नाहि तर पुढच्या भारत भेटीत घेवुन च येईन .. मला कोंडा नाहि.. पण केस भंयकर गळत आहेत.. ...हे नारळयाच्या दुधाच पण करेन च.. नाहि तर थोडे दिवसानि.. डोक्यावर केस च दिसणार नाहित .. Sad

अमा, लिंबू रस केवळ अटीतटीच्या प्रसंगापुरता, वर्ष सहा महिन्यातून एखाद्या वेळेला वापरायचा बरं. एरवी नुसतं नारळाचं दूध. Happy

Pages