गेल्या एका वर्षात तुम्ही काही केलंत?

Submitted by अजय on 6 March, 2011 - 23:24

मला काहितरी करायचंय हा लेख मी लिहून १ वर्ष झालं. त्यावर ११० प्रतिक्रियाही आल्या? पण त्यानंतर कुणी काही केलंय? कारण नुसती प्रतिक्रिया लिहणे म्हणजे काही करणे नाही. जे काही तुमचं स्वप्न असेल ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने काही केलंय का?

आणि लेख न वाचता देखील तुम्ही काही तरी केलं असेल तर ते वाचायला आवडेल. आम्हालाही त्यापासून स्फूर्ती मिळेल. तुमच्या स्वप्नाच्या दिशेने अगदी "माहिती मिळवली" इतकी छोटी पायरी ओलांडली असेल तरी चालेल. "कागदावर लिहून काढलं" हे सुद्धा चालेल.

पण मी गेल्या वर्षी काही केलं नाही पण या वर्षी हे करणार आहे अशा प्रतिक्रिया नकोत. उलट ते जे करायचं असेल ते आधी करा आणि मग सांगा.

कुणितरी "लोका सांगे ब्रम्हज्ञान" असे म्हणायच्या अगोदर सांगतोय Happy . किंवा मागे वळून पाहताना काही गोष्टी /चुका मी केल्या, करतोच आहे त्या ही सांगतोय.

योग्य वेळ घालवला:
अनेक ग्राहक, भागीदार यांना प्रत्यक्ष भेटलो. त्यातून खूप शिकायला मिळालं. " No Good idea survives a first real customer interaction" याचाही अनुभव घेतला. म्हणजे जी Idea आपल्याला great वाटत असते त्याबद्दल ग्राहकाला काहीही देणेघेणे नसते. त्याला वेगळेच हवे असते आणि ते शोधून काढून विकता येणे हाच उद्योगाचा मूलभूत पाया आहे.
काही वेगळ्या कल्पना , मार्केटींगच्या कल्पना चाचणी करून पाहिल्या. स्केल वाढवण्याच्या दॄष्टीने प्रयत्न केले. नवीन प्रकल्प सुरु केले. मार्केटींग बद्दल पुस्तके वाचली आणि काही कल्पना प्रत्यक्षात आणल्या.

कुणाचे तरी चरित्र (कितिही स्फूर्तिदायक असले तरी) या वर्षी वाचायचे नाही असे ठरवले होते आणि ते पाळले. अशी खूप पुस्तकं वाचून झाली आहे आणि आता वाचन सोडून त्यातलं प्रत्यक्ष काही आचरणात आणल्याशिवाय नवीन वाचायचं नाही असं ठरवलं आहे.

चुकीचा वेळ घालवला:
"Startup porn" म्हणतात ते वाचण्यात वेळ घालवला. उदा. Tech Crunch , Yourstory.in सारख्या वेबसाईट किंवा काही मासिकातले स्फूर्तीदायक लेख. यातून आपल्याला वाटते नवीन नवीन Idea मिळताहेत. हे करावे का ते करावे? काही लेखातून कधितरी एक ज्ञानाचा कण सापडतो पण ९०% वेळा काय वाचले काय मिळवले ते आठवत नाही. जर तुमच्या कडे काही आयडिया नसेल तर किंवा स्फूर्ती कमी पडत असेल तर अशा लेखांचा उपयोग होतो. पण तुम्ही प्रत्यक्ष एखाद्या कल्पनेवर काम करत असाल तर असे लेख वेळेचा अपव्यय ठरतात (माझ्यासाठी तरी) अजून तरी या सवयीवर उपाय सापडला नाही. माझ्या माहितीतल्या बर्‍याच उद्योजकांच्या मते ही सगळ्यात वेळखाऊ सवय आहे.
http://twitter.com/wadenick/status/27516895945
कुणाकडे या सवयीवर उपाय असेल तर जरूर सांगा ! Happy

तुम्ही काय केलंत?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे आमचे घडाभर! Happy

१) स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन केली.

२) रसायन उद्योगामध्ये चीन च्या एका कंपनीशी सहकार्याचा करार केला.

३) मुंबईतील एका कंपनीमध्ये करार पद्धतीनुसार प्रत्यक्ष काम सुरु केले.

४) ऑस्ट्रेलियातील प्रशिक्षण आणि संगणक क्षेत्रातील उद्योगाशी करार करुन भारतात मार्केटींग सुरु केले. महाराष्ट्रातील ३ शहरांमध्ये ऑफिस आणि क्लायंट्स ची जुळवाजुळव केली.

३) गुळ उद्योगाची अधिक माहिती मिळवुन, काही उद्योगांसाठी प्रत्यक्ष मार्केटींग केले. अनेक गुर्‍हाळघरे आणि ५०० टनी पर्यंतच्याउद्योगाच्या मालकांशी संपर्क करुन उत्पादन आणि मार्केटींगच्या अनेक पैलुंवर चर्चा केली / उपाय शोधले.

४) २५० टनी गुळ निर्मीती प्रकल्पा साठी 'फायनान्स' शोधला. (हे काम आगामी हंगामात ऑक्टो. २०११- सुरु करित आहे. त्यामुळे नियोजीत ५० टनी प्रकल्प यंदा ऑक्टो. २०१० - सुरु केला नाही)

मी १ ओफिस प्रोजेक्ट आणी २ पर्सनल प्रोजेक्ट पुर्ण केले
१ जाने पासुन नविन १ ओफिस प्रोजेक्ट आणी १ पर्सनल सुरु झालय Happy

Bhart Petroleum ची sub-dealership मिळवली आणि ३ client ला supply चालु केला....मुळ उद्योगा बरोबर यात पण investment केली .... अजुन ६ महीने लागतील स्थिर स्थावर व्हायला...नविन उद्योगात....

अजय, चंपक, पियापेटी, suशान्त अभिनंदन Happy
चंपक हे सगळे व्ययसाय एकमेकांशी संबधीत नाहीयेत ना? तरीही कसं काय मॅनेज करताय तुम्ही?

मी इंटेरीयर डिझाईन्सचा कोर्स केला जपानमधे. आता पुढ्च्या चाचपण्या चालू आहेत. जमेल का/ कितपत जमेल ते माहीत नाही अजुन.

बापरे चंपक, तुम्ही सॉल्लीड काम केलेत एका वर्षात. तुमचे अभिनंदन. तुम्ही दाखवत असलेल्या चिकाटीची मला सध्या प्रचंड गरज आहे.

पियापेटी आणि सुशांत तुमचेही अभिनंदन.

मी नुकतेच दुकान सुरू केलेय. आणि त्याचे बरेवाईट अनुभव घेतेय Happy

२०% पेक्षा जास्त वाढ, ३० हून अधिक नवीन ग्राहक. प्रदर्शना मध्ये सहभाग.
जुने विषय सोडविण्याचा प्रयत्न,
सर्व पातळ्यांवर अधिक संवाद साधण्याचा प्रयत्न. जसे ग्राहक, इंड्स्ट्री पीपल, कच्चा माल वाले,
एका मोठ्या रिव्यू मध्ये न रड्ता स्वतःची बाजू सांगितली.
स्वतःच्यातील लिमिटेशन्सचा सामना केला. करत आहे.
सर्विस टॅक्स सिच्युएशन अपडेट केली.
सेल्स फोर्स सारखे नवे सॉफ्ट्वेअर वापरात आणत आहे. त्याने खूप फरक पड्तो.
आर्थिक शिस्त अधिक बाणविण्याचा प्रयत्न.
प्लॅन बी इव्हॉल्व करायचा प्रयत्न आहे. - जसे मुलांना शिकविणे/ डॉग केनेल चालू करणे इत्यादी. यात फार पैसे नाही मिळणार पण समाधान, आनंद व स्वतःसाठी वेळ मिळेल.

एक महत्त्वाचा शोध लावला म्हणजे प्रत्येक सिच्युएशन मध्ये स्वतःला त्या समीकरणात अ‍ॅड करायचे नाही.
फक्त कंपनी, ग्राहक व इश्यू ह्यावरच लक्ष द्यायचे. पहिले ग्राहकांकडून काही ही ऐकून घेताना मला फार अवघड जात असे. पण मी, माझे व्यक्तिमत्त्व ( क्रिएटिव स्वभाव, सेन्सिटिव स्त्री वगैरे) वैयक्तिक सिच्युएशन
यांचा कामातील प्रश्नांशी काहीच संबंध नाही. हे समजून घेतले. यामुळे प्रत्येक बारीक बाबीत होणारी स्वत:ची झीज वाचली.

माबो दिवाळी अंक, माहेर अश्या ठिकाणी लिहायला सुरुवात केली. दर्जेदार लिखाण करायचा प्रयत्न आहे.

धन्यवाद अजय, या धाग्याच्या निमित्ताने मागील वर्षाचा आढावा घ्यायला मिळतोय.

१. पूर्वी मी घरातूनच काम करत असे. मागील वर्षात एक अगदी छोटे वेगळे ऑफिस थाटले आणि आता बाजूच्या नवीन मोठ्या ऑफिसमधे शिफ्ट केलेय. या २ महत्वाच्या पायर्‍या ओलांडल्या.
२. मागील वर्षाच्या सुरुवातीला केवळ एक ग्राहक होता. आता ६ आहेत.
३. माझ्या क्षेत्रातल्या बर्‍याच नवीन गोष्टी शिकून घेतल्या ज्यांच्या जोरावर मला आत्ताच काही नवीन प्रोजेक्ट्स पण मिळाले.
४. माझ्या क्षेत्रातील बर्‍याच नवीन उपयुक्त ओळखी झाल्या.

आणि केलेल्या चुका:
१. एक स्वतःचे product develop केले. आणि मग ग्राहकांकडे जाऊन आल्यावर कळाले की याची कोणालाही गरज नाहीये. अजयच्या म्हणण्याशी १००% सहमती - <<<" No Good idea survives a first real customer interaction" >>>
२. आणि बरेच काही "Startup porn" वाचून आपण असे काय करू शकतो या विचारांनी भरलेली डायरी. प्रत्यक्षात यातले अजुन काहीच नाही. पुन्हा अजयला १००% अनुमोदन <<<"Startup porn" वाचत बसणे ही सगळ्यात वेळखाऊ सवय आहे.>>>
माझी अवस्था या दोन्ही बाबतीत "कळते पण वळत नाही" अशीच आहे..

एक वर्षापूर्वी ज्या पोरांना एबीसीडी ची तोंडओळख सुद्धा नव्हती अश्या (अंडर प्रिविलेज्ड) पोरांना आठवड्यातून तीन दिवस,घरी बोलावून इन्ग्लिश शिकवायला सुरुवात केली. बर्‍याचश्या नवीन ,स्वतः तयार केलेल्या मेथड्स वापरल्या. आता त्यांना शालेय परिक्षेत ९०% च्या वर गुण मिळतात तेंव्हा मलाच ते गुण मिळालेत असं वाटून ,खूप आनंद होतो. बरीच वर्षे हा उपक्रम करायचे मनात होते त्याला मागच्या वर्षी सुरुवात केली. यापैकी काही पोरांना उत्तम वाचता येतं आणी वोकॅब पण वाढलीये.
या पोरांसाठी भारतातून बरीच गोष्टींची,फळं,फुलं,भाज्या,कीटक,प्राणी इ.ची चित्रे असलेली पुस्तकं आणलीयेत. ती ती नांवे शिकल्यावर त्यांनाच ती पुस्तके बक्षीस देऊन टाकलीत्..म्हंजे त्यांना घरी पण उजळणी करता येते.

चंपक,पियापेटी,सुशांत,अश्विनी,योगी -अभिनंदन
@ साधना.. तुझा तर एकदम हटके व्यवसाय आहे.. तुला या बिझिनेस मधे येणार्‍या अडचणी,अनुभव नक्की कळव.

चंपक, जबरदस्तच... एवढे काही सगळे एका वर्षात? अभिनंदन..

अश्विनीमामी, तुमचा तर विक्रीचा आलेख चढताच आहे. २०% वाढ करण्यासाठी तुमच्यासारखेच विचार करायला शिकायला हवे.

suशान्त, भारत पेट्रोलियम सारख्या मोठ्या कंपनी सोबत डील मिळवले - ग्रेटच..

वर्षू नील, पियापेटी, साधना, सावली - अभिनंदन, आणि शुभेच्छा..

अजय, चंपक, मी योगी,suशान्त,अश्विनीमामी,पियापेटी, साधना, सावली, वर्षू नील, - अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा

यावर्षी पार्टनरशीपमध्ये कंसल्टंसी सुरु करायचा बेत होता. परंतू ते गाडं लवकर पुढे जाईल असं वाटत नसल्याने दिवाळीच्या आधी स्वतः एकटीने व्यवसाय (डेव्हलपमेंट प्लानिंग कंसल्टंसी) सुरु केला. पूर्वी ज्या कंपनीत काम करत होते त्यांच्याचकडून आत्तापर्यंत एक ४ महिन्यांचा तर एक छोटासा असे दोन प्रोजेक्ट मिळाले.
नविन प्रोजेक्ट मिळण्याच्या दृष्टीने संभाव्य क्लायंट्सशी संवाद वाढवायला सुरवात केली.
आत्ता आत्तापर्यंत मी एकटीच काम करत होते. आता मात्र काम वाढत असल्याने अगदी पुर्णवेळ नाही तरी अर्धवेळ असिस्टंट (प्रोजेक्टच्या गरजेप्रमाणे किमान तितक्या कालावधीसाठी) या महिनाअखेरीपर्यंत ठेवणार आहे.

<>हे मी मिळवल नाही......first it was diversification option for funds....पण आता तो पण येक main line bussiness झाला.....आणि १० वष्रा पासुन mechanical industry मध्ये असल्यामुळे फार त्रास नाही झाला....

काम करणारे/वाढवणारे इ. सगळ्यांचे अभिनंदन.
मी काय केले - अनुभवातून शहाणपणा शिकले असे म्हणायला हरकत नाही.
गेल्या दिवाळीत स्वतःच काही पणत्या तयार करून, रंगवून त्या ऑनलाईन विकायचा प्रयत्न केला. हे सगळे मी एकटीच करणार होते. माझी स्वतःची पणत्या करण्याची क्षमता लक्षात घेता इथले मराठी मंडळ, भारतीय दुकाने इ. ठिकाणी जाऊन त्या विकण्याइतके उत्पादन मी करू शकणार नव्हते. म्हणून मग ऑनलाइन विकण्याचा पर्याय निवडला. कोणी विकत घेईल असे वाटले नव्हते. त्यामानाने मला जवळपास २५ गिर्‍हाईक मिळाले. यातले बहुतेक लोक हे माझ्या वैयक्तिक ओळखीतले होते. मी पणत्या करण्यासाठी दिलेला वेळ (चाकावर माती ठेवून पणत्या बनवण्यापासून ते पोस्टात पडेपर्यंतचा वेळ) आणि विक्रीतून मला झालेले उत्पन्न याचा ताळमेळ घातला तर मी $6/hr या रेटने काम केले असे म्हणता येईल. थोडक्यात प्रचंड कष्ट आणि त्यामाने परतावा जवळजवळ नाहीच.
हे मी करून बघीतले नसते तर मला कधीच कळले नसते पणत्या करणे आणि त्या विकणे किती अवघड काम आहे. खर तर विकणे या स्टेजपर्यंत येणेच खर तर अवघड आहे. हे एकट्यादुकट्याने करायचे काम नाही. तसच हे काम करत असतांना as a potter म्हणून माझी जी वाढ व्हायला हवी ती झाली नाही, होणारही नाही. ती वाढ होण्यासाठी मला पणत्या न करता दुसरे काही तरी शिकणे जास्त आवश्यक आहे असे वाटले. If I spend the same amount of time improving my pottery skills I would be a better potter.

सर्वांचे अभिनंदन आणि मनःपुर्वक शुभेच्छा !!

माझा रिपोर्ट :

मागील एक वर्षाचा आढावा घेता, काही गोष्टी केल्या , काही करायचा प्रयत्न केला तर काही अजुन अपुर्णच आहेत.

१) neuronic.in: मागील वर्षी ह्या वेळेस, आम्ही भारतात वैद्यकिय व्यवसाय करणार्‍यांसाठी एक सॉफ्टवेअर बनवत होतो. गेल्या मार्च मधे आम्ही एक बीटा कस्टमर (डॉक्टर) यांच्या सल्यानुसार सुधारणा चालु होती. वर्षभरात जवळपास ४ बीटा डॉक्टर्स आमच्या मदतीला आले. मागील वर्षाच्या शेवटच्या महिन्यात आम्ही ३ मेडीकल कॉन्फरन्सला हजेरी लावली. अनेकांनी विकत घेण्याबद्दल उत्सुकता दाखवली. काही जणांनी विकत घेतलेही आणि काही जणांशी बोलत आहोत.

आम्ही विकायची घाइ नाही केली कारण त्यांना डेमो देणे तसेच विकल्यानंतर सपोर्ट करण्यासाठी आमच्या कडे मनुष्यबळ नाही. अनेक माणसे नेमण्याइतका पैसा पण नाही. म्हणुन सध्या ३-४ लोकांशी/कंपनींशी बोलाचाली चालु आहेत. ते लोक आमच्या सेल्स आणि फर्स्ट लेव्हल सपोर्टची काळजि घेतील. त्याबदल्यात आम्ही त्यांना विक्रीचा काही हिस्सा देउ. (कोणाला ह्यात interest असल्यास माझ्याशी संपर्क साधा)

भारतीय मार्केट साठी स्पेशलायझेशन प्रमाणे विविध मॉड्युल्स बनवली आहेत आणि अजुन काम चालुच आहे. भारताबरोबर ऑस्ट्रोलिया / अमेरीका इथे पण हे सॉफ्टवेअर लाँच करण्याचा विचार झाला. सध्यातरी अमेरीका मार्केटवर काम करणे चालु आहे. बहुधा पुढच्या वर्षापर्यंत बीटा व्हर्जन लाँच करण्याचा विचार आहे.

थोडक्यात, जे काम चालु केले होते त्यात समाधानकारक प्रगती होते आहे.

२) गेल्या २-३ महिन्यात अजुन एका प्रॉजेक्टवर डोके लढवतो आहेत. आर्ट इ-बिझीनेस + सोशल नेटवर्कींग असे त्याचे स्वरुप आहे. सध्यातरी कन्सेप्ट व्हॅलिडीटी आणि प्लॅनिंग यावरच काम चालु आहे. दिवाळी पर्यंत काहीतरी तयार असावे असा विचार होता, बघु, अजुन अनेक गोष्टींचा विचार व्हायचा आहे.

३) DW/BI Consultancy चा व्यवसाय पण करायचे अनेक दिवसापासुन मनात आहे. पण त्या करिता मला काही skills असणे आवश्यक आहे म्हणुन त्या skills चा अनुभव मिळावा म्हणुन मागच्या वर्षी नोकरी बदलली.

पुस्तके अशी खुप वाचली नाही पण अनेक आर्टीकल्स, ब्लॉग्स यांचा वेळोवेळी उपयोग झाला. नुकतीच एक लिंक दिली आहे. त्यावरुन आम्ही न्युरानिक इझी प्रक्टीस च्या धोरणात १-२ बदल केले.

ह्या वर्षभरात, काही मायबोलीकरांची मदत झाली. काही जणांनी मदतीचा हात पुढे केला पण काही कारणाने त्यावेळी त्यांची मदत घेउ शकलो नाही. हा विभाग चालु केल्याबद्दल मायबोली प्रशासनाचे आभार.

अश्विनीमामी,साधना,वर्षू नील,मिस्टर योगी,अल्पना,रूनी,महागुरु सगळ्यांचे अभिनंदन.
आणि नविन कामाकरता शुभेच्छा.
रूनी, तुझं बरोबर आहे. बर्‍याच वर्षापूर्वी मी हाताने केलेली ग्रीटींग विकायचं असं ठरवलं होत. आणि शिवाय ती भारतातच विकणार होते. पण दुकानात ठेवण्यासंबंधी बोलणी केल्यावर लक्षात आलं की एक ग्रीटींग करायचा वेळ, आणि खर्चही काही निघणार नाही. Sad शिवाय भरपूर करण्याच्या नादात नुसत्याच पाट्या टाकाव्या लागतील.

या वर्षात मी अजुन एक गोष्ट केलीये जी कधीच केली नव्हती. फोटोग्राफीबद्दल लिखाण चालू केले. या आधी मी शाळेतल्या निबंधाव्यतिरिक्त कधीही काहिही लिहीले नव्हते. मायबोलीचे आभार Happy

रुनी, खरेच असे होते. मार्केट डिमांड्चा सामना करताना आपली वैयक्तिक वाढ बाजूस राहते. इतर अ‍ॅडमिन इश्यूज मध्ये वेळ जातो शिवाय अकाउंटिंग तर आहेच जन्माच्या कर्माला. पण तुमची विचारसरणी बरोबर आहे. ऑनलाइन तुमच्या कलेला समजून घेणारे ग्राहक नक्की भेट्तील.

सर्वांचे अभिनंदन आणि शुभेच्छा....!!!!!

गेल्या एका वर्षात भाड्याच्या जागेतून स्वतःच्या फॅक्टरी प्रिमायसेस मधे शिफ्ट झालो. कंप्लीट प्रोजेक्ट बँकेत सबमिट करून मशिनरी आणि फॅक्टरी पूर्णपणे ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. मुंबईत ऑफिस सुरू केले. या सर्व प्रकारात "बँक ऑफ महाराष्ट्र्"ने दिलेल्या मनस्तापातून लवकरात लवकर बाहेर पडून सेल्सवर त्याचा फार परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी लागली. तरी थोडा इफेक्ट पडलाच, कारण त्या प्रकारात जवळजवळ ४ महिने वाया गेले होते.

"बिझनेस एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड" मिळालं यावर्षी, ते निव्वळ एक मार्केटिंग टूल म्हणून स्विकारलं. खरं तर ते व्यवस्थित एनकॅश करायला हवं होतं सगळीकडे प्रमोशन्स मधे वापरून, पण तो मूळ पिंड नसल्याने मार खाल्ला. आता जाणवतय की, आपल्यालेखी या अ‍ॅवॉर्डची किंमत फार नसली तरी अ‍ॅड किंवा प्रमोशन्समधे ते असल्याने नक्कीच फरक पडतो. अजूनही वेबसाइइटवर त्याचे अपडेट्स केलेले नाहीत, त्याची प्रक्रिया मात्र सुरू केली आहे. ते नक्की करणार आहे.

प्रचंड भेडसावणारा मनुष्यबळाचा प्रश्न सध्या कळीचा मुद्दा बनलाय. मॅन्युफॅक्चरिंग अ‍ॅक्टिव्हिटी असल्याने आणि डिझाईन पासून ते इंस्टॉलेशनपर्यंत सर्व कामे असल्याने माणसं अपुरी पडतायत. त्यासाठी नुकतीच पेपर अ‍ॅड्सचा आधार घेतलाय. या फायनांशियल इयरेंडपर्यंत तो प्रश्न सुटेल अशी अपेक्षा आहे.

गेल्या वर्षी फक्त महाराष्ट्र, हैदराबाद आणि बँगलोर इथेच क्लायंट बेस होता. यावर्षी नॉर्थ रिजन आणि इतर राज्यातही वाढवलाय.

प्रयत्न चालू आहेत.

सर्वांना पुन्हा शुभेच्छा....!!!!!! Happy

इथे सगळेजण आपापले अनुभव मांडताहेत ते वाचुन नविन आयडियाज डोक्यात येतात आणि आधीच डोक्यात असलेल्या आपल्या आयडियांना कितपत मार्केट सपोर्ट मिळेल हेही लक्षात येतेय. इथे मनमोकळेपणे आपले प्लस आणि मायनस मांडल्याबद्दल सगळ्यांचे आभार. अजुन असे भरपुर इथे वाचायला मिळावेत ही अपेक्षा.

ग्रिटींग्स, बुकमार्क्स इ. कागदी गोष्टी आणि पणत्या, अर्थात विकतच्या पण घरी रंगवुन ही आयडिया माझ्याही डोक्यात आहे. या वर्षी राबवणार. पुढच्या वेळेस त्यांचाही अनुभव इथे मांडता येईल Happy

आमच्या बिजनेसमधली ह्या वर्षीची सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे गोडाऊन सुरु करण्याच्या दृष्टीने सध्या जिथे वर्कशॉप आहे त्याच बिल्डिंगमध्ये एक छोटा फ्लॅट घेतला.. ज्याचा उपयोग गोडाऊन आणि ऑफिस असा करायचा विचार आहे..

सध्या मनुष्यबळाची कमतरता प्रचंड जाणवते आहे.. जाहिरात देऊनही फारसा उपयोग होत नाही.. पूर्णपणे लेबर इन्टेन्सिव्ह काम असल्यामुळे बरेच जण नाहीच म्हणतात.. तरीही योग्य माणसे शोधणे चालू आहे...

एक केलेली महत्वाची गोष्टः नोकरीसाठी कुठेही अर्ज केला नाही Happy (अर्धवेळ कडुन पुर्ण वेळ उद्योजकतेकडे जाणार्यांसाठी टीप!)

छोटा अन मोठा उद्योग सांभाळण्यासाठी आपण आपले २४ तास देतच असतो. मग त्यात छोट्या ऐवजी 'स्केल' वर काम केले तर उत्तम, असे मला वाटते. (याला 'एक न धड भाराभर चिंध्या' असे ही काही लोक म्हणु शकतील.)

सध्या मनुष्यबळाची कमतरता प्रचंड जाणवते आहे.. जाहिरात देऊनही फारसा उपयोग होत नाही.. पूर्णपणे लेबर इन्टेन्सिव्ह काम असल्यामुळे बरेच जण नाहीच म्हणतात.. तरीही योग्य माणसे शोधणे चालू आहे...

>> याच्यावर एक उपाय अमलात आणुन गेली ५-७ वर्ष यशस्वी झालाय, गावाकडची ओळखीची १०-१२वी शिकलेली ,बेरोजगार मुले आणुन त्यांच्या जेवणा-राहण्याची सोय करायाची,आजारी पदली तर तो खर्चही आपणच करायचा, त्यांचा सगळा पगार आइवडीलांकडे पाठवायचा.अधुनमधुन सुट्टीलाही आपल्याच ख्र्चाने पाठवायचे, त्यांना काही कर्ज काअढायचे असेल तर garuntee आपणच घ्यायची.
बचत होते त्यामुळे आइवडीलच मुलांना काम सोडु नको म्हणुन दबाव आणतात.लोकल मुले म्हणावी तितक्या मनापासुन काम करत नाहीत. अर्थात तुमची situation नक्की काय आहे माहीत नाही.त्यामुळे हे लागु होइलच असे नाही. हे तंत्र ओळखीच्या २-३ लोकांनी त्यांच्या व्यवसायत वापरले आहे.

एक न केलेली महत्वाची गोष्टः नोकरीसाठी कुठेही अर्ज केला नाही

मी खुप ठिकाणी अर्ज केला पण नो sucess Sad Sad

मी विचार करतेय Uhoh माझ्याच क्षेत्रात मी teaching/coaching सुरु करु म्हनजे माझे background change होणार नाही .. आणी माझा teaching/coaching skill set वाढेल्.....

एक केलेली चुक म्हणजे एका तथाकथित marketing guru च्या नादी लागलो. आपला बिझिनेस वाढेल, आणखी ओळखी होतील वगैरे विचार करुन. काही हजार रुपये पण त्याला दिले. आणि २/३ महिन्यानंतर ते अक्कलखाती जमा करुन हा एक महत्त्वाचा धडा शिकलो की 'आपले स्वतःचे प्रॉडक्ट किंवा सेवा विकण्यासाठी, त्याचे मार्केटिंग करण्यासाठी, आपण स्वतः च सगळ्यात योग्य व्यक्ती असतो. बाहेरचे कोणीही नाही'. आणि त्यानंतरच माझे ग्राहक १ वरुन ६ झालेत...

भुंगा, "बिझनेस एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड" बद्दल अभिनंदन. ते एनकॅश करा अजुनही...

जी Idea आपल्याला great वाटत असते त्याबद्दल ग्राहकाला काहीही देणेघेणे नसते. त्याला वेगळेच हवे असते आणि ते शोधून काढून विकता येणे हाच उद्योगाचा मूलभूत पाया आहे. >>>

तुम्ही प्रत्यक्ष एखाद्या कल्पनेवर काम करत असाल तर असे लेख वेळेचा अपव्यय ठरतात >>>

प्रत्येक सिच्युएशन मध्ये स्वतःला त्या समीकरणात अ‍ॅड करायचे नाही. >>>

या सर्वांना एकदमच 'अगदी अगदी'! Happy

***

१) 'तुमचे पैसे' मागायला लाजू नका. मागेपुढे पाहू नका!
२) नफा किती कमवायचा हे तुमचे तुम्ही ठरवायचे आहे. 'हा माझा नफा आहे, माझा भाग आहे, यात तुमचा काहीही संबंध नाही' हे क्लायंटला सांगायला अजिबात कचरू नका. या नफ्यातूनच क्लायंटला तुमच्याकडून भविष्यात चांगली सर्व्हिस देता येईल हे त्याला पटवून द्या!

ही वरची दोन 'संतवचने' म्हणजे आमचे गुरू (म्हणजे मी नोकरी करत असतानाचे आमचे चेअरमन) दंडगे सर यांनी वेळोवेळी ठासून आणि विविध उदाहरणे देऊन सांगितलेले उद्योजकांसाठीचे सुविचारच. हे अमलात आणण्याचा मागच्या वर्षी प्रयत्न केला. 'डिस्काऊंट किती? केडिट किती?' हे प्रश्न म्हणजे आमच्या इंडस्ट्रीला लागलेला रोग आहे. अनेक जुन्या क्लायंट्सना 'हे दोन्ही यापुढे मिळणार नाहीत!' असं निक्षून सांगितले.

परिणाम- स्पष्ट सांगणे काहींना आवडले नाही. मला त्यांनी उद्धट आणि उर्मट अशा पदव्या दिल्या. Sad टर्नओव्हर कमी झाला. काही क्लायंट्स सोडून गेले. त्यासोबत रिकव्हरीचे आकडे कमी झाले. त्यासोबत डोक्याचा त्रासही कमी झाला. Proud

पण जुन्या (उमेदवारीच्या काळात वणवण फिरून कमवलेल्या) क्लायंट्सवर गेली ३-४ वर्षे सारे काही सुखेनैव चालले होते. यातले काही कमी झाल्यावर नवीन क्लायंट्स मिळवणे आलेच. त्याशिवाय गाडा कसा चालणार? तर इथे थोडा मार खातो आहे, असं वाटतेय. तो उमेदवारीच्या काळातला ऊन-पाऊस-तहान-भूक न बघता मोटरसायकलवर वणवण फिरण्यातला उत्साह कुठे गेला? Uhoh

***

काही नवीन बिझिनेस असोसिएट्सना भेटलो. काही नवीन अ‍ॅक्टिव्हीटिज सुरू करण्याचा प्रयत्न केला. 'रिलेटेड डायव्हर्सिफिकेशन' जमते का ते बघण्याचा प्रयत्न केला. ऑल इज नेव्हर वेल. फटके खात, ठेचकाळत, पडत शिकण्याचा प्रयत्न चालू आहे. 'मी अजून शिकतो आहे, शिकायचे आहे.' हेही संतवचनच. अनेक कोण कोण म्हणून गेले असतील, पण हे एकदा अजयशी झालेल्या गप्पांत तोही म्हणल्याचे आता अगदी तीव्रतेने आठवले.:)

'नफा किती कमवायचा हे तुमचे तुम्ही ठरवायचे आहे..' हे अंमलात आणण्याचा प्रयत्न करतानाच प्रत्येक गोष्ट 'इमिजिएट रिटर्न्स' वर मोजता येत नाही, हेही पटत गेले. काही गोष्टी 'तुलनेने कमी प्रमाणात मिळत असलेल्या किंवा अजिबातच मिळत नसलेल्या प्रत्यक्ष फायद्या' नंतरही चालू ठेवायच्या असं ठरवलं.

***

अजून 'मायक्रोलेव्हल'ला असलेलय अनेक गोष्टी आहेत. वेळ मिळाल्यावर लिहून काढायच्या आहेत खरं तर. असं लिहून काढण्याने स्वतःला स्वतःतून बाजूला काढून बघणे जमत असावे बहुतेक. Happy

मार्केटिंग गुरू आणि त्यावरची पुस्तके यांचा मनापासून राग येतो. प्रत्येक उद्योजक म्हणजे त्याचा स्वभाव, त्याला उपलब्ध असलेल्या संधी आणि साधनसामग्री (अपॉर्च्युनिटीज आणि रिसोर्सेस), त्याला असलेली स्पर्धा, आणि इतर अनेक फॅक्टर्स यांनी मिळून बनलेल्या पोताची एक विशिष्ठ वीण असते. प्रत्येकाची वेगळी. प्रत्येक सिच्युएशनमध्ये बेगळी. या सगळ्याला असं तक्त्यात, नियमात नाही बसवता येत. गाईडलाईन्स घेण्यापुरते, दुसर्‍यांचे अनुभव अभ्यासण्यापुरते, आणि एमबीएची पदवी मिळवण्यापुरतेच हे मर्यादित ठेवावे.

अनिल अंबानींना आज 'केंद्र सरकारने आजच बदललेले उद्योगविषयक धोरण'- हा प्रश्न असेल. तर मला- माझे मशिन फॉर्मॅट केल्यामुळे डेड्लाईनच्या आधी आजच्या क्लासिफाईड्स ऑनलाईन बुकिंग नाही करू शकत आहे- हा प्रश्न. कुणाचा प्रश्न मोठा? माझ्या मते माझा मोठा. मार्केटिंग गुरू आणि पुस्तकं याबाबत काय सांगणार डोंबलं.

"बिझनेस एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड" बद्दल अभिनंदन. ते एनकॅश करा >> अनुमोदन.

याच्यावर एक उपाय अमलात आणुन गेली ५-७ वर्ष यशस्वी झालाय, गावाकडची ओळखीची १०-१२वी शिकलेली ,बेरोजगार मुले आणुन त्यांच्या जेवणा-राहण्याची सोय करायाची,आजारी पदली तर तो खर्चही आपणच करायचा, त्यांचा सगळा पगार आइवडीलांकडे पाठवायचा.अधुनमधुन सुट्टीलाही आपल्याच ख्र्चाने पाठवायचे, त्यांना काही कर्ज काअढायचे असेल तर garuntee आपणच घ्यायची.
बचत होते त्यामुळे आइवडीलच मुलांना काम सोडु नको म्हणुन दबाव आणतात.लोकल मुले म्हणावी तितक्या मनापासुन काम करत नाहीत. अर्थात तुमची situation नक्की काय आहे माहीत नाही.त्यामुळे हे लागु होइलच असे नाही. हे तंत्र ओळखीच्या २-३ लोकांनी त्यांच्या व्यवसायत वापरले आहे.
>>>>>>>>

तुम्हीच लिहिलेय ५ - ७ वर्षांपूर्वी मग ठीक आहे. आज ते दिवस नाही राहिले. मुळात ४ ते ५ हजार कुरिअर कंपनीत मिळतात. शिवाय मोठ्या मॉल्समधे हाऊसकीपींगला फुल्ली एसी वातावरणात भले झाडू जरी मारली दिवसभर तरी ५ ते ७ हजार मिळतात. (वेळेवर मिळतात का, हा प्रश्न अश्या मुलांच्या कॅल्क्युलेशनमधे नसतोच. पगार जास्त ना मग झाले तर) त्याशिवाय तिथे डोळ्यांची पारणं फुकटात फिटतात, मग कशाला अंगमेहेनतीची कामं करून कमी पगार पदरात पाडा, भले वेळेवर का मिळत असेना.
त्याशिवाय बदललेली मानसिकता. आपल्या वडिलांच्या वयाची माणसं कदाचित कौतुकाने सांगतील की अमूक एक माणूस माझ्याकडे १८ - २० वर्ष काम करतोय. आता ते शक्य नाही. ५०० रुपये जास्त मिळतात म्हणून सोडून जातात हल्ली. अर्थात टिकून राहणारे आणि आपली कंपनी असल्याप्रमाणे वागणारे कामगार आहेत ज्यांच्यामुळेच उद्योग चालतात. पण आता ते हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच.
शेवटी थकून थकून मग विचार येतो..... सोडा मराठी बाणा, आणि भैया घरात आणा.

मी अक्षरशः हा निर्णय घेण्याच्या फायनल स्टेजला आहे. मुळात त्यांचे अख्खे ग्रूपच मिळतात. आणि १६ तास पण काम करायची तयारी असते. उद्योग बंद पडण्यापेक्षा ते बरे. काय करणार????
अर्थात हे सगळे इतर उपाय करून संपल्यामुळे आलेले शहाणपण आहे. सध्यातरी कुठला पर्याय नाही दुसरा.

Pages