गेल्या एका वर्षात तुम्ही काही केलंत?

Submitted by अजय on 6 March, 2011 - 23:24

मला काहितरी करायचंय हा लेख मी लिहून १ वर्ष झालं. त्यावर ११० प्रतिक्रियाही आल्या? पण त्यानंतर कुणी काही केलंय? कारण नुसती प्रतिक्रिया लिहणे म्हणजे काही करणे नाही. जे काही तुमचं स्वप्न असेल ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने काही केलंय का?

आणि लेख न वाचता देखील तुम्ही काही तरी केलं असेल तर ते वाचायला आवडेल. आम्हालाही त्यापासून स्फूर्ती मिळेल. तुमच्या स्वप्नाच्या दिशेने अगदी "माहिती मिळवली" इतकी छोटी पायरी ओलांडली असेल तरी चालेल. "कागदावर लिहून काढलं" हे सुद्धा चालेल.

पण मी गेल्या वर्षी काही केलं नाही पण या वर्षी हे करणार आहे अशा प्रतिक्रिया नकोत. उलट ते जे करायचं असेल ते आधी करा आणि मग सांगा.

कुणितरी "लोका सांगे ब्रम्हज्ञान" असे म्हणायच्या अगोदर सांगतोय Happy . किंवा मागे वळून पाहताना काही गोष्टी /चुका मी केल्या, करतोच आहे त्या ही सांगतोय.

योग्य वेळ घालवला:
अनेक ग्राहक, भागीदार यांना प्रत्यक्ष भेटलो. त्यातून खूप शिकायला मिळालं. " No Good idea survives a first real customer interaction" याचाही अनुभव घेतला. म्हणजे जी Idea आपल्याला great वाटत असते त्याबद्दल ग्राहकाला काहीही देणेघेणे नसते. त्याला वेगळेच हवे असते आणि ते शोधून काढून विकता येणे हाच उद्योगाचा मूलभूत पाया आहे.
काही वेगळ्या कल्पना , मार्केटींगच्या कल्पना चाचणी करून पाहिल्या. स्केल वाढवण्याच्या दॄष्टीने प्रयत्न केले. नवीन प्रकल्प सुरु केले. मार्केटींग बद्दल पुस्तके वाचली आणि काही कल्पना प्रत्यक्षात आणल्या.

कुणाचे तरी चरित्र (कितिही स्फूर्तिदायक असले तरी) या वर्षी वाचायचे नाही असे ठरवले होते आणि ते पाळले. अशी खूप पुस्तकं वाचून झाली आहे आणि आता वाचन सोडून त्यातलं प्रत्यक्ष काही आचरणात आणल्याशिवाय नवीन वाचायचं नाही असं ठरवलं आहे.

चुकीचा वेळ घालवला:
"Startup porn" म्हणतात ते वाचण्यात वेळ घालवला. उदा. Tech Crunch , Yourstory.in सारख्या वेबसाईट किंवा काही मासिकातले स्फूर्तीदायक लेख. यातून आपल्याला वाटते नवीन नवीन Idea मिळताहेत. हे करावे का ते करावे? काही लेखातून कधितरी एक ज्ञानाचा कण सापडतो पण ९०% वेळा काय वाचले काय मिळवले ते आठवत नाही. जर तुमच्या कडे काही आयडिया नसेल तर किंवा स्फूर्ती कमी पडत असेल तर अशा लेखांचा उपयोग होतो. पण तुम्ही प्रत्यक्ष एखाद्या कल्पनेवर काम करत असाल तर असे लेख वेळेचा अपव्यय ठरतात (माझ्यासाठी तरी) अजून तरी या सवयीवर उपाय सापडला नाही. माझ्या माहितीतल्या बर्‍याच उद्योजकांच्या मते ही सगळ्यात वेळखाऊ सवय आहे.
http://twitter.com/wadenick/status/27516895945
कुणाकडे या सवयीवर उपाय असेल तर जरूर सांगा ! Happy

तुम्ही काय केलंत?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रवीण,
मेनका मासीकाचा जानेवारी अंक घेउन बघा. तो लग्न विशेषांक आहे. त्यात आजकाल मॅरेज फोटोज मध्ये काय ट्रेंड्स आहेत ते मस्त लिहीले आहे नक्की उपयोग होईल. तसेच देशातील प्रमूख वेडिंग प्लॅनर्स व को ओर्डिनेटर्स चा डेटा बेस बनवून संपर्क वाढविल्यास सस्टेन्ड ऑर्डर्स येत राहतील. मेजर बिझ नेस दिल्ली व मुंबई! शुभेच्छा.

मी कंपनी चालविण्यातून ब्रेक घेउन स्वतः ला वेळ दिला, तब्येतीकडे थोडे लक्ष दिले, आराम केला. पुढे काय करायचे आहे त्याचे चिंतन केले आहे व पुढील अ‍ॅक्टिविटीज वर लक्ष फोकस केले आहे. गोइंग वन स्टेप अ‍ॅट अ टाइम. रूटीन बोअरिंग कामातून लक्ष व वेळ काढून स्वतःची ग्रोथ होइल तेच करायचे व नवे काही शिकून घ्यायचे. असाच मार्ग ठरवला आहे. Happy

ग्लास सीलिंग तोडल्यानंतरचा प्रवास किती मस्त व सुखद आहे. सितारोंसे आगे जहां और भी है याचा प्रत्यय घेत आहे. परवाच एका ओरिसातील जेनेरिक कस्टमर ने मेल केली त्यात मला चक्क अश्विनीबाबू असे संबोधिले होते. ओरिसात बाबू हे पुरुषांचे संबोधन आहे. मी त्याच्याशी फोनवरही बोलले होते आधी. पण आजिबात ऑफेंड झालेले नाही. लिंगनिरपेक्ष मैत्री हे ते तर सोडा भारतातही लिंनि कामही शक्य आहे. असा विश्वास आला. Happy

प्रविणपा मस्तच. Happy पुढच्या वाटचालीसाठी खुप शुभेच्छा.
तुम्ही काढलेले फोटो आवडले. नेहेमी जे फोटो घेतले जात नाहीत ते घेतले असल्याने मस्त वाटत आहे.

अजुन एखाद दोन गोष्टी- कदाचित तुम्हाला आधीच माहित असतील पण लिहिते इथे.
ड्रिम फिल्टर्स नसतील तर घेऊन ठेवा.
आणि चेहेर्‍यावरचे छोटे छोटे डाग किंवा खरखरित पण सॉफ्टवेअरच्या सहाय्याने नीट करता येतो ते टेक्निक आत्मसात करुन घ्या.
अश्विनीमामी , मस्तच.

सर्व मायबोलीकरांना हौसला अफजायी के लिये धन्यवाद Happy

लिंबू टिंबू, प्रतिसाद देण्याकरिता धन्यवाद. मी त्या दृष्टीने अभ्यास गेल्या काही महिन्यांपासून सुरू केलेलाच आहे.

अश्विनिमामी, उद्याच जाऊन मेनका मासिकाचा अंक घेतो. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. वेडिंग प्लानर्स लोकांचा डेटाबेस बनविण्याची कल्पना छान आहे. मी या दृष्टीने नक्कीच पावले उचलीन.

सावली प्रतिसादा करिता धन्यवाद. मला बऱ्यापैकी फोटो शॉप येते. फिल्टर्स आहेत, परंतू ड्रीम फिल्टर्स अजून घेतले नाहीत. तुमचे फोटोग्राफी वरचे सर्व लेख मी वाचले आहेत. फार उपयुक्त माहिती तुम्ही सोप्या शब्दात दिली आहे Happy

प्रवीण, अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा !

लग्नाचे फोटो अतीशय सुंदर काढले आहेत.

इथे एक लिंक आहे. http://www.photopoly.net/wedding-photography-tips/ अशा अनेक वेबसाइट्स आहेत, पण ही विषेश आवडली. लग्न वेगळ्या पध्दतीचं असलं तरी सोप्या आणि चांगल्या टिप्स आहेत वेडिंग फोटोग्राफीसाठी.

लीम्बुजी आणि प्रविन्पा तुम्हाला शुभेच्छा
मुळात मी जे करतो आहे ते (सध्यातरी) उद्योजक या सदरात मोडत नाहीय >> मी पण सध्या कुठल्याच सदरात मोडत नाही.. तरी सुद्धा इथे टाकते आहे
हा धागा मला नेहमीच आवडलाय पण आता स्वतःला सुरुवात करायची आहे त्यामुळे तर खूप प्रेरणादायी वगैरे वाटतो.. सेल्फिश इंटरेस्ट + बिझिनेस ह्याचा मेळ घालता येयील का ह्या स्वप्नातून (सध्या तरी सगळं हवेत आहे.. ) २ ऑप्शन वर काम चालू आहे..
लायब्ररी संबधित काही तरी चालू करायचं आहे.. म्हणून जागा बघतोय.. भारत वारी मध्ये
(आम्ही लवकरच भारत वासी होणार आहोत) घराजवळ लायब्ररी आहे का वगैरे बघून आलो.. आजू बाजूला विचारून आलो.. इथे अमुक अमुक जागी सुरु केली तर तुम्ही मेंबर व्हाल का.. टार्गेट लहान मुले आणि युथ ग्रुप.. पुस्तक शोधते आहे..बरेच जमवले/जमवते आहे कुठून ऑर्डर करायचे, वगैरे शोधते आहे ...
लायब्ररी सोफट वेयर विकत घेवू का कि कस्टम मेड बनवून घेवू ते बघते आहे
तुमचे विचार/सजेशन आवडतील ऐकायला.. बळच असले उद्योग करू नकोस हे सांगितलं तरी चालेल..

हा धागा आवडला. सगळ्याच उद्योजकांचे कौतुक.
माणसे मिळत नाहीत हा मुद्दा सार्वत्रिक आहे. आमच्या सेमिकंडक्टर इंडस्ट्रीतही (दरवर्षी पुष्कळ इंजिनियर तयार होत असूनदेखील) माणसे मिळत नाहीत ही तक्रार होत असते.

आमच्याकडे नोकरी केल्याने तुम्हाला पैसे आणि कामाचा अनुभव यापेक्षा अधिक काही मिळेल असे मार्केटिंग केल्याने माणसे मिळतात व टिकतात असे मला वाटते.
मुलांच्या शाळांच्या वेळात (अर्धवेळ किंवा तत्सम) कामाची वेळ ठेवली (ठेवणे शक्य असेल) तर मध्यमवयीन गृहिणींना आकर्षित करता येऊ शकेल.

धाग्याचा विषय मस्तच!
मृदूला सहमत.
अर्धवेळ नोकरी मिळण्याची आवश्यकता असणार्‍या असंख्य गृहीणी आहेत.
मीही अर्धवेळ नोकरीच्या शोधात आहे.

प्रित ...माझ्या बहिणीने तिच्या मुलासाठी (वय ३ वर्ष) लायब्ररी लावली आहे. त्यान्च्याकडे पुस्तकाबरोबर educational games सुद्धा मिळतात. शिवाय rechargeable cars for kids, puzzle games साठी भरपुर waiting असते. लायब्ररी सुरु करायची असेल तर तू या गोष्टीचा सुद्धा विचार करु शकतेस.

प्रित तुम्ही आलात कि सांगा आमच्याकडे खूप पुस्तके आहेत तुमच्या लायब्ररीला देता येतील. - तरुणाइसाठीची.

प्रविणपा, फारच सुरेख फोटो. हल्ली मोठ्या प्रमाणावर वाढदिवस साजरे केले जातात त्यावेळीही उत्तम फोटोग्राफर्सची गरज असते. जर बड्डे ऑर्गनायझर्सना कॉन्टॅक्ट केलात तर तिथेही एक छान संधी मिळेल. शुभेच्छा!

सवी२०१० >> माहितीसाठी खूप खूप धन्यवाद .. इंटरेस्टीनग.. हा विचार केला नव्हता.. मुलांची पुस्तक्वजा खेळणी विकणार होते आता ठेवेन, काही अजून घेईन..
अमा.. धन्स .. तुम्हाला मेल किवा विपु करेल नक्की सगळं फायनल झाले की

गेले सहा महिने येणार येणार म्हणत असलेले दुसरे एम्ब्रॉयडरीचे मशिन अखेर आमच्या कारखान्यात दाखल झालेले आहे... जर्मन कंपनी ZSK चे ४ हेड चे नवीन मशिन नुकतेच विकत घेतले आहे..

२५ मार्च, २०११ ची माझी पोस्ट, त्यातिल निवडक ...
>>>>गेल्या वर्षीचा ओढ्याचा बान्ध यशस्वी झाला, पण जास्त पाणी आत घुसले, आमच्या अनुपस्थितीत, सान्गुनही ते कुणी अडवले नाही, सबब प्रचण्ड मोठा खड्डा होऊन माती वाहून गेली, तर अनासायेच खड्डा मिळाला म्हणून तिथेच यावर्षी शेततळे करणार आणि ओढ्याकडच्या चराचे तोन्ड बन्दिस्त करणार. यावर्षी पिक घेणार नाही. व केवळ अन्य रोपान्च्या लागवडीवर/बान्धबन्दिस्तीवर लक्ष देणार. <<<<<<
प्रत्यक्षात, तो खड्डा लिम्बीच्या बाबान्नी बुजवुन काढला, सबब, खुप पूर्वी ठरविलेल्या जागीच शेततळे तयार केले, लिम्बीचे शेत या धाग्यावर तो मजकुर टाकला आहे. अजुन प्लॅस्टिकचे कागदाची सोय करू शकलो नाहीये, पण सुरुवात तर झालीये. तसेच यन्दा पिक काढणारही आहे.

>>>> दुसरी बाजु म्हणजे गेली सलग तिन वर्षे आमच्या मूळच्या खानदानी पण सध्या कोणीच करत नसलेल्या भिक्षुकीच्या व्यवसायात उमेदवारी सुरू केली आहे. प्रगती आहे, पण अजुन दोन वर्षाची मुदत एकुण डेव्हलपमेण्टकरता यास दिली आहे. यात वैयक्तिक स्किलचा भाग जास्त असतो. पण टीम वर्कही तितकेच महत्वाचे असल्याने मुलासही हळू हळू यात गुन्तवले आहे. <<<<
यातही गेल्या वर्षापासून, लहानसहान पूजापाठान्व्यतिरिक्त स्वतन्त्ररित्या मोठे उद्योग, जसे की वास्तुशान्ती/जननशान्ती वगैरे करायला सुरुवात झाली आहे. निरनिराळ्या पुस्तकान्ची खरेदी, नेटवरुन माहिती गोळा करणे, वाचन/पाठान्तर वगैरे अभ्यास कायमच सुरू असतो. नुकताच एक सेकण्ड ह्याण्ड पीसी घेतला आहे. याचाही उपयोग यात करणे आहे.

मी प्री स्कूल सुरू करायचे ठरवल्यापासून आतापर्यंत हे केले आणि अजूनही बर्‍याच गोष्टी करायच्या आहेत. ह्या त्या दोन्हींच्या नोंदी :

सर्वात आधी सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्लान केल्या. काय काय करायचे ते पायरीपायरीने लिहून काढले.

सर्वात महत्वाचे असे दोन निर्णय घेतले. :
एक : प्री स्कूल फ्रेंचायझीशिप न घेता ते स्वबळावर सुरू करणे.
दोनः प्री स्कूलच्या कामाकडे पूर्णवेळ लक्ष देता यावे म्हणून सध्याची नोकरी सोडणे.
वरीलपैकी दुसरा निर्णय मी नुकताच अंमलात आणलाय. आजच राजीनामा देत आहे.

नर्सरीसंदर्भातील सगळी माहिती आंतरजालावरून मिळवली. जागेसाठी किमान ५ इस्टेट कन्सलटंट्स चे नंबर्स आणि ऑफिसेस शोधले. प्री स्कूल इक्विपमेंट्स सप्लायर्स शी बोलून त्यांची कोटेशन्स मागवून घेतली. सध्यस्थित प्री स्कूल ओनर्स ना भेटून त्यांचे अनुभव टिपून घेतले. त्यानुसार प्लानमध्ये बदल केलेत. शाळेसाठी लागणार्‍या स्टाफ, फर्निचर, स्टेशनरी, सर्विसेस इत्यादींची यादी केली. एकूणात खर्चाचा अंदाज घेतला. जाहिरातीची तयारी.

आतापर्यंत न केलेली कामे: (ही कामे नोकरी सोडलयामुळे मी करू शकेन आता Happy )
पूरेसं भांडवल जमा करणे.
प्रत्यक्ष जागा बघून ती फायनल करणे. जागा ठरवल्यानंतर तिची हवी तशी रंगरंगोटी व सजावट करणे.
फर्निचर, स्टेशनरी व इक्विपमेंट्सची खरेदी.
जाहिरात करणे.
स्टाफ निवडणे.
प्रत्यक्ष अ‍ॅडमिशन्स अन शाळेचा श्रीगणेशा Happy

अरे वा! अभिनंदन टोकूरिका.
काही मदत हवी असल्यास नक्की सांगा.
तुमच्या शाळेबद्दल कधीही काही नविन कल्पनांबद्दल चर्चा करायची असल्यास नक्की सांगा. मी बोलायला वेळ देईन.

येथील काही उद्योजकांनी suggest केल्याप्रमाणे बेडशीट्स सोबत सोलापूरी चटणी पण ठेवायला सुरवात केली. थोडे पाकिट छोट्या छोट्या दुकानात ठेवायला दिले तर काही स्वत:....
छान response मिळत आहे.
पण प्रोब्लेम असा येत आहे की, ते दुकानदार खुप margin मागत आहेत.

हो monalip, २०% ते मागत आहेत...
छोट्या प्रमाणावर सुरु केल्याने २०% म्हणजे मला तरी जरा जास्त वाटत आहे..
तुम्ही कसे करत आहात?????

Pages