गेल्या एका वर्षात तुम्ही काही केलंत?

Submitted by अजय on 6 March, 2011 - 23:24

मला काहितरी करायचंय हा लेख मी लिहून १ वर्ष झालं. त्यावर ११० प्रतिक्रियाही आल्या? पण त्यानंतर कुणी काही केलंय? कारण नुसती प्रतिक्रिया लिहणे म्हणजे काही करणे नाही. जे काही तुमचं स्वप्न असेल ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने काही केलंय का?

आणि लेख न वाचता देखील तुम्ही काही तरी केलं असेल तर ते वाचायला आवडेल. आम्हालाही त्यापासून स्फूर्ती मिळेल. तुमच्या स्वप्नाच्या दिशेने अगदी "माहिती मिळवली" इतकी छोटी पायरी ओलांडली असेल तरी चालेल. "कागदावर लिहून काढलं" हे सुद्धा चालेल.

पण मी गेल्या वर्षी काही केलं नाही पण या वर्षी हे करणार आहे अशा प्रतिक्रिया नकोत. उलट ते जे करायचं असेल ते आधी करा आणि मग सांगा.

कुणितरी "लोका सांगे ब्रम्हज्ञान" असे म्हणायच्या अगोदर सांगतोय Happy . किंवा मागे वळून पाहताना काही गोष्टी /चुका मी केल्या, करतोच आहे त्या ही सांगतोय.

योग्य वेळ घालवला:
अनेक ग्राहक, भागीदार यांना प्रत्यक्ष भेटलो. त्यातून खूप शिकायला मिळालं. " No Good idea survives a first real customer interaction" याचाही अनुभव घेतला. म्हणजे जी Idea आपल्याला great वाटत असते त्याबद्दल ग्राहकाला काहीही देणेघेणे नसते. त्याला वेगळेच हवे असते आणि ते शोधून काढून विकता येणे हाच उद्योगाचा मूलभूत पाया आहे.
काही वेगळ्या कल्पना , मार्केटींगच्या कल्पना चाचणी करून पाहिल्या. स्केल वाढवण्याच्या दॄष्टीने प्रयत्न केले. नवीन प्रकल्प सुरु केले. मार्केटींग बद्दल पुस्तके वाचली आणि काही कल्पना प्रत्यक्षात आणल्या.

कुणाचे तरी चरित्र (कितिही स्फूर्तिदायक असले तरी) या वर्षी वाचायचे नाही असे ठरवले होते आणि ते पाळले. अशी खूप पुस्तकं वाचून झाली आहे आणि आता वाचन सोडून त्यातलं प्रत्यक्ष काही आचरणात आणल्याशिवाय नवीन वाचायचं नाही असं ठरवलं आहे.

चुकीचा वेळ घालवला:
"Startup porn" म्हणतात ते वाचण्यात वेळ घालवला. उदा. Tech Crunch , Yourstory.in सारख्या वेबसाईट किंवा काही मासिकातले स्फूर्तीदायक लेख. यातून आपल्याला वाटते नवीन नवीन Idea मिळताहेत. हे करावे का ते करावे? काही लेखातून कधितरी एक ज्ञानाचा कण सापडतो पण ९०% वेळा काय वाचले काय मिळवले ते आठवत नाही. जर तुमच्या कडे काही आयडिया नसेल तर किंवा स्फूर्ती कमी पडत असेल तर अशा लेखांचा उपयोग होतो. पण तुम्ही प्रत्यक्ष एखाद्या कल्पनेवर काम करत असाल तर असे लेख वेळेचा अपव्यय ठरतात (माझ्यासाठी तरी) अजून तरी या सवयीवर उपाय सापडला नाही. माझ्या माहितीतल्या बर्‍याच उद्योजकांच्या मते ही सगळ्यात वेळखाऊ सवय आहे.
http://twitter.com/wadenick/status/27516895945
कुणाकडे या सवयीवर उपाय असेल तर जरूर सांगा ! Happy

तुम्ही काय केलंत?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला एकाने चक्क १०% सांगीतले व टिपिकल मराठी असल्याने त्याच्याकडे ठेवले तर संपते पण. बाकीच्यांकडे एकतर थंड प्रतीसाद वर ते २०% मागतात मग मी ठेवायचे बंद केले तिकडे.

तुझ्याकडे माझा फोन नंबर आहे ना. फोन कर काही माहिती हवी असल्यास. नो प्रोब्स. Happy

टोकूरिका. अभिनंदन.

मी गेल्या दोन वर्षात जग उद्धारण्याचे काम केले कारण हातात पाळण्याची दोरी होती Proud

थोडंफार फ्रीलान्सिंग केलय पण त्यातून मनाजोगते काम मिळत नाहीये. पैसा तर बुडीच्या खात्यातच जमा होतोय. Sad ते असो. मार्केटिंग सर्व्हेचा डेटा अ‍ॅनालिसीस अत्यंत वैतागवाणा असतो.

इथे मायबोली उद्योजक ग्रूपमधे कुणाला हवी असल्यास खालील बाबतीत मदत मात्र करू शकते

१. मार्केटिंग
२. अ‍ॅडव्हर्टायझिंग.
३. पब्लिक रिलेशन्स
४. कस्टमर रिलेशन्स.
५. मीडीया रिलेशन्स

फेब. २०१२ मधे भारतात कायमचे परतलो.
-घराचे इंटेरियरचे काम केले. मी डीझाईन करुन बनवुन घेतले. अजुन ते पूर्ण झाले नाहीये.
-फोटोग्राफी शिकवण्याचे बेसिक क्लासेस चालु केले. दर आठवड्याला कोणी ना कोणी असतेच.
-'फ' फोटोचा या फोटोग्राफी विषयक दिवाळी अंकाची संकल्पना तयार करुन कार्यकारी संपादक म्हणुन काम केले. या खुप काही शिकायला मिळाले, खुप लोकांच्या ओळखी झाल्या.
-अजुन एका वेगळ्या गोष्टीवर काम चालु आहे. पण ते पूर्णपण दुसर्‍यांवर अवलंबुन असल्याने वेळ लागणार असे दिसतेय. त्यात काही प्रगती झाली की इथे सांगेनच.
-जपानी इंटेरीयर डेकोर साठी काम करणे चालु आहे.
तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांची गरज आहे Happy

.

सध्या इतरांना उद्योगासाठी प्रोत्साहित करणे चालू आहे. आजूबाजूला बिझनेसच्या दृष्टीने भरपूर स्कोप आहे पण भाषेच्या प्रॉब्लेममुळे अडत आहे. सध्या तमिळची शिकवणी चालू केली आहे. बघूया. काही बिझनेस करण्यालायक बाबी:

१. मी ज्या भागात राहते तिथे एकही प्रीस्कूल नाही. कमीतकमी इन्व्हेस्टमेंट करून चांगला फायदा मिळू शकेल. पण भाषेचा मुख्य प्रॉब्लेम. सोबत कुणी लोकल व्यक्ती मिळालं तर मात्र नक्की चालू करणार. त्यादृष्टीने चाचपणी चालूच आहे.

२. ईव्हेंट मॅनेजमेंट. सध्या इथे तमिळनाडूमधे शक्य नाही, रत्नागिरीला परत गेल्यास नक्की चालू करणार.

३. अ‍ॅडव्हर्टायझमेंट आणि पीआरमधे कन्सल्टिंग चालूकरणे.

४. फ्रीलान्सिंगसाठी थोडेफार काम चालूच आहे.

सर्वांचे अभिनंदन !!!

मला बोध झालेल्या काही गोष्टी लिहित आहे, मतभेद जरूर सन्गावेत :
फक्त "काम करणारी मुल" हा शब्द वपरण बन्द करा १० % लोक सोडुन जणे कमी होइल. जसे आपल्याला वाटत मराठी माणुस काम करयला असावा तसा मराठी माणसाला पण मराठी एम्पोयर पहिजे असतो, अस मला वाटत. केवळ पगार ही एकमेव बाब माणस पकडून ठेवते अस नही. पगारा पलीकडे emotional engineering केल्यास परिस्तित बराच फरक पडू शकेल अस जाणवल.
मला अनूभवातून समजलेल्या टिप्स लिहित आहे, त्यातिल काहि पारखून पाहील्या(tested OK) अहेत.
१} employee ला एकेरी (तु, तूला,) बोलू नये.
२} पगार कमी असो वा जस्ती, ठरावीक तारिखेहुन उशिर होवू नये. माग स्वतःला उपाशी रहावे लगले तरीहि चालेल.
३} regular communication ला महत्व देणे.
४} जस्ती चे पैशे देणे टाळावे.
५} employer चा किर्किरा स्वभाव employee la पळ्वून लावायला मदत करेल.
६} राग आणि प्रेम आवरते घ्यावे.
७} चूघलखोरि ला आळा घालावा.

मी उद्योजक नाही
पण मी गेल्या एका वर्षात काय काय केले याचा नम्र वृत्तान्त
- एम बी ए च्या आन्तरराष्ट्रीय व्यवसाय व्यवस्थापन या विषयाचा सहा महिने सखोल अभ्यास करून तो डिप्लोमा उत्तीर्ण झालो व मुलाना शिकविण्यास सुरुवात केली
- ८ पुस्तके भाषांतरित केली - इंग्रजी-मराठी- व इतर देखील
- जागृतियात्रा या संस्थेबरोबर काम करण्यास सुरुवात केली
- दोन कंपन्यांबरोबर सल्लागार म्हणून काम सुरू केले
- कॉलेजातील विद्यार्थ्याना काउन्सेलिंग सुरू केले
- या व्यतिरिक्त - इंजिनीयरिंगच्या विद्यार्थ्याना शिकविणे चालू ठेवले

शिफ्ट कंप्लिट केले. खूप लूज एंडस बाकी आहेत. कंपनी सध्या होल्ड वर आहे. नवे काय उद्योग करावे ते अजून माहीत नाही. बाकी एक शिकायची फेज चालू आहे. खूप छान एक्स्पोजर मिळते आहे.
उद्योजक मंडळी कशी आहेत सर्व?

इथे येऊन माझीच आधीची पोस्ट वाचली. अगदी एकच वर्ष आणि काही दिवस आधी लिहीली आहे. तर हे एक वर्षानंतरचे अपडेट्स.
१. 'फ फोटोचा' दुसरा अंक प्रकाशित केला.
२. जपानी इंटेरीअर डेकोर वर काम करायला सुरुवात केलीये असे मागच्या वर्षी लिहीले. आता ४ डिसें ते ९ डिसें एका कन्झ्युमर सेल मधे स्टॉल घेतला आहे. तिथे माझ्या ब्रँडच्या जपानी डेकोरच्या कलावस्तुंचे प्रदर्शन आणि विक्री करणार आहे. एकेक पिस बनवताना बरिच मेहेनत झाली, काही पुन्हा पुन्हा बनवाव्या लागल्या. पण आता तयार झालेल्या २० फ्रेम्स बघताना मस्त वाटतंय.
माझ्या ब्रँडचे नाव 'आमेका क्रिएशन्स'. आमेका म्हणजे 'अंडर द हेवन'. ब्रँडचा लोगो म्हणजे 'आमे' ( अर्थ - स्वर्ग) ची कांजी ( अक्षर ) आहे.
ब्रँडची वेबसाईट चालु केलीये. अजुन खुप काही टाकले नाहीये. http://www.ameka-creations.com/

मायबोलीवर जाहीरातही टाकली आहे.
http://jahirati.maayboli.com/node/946

ज्यांना शक्य आहे त्यांनी ४ ते ९ डिसें नक्की या.

नोकरी सोडली. अगदी मागचा पुढचा विचार न करता सोडली. मग २ महिने निवांत आराम केला घरी. आता जरा हात पाय हलवतोय. अजुन सहा एक महिण्यात इथे लिहण्यासारखे बरेच काही असेल. Happy

सावली, अभिनंदन. वेबसाईट आवडली. तुझे आतापर्यंतचे काम, माईलस्टोन्स नक्की टाक साईटवर.
निवांत, गूड लक.

सावली अभिनंदन. फ्रेम्स आणि ग्रिटींग्ज खूप आवडले.

मी इथे लिहिलं की नाही माहित नाही. पण माबोवरच्या अजून एका मैत्रिणीबरोबर मिळून छोटंसं काम सुरु केलंय. छोट्या साईझचे कॅन्व्हास पेंटींग्ज, कागदावर पेंटींग्ज, रंगवलेले टी कोस्टर्स सेट, ट्रे, पेन स्टँड्स, वॉल क्लॉक्स, एनॅमल्ड ज्वेलरी, बोल्स, अगदी छोट्या साइझच्या कॉपर एनॅमल्ड पेंटींग्ज, रंगवलेले ज्वेलरी बॉक्सेस असं बरंच काय काय करतोय आम्ही दोघीजणी. प्रदर्शन आणि विक्री करायची होती दिवाळीच्या वेळी पण ते जमलं नाही. आता सध्या तरी फेसबुक पेज उघडून तिथेच प्रदर्शन आणि विक्री चालू आहे. सध्या तिथे खूप कमी फोटो आहेत पण तरीही २-३ ऑर्डर्स पण मिळाल्यात.

धन्यवाद. आज नविन एक गोष्ट लक्षात आली. मी जेवढे पैसे नोकरीत मिळवत होतो तेच जर उद्योजक म्हणुन मिळवले तर इन्कमटॅक्स बाकी बराच कमी होतो कारण प्रोपराटरशिप कॅटेगरी खाली आपला होणारा बराचसा खर्च (गाडी + मेंटेन्स + डिप्रिशिएअशन इत्यादी ) आपल्या एकुण उत्पनातुन वजा होतो जे नोकरी करताना होन नाही. Wink

Pages