बोलगाणी - प्रवेशिका १ (रैना)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 20 February, 2011 - 23:36
मायबोली आयडी: रैना
मुलीचे नाव : इरा
वय: ३ वर्षे २ महिने

एटू लोकांचा देश- विंदा करंदीकर ( पॉप्युलर प्रकाशन)
'नैसर्गिक रचना' आणि 'वाङ्मय ' या दोन बालकविता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!

खूप खूप धन्यवाद लोकहो. Happy

अवांतर- विंदांचे 'एटू लोकांचा देश' हे पुस्तक खरेच फार गोड आहे. नवीन आवृत्ती काढली आहे पॉप्युलरने बहुतेक. किंमत रुपये ३५. पण अक्षरश: अमूल्य ठेवा आहे हा. सोपे शब्द, यमक, नाद, त्यातील चित्रे हे सर्व मुलांना लगेचच अपील होतात. इराला यातील कविता अ ति श य आवडतात.
मुलांसाठी नक्की घ्या/ भेट द्या. Happy

थोड्या मोठ्या मुलांसाठी विंदांचे - 'पिशीमावशी आणि तिची भूतावळ'.
आणि पाडगावरकांच्या बालकविता 'अफाटराव' वगैरे याही इराला फार आवडायच्या.

फारच गोड.
आता वाङ्मय म्हटल्यावर इराच "हा" खुपच गोड.
डोक हलवणारी बाहुलीच डोळ्यासमोर आली Happy

गोड!! टिम्म म्हणता येते खाली..टुम्म म्हणता जाते वर..खुपच छान म्हणालिये..चित्र उभं राहिलं डोळ्यासमोर..

कस्सलं गोड..
उत्साहाने सळसळतेय नुसती पोर.
बॅकग्राऊंड स्कोअर पण आवडला बरं का रैनाताई!

वॉव इरा, शाब्बास. मस्त म्हटल्यात दोन्ही कविता. अवघड शब्द पण अगदी स्पष्ट उच्चारलेत. रैना, तिला बहूतेक अजून काही कविता ऐकवायच्या असणार. Happy

रैना, त्या पुस्तकाबद्दल थँक्यु. आमच्या ध्यानाला पण आवडलंय. बरेच शब्द कळलेच नाहीत त्याला पहिल्यांदा कविता वाचून दाखवल्यावर. पण तरिही पुस्तक आवडलय. रात्री झोपताना यातली पोएम वाच म्हणत असतो.

व्वा ! शाब्बास इरा.
किती मनापासून आणि लक्ष देऊन म्हटल्या आहेत दोन्ही कविता. अद्भुत, वृक्ष...मस्तच !
रैना, तुझा आवाजही खूप गोड आहे.

Pages