हा पक्षी कोणता?
माझ्या बिघडलेल्या फोटोंकरता एक उपयोग शोधण्यात मी यशस्वी झालो आहे असे मला वाटते. खास करुन पक्षांचे फोटो. इथे मी असे फोटो टाकीन ज्यात पक्षी नीट ओळखु येत नाही, आणि तुम्हाला तो ओळखायचे आव्हान देईन. अर्थात उत्तरादाखल माझ्याजवळ त्या पक्षाचा चांगला फोटो देखील असेल. झब्बु देण्याबाबत तीच एक अट आहे. एक कोडेदार फोटो असेल तर एक उत्तरदार देखील असावा.
प्रश्न देतांना तुमच्या नावाचा उल्लेख करुन एक रनींग नंबर वापरा (उदा. माझा पहिला प्रश्न असेल aschig १)
उत्तर देतांना प्रश्नाच्या क्रमांक वापरता येईल. (या सुचनेकरता माधवला (व सावलीला सुद्धा) धन्यवाद)
चला तर करुया सुरु. (पुढच्या पोस्टींग मध्ये पहिला प्रश्न असेल).
आत्तापर्यंतचे प्रश्नः
aschig 1: उत्तर साधना (मृनिश - अर्धे उत्तर)
aschig 2: उत्तर सावली
aschig 3: उत्तर भुंगा (नादखुळा चे पण बरोबर होते)
aschig 4: उत्तर जयु
aschig 5: उत्तर भुंगा/नादखुळा
aschig 6: उत्तर भुंगा/नादखुळा
aschig 7: उत्तर भुंगा/नादखुळा
aschig 8: उत्तर नादखुळा
aschig 9: उत्तर सावली/भुंगा
aschig 10 (30 nov 2011):
aschig 11 (31 jan 2012): अर्धे उत्तर साधना/कापो/भुंगा
aschig 12 (29 mar 2012): उत्तर वेका
aschig 13 (10 apr 2012): उत्तर भुंगा
aschig 14 (10 apr 2012): उत्तर भुंगा/ shendenaxatra
aschig 15: (10 apr 2012): वेका
aschig 16: (27 apr 2012): वेका (/साधना - साधनेबद्दल)
aschig 17: (29 apr 2012): वेका (+ साधना/इंद्रधनुष्य)
aschig 18: (30 apr 2012): वेका/भुंगा
aschig 19: (24 may 2012): वेका/इंद्रधनुष्य
aschig 20: (9 oct 2012): वेका
aschig 21: (16 Feb 2013): वेका
aschig 22: (18 Feb 2013): rmd/2
aschig 23: (21 Feb 2013): सावली/भुंगा
aschig 24: (23 Feb 2013): rmd
aschig 25: (28 Feb 2013): वेका
aschig 26: (4 Mar 2013): वेका/rmd
aschig 27: (15 apr 2013): rmd/कांदापोहे
aschig 28: (9 may 2013): rmd
aschig 29: (14 may 2013): कांदापोहे
aschig 30: (21 may 2013): राज
aschig 31: (3 aug 2013): वेका
aschig 32: (4 oct 2013): साधना/rmd/सारीका
aschig 33: (20 Oct 2013): rmd
aschig 34: (21 Oct 2013): rmd
aschig 35: (21 Dec 2013):
लालु १:
सावली १ :Smew , Male - नादखुळा
अवल १: भुंगा
अवल २ : पर्वत कस्तुरी : नादखुळा
अवल ३ : सूर्यपक्षी : भुंगा, aschig, कांदापोहे
अवल ४ : कॉर्मोरंट : सावली, भुंगा
भुंगा, सचिन्_साची वगैरे (वेळ मिळाल्यावर क्रमांक व उत्तरे कोणी दिली हे लिहीन)
प्रश्न क्रमांक व उत्तर देणार्यांची नावे अशी इथे देत राहण्यासंबंधी एक सुचना:
तुम्ही प्रश्न टाकल्यावर मला संपर्कातुन एक्झॅक्ट वर्डींग कळवलेत तर मी तसेच्या तसे कॉपी-पेस्ट करु शकेन
उदा.: भुंगा ७: अनुत्तरीत
मग उत्तर मिळाल्यावरः
भुंगा ७: उत्तर दानखुळा
किंवा दोन्ही एकत्र (उत्तर मिळाल्यावर).
पहा जमल्यास.
इंडियन पॅरॅडाइज
इंडियन पॅरॅडाइज फ्लायकॅचर.
माझ्या मते तरी याचे मराठी नाव स्वर्गिय नर्तक हेच त्याला जास्त शोभते. तो उडताना त्याचा लांबलचक शेपटा मागे लाटांसारखे नर्तन करत समांतर फडकत फिरतो त्याच्याबरोबर. मला वाटत नाही उडतानाच्या त्या लाटांसोबतचा त्याचा फोटो असेल कोणाकडे, तसेही त्याला बघताना कॅमे-याकडे लक्ष तरी कोणाचे जाईल? >>>>>>>>>>>>>>>>
साधना, खरंय! कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये आम्ही फिरत होतो नेमके त्याच दिवशी तिथे प्रचंड धुळीचे वादळ आलेले होते. पाऊस येईल की काय अशी परिस्थिती होती. कँटरमधून अत्यंत हताश अवस्थेत पुढे जात असता अचानकच ह्या पक्ष्यांची एक जोडी दिसली. आणि अशी काही लाटांसारखी शेपटी तरंगवत जोडी पळाली, की त्या दृश्यानेच आमच्या एरव्ही विफल झालेल्या सहलीचे सार्थक झाले होते.
चैतन्य खिरे (धन्यवाद अवल!) आणि हिम्सकूल दोघांचेही फोटो दृष्ट लागण्यासारखे चांगले आलेले आहेत.
वेका, पुढच्या दोघांना पक्षी
वेका, पुढच्या दोघांना पक्षी कुठे आहे ते सापडले आहे (त्यांची उत्तरे मात्र बरोबर नाहीत) - वर उजवीकडे. आता ओळखणे सोपे जावे.
अश्चिग... आता प्लीज तो कावळा
अश्चिग... आता प्लीज तो कावळा आहे असं सांगू नको बाबा!
मला पक्षी दिसला हेच महत्वाचं.
मला पक्षी दिसला हेच महत्वाचं. तो ओळखण्याचं काम बाकिचे करतीलच.
मला पक्षी दिसला पण ओळखता येणे
मला पक्षी दिसला पण ओळखता येणे कठिण आहे. पोटावर एका बाजुने पांढरा पट्टा दिसतोय, त्यावरुन रॉबीन असावा असा तर्क करु शकते. पण आकार थोडा मोठा वाटतोय रॉबीनसाठी त्यामुळे.....
काळा दिसतोय. म्हणून कावळा
काळा दिसतोय. म्हणून कावळा असावा. (टीपः मला चिमणी व कोंबडी हे पक्षी देखिल ओळखता येतात. तसेच मोर.)
वॉव इतका स्पष्ट आहे तरी मी
वॉव इतका स्पष्ट आहे तरी मी कसा मिस केला बरं

पण ओळखायचं तर थोडं कठीण काम आहे...सनबर्ड आहे का?? आणि असेलच तर मग कदाचित डबल कॉलर्ड?
त्यापुढे मात्र दुसरा फोटू पायजेल...
वेका... मला पण सनबर्ड वाटला
वेका... मला पण सनबर्ड वाटला होता. पण हा पक्षी जरा मोठा वाटतोय आकाराने. खरंच त्याची बसण्याची ढब वगैरे सनबर्ड सारखी आहे.
रमड चोच पण बघ नं वर
रमड चोच पण बघ नं वर आलेली...लेट्स सी अश्चिगबाबु काय म्हणताहेत.....:)
येस, सनबर्ड चुकीच्या
येस, सनबर्ड
चुकीच्या कंप्युटरवरुन वेब अॅक्सेस करतो आहे म्हणून दूसरा फोटो टाकु शकत नाही (आत्ता). नंतर टाकीन.
aschig 21 == sun bird (वेका)
aschig 21 == sun bird (वेका)
हे पक्षी कोणते? aschig 22:
हे पक्षी कोणते?
aschig 22: जामनगर फेब. २०१३
aschig 21: परपल सनबर्ड aschig
aschig 21: परपल सनबर्ड
aschig 22: स्वालोज?
वेडे राघू किंवा पोपट?
वेडे राघू किंवा पोपट?
स्वॅलो, पाकोळी की टिटवी
स्वॅलो, पाकोळी की टिटवी म्हणतात आपल्याकडे. तेच का हे?
पर्पल सनबर्ड न? दुसरे वेडे
पर्पल सनबर्ड न?
दुसरे वेडे राघुच वाट्ताहेत ..
मलापण या पाकोळ्याच वाटताहेत.
मलापण या पाकोळ्याच वाटताहेत. (फोटो - २२)
(वेडे / शहाणे राघु, स्वॅलो,
(वेडे / शहाणे राघु, स्वॅलो, टिटवी, पाकोळी) नाही.
aschig 22 करता यावरुन काही कळतय का ते पहा ...
चिमण्या / साळुंक्या (मैना) /
चिमण्या / साळुंक्या (मैना) / कबुतरं?
सीगल्स?
सीगल्स?
इन्ना-१ हा कोण?
इन्ना-१
हा कोण? औरंगाबाद्मधे दिसला आहे. मी याला निळा भारद्वाज म्हणते . ( जाणकारांनी माफ करावे
)
इन्ना १ - Eurasian Magpie
इन्ना १ - Eurasian Magpie
इन्ना १ - Eurasian Magpie >
इन्ना १ - Eurasian Magpie > +१
मी याला निळा भारद्वाज म्हणते > टकाचोर म्हणतात ना?
यावरुन काही कळतय का ते पहा ... > यावरुन ते चतुर वाटत आहेत. :p
aschig २२ चतुर वाटत आहेत
aschig २२ चतुर वाटत आहेत
चिमण्या / साळुंक्या (मैना) /
चिमण्या / साळुंक्या (मैना) / कबुतरं? नाही
सीगल्स किंवा चतुर पण नाहीत.
aschig 22: अजुन एक फोटो.
कंटेक्स्ट वापरुन पहा
टोळ? टोळ पक्षी असतो का? म्हणे
टोळ? टोळ पक्षी असतो का? म्हणे टोळधाड आली की आकाश सुद्धा दिसत नाही...
इन्ना-१ >>> खटिक
इन्ना-१
>>> खटिक
अश्चिग २२ : starlings?
अश्चिग २२ : starlings?
सांग रे बाबा आता...माझ्याकडे
सांग रे बाबा आता...माझ्याकडे तर नवा तुक्का पण नाय मारायला.... उगाच कुठल्या बदकांच्या थव्याला तोंडघशी पाडू
वेका, बदकांना इतकं वरती
वेका, बदकांना इतकं वरती उडवशील तर ती नक्कीच तोंडघशी पडतील.
Pages