हा पक्षी कोणता?
माझ्या बिघडलेल्या फोटोंकरता एक उपयोग शोधण्यात मी यशस्वी झालो आहे असे मला वाटते. खास करुन पक्षांचे फोटो. इथे मी असे फोटो टाकीन ज्यात पक्षी नीट ओळखु येत नाही, आणि तुम्हाला तो ओळखायचे आव्हान देईन. अर्थात उत्तरादाखल माझ्याजवळ त्या पक्षाचा चांगला फोटो देखील असेल. झब्बु देण्याबाबत तीच एक अट आहे. एक कोडेदार फोटो असेल तर एक उत्तरदार देखील असावा.
प्रश्न देतांना तुमच्या नावाचा उल्लेख करुन एक रनींग नंबर वापरा (उदा. माझा पहिला प्रश्न असेल aschig १)
उत्तर देतांना प्रश्नाच्या क्रमांक वापरता येईल. (या सुचनेकरता माधवला (व सावलीला सुद्धा) धन्यवाद)
चला तर करुया सुरु. (पुढच्या पोस्टींग मध्ये पहिला प्रश्न असेल).
आत्तापर्यंतचे प्रश्नः
aschig 1: उत्तर साधना (मृनिश - अर्धे उत्तर)
aschig 2: उत्तर सावली
aschig 3: उत्तर भुंगा (नादखुळा चे पण बरोबर होते)
aschig 4: उत्तर जयु
aschig 5: उत्तर भुंगा/नादखुळा
aschig 6: उत्तर भुंगा/नादखुळा
aschig 7: उत्तर भुंगा/नादखुळा
aschig 8: उत्तर नादखुळा
aschig 9: उत्तर सावली/भुंगा
aschig 10 (30 nov 2011):
aschig 11 (31 jan 2012): अर्धे उत्तर साधना/कापो/भुंगा
aschig 12 (29 mar 2012): उत्तर वेका
aschig 13 (10 apr 2012): उत्तर भुंगा
aschig 14 (10 apr 2012): उत्तर भुंगा/ shendenaxatra
aschig 15: (10 apr 2012): वेका
aschig 16: (27 apr 2012): वेका (/साधना - साधनेबद्दल)
aschig 17: (29 apr 2012): वेका (+ साधना/इंद्रधनुष्य)
aschig 18: (30 apr 2012): वेका/भुंगा
aschig 19: (24 may 2012): वेका/इंद्रधनुष्य
aschig 20: (9 oct 2012): वेका
aschig 21: (16 Feb 2013): वेका
aschig 22: (18 Feb 2013): rmd/2
aschig 23: (21 Feb 2013): सावली/भुंगा
aschig 24: (23 Feb 2013): rmd
aschig 25: (28 Feb 2013): वेका
aschig 26: (4 Mar 2013): वेका/rmd
aschig 27: (15 apr 2013): rmd/कांदापोहे
aschig 28: (9 may 2013): rmd
aschig 29: (14 may 2013): कांदापोहे
aschig 30: (21 may 2013): राज
aschig 31: (3 aug 2013): वेका
aschig 32: (4 oct 2013): साधना/rmd/सारीका
aschig 33: (20 Oct 2013): rmd
aschig 34: (21 Oct 2013): rmd
aschig 35: (21 Dec 2013):
लालु १:
सावली १ :Smew , Male - नादखुळा
अवल १: भुंगा
अवल २ : पर्वत कस्तुरी : नादखुळा
अवल ३ : सूर्यपक्षी : भुंगा, aschig, कांदापोहे
अवल ४ : कॉर्मोरंट : सावली, भुंगा
भुंगा, सचिन्_साची वगैरे (वेळ मिळाल्यावर क्रमांक व उत्तरे कोणी दिली हे लिहीन)
प्रश्न क्रमांक व उत्तर देणार्यांची नावे अशी इथे देत राहण्यासंबंधी एक सुचना:
तुम्ही प्रश्न टाकल्यावर मला संपर्कातुन एक्झॅक्ट वर्डींग कळवलेत तर मी तसेच्या तसे कॉपी-पेस्ट करु शकेन
उदा.: भुंगा ७: अनुत्तरीत
मग उत्तर मिळाल्यावरः
भुंगा ७: उत्तर दानखुळा
किंवा दोन्ही एकत्र (उत्तर मिळाल्यावर).
पहा जमल्यास.
सनबर्ड, फुलचुख्या पण म्हणतात
सनबर्ड, फुलचुख्या पण म्हणतात ना. धन्स इंद्रा. उत्तर मिळाले.
जागू, तुझ्या फोटोतली पर्पल
जागू, तुझ्या फोटोतली पर्पल रम्प्ड सनबर्डची मादी आहे. त्याला मराठीत "शिंजीर" म्हणतात. आहे तो सूर्यपक्षीच पण या एकालाच "शिंजीर" असे वेगळे नाव पण आहे. याचा नर कायच्याकाय सुंदर असतो....... एकदम "झगामगा मला बघा"
भुंगा, बरं झालंस क्लियर
भुंगा, बरं झालंस क्लियर केलंस..मला वाटलेलं की सरळ सगळ्य सनबर्डसना शिंजीर म्हणातात की काय...
अरेसहीच अस्तो तो नर...(एकंदरीतच पक्षीजगतातले नर.... Paradise fly catcher for that matter......)
वेका/इंद्रधनुष्य,
वेका/इंद्रधनुष्य, बरोबर
aschig 19: (24 may 2012): सँडपायपर
भुंग्या धन्स. ते नर पक्षी पण
भुंग्या धन्स. ते नर पक्षी पण आहेत आमच्याइथे छानच दिसतात ते.
fb वर Indian Bird या Groupचे
fb वर Indian Bird या Groupचे कोणी सदस्य आहात का? जबरी कलेक्शन आहे तिथे.
इंद्रधनुष्य १ : हा पक्षी कोणता? (स्थळ: वसई)
बसण्याची पद्ढ्त, शेपटी इ.
बसण्याची पद्ढ्त, शेपटी इ. वरुन Coppersmith वाटतोय...
वेका... बरोबर हा तांबट आहे.
वेका... बरोबर हा तांबट आहे.
आज दुपारी जोरदार पाऊस
आज दुपारी जोरदार पाऊस पडल्यानंतर एका विशिष्ट प्रकारचे किडे (किंवा अगदी छोट्या फुलपाखरांसारखे किडे) मोठ्या प्रमाणात हवेत उडताना दिसत होते. काही वेळाने बरेच कावळे रस्त्यावर बसून ते किडे खाताना दिसले. आश्चर्य म्हणजे त्यात ८-१० कावळे पांढर्या मानेचे होते. म्हणजे त्यांची मान पूर्ण पांढरी नव्हती पण मानेवर व पंखाखाली अनेक पांढरे डाग दिसत होते. ते कावळे पूर्ण भिजल्यामुळे त्यांच्या मानेवर पंखाखाली असलेले पांढरे डाग दिसायला लागले असावेत. तसेच ते उडताना पंखाखालचे पांढरे डाग देखील दिसत होते. अशा प्रकारचे कावळे कोणी पाहिले आहेत का?
गाव कोणते?
गाव कोणते?
>>> गाव कोणते? पुणे
>>> गाव कोणते?
पुणे
स्थळः वसंत विहार, ठाणे. नावः
स्थळः वसंत विहार, ठाणे.
नावः माहीत नाही.
अतिशय चपळ होता हा. खास याला कॅमेर्यात पकडण्यासाठी खाली जाऊन साधारण तासभर बैठक मांडली होती.
तसेच शेपटीचा फुलोरा तर मस्तच होता.
शेपटीचा टिपलेला नजारा

हा नाचण आहे
हा नाचण आहे बहुतेक.
कावळ्यांचे पोट भिजल्यावर मधुन मधुन पांढरे दिसते. मीही पाहिलाय पुर्ण भिजलेला काळा-पांढरा कावळा.
स्मितहास्य, ह्या पक्षाचे नाव
स्मितहास्य,
ह्या पक्षाचे नाव "पांढर्या ठिपक्यांचा नर्तक किंवा नाचण किंवा नाचरा (White-spotted Fantail Flycatcher Or Rhipidura albogularis)" असे आहे. हा चिमणीच्या आकाराचा असून अत्यंत चपळ व अस्वस्थ असतो. तो एका जागेवर १-२ सेकंदापेक्षा बसत नाही. सतत इकडून तिकडे उडत असतो. हा अतिशय स्वरबद्ध व मंजूळ शीळ घालतो. आपल्या शेपटीच्या पिसार्याची तो अखंड उघडझाप करत असतो. माझ्या घराभोवती यांची एक जोडी आहे. दिवसभरात अनेकवेळा याची मंजूळ, सप्तसुरी शीळ ऐकू येते. पण मला आजवर याला कॅमेर्यात पकडता आलेले नाही.
प्रकाशचित्राबद्दल अभिनंदन! याचे अतिशय सुस्पष्ट असे प्रकाशचित्र तुम्हाला काढता आले हे एक मोठे आश्चर्य आहे, कारण याला कॅमेर्यात पकडणे अत्यंत अवघड आहे.
हा अतिशय स्वरबद्ध व मंजूळ शीळ
हा अतिशय स्वरबद्ध व मंजूळ शीळ घालतो. >>> अगदी
पण मला आजवर याला कॅमेर्यात पकडता आलेले नाही. >> मलाही ते जमले नाही.. केवळ दहा फुटांवरुन सुद्धा... हे त्याचे सुंदर घरटे...
फुलोरा..

हा आहे While-throated fantail
हा आहे While-throated fantail flycatcher
तो आणि त्याचा चुलत भाऊ white-browed fantain flycatcher (याच्या भुवईला एक जाड पांढरा पट्टा असतो)
हे दोन्ही पक्षी white-spotted असतात. पहिला जास्त कॉमन (मला तरी जास्त दिसायचा). माझ्या सर्वात आवडत्या पक्षांपैकी एक. शीळ ऐकली की लगेच बाहेर जाऊन दर्शन घ्यायचे. दोघांच्या शिळेत थोडा फरक असतो.
मास्तुरे, धन्यवाद तो एका
मास्तुरे, धन्यवाद
तो एका जागेवर १-२ सेकंदापेक्षा बसत नाही. सतत इकडून तिकडे उडत असतो. >>> अगदी. कारण याच्या प्रत्येक फोटोसाठी कॅमेरा सेटिंग सतत बदलावी लागत होती.
हा अतिशय स्वरबद्ध व मंजूळ शीळ घालतो. आपल्या शेपटीच्या पिसार्याची तो अखंड उघडझाप करत असतो. >>> हो. म्हणजे अगदी समोरून मागे जरी वळून बसायचे असेल तरी शेपटीचा पिसारा फुलवूनंच. शीळ तर काय वर्णावी. सकाळी नीरव शांततेत त्याने घातलेली शीळ ऐकली की जाम मस्त वाटतं. ते ही कालंच समजलं की हेच साहेब आहेत ते शीळ घालणारे.
स्मितहास्य, अप्रतिम फोटो.
स्मितहास्य, अप्रतिम फोटो. टायमिंग आणि सेटिंग एक नंबर
इंद्रधनुष्य मस्त !
हा कोण?
हा कोण?

Oriental Magpie Robin म्हणजेच
Oriental Magpie Robin म्हणजेच 'दयाळ'
हा गरुडच आहे ना? स्थळः
हा गरुडच आहे ना?
स्थळः सिंहगडला जाताना डावीकडे जी दरी आहे तिथे.
लांब होता म्हणुन जास्तीच झुम मिळण्यासाठी व्हिजीए सेटिंग लावुन काढलाय फोटो.
त्यामुळे क्वालिटी फार उत्तम नाहिये. शिवाय त्याची पाठच माझ्याकडे होती बराच वेळ.
हा एकच स्नॅप मिळाला त्याने मान फिरवल्यावर. आकार घारीपेक्षा मोठा होता.
धन्यवाद इंद्रधनुष्य. हा फोटो
धन्यवाद इंद्रधनुष्य.:स्मित:
हा फोटो काढण्यापूर्वी मनात विचार आला होता, दयाळ पक्षी कसा असतो, आपण अजून पाहिला नाही. आणि आता तुम्ही सांगताय हाच दयाळ आहे.
गरूडाची चोच मोठी असते ना? मला
गरूडाची चोच मोठी असते ना? मला तरी हा गरूड वाटत नाही.
crested serpant egale -
crested serpant egale - डोक्यावर तुरा दिसतोय इंद्रा...
वरचा स्मितहास्यचा फोटो "नंदन
वरचा स्मितहास्यचा फोटो "नंदन नाचण म्हणजेच फॅनटेल्ड फ्लायकॅचर.
झकासराव, तो क्रेस्टेड सर्पंट ईगल आहे. बहुतेक त्याला मराठीत "नाराच गरूड" असे म्हणतात. (मराठी नावाबद्दल खात्री नाही)
कावळ्यांचे पोट भिजल्यावर मधुन
कावळ्यांचे पोट भिजल्यावर मधुन मधुन पांढरे दिसते. मीही पाहिलाय पुर्ण भिजलेला काळा-पांढरा कावळा.>>> +१ हल्ली पोटच काय, मानही काळी पांढरी झालेले ओलेते कावळे दिसतात बागडताना.
स्मिहा आणि झकासराव मस्त आहेत
स्मिहा आणि झकासराव मस्त आहेत फोटोज...लकी...:)
तो मलापण क्रेस्टेड सरपेंटच वाटतोय...
हिम्स आणि भुंगा धन्यवाद रे.
हिम्स आणि भुंगा धन्यवाद रे.


तुम्ही सांगितल्यावर मी फोटोत गरुडाच्या डोक्यावर तुरा पाहिला.
ह्या बाबतीत अजुन बरच शिकायच आहे हे माहितीच आहे पण अजुन नजर तयार व्हायचीय ह्याची जाणीव झाली ते बरच झालं ह्या निमित्ताने.
हा कोण ? प्लिज नाव सांगा याचे
हा कोण ? प्लिज नाव सांगा याचे
Ashy Prinia म्हणजेच राखाडी
Ashy Prinia म्हणजेच राखाडी वटवट्या
Pages