ओल्या हळदीचे लोणचे - फोटोसहीत

Submitted by दिनेश. on 7 February, 2011 - 07:22
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
पारंपारीक कृति व प्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थंड, यात तेलाची फ़ोडणी करायची तर नूसती हिंग घालून करावी. मेथी मोहरी अगदी नावालाच,
कारण हळद थोडी कडवट असते. किसून केले तर खार दाट होतो (मेथी, मोहरी त्यासाठी
वापरतात.)

भाऊ आंबेहळद रंगाने थोडी गडद असते. तिचे लोणचे अर्थातच जास्त चवदार लागते.

निकिता, तूप कढवण्यासाठी वापरतात. मासे खात असाल तर माश्याची पोटली
बांधण्यासाठी. मासे नकोत तर बाकिच्या भाज्या पण त्यात बांधून, तव्यावर
भाजता येतील.

तामिळ लोकांना कुठल्यातरी सणाला (पोंगल ?) ओल्या हळदीचे रोप लागते बहुतेक. कारण त्या सुमारास हि रोपे येतात बाजारात.

मी ह्य्द्राबाद ला रहाते....हळदी ची रोपे किंवा ओली हळद मला इथल्या मार्केट मध्ये सापडतच नाहीये...
बहुतेक हाच season असतो न...कोणाला माहितीये का कुठे मिळू शकेल इकडे

मी सध्या सीझन आहे म्हणून ओल्या हळदीचं लोणचं केलंय! फक्त त्यात आंबेहळद,आलं, आवळाही किसून घातला. लिंबाचा रस, मोहरी पूड्,हिंग आणि मेथी दाणे तळून पावडर करून असा मसाला घातला!
तुम्ही केलेली रेसिपीपण आवडली.

hyamadihye ambe halad pan ghalavi. chan swad yeto. tasech kharakeche tukade aani kalya manuka pan ghalataat. mast lagataat.

दिनेशदा, मी पण गेल्याच आठवड्यात हे लोणचे केले.
ही हळद कुंडीत कशी लावायची? म्हणजे एका कुंडीत किती मुळ्या लावायच्या?

मस्तच फोटो आणि रेसिपी. तोंपासु. आता नक्की करून बघते. माझी आई करत असे ओल्या हळदीचे लोणचे काप करून. मस्त लागत असे. मला माहिती हितं कसं करतात ते पण आळस. आता नक्की करेन. तुमच्या या पोस्टमुळे मला उत्साह आला ओल्या हळदीचं लोणचं करण्याचा. Happy

दिनेशदा मी हे लोणचे नेहमी ह्या दिवसात करते. खूप छान होते, गाजर आणि मुळ्याचे लोणचेही अशा प्रकारे करता येते. ते जास्त दिवस लिंबाच्या रसात मुरवावे लागते.पण मी मीरी न वापरता लाल तिखट वापरते. कारण ओली मीरी मिळण्याची शक्यता कमी असते.

चांगली पाककृती आहे.

>>>एवढी हळद खावून पोटात दउखत नाही का?
(मी एकदा खाल्ले तर दुखले होते..)

तुमच्या पोटात बर्‍याच गोष्टींनी दुखतं असं बघितलं आहे. हळदीचं काय घेऊन बसलात??

विळी,
माझ्या पोटात दुखत हे बघितलय का? पण तुमच्या का आता दुखतय ते दिसत नाही का? का दुसर्‍याच खुपत आणि स्वतःच नाही खुपत असेच ना. Wink
संधीसाधू कुठले..
(अशी आयडी घ्या आता)

दिनेशदा, आजच ओल्या हळदीचे लोणचे करतेय,
५०० ग्रॅ. ओल्या हळदीचा किस
२०० ग्रॅ. आल्याचा किस
३०० ग्रॅ. कैरीचा किस
एकत्र करुन त्यात मीठ टाकून ठेवले आहे, फोडणीत तेल, मोहरीची डाळ, मेथी, तीळ, हिंग, तसेच गरजेनुसार लाल तिखट, हळकुंड तळून त्याची भुकटी १ चमचा असे जिन्नस वापरलेत, मुरण्यासाठी व टिकण्यासाठी वरुन कच्चे शेंगदाणा तेल घालणार आहे..
यात काही सुचना असतील तर कळविणे.. चव अजुन पाहीली नाही..
Happy

दिनेशदा, माझ्या सासुबाई नेहमी फक्त फोडणीचे तेलच गरम नंतर थंड करुन लोणच्यात टाकतात, लोणचे टिकण्यासाठी कच्चेच तेल टाकतात, त्यांच्यामते, तेल गरम करुन नंतर थंड करुन टाकले तर लोणचे सुरुवातीला खमंग लागते पण नंतर जसे जसे मुरते तसा त्याला एक प्रकारचा उग्र वास येतो..
काय करु..? Sad

वा वा, फारच छान दिनेशदा,
माझ्या आईने नुकतेच हे लोणचे घातले आहे. त्यात आलं नाही पण हळदी बरोबर आवळा किसून घातला आहे आणि काळे मीठ. तुम्ही दिलेली ही फोटोसहित लोणच्याची कृती पाहून तोंडाला पाणी सुटले.

माझी आई ओल्या हळ्दीच्या पातळ चकत्या करुन करायची .. हे जास्त टेम्प्टींग दिसतंय..
जर आल्यांचा कीस वाटीने मोजायचा असेल तर प्रमाण काय घेऊ?
म्हण्जे मी मोजुन आलं घेतलं नाही आणि रिसिट पण टाकली आहे त्यामुळे प्रमाणाचा अंदाज वाटीने घ्यावा लागणार....:(

Pages