Submitted by दिनेश. on 7 February, 2011 - 07:22
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
४० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
अधिक टिपा:
क्ष
माहितीचा स्रोत:
पारंपारीक कृति व प्रयोग
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चवीला अतिशय सुंदर लागतो हा
चवीला अतिशय सुंदर लागतो हा प्रकार .. नुसत वाचूनच तोंडाला पाणी सुटले.
माझ्या ऑफिसमधल्या गुजराती कलिगने आणलेला हा प्रकार, पण त्यात आले नव्हते.
गुजराथी लोकांचा आणखी एक
गुजराथी लोकांचा आणखी एक प्रकार म्हणजे, छुंद्यासाठी कैर्या किसल्यानंतर त्या किसातून जे पाणी निघते त्या पाण्यात हळद, मिरी, ओली बडीशेप वगैरे घालून मूरवतात. तो प्रकार पण मस्त लागतो.
दिनेशदा, आमच्याकडे जवळपास
दिनेशदा, आमच्याकडे जवळपास वर्षातले १० महिने तरी आवडीने खाल्ला जाणारा हा लोणच्याचा प्रकार आहे. घरी जर करायला जमले नाही तर तेवढ्यापुरते बाहेरचे आणतो. पण शक्यतो घरीच करतो. सध्या त्यात आवळ्याचा कीसही घातलाय. मस्त चव येते. क्षुधावर्धक, रक्तदोषनाशक असे हे लोणचे समजले जाते.
अकु, अलिकडेच कर्करोगाची
अकु, अलिकडेच कर्करोगाची शस्त्रक्रिया झालेल्या, आमच्या नात्यातील एका बाईला, निव्वळ हळदीच्या गोळ्या चालू केल्या आहेत (अर्थात बाकीची ट्रिटमेंट चालूच आहे.) म्हणून आपला हा पारंपारीक प्रकार आहारात असायला हवा.
मस्त! वरण-भाताबरोबर खास
मस्त! वरण-भाताबरोबर खास लागतं!
'हळदीचे लोणचे' जेवणा सोबत
'हळदीचे लोणचे' जेवणा सोबत माझा आवड्ता प्रकार आहे...आणि दिनेशदा तुम्ही पाककृतीही सोपी दिली आहे.
आता फोटो टाकला आहे. चव मस्तच
आता फोटो टाकला आहे. चव मस्तच आलीय.
मस्त फोटो. हळद खिसण्या एवजी
मस्त फोटो. हळद खिसण्या एवजी बारीक काप पण चालतील ना?
आजीची आठवण आली ती हळदीचे आणि कार्ल्याचे लोणचे खुप छान बनवायची.
भारतात गेले की तुमच्या पद्धतीने बनवुन आणेन.
(ईथे(seattle मध्ये) ओली हळद मिळते का?)कुणाला माहिती असेल तर सांगा
अनु ३ आमच्याकडे पण आधी चकत्या
अनु ३ आमच्याकडे पण आधी चकत्या करुनच करत असत. पण किसल्याने लोणचे मिळून येते आणि खायलापण चवदार लागते. तूमच्याकडे बहुतेक मिळत असणार.
अहाहा, मस्त लागतं हे लोणचं.
अहाहा, मस्त लागतं हे लोणचं. मी ह्यात हिरव्या मिरचीचे तुकडे पण घालते, बाकी सगळं सेम. हावरटासारखं खूप खाल्लं तर मात्र तोंड येतं (स्वानुभव)
मस्त दिसतयं. मी गेल्या
मस्त दिसतयं. मी गेल्या महिन्यात केलं, त्यात मीठाऐवजी सैधव मीठ घातलं.
दिनेशदा, धन्यवाद! मला हा
दिनेशदा, धन्यवाद! मला हा प्रकार फार म्हणजे फारच आवडतो. तुम्ही सांगितल्याप्रमाणे वरण भात, दही भात याबरोबर मस्त लागतो. आत्ता देशात गेले होते तेव्हा मनसोक्त खाऊन आले आहे. ईथेही एकदा ओली हळद मिळाली होती. इंग्रजीमध्ये ओल्या हळदीला काय म्हणतात?
wet turmeric
wet turmeric
दिनेश दा मला फोटो दिसत नाही
दिनेश दा मला फोटो दिसत नाही ये
वा वा. कित्येक वर्षात खाल्लं
वा वा. कित्येक वर्षात खाल्लं नाहीये. घरी बाबा करून द्यायचे

राखी.
दिनेशदा माईनमुळ्याचं लोणचं पण टाका आता
वत्सला, फ्रेश रुट टर्मरिक
वत्सला, फ्रेश रुट टर्मरिक म्हणत असावेत. मी मुद्दाम फोटो टाकलाय, नाव नाहि कळलं तरी ओळखता येईल.
चंपी, पिकासा वरुन आलेत हे फोटो.
मम्मी करायची हे लोणचे. मी
मम्मी करायची हे लोणचे. मी एकदा केले पण परत लक्षातच नाही आले कधी. आता करेन हे.
माईनमुळ्याचे लोणचे, छन्न्याचे लोणचे सगळे खाऊन लई वर्षे झाली
माईनमुळा म्हण्जे Horse radish
माईनमुळा म्हण्जे Horse radish का?
आहा.. तोंपासु लिंबुफूल म्हंजे
आहा.. तोंपासु
लिंबुफूल म्हंजे काय?????? कसं दिस्तं ??
व्हेरी व्हेरी टेस्टी टेस्टी !
व्हेरी व्हेरी टेस्टी टेस्टी ! हळदीचं लोणचं टेस्टी तर लागतच, पण उपलब्ध असेल तेव्हा, ओल्या हळदीचा कीस, नेहमीच्या हळद पावडर ऐवजी भाजी/ आमटीत वापरून बघितला, काय जबरी स्वाद येतो ! खास करून पालक/ मेथी पातळभाजीत, थालीपीठात !!!
मिनोती, माईनमूळ्याचा फोटो आहे
मिनोती, माईनमूळ्याचा फोटो आहे का ? कोल्हापूर भागात ते खूपच लोकप्रिय आहे.
सावली माईनमूळा म्हणजे हॉर्स रॅडीश नाही. हे करड्या तपकिरी रंगाचे बोटभर लांबीचे मूळ असते. गुच्छात येते, बाजारात. वरची साल काढली कि आत पांढरट पिवळे मूळ असते. त्याच्या चकत्या करुन लोणचे करतात. नेहमीच्या पद्धतीनेच करतात (मला वाटते नंदीनीने कृति दिली होते ) यात कैर्याही घालतात कारण नूसते माईनमूळे चवीला कडू लागतात. पण लोणचे मात्र चवदार लागते. तोंडाला चव आणते. गुजराथी लोक याला गरमर म्हणतात. मुंबईला ग्रँट रोड (भाजी गल्ली ) आणि पार्ले येथे बाजारात बघितले होते.
वर्षू, लिंबू फूल म्हणजे सायट्रीक अॅसिड. पांढर्या साखरेसारखे दिसते. अगदी चिमूटभर टाकले तरी पदार्थ छान आंबट होतो. त्यामूळे ताज्या लिंबाला पर्याय म्हणून वापरतात (अर्थात याला ताज्या लिंबाचा स्वाद नसतो ) तयार लिंबाची सरबते, खूपदा यापासूनच केलेली असतात. हे लिंबापासून न करता कच्च्या संत्रापासून करतात, असे मला एकाने सांगितले होते.
दिनेशदा सह्हीच. मी ह्यात काळ
दिनेशदा सह्हीच. मी ह्यात काळ मिठपण घालते.
मी हल्लीच केलं. घरच्या
मी हल्लीच केलं. घरच्या हळदिचं. पण चकत्या करुन आणी मिरची घालुन. पुढच्या वेळी असं करुन बघेन. नवीन हळद आता डोकं वर काढ्ते आहे
सह्हीच आई करते अस लोणच पण
सह्हीच
आई करते अस लोणच पण त्यात कधी कधी थोडा लोणच्याचा मसाला किंवा हिरवी मिरची घालते.
आई जेव्हा मिक्स भाज्यांचे लोणचे करते त्यात पण ताज्या हळदीच्या चकत्या घालते. मस्तच लागतं.. अत्ताच खाऊन आले
काळ्या मीठाने जास्त चवदार
काळ्या मीठाने जास्त चवदार होणार हे नक्की.
निकिता, हळदीच्या पानांचा उपयोग केला कि नाही. त्याला पण मस्त स्वाद असतो.
गिरिश, ओल्या हळदीचे बाकीचे उपयोग पण करुन बघायला हवेत.
यात पिंपळिचा स्वाद नक्कीच छान लागतो. मुंबईत आयुर्वेदीक औषधे विकणार्यांकडे मिळते ती. (मला नाही मिळाली !!)
एकदम झक्कास दिसतय. नुसत्या
एकदम झक्कास दिसतय. नुसत्या हळदीचं लोणचं कधी खाल्लं नव्हतं.
साबा नी केले आहे सध्या घरी.
साबा नी केले आहे सध्या घरी. सेम असेच दिसते आहे!!
दिनेशदा, हा तुमचा अगदी
दिनेशदा,

हा तुमचा अगदी तोंडाला चव आणणारा लेख वाचला ...
आणि प्रिंटही काढली !
(....आता घरी जाऊन आदेशच (?) देतो,कि या पत्रातल्या प्रमाणे कृती झालीच पाहिजे :डोमा:)
माझाही आवडता प्रकार. अर्थात,
माझाही आवडता प्रकार. अर्थात, तेलाची फोडणी दिलेलंच मी चाखलंय; हा प्रकार करून पहायला हवा.
दिनेशदा, ओली हळद व आंबेहळद वेगळी ना ? आंबेहळदीचं लोणचं पण छान होतं.
दिनेशदा ह्यात मेथी / मोहरि ची
दिनेशदा ह्यात मेथी / मोहरि ची डाळ घालायची असेल तर ?
Pages