दु:खद घटना - जुना धागा

Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफिकीर, तुमच्या दु:खात सर्वं मायबोलीकरांसह मी सहभागी आहे. आई जाण्याने लहान होण्याची हक्काची जागा गमावतो माणूस... त्या दु:खावर मलम नाही Sad

विठ्ठल उमपांचं निधन.... कलाकाराला अगदी हवा तस्सा मृत्यू... देवानं त्यांना हवं होतं तसं... स्वहस्ते नेलय.... त्यांच्या आत्म्याची शांती तिथेच प्रस्थापित झाली.

Sad

बेफिकीरजींच्या आईंच्या आत्म्यास शांती लाभो !!

विठ्ठल उमप यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

बेफिकीरजींच्या आईंच्या आत्म्यास शांती लाभो !!
आई - मुलाच नात हेच खर नात अख्या विश्वात.. बाकी सारी नाती बनवलेली..
प्रत्यक्ष जिच्या उदरातून जन्म झाला तीचा विरह सहन करणे म्हणजे अतिशय अवघड. खरच त्या दु:खावर मलम नाही

Sad

Sad

नॅशनल फिल्म्स अर्काईव्हज ऑफ इन्डिया चे संचालक विजय जाधव (४३) आय ए एस यांचे निधन. मध्यंतरी त्यांची साडे नऊच्या बातम्यात मुलाखत ऐकली होती. खूप गहिरा आवाज होता त्यांचा . अर्काईव्हज साठी त्यानी खूप डोळसपणे योजना आखून जुने चित्रपट मिळवायला सुरुवात केली होती. बरीच कामे त्याना करायची होती. अर्काइव्हजचे त्यांचेकडून चांगले झाले असते असे आश्वासक वातावरण त्यानी निर्माण केले होते.

ज्ञानेश्वर नाडकर्णी, शिक्षणतज्ञ चित्रा नाईक आनि अभिनेत्री नलिनी जयवंत यांचे निधन.

विजय जाधव!!! O my GOD!!! Sad Sad Sad
त्यांची बायको साधना माझी मैत्रिण. ते स्वतः उस्ताद अल्लारखांकडे तबला शिकले होते. अतिशय लाघवी व्यक्तीमत्व. कराडचे माजी नगराध्यक्ष श्री. पी. डी. पाटील यांचे ते नातजावई होते.

You will be missed!!!

विद्यार्थी दशेत असताना चित्रबाईं बरोबर पत्र व्यवहार केल्याचे स्मरणात आहे, त्यांनी स्वतःहून त्याचे उत्तर त्यांच्या लेटर हेड वर दिलेले. त्यावरून त्यांचे व्यवस्थापन खूप चांगले असून मुलांना शिक्षण मिळावे म्हणुन स्वतः दखल घेणे जरूरीचे त्याना वाटत असावे. माझा त्यांना सलाम.
नलिनी जयवंत एवढ्या सुंदर काम करत असून त्यांचे निधन एकाकी व उपेक्षित झाले, हे वाचून दु:ख व खेद वाटला.
ओम शांती..

Sad

ह्म्म. आज दुपारीच जेवताना जुन्या नाटकांच्या आठवणी निघाल्या त्यात लखोबा लोखंडेही होते Sad
त्यांना माझी श्रद्धांजली Sad

प्रभाकर पणशीकरांना भावपूर्ण श्रद्धांजली. अजूनही ' तो मी नव्हेच' मधील त्यांच्या भूमिका आठवतायत.

Pages