Submitted by ढंपस टंपू on 25 July, 2023 - 02:33
अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक च्या मागच्या धाग्यावर १९०० पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्याने हा नवीन धागा.
मागच्या धाग्यावरचे अचाट सीन्स पाहण्यासाठी खालील दुव्यावर जा.
https://www.maayboli.com/node/2242
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(नवीन धागा निघाल्याने तिकडची
(नवीन धागा निघाल्याने तिकडची शेवटची पोस्ट इथे पहिली म्हणून हलवत आहे).
अ आणि अ धागा वाचून शेवटी तिरंगा मधला मिसाईल का फ्युज यहा है वाला सीन पाहिला. धमाल आहे.
या निर्माता दिग्दर्शकाने जर ओपेनहायमर वर सिनेमा बनवला असता तर दोन गँगमधे तुंबळ युद्ध होतं, त्यात ते एकमेकांवर दाताने पिन काढून अणूबाँब फेकत असतात असे दृश्य आपल्याला पहायला मिळाले असते.
वेळ गेलेली नाही अजून. साऊथच्या दिग्दर्शकाने न्यूटनवर सिनेमा बनवला पाहीजे. भौतिकशास्त्राचे न्यूटनचे नियम पडद्यावर ज्यांनी बदलले त्यांनाच तो अधिकार आहे.
यात न्यूटन गावातल्या एका मोठ्या जमीनदाराचा वाया गेलेला मुलगा असतो. या घरात अनेक माणसं राहत असतात. एकमेकांशी ते गुण्यागोविंदाने राहत असतात. जमीनदार न्यायप्रिय असतो. कुणी चुकीचा वागला तर मात्र त्याचे हात पाय तोडून गाळ्यात घालायची शिक्षा तो ठोठावत असतो. इतरांसाठी मात्र तो देव असतो.
न्यूटनला तो हाकलून देतो. त्या आधी न्यूटन एका मुलीला एक अचाट पैज लावून पटवतो. २४ तासात तू मला पटशील असे आव्हान दिल्याने ती २४ तास त्याच्याच विचार करू लागते आणि २४ तासात पटतेच. घरातून हाकलून दिल्यावर तो या मुलीशी लग्न करतो. तिचे नाव मादाम क्युरी असते. पण गावात तिला मॅडम कावेरी म्हणत असतात.
न्यूटनला आता कळते कि तिचा बाप
गुंंडकाळे धंदेवाला आहे. त्याला जमीनदाराचा अडथळा होत असल्याने त्याचा तो काटा काढत असतो. हे सांगायला न्यूटन घरी जातो पण पिता त्याला हाकलून देतो. मग गुपचूप गुपचूप तो परिवाराचे संरक्षण करत राहतो आणि शेवटी तिच्या बापाचे सुद्धा प्रचंड हाणामारी नंतर हृदयपरिवर्तन होते. या हाणामारीत खाली आपटलेले लोक वर उडून जात असतात. हवेत कोलांटी उडी खात असतात. एकदा उडी मारली कि तिचे उड्डाणात रूपांतर होऊन एकाच उड्डाणात पंधरा वीस लोकांना किक मारता येत असते.या प्रचंड हाणामारीचा थकवा येऊन शेवटी न्यूटन एका झाडाखाली बसतो.
तेव्हां वरून त्याच्या डोक्यात नारळ पडतात. ते नारळ डोक्यात आपटूनही पुन्हा वर जात नाहीत.
तेव्हां न्यूटन ओरडतो " यू रेखा ! यु रेखा !! "
त्याबरोबर झाडावर चढून नारळ तोडून मारणारी रेखा सुद्धा खाली पडते.
आणि गुरूत्वाकर्षणाच्या शक्तीचा शोध लागतो..
तेव्हांपासून सगळ्या वस्तू वरून खाली पडायला लागतात.
,
गुरूत्वाकर्षणाचा नियम पाण्यासाठी तपासताना न्यूटन
धमाल सुरुवात !!!!!!!!!!
धमाल सुरुवात !!!!!!!!!!
चलिए, अगला सवाल ये है...
चलिए, अगला सवाल ये है...
माला सिन्हा इथे काय करत असावी?
१. तोंड धुते आहे.
२. क्रीम लावते आहे.
३. फेशिअलची प्रॅक्टिस करते आहे.
४. यापैकी काहीच नाही.
क्रीम लावते : फेम फेम से गोरी
क्रीम लावते : फेम फेम से गोरी गोरी .
ही नुतन आहे. माला सिन्हा
ही नुतन आहे. माला सिन्हा नव्हे.
माला सिन्हा आहे ती...
माला सिन्हा आहे ती...
न्यूटन आहे.
न्यूटन आहे.
शुक्रवारच्या दिवशी माता नळाईचा वार असल्याने साडी नेसायचं व्रत होतं त्याचं.
ही नुतन आहे. माला सिन्हा
ही नुतन आहे. माला सिन्हा नव्हे.>>> MazeMan यांनी दिलेली लिंक बघा.
खरंच ती ऍक्शन विचित्र वाटते
नुतन, माला सिन्हा
नुतन, माला सिन्हा
माला सिन्हा action फनी एकदम.
हाहा.. आणी तो तिचा नाच आहे...
हाहा.. आणी तो तिचा नाच आहे...
नुतन मस्त दिसतेय. थोडी काजोल सारखी..
माला सिन्हा क्रिम लावतेय....
माला सिन्हा क्रिम लावतेय....
हा सीन पाहून काय वाटतं ?https
हा सीन पाहून काय वाटतं ?
https://www.instagram.com/p/CvOkgJNsVzr/
मी फोटो नुतनचा आहे म्हंटलं
मी फोटो नुतनचा आहे म्हंटलं - लिंक नव्हे.
सावरा सावर कशाला... झाली चूक
सावरा सावर कशाला... झाली चूक तर एक्सेप्ट करावी... ती माला सिन्हा आहे...
सावरा सावर कशाला... झाली चूक
सावरा सावर कशाला... झाली चूक तर एक्सेप्ट करावी... ती माला सिन्हा आहे... >>> नवीन आयुष्याच्या शुभेच्छा !
हा सीन पाहून काय वाटतं ?https
हा सीन पाहून काय वाटतं ?
https://www.instagram.com/p/CvOkgJNsVzr/
>>>>
त्याला हार्ट अटॅक कसा नाही आला?
माला सिन्हा इ-क्रीम लावत आहेत
माला सिन्हा इ-क्रीम लावत आहेत. बोटांवर घेऊन नुसतेच गालाला ओवाळल्यासारखे करायचे. हे त्याकाळी नवीनच निघाले होते, म्हणून "अल्ला जाने क्या होगा आगे"
बडे अच्छे लगते हैं मध्ये
बडे अच्छे लगते हैं मध्ये पहिल्या सीजनमध्ये असंच काहीसं करण्यासाठी साक्षी तन्वरला एक ज्येष्ठ स्त्री सांगते. राम कपूर सुद्धा अचंबित होतो हे पाहून. मूळ इथे होतं तर..
(No subject)
नूतन माला सिन्हा च्या डोईवर
नूतन माला सिन्हा च्या डोईवर असलेल्या स्विमिंग पूल मधे डाईव मारणार आहे.
सावरा सावर नाही! मी फोटो
सावरा सावर नाही! मी फोटो बद्दल comment केली होती.
माहित आहे हो.. गम्मत करत होतो
माहित आहे हो.. गम्मत करत होतो...
मी आणि माझा मित्र, आम्ही दोघे
मी आणि माझा मित्र, आम्ही दोघे मिळून आमच्या गाडीतून शत्रूच्या गाडीचा पाठलाग करत असतो. मित्र गाडी चालवत असतो व मी बाजूला बसलेला असतो. अचानक रेल्वे फाटक येते. आणि हाय रे कर्मा! नेमकी त्याच वेळेस तिथून आमच्या आडवी रेल्वे जात असते. आणि शत्रूची गाडी मात्र रेल्वे येण्याआधीच तिथून पलीकडे निसटलेली असते आता रेल्वे निघून जाईपर्यंत वाट बघण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नसतो. पण तेवढा धीर मला कुठे निघायला? कारण मी हिरो आहे. मी लोळत लोळत धावत्या रेल्वेच्या खालून पलीकडे जातो पण थोड्याच वेळात रेल्वे निघून जाते, माझा मित्र गाडी घेऊन पलीकडे येतो. व मी पुन्हा त्या गाडीतच बसतो आता तुम्ही विचाराल, "अरे त्यातच बसायचे होते तर रेल्वेखालून लोळत लोळत पलीकडे का गेला होतास?" तर माझे उत्तर आहे, "शत्रूची गाडी पुढे कोणत्या वळणावर वळली इतकेच पाहण्यासाठी"
हे तर काहीच नाही. पुढे जिथे जिथे आमच्या गाडीच्या आडवी झाडे झुडपे जंगल येते, तिथे तिथे मी गाडीवर चढून उभे राहून पुढचा रस्ता पाहत माझ्या मित्राचा गुगल मॅप बनून त्याला मार्गदर्शनसुद्धा करतो. वेळप्रसंगी झाडांवरून फांद्यांवरुन उड्या मारत मारत मी आमच्या गाडीच्या पुढेही जातो. हे सगळे करूनही माझे केस जराही वाकडे होत नाहीत. किंवा माझा इनशर्ट सुद्धा बाहेर येत नाही. मी हिरो असल्याने अमानवीय शक्ती आहे. पण काही झाले तरी मी अखेर मित्रासोबत गाडीतच येऊन बसतो. कारण माझ्यापेक्षा जास्त शक्ती....... आमच्या दिग्दर्शकाला आहे
https://youtu.be/yHSDH4wBsIM?t=6074
https://www.facebook.com
https://www.facebook.com/watch?v=593208239637908