अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक

Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00

तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?

उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "

या आधिचे सीन या दुव्यावर वाचा

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एका अ तर्क्य सीनचा शोध लागलाय - अनोखा अंदाज सिनेमामधल्या. >>> धमाल सीन आहे Lol

फिनिश लाइन आपल्याला कळावी म्हणून फिनिश शब्द आपल्या बाजूने लिहीलेला आहे. रेसर्स लोकांना कळो वा ना कळो. इतक्या वार्‍यातून, खाली वाकून, नंतर खाली पडूनही मको चा मेक अप जसाच्या तसा आहे. त्यांनी जाहिरातीकरता हा सीन वापरला पाहिजे. जेम्स बॉण्डच्या शर्टावर सुद्धा फायटिंग नंतर यापेक्षा जास्त सुरकुत्या येत असतील. नंतर तो हीरो म्हणतो "उसके चेहरे की लाली वापस आयेगी". तेथे तिच्या चेहर्‍यावर क्लोज अप आहे. मला तरी कोठे लालीची चणचण दिसली नाही.

मुळात रक्त द्यायला हवे हे कोणी ठरवले? ते ही तिच्या जखम झालेल्या हातातूनच दिले. जिनकी जान एक हो उनको सेप्टिक वेप्टिक नही होता. मला वाटले तो प्रेमी/जान ई डॉयलॉग मारायच्या ऐवजी सांगेल निरूपा रॉय तर वाचली होती. मग ही पण वाचेल.

नंतरच्या सीन मधे "आपल्याला स्क्रीनवर जितके दिसते, तितकेच त्यातील पात्रांनाही प्रत्यक्षात दिसते" या नियमाचा (इथे नियम-१ बघा) प्रत्यय येतो. बाकड्यावर बसलेल्या त्या दुसर्‍या पंटरवर क्लोज अप असल्याने बाजूने आलेला हीरो त्याला दिसत नाही. मागची मुलगी सावलीत पुस्तक वाचताना गॉगल लावून वाचते. पण नंतर ओपन मधे फायटिंग बघताना गॉगल डोक्यावर लावते. सनग्लासेस असतात तसे सावलीग्लासेस असावेत.

सगळेच ९०ज मधल्या प्रिन्टेड शर्ट्समधे. गब्बर म्हंटला असता कौन हीरो है, कोन नहीं, हमको नही पता! हमको कुछ नही पता!!

पाहिला अ अं चा सीन. धमाल आहे.

मको च्या चेहर्‍यावरचे भाव आणि करूण पार्श्वसंगीत, आ आ आ आ आकारी याने सकाळी सकाळी पोट धरून हसवलं.
हिरो हिरविनीला रक्त देतो म्हणजे त्यांच्यात रक्ताचं नातं (आधीपासून नसेल तर) निर्माण झालं. इथे "तुम मुझे खून दो, मै तुम्हे राखी दूंगी" हे गाणे वाजायला हरकत नव्हती.

आता इथून पुढे त्यांनी रक्षाबंधन सण साजरा केला असणार. हाच तो अनोखा अंदाज.

या वरून काय बोध घ्याल मुलामुलींनो?

१. दुचाकीचे ऍक्सल बाहेर निघत असल्यास वाकुन हाताने धरण्या पेक्षा पायाने पायताणाच्या हिलने दाबून धरावे.
२. इथे योगायोगाने रक्तगट अनुकुल निघाला म्हणुन बरे. आपण मात्र बॉयफ्रेंड/गर्लफ्रेंड निवडताना रक्तगट तपासून एकमेकांना आपले रक्त चालेल असा निवडावा. एरवी कितीही सेन वाटले तरी कुणाच्या डोक्यात प्यार की ताकतची काय काय मिथके भरली असतील सांगता येत नाही. उगाच रिस्क कशाला?

गफ्रे अशी निवडा जी रेस संपेपर्यंत मध्येच बेशुद्ध पडणार नाही.
>>>>>>
मुळीच नको, व्हीलचा ॲक्सल हाताने किंवा इतर कशानेही सांभाळणाऱ्या सुंदर स्त्रियाच पुढे जाऊन कैकेयी बनतात. तत्क्षणी ब्रेकअप करा. पडलात तरी बेहत्तर…..

MaMan Lol

तत्क्षणी ब्रेकअप करा. पडलात तरी बेहत्तर….. >>> माझेमन Lol

तो हीरो कोणाचातरी कोण असावा. सध्याच्या भाषेत नेपो बेबी. अशा हीरोज ना एरव्ही लीड रोल, लाँच मूव्ही वगैरे मिळत नाही. मोटरसायकलवरून एण्ट्री, लगेच फायटिंग, त्याची तारीफ असलेले संवाद्/सीन्स ई.

त्याची एण्ट्रीवाला सीन फारच विनोदी आहे. कॉलेज च्या निवडणुकीकरता त्याच्या प्रतिस्पर्ध्याचे पोस्टर्स याचे लोक फाडत असतात - नोट करा - व्हिलनचे लोक याचे पोस्टर्स फाडत नाहीत - हीरोचे लोक व्हिलनचे पोस्टर्स फाडत असतात. हीरो च्या एण्ट्रीचा बेसिक रूल म्हणजे अन्याय इतरांनी करताना दाखवायला हवा. इथे हाच करतोय.

तेथे एकजण येउन यांना म्हणतो तुम्ही तुमचे पोस्टर दुसर्‍या भिंतीवर लावा (तो एकजण मला आधी अमृता सिंग वाटला). मग हे भांडतात. मग तो म्हणतो कॉलेज याच्या बापाचे आहे काय, आणि तेव्हा हा कोठूनतरी मोटरसायकल घेउन येतो आणि फायटिंग करताना म्हणतो हो माझ्या बापाचे आहे. म्हणजे त्या दूरच्या अंतरावरून त्याने तो प्रश्नही ऐकलेला असतो.

म्हणजे त्या दूरच्या अंतरावरून त्याने तो प्रश्नही ऐकलेला असतो. >>> Lol

हाच सिनेमा साऊथचा असता तर त्याने उत्तर दिल्यावर व्हिलनने विचारलेच असते कि "तुम्हे सुनाई दिया क्या ?"
यावर हिरोने खलनायकी स्माईल केले असते मग रीळ उलट्या दिशेने गुंडाळल्यासारखी दृश्ये उलटी पळाली असती. मग व्हिलन यायच्या आधी हिरोने कसे मायक्रोफोन, कॅमेरे लावलेले असतात आणि तो कसा लपून बघत असतो इत्यादी दाखवणारा प्लॅशबॅक आला असता.

सगळेच ९०ज मधल्या प्रिन्टेड शर्ट्समधे. गब्बर म्हंटला असता कौन हीरो है, कोन नहीं, हमको नही पता! हमको कुछ नही पता!!

Happy

माझेमन ! Happy
९०ज चे अनेक रद्दी सिनेमे मिरजेच्या माधव/अमर/देवल टॉकीज मध्ये पाहिले आहेत. हा सुटला किंवा वयोमानाप्रमाणे स्मरणशक्ती कमी झाली असावी!

अंजली _१२,मोह टाळता आला नाही बरं का. लिंक उघडलीच. अर्रर्र.. मको इतकी खाली झुकून स्क्रू पकडून ठेवते तरी गाडी चा किंवा हिरोचा तोल ढळला नाही हो. आमच्यासारख्या - मागील सीटवरचा जरा हात जरी हलवू पाहत असेल तरी टेंशन घेणाऱ्या दुचाकीचालकांसाठी- हे भारीच अचंबित करणारे.
आणि एक नोंद घेतली की हॉस्पिटलमध्ये सभोवतालच्या डोळे टिपणाऱ्या मायावतींमध्ये एक चेहरा ओळखीचा वाटला. बहुतेक राजश्री चा आवडता चेहरा आहे. मैंप्याकिया आणि हम.. कौन मध्ये पाहिल्यासारखा वाटला.

सभोवतालच्या डोळे टिपणाऱ्या मायावतींमध्ये एक चेहरा ओळखीचा वाटला >>> मलाही

हे भारीच अचंबित करणारे >>> बाईकवरून रेसला जाताना केस मोकळे आणि एरोडायनॅमिक्सचा अज्जीबात विचार न करता बेसबॉल कॅप घालणे हे आमच्यासारख्या पिलियन रायडर्सना तेवढेच अचंबित करणारे होते. ते रक्त भरायला जेवढा वेळ लागला नसता त्यापेक्षा जास्त वेळ केसातला गुंता सोडवायला लागला असता.

इतक्या वार्‍यातून, खाली वाकून, नंतर खाली पडूनही मको चा मेक अप जसाच्या तसा आहे>>>>>>>>> आणि टोपी पण Lol

म को ला शुद्ध आल्यावर, सगळ्यांचे डोळे पुसून झाल्यावर ती पिवळा टॉपवाली रक्ताची पिशवी घेऊन बाहेर चालली जाते. जाऊदे आता हे वाया जाणार. देते ओतून बेसीनमधे म्हटली असेल असं इमॅजिन केलं.

दूरच्या अंतरावरून त्याने तो प्रश्नही ऐकलेला असतो. >>>हे बर्‍याच बॉलिवूड सीन मधे होते.. त्यांना एक दिव्य शक्ती प्राप्त असते बहुतेक Lol

मैंप्याकिया आणि हम.. कौन मध्ये पाहिल्यासारखा वाटला>>> +++१११ र....डायला कोरस भारी जमवलाय

र आ.. राखी, रक्ताचं नातं, वाऱ्याला शांपू :हहपुवा:

व्हीलचा ॲक्सल हाताने किंवा इतर कशानेही सांभाळणाऱ्या सुंदर स्त्रियाच पुढे जाऊन कैकेयी बनतात. तत्क्षणी ब्रेकअप करा. पडलात तरी बेहत्तर…..
>>>>> Lol कैकयीसारख्या बुद्धिमान स्त्रियांना फक्त सुंदरच समजणारे पडलेलेचे बरे.‌ 'एक चतुर नार' गाण्याला 'चीट शीट' समजा. त्या गाण्यातील अर्धेअधिक शब्द बोबडी वळल्यासारखेच आहेत.

बाकीचे प्रतिसाद सावकाश वाचेन.‌ इथे आवडते गाणे द्यायची संधी मिळाली तेवढी लग्गेच घेतली. Lol

ते रक्त भरायला जेवढा वेळ लागला नसता त्यापेक्षा जास्त वेळ केसातला गुंता सोडवायला लागला असता. >>>
वाऱ्याला शांपू लावलेला असतो, त्यामुळे गुंता होत नाही. >>> Lol

मलाही बरेच एक्स्ट्रॉज राजश्रीवाले वाटले.

सगळ्यांचे डोळे पुसून झाल्यावर ती पिवळा टॉपवाली रक्ताची पिशवी घेऊन बाहेर चालली जाते. जाऊदे आता हे वाया जाणार >>> हो Happy

ही रेस म्हणे जिंकण्याकरता नसते. मग कशाला इतका उद्योग केला? बॅकग्राउण्ड म्युझिक मजेदार आहे. सगळे सरळ रस्त्यावर जोरात बाईक्स हाणत पुढे पुढे जात असताना कचाकचा ब्रेकचे आवाज मागे येत असतात.

हिरोचा तोल ढळला नाही हो >>> हे शब्दशः अर्थाने खरे आहे पण इतर साहित्यिक अर्थाने नसावे. कारण पुढे एका सीन मधे मकोला चक्कर येते. ती माँ बननेवाली असते.

व्हीलचा ॲक्सल हाताने किंवा इतर कशानेही सांभाळणाऱ्या सुंदर स्त्रियाच पुढे जाऊन कैकेयी बनतात. तत्क्षणी ब्रेकअप करा. पडलात तरी बेहत्तर….. >>> Lol वरती आधी वाचले होते पण विसरलो.

साहित्यिक अर्थ >> Lol
मकोला चक्कर येते. ती माँ बननेवाली असते. >> रेसमधे भाग घेतल्याने ?

चमत्कारी फोटो वाला आख्खा सिनेमाच अ आणि अ आहे. सुरूवातीचा सीन जंजीर मधे ढापला आहे. फक्त तो १२ वर्षे आधी रिलीज केल्याने संशय आला नाही.
https://www.youtube.com/watch?v=wOGODozNfRY

मकोला चक्कर येते. ती माँ बननेवाली असते. >> रेसमधे भाग घेतल्याने ? >>> खून ट्रान्स्फर केल्याने असेल Proud

चमत्कारी फोटो >>> Lol Lol

ती माँ बननेवाली असते. >>> रेसमधे भाग घेतल्याने ? >>> खून ट्रान्स्फर केल्याने असेल >>>
चहाटळ कुठले..'प्यार और विश्वास की ताकद' आहे ती.

Pages