एका पेक्षा एक - अप्सरा पर्व

Submitted by निंबुडा on 31 December, 2010 - 01:00

झी मराठी वर एका पेक्षा एक चे "अप्सरा आली" सेलेब्रिटी चे पर्व सुरु झाले आहे. बर्‍याचशा डान्सर्स नृत्यकला शिकलेल्या वाटतात. त्यामुळे कार्यक्रम रंगतदार होणार यात शंकाच नाही. या पर्वावर चर्चा इथे करु या. Happy

या पर्वातल्या ९ सहभागी:
१) सुरेखा पुणेकर (प्रसिद्ध लावणी नृत्यांगना)
२) उर्मिला कानिटकर (असंभव ची शुभ्रा)
३) गिरिजा ओक (लज्जा ची मनु)
४) आरती सोळंकी (फू बाई फू फेम)
५) स्मिता तांबे (अनुबंध ची किटी)
६) नेहा पेंडसे (भाग्यलक्ष्मी ची काशी)
७) मृण्मयी देशपांडे (कुंकू ची जानकी)
८) नेहा जोशी (अवघाची हा संसार मध्ये प्रसाद ओक ची बहिण म्हणून काम केले होते हिने)
९) सोनाली खरे (चेकमेट मध्ये अंकुश चौधरी ची हीरॉईन होती.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिल्या आठवड्यातल्या दोन्ही एपिसोडमधली नृत्य सादर झालेली गाणी:

१) सुरेखा पुणेकर - या रावजी तुम्ही बसा भावजी (लावणी)
२) उर्मिला कानिटकर - गोजिरी सिनेमाचे टायटल साँग होते का??
३) गिरिजा ओक - येऊ कशी प्रिया (कॅब्रे फॉर्म मध्ये)
४) आरती सोळंकी - तुझा फडफड उडतो घागरा (हे कोणते गाणे आहे?? सिनेमातले आहे का??)
५) स्मिता तांबे - विंचू (आयटम साँग)
६) नेहा पेंडसे - शीला की जवानी (आयटम साँग)
७) मृण्मयी देशपांडे - अगं बाई अरेच्चा मधली "दुर्गे दुर्घट भारी..." आरती
८) नेहा जोशी - ना मानोंगे तो दूंगी तोहे गाली रे
९) सोनाली खरे - हमको आजकल है इंतजार....

एक करेक्शन तो मयुर वैद्य नाही रे बाबानो ती मयुर वैद्य.
बाकी महाग्रु फार फार......... पकवतो हे एक्दम झकास.
मराठी नट आणि नट्या किती लवकर बेढब होतात हे एकदा हिंदी सिरियल्स पाहल्यावर कळतेच.
शिवाय ग्रेस म्हणजे काय रे भाउ.....? हा एक प्रश्नच आहे. असो तरी हि मराठि असे आमुची मायबोली.
या वर्तुळातून बाहेर पड्णार ?

ती मयुर वैद्य >>> Rofl

दिपाली विचारे नामक एक कोरीओग्राफर पण आहे. आवाज तर असला भसाडा आहे कि उषा उथुपला पन लाजवेल. Proud

फुलवा खामकर कालच्या एपिसोड मध्ये म्हणाली की तिची सुरुवात याच रंगमंचावरून झालेली आहे. Uhoh

ती आधी कधी participant म्हणून आली होती का?? Uhoh

मागे ती मयुरा वैद्य कुठल्याशा एका झी मराठी च्या कार्यक्रमात बागडली होती..केवढी अजस्र आहे ती.. धन्यवाद आहे एकदम.. तो बोबड्या श्रोत्री आणि महागुरू ह्यांच्यात खरी जुगलबंदी असणार आहे; कोण जास्त पकाउ? अशी..

मयूर वैद्यसाठी ह कार्यक्रम पहावासा वाटत नाही. त्याचे ते पचपच बोलणे, बघण्याची स्टाईल ई फार बेकार आहे. एकवेळ पुष्कर परवडला पण मयूर नको.

रच्याकने पूर्ण भागात आता सुरेखा पुणेकर फक्त लावणीच करणार का?>>>>नीलु, माझाही तोच प्रश्न Proud

ती मयुर वैद्य >>> Rofl

उर्मिला कानिटकर - गोजिरी सिनेमाचे टायटल साँग होते का??>>>>>नाही ते "ऑक्सीजन" या मराठी चित्रपटातील गाणे. संगीत – अजय-अतुल.
"अल्हड अवखळ वार्‍यावरती फिरते मी दिनरात, लाजरी मी गोजिरी सोनपरी......" हे गोजिरी चित्रपटाचे शिर्षक गीत (मधुरा वेलणकर आणि सुनिल बर्वे अभिनित).

तो बोबड्या श्रोत्री आणि महागुरू ह्यांच्यात खरी जुगलबंदी असणार आहे; कोण जास्त पकाउ? अशी..>>>>>>अगदी अगदी Happy

सुनिल प्रचंड मोदक. ति मयुर. हा हा हा.
मला आणि माझ्या नवर्याला "ति" माणसे लगेच कळुन येतात. पहिल्या भागात तो जेंव्हा आला, तेंव्हाच आम्हि म्हटले कि आता येणार मजा.
र्.च्या. क. ने. सुरेखा पुणेकर कुठेतरी परिक्षक होती. आता स्पर्धक? ती एक्दम मिसमॉच आहे

>>मयूर वैद्यसाठी ह कार्यक्रम पहावासा वाटत नाही.

मी हा प्रोग्राम पहात नाही पण हे मयुर वैद्य नामक प्रकरण काय आहे ते पहायला मात्र एकदा पहाणार आहे Happy

>>ते शीला केजवानी असं आहे ना? सगळे सरसकट शीला की जवानी काय म्हणतात?

ते "शीला की जवानी" असंच आहे.

जरा प्रत्येकीचे फोटू-गिटू टाका की बायांनो. बाकी चर्चा इतकी चमचमीत चाल्लीये की, माझ्यासारखी मी पण बघावं म्हणतेय......

>>ते शीला केजवानी असं आहे ना? सगळे सरसकट शीला की जवानी काय म्हणतात?

ते "शीला की जवानी" असंच आहे>> आश्विनीचा पीजे फुकट गेला Proud
>>नाही नाही ते शीला केजवानी असं आहे>> खरच की काय?

http://www.lyricsmasti.com/song/7456/get_lyrics_of_Sheila-Ki-Jawani.html - जिज्ञासूंनी खात्री करून घ्यावी. Happy

ह्या एका 'केजवानी' मुळे मला हितेन तेजवानी, जयंत कृपलानी, रवी बासवानी, असरानी, हिरानंदानी असे अनेक सिंधी आठवून गेले. Proud विषयांतराबद्द्ल क्षमस्व. मला आज काहीही काम करायचा कंटाळा आलाय आणि ५:४५ च्या आधी निघता येणार नाहिये. त्यामुळे टीपी चाललाय. तुमचं चालू द्यात.

ते शीलाकी जवानी असंच आहे. कतरिना शीलाकी जवानी नामक बी ग्रेड सिनेमात आयटम साँग करत असते, असं काहीसं आहे. Happy

सोनाली खरे - माधुरीच्या "हमको आजकल है इंतझार...." या गाण्याची इतकी वाट आजवर कुणी लावली नसेल. अंगच लवत नव्हतं तिचं.
>>>>>>>>>>>< खरच्,किती दणादणा नाचत होती,आणि दोनच आठवड्यापुर्वी माधुरीचा झलक मध्ये हा डान्स बघितला होता,त्यामुळे अजुनच ब्येक्कार वाटला.
ती नेहा(भाग्यलक्ष्मी फेम) पण किती चीप नाचत होती. त्यापेक्षा कतरीना बरी नाचलीय. Lol
सुरेखा पुणेकर लावणी छानच करतात पण बाकिचे प्रकार करु शकतील काय?
बाकि,सगळ्यांचे कॉश्चुम्स आणि दागिने कोण देतं ? किती बेकार आहेत ते.

शीला की जवानी असंच आहे. झलक मधे तीमाखा च्या प्रमोशनच्या वेळी मेरी गर्लफ्रेंड का नाम शीला केजवानी है असा पीजे मारला होता अक्षय कुमार ने.

>>स्मिता तांबे (अनुबंध ची किटी)

प्रोमोजमध्ये हिला पाहून ही अंतरा माळी आहे असं आईला वाटत होतं. पण नीट पाहिल्यावर हिला कुठल्यातरी सिरियलमध्ये पाहिलंय ह्यावर आमचं एकमत झालं. मग "अग कोणाच्या तरी बिनधास्त मैत्रिणीचं काम केलं होतं हिने" ह्यापासून सुरुवात होऊन, मग किटी, आशू ह्या क्रमाने शेवटी "अनुबंध" पर्यंत पोचलो. Happy

माझ्या ऑफिसमधे सगळे शीला केजवानी आहे असं म्हणताहेत. काय माहीत नक्की काय आहे ते.<< केश्वे वर्ष अखेरीला तुझी सगळे खेचताहेत हेही कळलं नाहि तुला ? काय गं हे?

Pages