शब्दार्थ

Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11

एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.

या आधिचे संभाषण या दुव्यावर सापडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कदाचित लॅटिन मास मधल्या शब्दांचे मराठीकरण करताना याचे भाषांतर न करता नुसते ट्रान्सलिटरेशन केले असेल कोण्या पाद्र्याने>>> वा:!!! मस्त!!!

अत्रंगी / अतरंगी चा अर्थ ? >> तसे हा शब्द "खुळचट" याला समानार्थी म्हणून वापरला जातो. तरी अतरंगी म्हणजे बहुदा विविध रंग गुण असणारा असे म्हणू शकतात.
मल्टीटास्किंग करणार्‍यांना सुध्दा काय अतरंगी काम करतोस असे बोलतात.

ऑल क्लिअर हां चुकीचा फूल फॉर्म आहे

OK म्हणजे zero killed अश्या अर्थाने ते दुसऱ्या महायुद्धात casualties मोजण्या सम्बंधी वापरले जाई पुढे त्याचा मूळ अर्थ दूर राहून ऑल क्लिअर अश्या ढोबळ अर्थाने वापरला जावू लागला हां शार्ट फॉर्म

ओके शब्दाची व्युत्पत्ती कोठुन झाली असेल ? >> 'विकी' मध्ये याच्या सुमारे डझनभर व्युत्पत्ती सापडतील !

'निरंक' चा अर्थ कुणी नीट समजावून सांगेल का ? 'निर' म्हणजे नकार हे कळले.

आजची एक बातमी अशी आहे : धडक मोहिमांचा अहवाल निरंक.

ऑल क्लिअर हां चुकीचा फूल फॉर्म आहे

OK म्हणजे zero killed अश्या अर्थाने ते दुसऱ्या महायुद्धात casualties मोजण्या सम्बंधी वापरले जाई पुढे त्याचा मूळ अर्थ दूर राहून ऑल क्लिअर अश्या ढोबळ अर्थाने वापरला जावू
<<
हे ज्ञान ऑलरेडी असताना इथे प्रश्न विचारण्याचे प्रयोजन?

blasphemy: म्हणजे देवाच्या, देवाच्या शब्दाच्या वा आज्ञेच्या विरोधात बोलणारा, वागणारा. धर्मद्वेष्टा शब्द बरोबर नाही वाटत त्यासाठी.

ब्लास्फेमी ही कन्सेप्टच परकी आहे की काय आपल्याला? सगळी ईश्वरवादी, निरीश्वरवादी इ. तत्वद्न्यानं आपण एकाच प्रवाहाचा भाग मानली म्हणून?

Heresy - पाखंडमत
मोल्सवर्थने दिलेले अर्थ - ढेंगमत, ढोंगमत, ठेंगमत

जालावरचे इंग्लिश- मराठी शब्दकोश तितकेसे समाधानकारक नसतात असे मला बरेचदा जाणवले आहे
.विशेषतः, अर्थाने जवळपास असणाऱ्या परंतु, सूक्ष्म फरक असणाऱ्या दोन इंग्लिश शब्दांचा मराठीत एकच अर्थ दिलेला असतो.
दोन उदाहरणे देतो:
• moral & ethical या दोघांचा अर्थ ‘नैतिक’ असा दिला आहे.
• ludicrous & ridiculous या दोघांचा अर्थ ‘हास्यास्पद’ असा दिला आहे.

माझ्या मते ही जालिय शब्दकोशांची मर्यादा असावी.
इथल्या अभ्यासकांचे काय मत आहे ?

ओके हा शब्द आजच्या तारखेला छापील स्वरूपात पहिल्यांदा वापरला गेला असं ग्यान ऑल इंडिया रेडियोकडून मिळालं. साल १८३९

काही ठीकाणी एखाद्या तरुण स्त्रीचा उल्लेख करताना "पुरंध्री " असा करतात,तर पुरंध्री शब्दाचा अर्थ व व्युत्पत्ती काय आहे?

बर्याचदा आपण व्रत वैकल्ये असा शब्द वापरतो. तर यात 'वैकल्य' म्हणजे काय?
आताच एक ज्ञानोबांची ओवी वाचनात आली.
"देह वैकल्याचा वारा । झणी लागेल या सुकुमारा"

'fiction book' साठी 'नवलिका ' हा शब्द वाचण्यात आला. याआधी 'काल्पनिका ' ऐकले होते. काय फरक वाटतो दोघांत ?

देव्हाऱ्यातील गंधफुलांतच झाकून ठेवा ती पोथी
अशी बुद्धीची भूक लागता कशी पुरेल अम्हा बोथी
रविबिंबाच्या घासासंगे हवी, कुणाला शिळी कढी? ॥२॥
―कवीवर्य वसंत बापट (ये उदयाला नवी पिढी)

Pages