शब्दार्थ

Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11

एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.

या आधिचे संभाषण या दुव्यावर सापडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

समजा तुम्हाला बोलाची कढी आणि बोलाचा भात असे पूर्ण जेवण न घेता केवळ अल्पोपाहार करायचाय तर तुम्ही 'थंडा फराळ' करता!
Wink

Thanks. Sasarachya public ni mhane kadhi ha shabdach aikla nahiye. Sakali Sakali pakvat hote aaj kay khayla mi sangitala thanda pharal tar tyanna vatla ki divasbhar chau-myau khaun rahayche. Mhane hindi shabd ahe. Mala upashi rahne arthach mahit ahe. So confirm karayche hote.

BTW, usal -poli keliye, konala upashi thevalele nahiye Happy

Lakkha?

Swarth janu bhintivaracha aarasa bilori

Bilori chandana

Ase shabdprayog aikalet

र्‍हाईन स्टोन ह्या उपरत्नाकरता बिल्लोर असा शब्द आहे. कदाचित बिल्लोर हे उत्तरेतील एक शहर आहे तिथे ते बनत असतील. हिर्‍यासारखे चमकदार पण हिर्‍यापेक्षा स्वस्त असे हे स्फटिक असतात.

चमकदार वर्ख लावलेल्या कांचेच्या बांगड्या. हा 'वर्ख' कदाचित शें. म्हणाले तसे बारीक खडे वा त्यांचा चुरा असू शकेल.
'बिलवर' बहुधा त्याचाच अपभ्रंश.
हळुहळू 'चमकदार म्हणजे बिलोरी' असा अर्थ रूढ झाला असावा.
(आठवा : स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी...')

बिलोर = उंची काच, स्फटिक
बिलोरी - काचेचे

वा.गो. आपटे - मराठी शब्दरत्नाकर

बिलौर bilaur हा उर्दू/पर्शियन शब्द आहे .स्फटिकापासून बनवलेली कांच

गुगल ट्रान्स्लेट मधे इन्ग्रजी ते हिंदी असा पर्याय निवडला आणि इंग्रजीत र्‍हाईनस्टोन टाईप केले तर हिंदी अनुवाद बिलोरी असा येतो.
एका ऑनलाईन फारसी शब्दकोषात बिलोर असा फारसी शब्द घातला तर त्याचा इंग्रजी अनुवाद

crystal, cut - glass, flint - glass

असा आला.

गुगल ट्रान्स्लेट मधे इन्ग्रजी ते हिंदी असा पर्याय निवडला आणि इंग्रजीत र्‍हाईनस्टोन टाईप केले तर हिंदी अनुवाद बिलोरी असा येतो.
<<

जौद्याहो शेंडेअप्पा! त्या गूगल ट्रान्स्लेशन मधे काय पन टाईप केलं का त्याचा अनुवाद लैच कैच्याकै येतो Lol

नक्की काय अर्थ बिलोरीचा?? कन्फ्युज व्हायला झालं.

३ अक्षरी शब्द हवा आहे.>> शब्दकोडं सोडवताय की काॅय?? Happy

Pages