शब्दार्थ

Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11

एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.

या आधिचे संभाषण या दुव्यावर सापडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बोथी म्हणजे अगदी लहान मुलांना दूध पाजण्यासाठी केलेला मऊ वस्त्राचा बोळा. दूध पा़जण्याच्या बाटलीच्या तोंडाशी जे रबरी बूच किंवा बोंडी असते त्यालाही बोथी म्हणतात. जुन्या मराठीत (तुळपुळे -फेल्डहाउस शब्दकोश) मध्ये बुंथी/बोथीचा अर्थ एकच दिला आहे. तो म्हणजे तलम आच्छादन अथवा नुसतेच आच्छादन. 'मनाचिये बुंथी गुफियेला शेला, बाप रखुमादेवीवरे विठ्ठले अर्पिला...मोगरा फुलला.'

@ राहुल,
अशी बुद्धीची भूक लागता कशी पुरेल अम्हा बोथी >>>>>>>

आधी अर्थ कळला नव्हता शब्दाचा. पण कडवे आणि एकूण कवितेचा अर्थ पाहिला तर,
बोथी म्हणजे शिदोरी, पुरचुंडी असावे किंवा आपण जेवणे झाल्यावर उरलेले अन्न काढून ठेवतो ते असावे.
या दोन्ही गोष्टी अपुर्‍या / जेमतेम असतात प्रमाणात (quantity); आपल्याला हव्या तितक्या नसतात किंवा
त्यातले पदार्थ आपल्याला हवे ते -- हवे तितके असे नसतात.
त्यावरून, ---- आमच्या बुद्धीची भूक अफाट आहे आणि आमची पसंतही जगावेगळी आहे; कुणी तरी देऊ केलेले काहीही खायची आमची वृत्ती नाही; अशा अर्थाने, परंपरांनी आमच्यासाठी ठेवलेली बोथी आम्हाला नको ------ असे म्हणायचे असावे बहुतेक कवींना.

हे सर्व अंदाजाने अर्थ लावून लिहिले आहे. किती बरोबर माहीत नाही. कुणीतरी जाणकार लिहितीलच वेळ मिळाला की.

हिरा जी आणि कारवीताई मनापासून धन्यवाद.. Happy
>> आमच्या बुद्धीची भूक अफाट आहे आणि आमची पसंतही जगावेगळी आहे; कुणी तरी देऊ केलेले काहीही खायची आमची वृत्ती नाही; अशा अर्थाने, परंपरांनी आमच्यासाठी ठेवलेली बोथी आम्हाला नको <<
हा अर्थ ही खुपच जुळतो, जवळ जातो आहे.
Happy

हीरांनी लिहिले बघा, तुम्ही ते जास्त अधिकृत धरा. ते / त्या किंवा चिनूक्स लिहीतात इथे उत्तरे जास्त प्रमाणात आणि संदर्भ देऊन / पाहून लिहीतात. तो अर्थही जुळतोय कवितेला.
माझे अंदाजाने अर्थ लावून लिहिलेले होते.
लहान / अशक्त मुलांना दूध पाजण्यासाठी बोळा वापरायचे. बोळ्याने दूध पिणे असा वाक्प्रचार पण आहे.
बोथडी, बोंडले असेही शब्द आहेत, पण त्या वेगळ्या वस्तू.

नवरी मुलगी सासरहून पहिल्यांदा येते तेव्हा काही पदार्थ तयार करून आणते आणि ते भावकीत वाटायचा प्रघात होता. त्याला बुथी म्हणतात. कदाचित बुत्ती. हे ते बोथी असेल का? अर्थ तर जुळतोय

प्रसून = फूल, पुष्प. ( प्रसून जोशींचे पेपरात नाव वाचल्याने हा अर्थ गुगलून काढला !)

लहान मुलांना औषध / दूध पाजायला जे बोंडले वापरतात त्या शब्दाचा उगमदेखील या बोथीपासूनच आहे का?

टवणे सर, बोंड किंवा बोंडी म्हणजे अग्र किंवा टोक असलेला/टोकेरी भाग. स्तनाग्रांना बोंड/ बोंडी म्हणतात. बोथी, बोथडे, बोंडी, बोंडले हे सर्व शब्द परस्परसंबंधित आहेत .
बुंथ, बुंथी म्हणजे मुलगी सासरी निघताना बरोबर दिलेले सामान. कदाचित हे सामान/टोपली/हारा हा बुंथीने म्हणजे तलम वस्त्राने आच्छादलेला असतो म्हणूनही हा अर्थ आला असावा .

टेम्भा... आणि टेम्भा मिरवणे म्हणजे नक्की काय? (टेम्भा या नावाने एक मूर्ती बघितली म्हणून प्रश्न पडला...)

टेंभा म्हणजे मशाल.
वरातीच्या वगैरे पुढे (उजेड दाखवण्यासाठी) जे मशाली घेऊन चालतात ते टेंभेकरी.
(आपण उजेड दाखवतो (पाडतो? Proud ) आहोत म्हणून लोक चालू शकताहेत असं समजणारा तो टेंभा मिरवणारा. Proud )

आपण उजेड दाखवतो (पाडतो? ) आहोत म्हणून लोक चालू शकताहेत असं समजणारा तो टेंभा मिरवणारा. >>>
म्हणजे 'टेंभा मिरवणे' हे 'फुशारकी मारणे' च्याही जवळ जाईल..किंवा या अर्थानेही वापरता येईल?.. Happy

>>> म्हणजे 'टेंभा मिरवणे' हे 'फुशारकी मारणे' च्याही जवळ जाईल..किंवा या अर्थानेही वापरता येईल?.
होय, त्याच भावार्थाने वापरतात.

@ परदेसाई
कुणीतरी या पानावर दाखवलेल्या मूर्तीबद्दल सांगितले. तो टेम्भा वेगळा की ती माहिती चूक? >>>>>>>>>>
नेटवर टेंभाचा लक्ष्यार्थ (connotation, implication या अर्थी) आधार, आश्रय असा दिला आहे. दाते-कर्वे महाराष्ट्र शब्दकोशाचा संदर्भ दिला आहे.
तुमच्या चित्रात तो राक्षसा-सारखा, बसलेला पुतळा आहे तो टेंभा असावा. त्याच्या मुकुटात ( दोन शिंगांच्या मध्ये) खोबणी दिसते आहे बघा. त्यात ती नाग-गरूड पंचारती बसवता येते बहुतेक, अशीच किंवा फिरकीचे आटे असतील त्या खोबणीला. त्या गरूडाच्या पायाखाली बदामाकृती आकार आहे कलाकुसर केलेला, त्याच्या तळाला मुकुटाच्या खोबणीत नीट बसेल असे स्ट्रक्चर असणार. हवी तर जमिनीवर ठेवा आरती, हवी तर थोडी उंच ठेवा पुतळ्याच्या आधाराने.
त्या पंचारती दिव्याचा -- आधार -- पुतळा -- याअर्थी टेंभा.
हे मी अंदाजपंचे सांगितले आहे. टेंभाच्या लक्ष्यार्थावरून.

बोथी म्हणजे लहान मुलांच्या तोंडात रडू नये म्हणून देतात ती चोखणी असाही एक अर्थ आहे. म्हणजे पॅसिफायर. थोडक्यात, बुद्धीची भूक लागलेली असताना तो पोथीरूपी पॅसिफायर कसा पुरेल?

पाचावर धारण बसणे याचा अर्थ घाबरणे असा का होतो?>>>> काहीतरी महागाई शी /पैशांशी related आहे पूर्वीच्या काळी धान्य महाग होत होत १ आण्याला /(का रुपयाला लक्षात नाही ) ५ मण धान्य मिळायला लागलं जे महागाई नसताना जास्त मिळायचं ..मग लोकांना भीती वाटायला लागायची आता आपण खायचं काय वगैरे (बहुतेक हे मी मिपा वर केव्हातरी वाचले होते किंवा असेच आंतरजालावर कुठेतरी.. link सापडली तर टाकेन )

गणेशोत्सव खेळ शब्दांचा मधे '
पूर्ण गोलाकार इंद्रधनुष्य याला इन्द्रव्रज म्हटलय
(मी इतके दिवस इन्द्रवज्र म्हणत होते)
व्रज चा अर्थ काय? आणि इन्द्रव्रज का म्हटलं गेलंय ?

'मनाचिये बुंथी गुफियेला शेला, बाप रखुमादेवीवरे विठ्ठले अर्पिला...मोगरा फुलला.'>>
हे मी इतके दिवस ' मनाचिये गुंती' असं समजत ( ऐकत) होते

पाचावर धारण बसणे याचा अर्थ घाबरणे असा का होतो?
पाचावर धारण म्हणजे आपली संवेदनांची जी पंचेंद्रिये आहेत (पाच) ती भीतीने फ्रीझ होऊन जाणे . काम करीनाशी होणे.(कान नाक डोळे, नाक जीभ,त्वचा)
गीतेतही अर्जुनाने म्हटले आहे सीदन्ति मम गात्राणि, मुखं च परिशुष्यति म्हणजे माझी गात्रे गळाठली आहेत आणि तोंडाला कोरड पडली आहे इत्यादि

हळवा/हळवे शब्दाचा अर्थ काय?
मवाळ हळवे सूर
हळव्या स्वयंवराला साक्षी वसंत राजा
स्वभावाने हळवा
अश्या अनेक प्रकारे हा शब्द वापरलेला वाचला आहे.

Pages