शब्दार्थ

Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11

एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.

या आधिचे संभाषण या दुव्यावर सापडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हं. मला सुरक्षित सुचत होतं. सुखरूप त्यापेक्षा जवळ आहे. सुखरूपतेचा.
किंवा उपमा वापरून उबदार सावली असलं काहीतरी। .

परीघाबाहेर बर्‍याचदा वापरला जातो. त्याचा अर्थ चाकोरीबाह्य, रुळलेली/मळलेली पायवाट सोडून असा होतो.

त्यात रुढ संकेत झुगारून देण्यारी बंडखोर छटा आहे. out of comfort zone मध्ये बंडखोरी अभिप्रेत नाही .

out of comfort zone करता मराठी प्रतिशब्द कोणता
Submitted by हर्पेन on 14 February, 2019 - 12:24 >>>>> उबदार विश्वातून किंवा कोषातून बाहेर पडणे / सरावलेल्या वाटेला निरोप देणे / सर्वस्वी नवा अनुभव घेउन पहाणे -- असे काही तरी?
वाक्याचा संदर्भ असेल त्याप्रमाणे प्रतिशब्द निवडावा लागेल.

वाक्याचा संदर्भ असेल त्याप्रमाणे प्रतिशब्द निवडावा लागेल. >>+१

सर्वस्वी नवा अनुभव घेउन पहाणे मला चालेलसा आहे.
धन्यवाद कारवी.

शब्दातील एकाच अक्षराच्या ऱ्हस्व/दीर्घ फरकाने अर्थ कसा बदलतो बघा:

सलिल - पाणी ( आणि वारा देखील)
सलील - खेळकर ; सोपे

गिलक्याचा कोसा- loofah असे गूगल करुन जी चित्रं दिसतील ती पहा. सुकलेल्या घोसाळ्याचं व्हेनेशन त्या खोप्याच्या विणीसारखं दिसतं खरं

कोकणीमधे समजावून सांगायला कठीण, किचकट नाती सांगताना ' घोसाळ्या कात्तो ' म्हणतात.

व्हेनेशन
<<
हे हरिणाचे मांस नसून व्हेन्स उर्फ नीला/रसवाहिन्यांचे जाळे या अर्थाने आहे हे डोक्यात शिरायला थोडा वेळ लागला Lol

हरिणाचे मास - ते venison - देवनागरीत व्हेनिसन

venation - पानांवरच्या वाहिन्यांचे जाळे.

"कलेच्या व साहित्याच्या क्षेत्रात सौंदर्याला आणि त्याच्या ब्रह्मानंदस्वादसहोदरतेला अंतिम मूल्य मानणारे सुखवस्तू संप्रदाय फोफावू लागले."

हे वाक्य एका मासिकाच्या संपादकीयात आहे. संदर्भावरून अर्थ पोचतोय. ब्रह्मानंदस्वादसहोदरता हा शब्द कुणा इंग्रजी /परभाषिक श ब्दाचे मराठी रूपांतरण असेल का?

ब्रह्मानंदस्वादसहोदरता हा शब्द कुणा इंग्रजी /परभाषिक श ब्दाचे मराठी रूपांतरण असेल का? >>>>>
हिंदी आहे. ब्रह्मानंदाच्या तोडीचा / बरोबरीचा (श्रेय गुगल)
रस सिद्धांत.
काव्यानंद को 'ब्रह्मानंद स्वाद सहोदर' माना गया है। दोनों में अंतर इतना ही है कि - ब्रह्मानंद शाश्वत, नित्य और स्थायी है -- किंतु काव्यानंद क्षणस्थायी और अनित्य ।

संदर्भ -- पान ९ : http://www.tmv.edu.in/pdf/MA%20syllabus/H-103%20Bhartiy%20Yewam%20pashty...

या एमए हिंदीच्या स्टडी नोटस आहेत. ब्रह्मानंद स्वाद सहोदर चे मूळ तिथेच पान १२४-१२५ वर दिलेल्या संदर्भ ग्रंथांमध्ये बघावे लागेल.

मेधा, हो सुकलेल्या घोसाळ्याच्या शिरांची जाळी खरंच सुगरणीच्या घरट्याच्या विणीसारखी वाटते. कोसा म्हणजे वाळलेलं फळ का?

कणीक तिंबणे या म्हणीचा अर्थ 'एखाद्याला अडचणीत टाकण्याचा प्रयत्न करणे.' असा होतो.
तर कणीक तिंबणे म्हणजे 'पोळ्यांसाठी पीठ मळणे.' असाही होतो.

कणिक तिंबताना जसा कणकेचा फिजिकल अब्युज करतहा, हाताने मारतात, कणिक उचलुन हापटतात तसा एखाद्याची कणिक तिंबताना करतात.

Kanik timbane >> लाक्षणिक ( फिगरेटिव्ह) अर्थ - बुकलून काढणे, बदडणे, चोप देणे . शब्दशः ( लिटरल) अर्थ कणीक मळणे.

मळणे आता प्रचलित शब्द असला तरी गेल्या काही वर्षातील असावा. मला लहानपणी पोळ्यांचे पीठ "मळणे" हे घरी ऐकल्याचे लक्षात नाही. मी मळणे या अर्थाने लहानपणीच ऐकला आहे पण तो बाहेर. लिज्जत पापड करता आमच्या आसपास अनेक कुटुंबे पापड लाटायची, त्यांच्याकडून. तेव्हा मला मळणे म्हणजे खराब होणे हा अर्थ माहीत होता - शर्ट मळतो वगैरे- त्यामुळे त्याच्या अशा वापराचे आश्चर्यही वाटल्याचे आठवते.

मग प्रश्न पडतो की आधी मराठीत कोणता शब्द प्रचलित असावा?

पांढरी शुभ्र कणीक तेल पाणी मीठ पडून मळली वरुन कणिक मळणे निघालं. (असा शोध मी एका मिनिटापुर्वी लावलाय)

कणीक मळण्यामधली कणीक तिंबणे ही एक पायरी आहे. तिंबण्यामध्ये पाणी - मीठ - तेल घातलेली कणीक बुकलून / आपटून इ. घेणे अपेक्षित आहे. "पोळ्या चांगल्या व्हायला कणीक नुसती मळून चालणार नाही, चांगली तिंबून घ्यायला हवी." असा सल्ला ऐकलाय.

कणीक तिंबणे हे वाक्प्रचार म्हणून जास्त वापरात आहे. बेदम मार देण्याच्या अर्थाने वापर होतो. कणीक बहुतेक गव्हाच्या पिठाला म्हणतात कारण भिजवून थोडा वेळ ठेवावी लागते. ज्वारी बाजरी चे पिठ पाणी घालून डायरेक्ट मळतात. आमच्या गावाकडे कणीक हा शब्द कुणाला ठाऊक देखील नाही. गव्हाचे पीठ मळने असंच म्हणतात.

मळणे हा शब्द हिंदीतून आला असावा (हात मलते रह गया).. (अमितव प्रमाणे माझाही शोध.. Happy )..
मालवणीतही 'पीठ मळणे' असेच म्हणतात, तिंबत वगैरे नाहीत.

Pages