Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
मला टोणगा चे म्हणणे पटले. शोध
मला टोणगा चे म्हणणे पटले. शोध घेतला आणि शोध लावला, हे सोपे पर्याय वाटताहेत. शोधून काढली/ले पण काही बाबतीत योग्य वाटते.
आपण invention आणि innovation
आपण invention आणि innovation मध्ये गोंधळ करतोय का?
किरण इन्वेंशन म्हणजे पूर्ण
किरण इन्वेंशन म्हणजे पूर्ण नवनिर्मिती तर इनोव्हेशन म्हणजे वर्षाने लिहल्यासारखे नवपरिवर्तन किंवा नवरचना / नवरिती इ म्हणजे असलेल्या गोष्टी नविन पद्धतीने करने.
टोणग्याचा पर्याय नुतनीकरण हा रिनोव्हेट ह्या इंग्रजी शब्दाला मराठी पर्याय वाटतो.
'नुतनीकरण' करताना नवीन पद्धत
'नुतनीकरण' करताना नवीन पद्धत वापरली असेल, अथवा बदल केले असतीलच असं नव्हे. innovate या शब्दात 'पद्धतीत बदल करणे/सुधारणा करणे' हा अर्थ अपेक्षित आहे. त्यामुळे 'नुतनीकरण' हा शब्द योग्य नाही.
नूतनीकरण शब्दही शब्द योग्य
नूतनीकरण शब्दही शब्द योग्य नाही असे मला नन्तर वाटले कारण त्याला रिन्यूअल असा शब्द आहे.
innovation म्हणजे
innovation म्हणजे नावीन्यपूर्ण सुधारणा (ज्यात कल्पकता असते)
invention म्हणजे शोध (ज्यात संशोधन असते)
हे योग्य वाटते का?
अर्थ बरोबर आहेत हो. त्याला
अर्थ बरोबर आहेत हो. त्याला तांत्रिक आणि चपखल प्रतिशब्द पाहिजे आहेत..
धन्यवाद जनहो. पण टोणगा
धन्यवाद जनहो. पण टोणगा म्हणाला तसे चपलख/चपखल तांत्रिक शब्द हवा आहे.
Weightage व Weighted Average
Weightage व Weighted Average या शब्दांना अर्थपूर्ण मराठी शब्द आहेत का?
'गव्हर्नंस' ला मराठी शब्द काय
'गव्हर्नंस' ला मराठी शब्द काय आहे?
गुरुजी..
Weightage तौलानिक/तुलनात्मक वजन
Weighted Average तौलानिक/तुलनात्मक वजनाची सरासरी
चंपक, हे संख्याशास्त्रातले
चंपक, हे संख्याशास्त्रातले शब्द ना. तिथे तसले (म्हणजे किलो वगैरे ) वजन अपेक्षित नाही.
इथे महत्व अश्या अर्थाने वेट हा शब्द येतो. काहितरी वेगळा शब्द असेल.
Weightage तौलानिक/तुलनात्मक
Weightage तौलानिक/तुलनात्मक महत्व/ गुण/ गुणसंख्या/ गुणवत्ता
Weighted Average तौलानिक/तुलनात्मक गुणांची सरासरी
असे होऊ शकेल का?
गव्हर्नंस ला मराठी शब्द काय?
प्रशासन. गूड गव्हर्नन्सला
प्रशासन. गूड गव्हर्नन्सला माधव गोडबोलेनी सुप्रशासन असाच शब्द वापरलाय...
रॉबीन, परट्या म्हणजे काय?
रॉबीन, परट्या म्हणजे काय? 'परट्यांची भोकं' अशी उपमा जीएंनी काही ठिकाणी डोळ्यांकरता वापरलीय.
धन्यावाद! पण मग
धन्यावाद!
पण मग अॅडमिनिस्ट्रेशन ला प्रशासन हा शब्द योग्य आहे का?
अॅडमिनिस्ट्रेशन अॅन्ड गव्हर्नंस मध्ये फरक काय?
उदा. यशदा - विकास प्रशासन प्रबोधिनी. अन गुड गव्हर्नंस म्हणजे पण सु-प्रशासन का?
>>पण मग अॅडमिनिस्ट्रेशन ला
>>पण मग अॅडमिनिस्ट्रेशन ला प्रशासन हा शब्द योग्य आहे का?
अॅडमिनिस्ट्रेशन ला व्यवस्थापन हा शब्द जास्त योग्य वाटतोय आणि गव्हर्नंस ला प्रशासन!
"Common Sense" याचा अर्थपूर्ण
"Common Sense" याचा अर्थपूर्ण मराठी शब्द कोणता?
नाही. व्यवस्थापन म्हणजे
नाही. व्यवस्थापन म्हणजे management.
मला वाटते प्रशासन व संचालन असे शब्द वापरावेत. (संचालन मला फारसा रुचला नाहीये, अजून कोणास चांगला पर्याय सुचल्यास लिहावे)
गोणपाटांना परटं म्हणतात
गोणपाटांना परटं म्हणतात बहुतेक.. पण नक्की माहिती नाही..
'घरकाम' ला योग्य english
'घरकाम' ला योग्य english प्रतिशब्द काय? ( गमतीने आपण homework म्हणू शकतो! )
हाऊसवर्क
हाऊसवर्क
धन्यवाद स्वाती.
धन्यवाद स्वाती.
Mala "Shivakalyan Raja"
Mala "Shivakalyan Raja" madhil eka ooli cha aartha hava aahe .....
"Savadh pane Nrupavar Tuchha kele" .......
Koni madat karu shakel kay ?
तांदळाच्या भुशाला नेमका शब्द
तांदळाच्या भुशाला नेमका शब्द कुणी सुचवेल का? टरफल, कोंडा, साल, तुसा - हे शब्द नकोत. अजून वेगळे. धन्यवाद.
टण्या, गोणपाटाला पटकर म्हणतात
टण्या, गोणपाटाला पटकर म्हणतात ते माहीत होतं. पण परटे हे फक्त जीएंच्याच कथेत वाचलं.
वर innovation आणि invention
वर innovation आणि invention वर चर्चा वाचली.
innovation ला नवोन्मेष हा शब्द कसा वाटतोय? आणि invention ला.. थांबा विचार करून सांगते.
common sense ला अष्टावधान?
common sense ला अष्टावधान?
संघमित्रा, अष्टावधान =
संघमित्रा,
अष्टावधान = Alert
common sense = विवेक . . . . . ( अगदी सद् - सद् नसला तरी विवेक ) ?
"कोंदण" याला समानार्थी शब्द
"कोंदण" याला समानार्थी शब्द कोणता????????
मला एक असे नाव हवे आहे ज्याचा
मला एक असे नाव हवे आहे ज्याचा अर्थ सुन्दर व हेल्दी (स्वस्थ) असा होइल मला माझ्या मैत्रिनिच्या क्लिनिकसाथि नाव हवे आहे
Pages