Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
@ स्वाती ~ फचिन यांचे म्हणणे
@ स्वाती ~ फचिन यांचे म्हणणे बरोबर असल्याची पुष्ठी गजानन यानी दिलेल्या लिंकवरून दिसते. मोल्सवर्थनुसार नेणीव याचा थेट अर्थ Ignorance होत असल्याचे ध्वनीत होत असले तरी माझ्या समजुतीप्रमाणे ज्यावेळी आपण जाणीवनेणीव असे जोडीने वापरतो त्यावेळी ज्ञान-अज्ञान असे सूचित होत नसून ज्ञानाच्या कक्षा रूंदावण्याची ती एक प्रक्रिया असू शकते. 'जाणीव' चा वापर आपण सातत्याने पाहतो पण फक्त 'नेणीव' कुठे प्रयोगात आले असेल असे वाटत नाही.
जाणकार अधिक प्रकाश टाकतील अशी अपेक्षा.
४.२ आचार्य विनोबा भावे calls
४.२ आचार्य विनोबा भावे calls “विद्या” to mean “sensibility” (जाणीव in Marathi) and “अविद्या” to mean a state devoid of sensibility (नेणीव in Marathi). By this definition, “अविद्या” seems to be conceptually similar to the concept of a “null set” in mathematics !
हे इथे आहे.
मृण्मयी ~ थॅन्क्स. छानच आहे
मृण्मयी ~ थॅन्क्स. छानच आहे तो संदर्भ. सगळाच वाचला.
कॉन्शस माईन्डला जाणीव आणि
कॉन्शस माईन्डला जाणीव आणि सबकॉन्शस माईन्डला नेणीव म्हणतात ना?
काल मित्रमैत्रिणींबरोबर गप्प
काल मित्रमैत्रिणींबरोबर गप्प झाडताना असं कळलं की एका नवर-बायकोची शब्दार्थांवरून गंभीर पैज लागली मायबोलीपेक्षा अजून चांगली जागाच नाही विचारायला!
'काळीज' ह्या शब्दाचा नक्की अर्थ काय? २ तट पडले. हदय)ते कसं बरं लिहितात! heart असं म्हणणार्यांचा आणि 'काळीज' म्हणजे लिव्हर असं म्हणणार्यांचा.
आता निवाडा तुम्हीच करा बुवा.
सग्ळ्या म्हणी आणी वाक्प्रचार आणि गाणी ऐकून वाटतं की heart ch असणार.
मटण खाणारे खवय्ये म्हणतात we know our meat काळीज म्हणजे नक्की लिवर.
ढालगज म्हणजे काय? व्युत्पत्ती
ढालगज म्हणजे काय? व्युत्पत्ती माहित आहे पण सर्वसामान्यपणे कुठल्या कुठल्या अर्थाने वापरला जातो?
ढालगज : निष्कारण उठाठेवी
ढालगज : निष्कारण उठाठेवी करणारा व फाजील . उदा. ढा. भवानी
आरे कोणीतरी उत्तर द्या की.
आरे कोणीतरी उत्तर द्या की. अशी काळजाला घरं पाडू नका/काळजाला घोर लावू नका. मला गूगलून हे सापडलं.पण प्रश्ण असा आहे की माणसाच्या आणि पशूपक्ष्यांच्या काळजाचे २ वेगवेगळे अर्थ का म्हणून असतील?
काळीज... (http://www.cfilt.iitb.ac.in/wordnet/webmwn/wn.php)
Noun(4)
(R)(H)(E) मन, चित्त, अंतःकरण, मानस, हृदय, काळीज, अंतर्याम, जीव, अंतरंग - अनुभव, विचार, विकार यांचे अधिष्ठान असलेली यंत्रणा "प्रार्थनेने माणसाचे मन शुद्ध होते./ त्याचा या कामात जीव लागत नव्हता"
(R)(H)(E) हृदय, काळीज - ज्यामुळे शुद्ध रक्ताचे शरीरभर रक्तवाहिन्यांद्वारे अभिसरण होते तो छातीत डाव्या बाजूला असणारा एक अवयव "हृदयाचे अलिंद आणि निलय असे दोन भाग असतात"
(R)(H)(E) अंतःकरण, अंतरात्मा, हृदय, अंतर्मन, मन, चित्त, मानस, काळीज, अंतर्याम, जीव, अंतरंग - अनुभव, विचार, विकार यांचे अधिष्ठान "अंतःकरणातून निघालेला आवाजच खरा."
(R)(H)(E) काळीज - पशुपक्षांचे यकृत "त्याला बकर्याचे काळीज खायला आवडते."
काळीज = हृदयच कलेजी =
काळीज = हृदयच
कलेजी = लिव्हर.
बागुलबुवा, पैज जिंकायला मदत
बागुलबुवा, पैज जिंकायला मदत केल्याबद्दल आभारः)
बकर्याचे काळीज म्हणजे यकृतच.
बकर्याचे काळीज म्हणजे यकृतच. त्याला मराठीत तरी कलेजा म्हणत नाहीत.
(माफ करा पण दोन्ही अर्थ शब्दांच्या वापरानुसार बरोबरच आहेत.
)
गजानन, कलेजा नव्हे कलेजी
गजानन, कलेजा नव्हे कलेजी म्हणताहेत बागुलबुवा. अन मलाही ते बरोबर वाटतेय. आम्हीही "कलेजी खावी, त्यात आयर्न खुप असतं "असच म्हणतो
माझी कोल्हापूरची मैत्रिण
माझी कोल्हापूरची मैत्रिण म्हणाली की त्यांच्या घरी काळीज खाणे आसं म्हणतात, पण मला वाटतं की ती स्लँग असावी. खरा शब्द कलेजी खाणे असाच असणार.
सव्यासाची म्हणजे काय?
सव्यासाची म्हणजे काय?
सव्यसाची म्हणजे उजव्या आणी
सव्यसाची म्हणजे उजव्या आणी डाव्या हाताने धनुष्य बाण चालवू शकणारा असा शब्दशः पण ambidextrous य अर्थी वापरला जाणारा.
पुर्वी लढाईच्या वेळी हत्ती असत त्यात सर्वात पुढे असणार्या हत्तीणीला ढालगज म्हणत. त्यावरून पुढे पुढे करणारी किंवा नसत्या चौकशा करणारी मुलगी म्हणजे ढालगज असा शब्द आला.
सव्यासाची >> दोन्ही हात समान
सव्यासाची >> दोन्ही हात समान तर्हेने वापरु शकणारा .... अर्जुन सव्यसाची होता.
अनुमोदन असामी, अर्जुनाला
अनुमोदन असामी, अर्जुनाला सव्यसाची आणि गुडाकेश (नीद्रेवर विजय मिळवलेला) अशी दोन विशेषणे मिळालेली होती.
सव्यसाची ची व्युत्पत्ती अशी
सव्यसाची ची व्युत्पत्ती अशी वाचल्याचे आठवते-
अपसव्येनापि सव्येनेव साची (अपसव्येन अपि- डाव्या हाताने सुद्धा, सव्येन इव- उजव्या हाताप्रमाणे साची- बाण चालवणारा, थोडक्यात- डाव्या हातानेही बाण चालवू शकणारा असा अर्थ असावा.
नॉर्मली- उजव्या हातानेच बाण चालवतात ना??
चू/भू.दे.घे.
गुडाका-निद्रा. निद्रेचा
गुडाका-निद्रा. निद्रेचा स्वामी तो गुडाकेश.
साची = बाण ? व्युत्पत्ती ?
साची = बाण ? व्युत्पत्ती ?
श्रेढी = Progression (गणितात
श्रेढी = Progression
(गणितात Arithmetical progression, Geometrical progression असते ते Progression)
हा शब्दही आज पहिल्यांदाच माहीत झाला.
"तुला जमीन व्यवहारातील
"तुला जमीन व्यवहारातील कायदेकानू माहिती नाहीत, त्यामुळे तू शांत बस !" असा एक संवाद बैठकीत ऐकला. इथे 'कायदा' म्हणजे काय ते समजले पण हे "कानू" काय प्रकरण आहे? कानू = कलम (क्लॉज) वगैरे असते काय?
बाबु, व्युत्पत्ती माहिती नाही
बाबु,
व्युत्पत्ती माहिती नाही हो. चेकावं लागेल कुठेतरी.
(साची चा अर्थ बाणच आहे की अजून काही हेही चेकावं लागेल.
मी फक्त कुठेतरी वाचनात आलेलं, ते डोक्यात पक्कं बसलं होतं म्हणून दिलं इथे.)
मी बघतो जरा चेक करून
कानू नाही कानून (हिंदीत
कानू नाही कानून (हिंदीत म्हणतो तो).
हिंदीत कानून आहे, पण मराठीत
हिंदीत कानून आहे, पण मराठीत कानू असल्याचे वाचले होते... खखोदेजा.
युयुत्सु चा अर्थ काय?
युयुत्सु चा अर्थ काय?
युयुत्सु म्हणजे युद्ध करायची
युयुत्सु म्हणजे युद्ध करायची इच्छा असलेला.
नहाणीघर बरोबर की न्हाणीघर ?
नहाणीघर बरोबर की न्हाणीघर ?
translucent - semitransparent
translucent - semitransparent यासाठी मराठीत काय शब्द आहे?
transparent - पारदर्शक
opaque - दूधाळ (अपारदर्शक इथे योग्य आहे का?)
semitransparent -
semitransparent - अर्धपारदर्शक
opaque साठी 'अपारदर्शक' योग्य वाटतंय.
Pages