वासंतिक कल्लोळ २०११

Submitted by अंजली on 22 December, 2010 - 11:18
ठिकाण/पत्ता: 
कॅरी, नॉर्थ कॅरोलिना

वासंतिक कल्लोळ २०११
१३-१४-१५ मे २०११
नॉर्थ कॅरोलिना

परंपरा बरं का परंपरा.... मायबोलीवर परंपरेला असाधारण महत्व आहे. गणेशोत्सव परंपरा, दिवाळी अंक परंपरा, वर्षाविहार परंपरा, एठिएवे परंपरा, अमुकतमुक उपक्रम परंपरा वगैरे. इतकंच काय इथे होणार्‍या भांडणं-वादांना पण परंपरा आहे. Wink
तर अशा मायबोली परंपरेला अनुसुरून २०११ च्या वासंतिक कल्लोळाची परंपरा पुढे चालवायची जबाबदारी यावर्षी नॉर्थ कॅरोलिनाने घेतली आहे. सर्व मायबोलीकरांना आग्रहाचे आमंत्रण.
कार्यक्रमाची रूपरेषा येणार्‍या लोकांच्या सूचनेनुसार ठरवता येईल. आमच्या छोट्याशा गावात पहाण्यासारखं फारसं काही नाही, पण इथून बीचवर एखादा दिवस किंवा Smokey Mountains ला एखादा दिवस जाता येईल. Happy

प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, May 13, 2011 - 18:00 to रविवार, May 15, 2011 - 17:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाडवांच्या कौतुकासाठी धन्यवाद! पण सगळं श्रेय रेसिपी टाकणार्‍यांना Wink

रच्याकने, मधुरीमाच्या लोणच्याची रेसिपी खणून काढली आहे. लाभ घ्या!

आणि हो "कुलफी" सुद्धा होती बर का! नंतर कळल की त्याला "कुलदीप" अरर् "coolwhip" असे म्हणतात.... Wink

"Mad"eleine cakes आणि बेलजियम चोकलेट कपकेक पोरांना लै आवडले म्हणजे त्यांनी आम्हाला सांगुन टाकले की तुम्ही खाल्ले नाहीत तर आम्ही संपवून टाकू.... Proud

अग अंजली, केलस केंव्हा एवढं सगळं? प्लॅनींगपण सांगून टाक आता. मलापण बाजारचा पनीर टिक्का आवडत नाही. तेंव्हा तुझी पनीर टिक्काची रेसिपी जरूर लिही. पनीर विकत आणलं असशील तर ब्रँडही लिही. एकदम टेम्प्टींग दिसतय.

सक्काळी उठून केलं सग्गळं तिने . बाराबशीतले लोक जराशी डुलकी काढत होते तेंव्हा चिरल्याचे, वाटल्याचे, खोवल्याचे आवाज आले नाहीत कारण ८०० खिडक्या, ९०० दारांचं भलं थोरलं घर Happy

शोनू, डुलकी तू एकटीच काढत होतीस. ते आवाज आम्हीच करत होतो. Proud

जोक्स अपार्ट, पण अंजलीची सगळी जय्यत तयारी होती. पदार्थ गरम करणे / ग्रिल करणे इतकंच आयत्या वेळचं काम होतं (जे मुख्यत: पन्ना आणि शोनूने केलं.) Happy

बाकी वृत्तांत येतीलच. पण एक प्रश्न विचारायचाच राहिला.
(पुरुषस्वप्नांच्या निमित्ताने) वेमांना कोपच्यात घेतलं का?

घेतलं ना. पण ते म्हणाले 'What happens in NC, stays in NC' हे मान्य असेल तरच उत्तर देईन. त्यामुळे ते कल्लोळाला न आलेल्यांना सांगायचं नाहीये. Proud

च्च च्च. काय हे? हा कसला वृत्तांत! पार्ल्याच्या बा.फ. वर गेल्यासारखे वाटते. नुसते खाण्यापिण्याबद्दल!
इतर काही गप्पा, काही कुचाळक्या, कुणाच्या 'आठवणी ' काढल्या का? विशेषतः भारतातल्या कुणाच्या?
काही उद्बोधक चर्चा, कुणाचे गाणे? काही सांस्कृतिक कार्यक्रम केलेत की नुसते हादडत बसलात?

झक्की: गटग ला आलेले २-३ इसम चक्क "मी झक्की" अशी ओळख सांगत होते.... मग आता पुन्हा वृतांत कश्याला वेगळा!!! Proud

गटग ला आलेले २-३ इसम चक्क "मी झक्की" अशी ओळख सांगत होते.>>> झक्कींसारखे वागले, बोलले ना. बरंय. त्यांची उणीव तुम्हांला भासली नसेलच Wink

एका जणांनी झक्की आणि दुसर्‍या गृहस्थांनी तुमच्या परम मित्राचा आयडी घेतला. मग झक्कींनी त्या परम मित्राच्या ग्लास्तात दारू ओतली. Proud

मग झक्कींनी त्या परम मित्राच्या ग्लास्तात दारू ओतली. >> छे मग ते झक्की असूच शकत नाहित Lol

अंजली तो पा सू वाटतेय सगळे Happy

मेधाने काढलेले फोटो:
आइसक्रीम सोडा
DSC_0692.JPGDSC_0695.JPG

व्हेज कबाब
DSC_0696.JPG

मटण कबाब
DSC_0697.JPG

तंदूरी पनीर
DSC_0698.JPG

मधुरीमाकडचा मेन्यू
मटकीची उसळ
DSC_0722.JPG

भरभक्कम डावी बाजू
DSC_0728.JPGDSC_0737.JPG

आता अजून खाण्याचे फोटो टाकत नाही Wink

रविवार सकाळचा लंच मेनू

सोलापूरी भरली वांगी, चिंच-गुळाचं वरण, काकडीची कोशींबीर, लोणचं, सोलापूरी दाण्याची चटणी, पोळ्या, भात.
बरोबर यजमान आणि यजमाणीन बाईंबरोबर मस्त गप्पा ! नॉर्थ कॅरोलिना कसं रहायला मस्त आहे याची माहिती.

अन्नदाता सुखी भव ! खूप मजा आली.

अंजली आणि मधुरिमा,
जबरदस्तं सगळे पदार्थ.. मिस केलं :(.
मेंदीची हात छान रंगलेत ( मायबोली लोगो साठी कॉपीराइट इश्यु नाही आला ना :फिदी:) .. नेक्स्ट टाइम मेंदी + टॅटु जीटीजी करु मी आल्यावर .

Pages