वासंतिक कल्लोळ २०११

Submitted by अंजली on 22 December, 2010 - 11:18
ठिकाण/पत्ता: 
कॅरी, नॉर्थ कॅरोलिना

वासंतिक कल्लोळ २०११
१३-१४-१५ मे २०११
नॉर्थ कॅरोलिना

परंपरा बरं का परंपरा.... मायबोलीवर परंपरेला असाधारण महत्व आहे. गणेशोत्सव परंपरा, दिवाळी अंक परंपरा, वर्षाविहार परंपरा, एठिएवे परंपरा, अमुकतमुक उपक्रम परंपरा वगैरे. इतकंच काय इथे होणार्‍या भांडणं-वादांना पण परंपरा आहे. Wink
तर अशा मायबोली परंपरेला अनुसुरून २०११ च्या वासंतिक कल्लोळाची परंपरा पुढे चालवायची जबाबदारी यावर्षी नॉर्थ कॅरोलिनाने घेतली आहे. सर्व मायबोलीकरांना आग्रहाचे आमंत्रण.
कार्यक्रमाची रूपरेषा येणार्‍या लोकांच्या सूचनेनुसार ठरवता येईल. आमच्या छोट्याशा गावात पहाण्यासारखं फारसं काही नाही, पण इथून बीचवर एखादा दिवस किंवा Smokey Mountains ला एखादा दिवस जाता येईल. Happy

प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, May 13, 2011 - 18:00 to रविवार, May 15, 2011 - 17:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंजली तू नाही का नाव नोंदवणार Proud
डीसी/स्मोकी गटगच्या अनुभवावरून - कुठेही हिंडायला वगैरे काही वेळ मिळत नाही तसाही, मायबोलीकरांच्या गप्पाच इतक्या वेळ चालतात की हिंडणे-फिरणे वगैरे सगळे आपोआप बाद होते त्यामुळे तुमच्या गावात काही नाही बघायला याचे काही वाईट वाटून घेवू नकोस. Happy

९ तास. डिराईविंग. शुक्रवारी दुपारी ४:०० ला निघुन १ ला पोहचायच. शनिवारी राहुन वासंतिक कल्लोळ करुन मग रविवारी सकाळी निघुन यायच. मग बीच, Smokey Mountains कधि करायच?. Wink

अंजली, ६ ते ८ पेक्षा स्मृतीदिनाच्या दीर्घसप्ताहांताला का ठरवत नाहीस?

मला चालेल :). लोकांचे कार्यक्रम ठरलेले असतात म्हणून अलिकडे घेतली तारीख. पण बहुतांश लोकांना स्मृतीदिनाच्या दीर्घसप्ताहांताला जमणार असेल तर बदलते.

चेरी ब्लॉसमची परंपरा मोडेल हाँ मग. Proud
(आम्हांला काही नाही, तूच परंपरा परंपरा म्हणून धोशा लावला आहेस म्हणून म्हटलं. :P)

'ब्लॉसम आधीच येऊन गेला होता' ही परंपरा राहीलच. Wink
मला चालेल स्मृतीदिनाच्या दीर्घसप्ताहांताला. (म्हणजे काही झाले तरी मी येणारच आहे.)

माझा लेकपण येणार म्हणतोय. Happy
'आय लाइक टू हँग आऊट विथ यू गाय्ज - लास्ट जीटीजी अ‍ॅट अवर प्लेस वॉज फन' अशी माबोकरांना कॉम्प्लिमेन्ट आहे. Happy

अ‍ॅडमिन, वेमा
वर "10 मायबोलीकर जाणार आहेत." असं दिसतंय आणि नाव नोंदवताना फोन नंबर मागतात (दिला नाही तरी चालते) त्याबरोबर सोबत येणार्‍या गेस्ट्सचा आकडा टाकता येईल हे पहावे.
धन्यवाद.

एम्टी Happy

तारखांमधे बदल केले आहेत.
मधुरीमा, मला संपर्कातून तुझा फोन नं पाठवशील का? तुला फोन करते, मग सविस्तर बोलू.

अटलांटाकर्सनी कोणी का नाही नाव नोंदवलेय, त्यांना वेगळे आमंत्रण मिळाले नाही का त्यांच्या बाफवर.
आणि मृ कुठय सगळ्यात पहिले ती नाव नोंदवते ना कुठेही, जाणार असो अथवा नसो. Happy

मृ तू ये स्मार्ट कार घेऊन.
मला ती गाडी फार आवडते टू सीटर आहे म्हणून. Happy

Pages