कथाकथी

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago
Time to
read
2’

मध्यंतरी ऑफिसमध्ये एकाने विचारलं, "मला चांगल्या मराठी कथा वाचायच्या आहेत. सारखा मायबोली मायबोली करत असतोस.. तर तिथल्या कुठल्या कथा वाचू ते सांग आणि लिंक पण शोधून दे.. "
तेव्हा त्याला पटकन सापडतील अश्या कथांच्या लिंक दिल्या. (त्या अर्थातच यंदाच्या दिवाळी अंकातल्या होत्या. Wink )
नंतर सहज विचार करत होतो की अश्या मायबोलीवरच्या कथा आठवायच्या ठरवलं तर कोणत्या कोणत्या कथा पटकन आठवतायत ? त्यांची यादी करून त्या शोधून परत वाचल्या. आता लिंका शोधल्याच आहेत तर इथे टाकतो. जेणेकरून अजून कोणाला वाचायच्या असतील तर वाचता येतील. मायबोलीवरच्या बाकीच्या कथा आवडल्या नाहीत असं अजिबात नाही.. पण ह्या अगदी लक्षात राहिल्या..

दिसामाजिं काहीतरी : http://vishesh.maayboli.com/node/95
ही कथा पहिल्यांदा वाचताना मला अगदी भिती वाटली होती. श्र ची मला वाटलेली बेस्ट !!

सांवरा रे : http://vishesh.maayboli.com/diwali-2009/659
खास शोनू टच.. अजून काय लिहिणार ? Happy

सुखात्मे : http://www.maayboli.com/hitguj_diwali_ank/hda_2007/node/546.html
ही वाचताना खूप अंगावर आली. मी अंकाच्या प्रतिक्रियेत पण लिहिलं होतं.. ह्यावर पुरुषोत्तम मध्ये छान एकांकिका बसवता येईल..

राजामणी : http://www.maayboli.com/hitguj/messages/118369/118160.html?1161287924
शोनूच्या ह्या कथेची पार्श्वभूमी बाकी कथांपेक्षा एकदम वेगळी आहे ! त्यामुळे खूप लक्षात राहिली.

नीरजाची 'एका हरण्यची गोष्ट' : http://www.maayboli.com/node/21285
सह्ही आहे एकदम.. !

एक दिवस : http://www.maayboli.com/hitguj_diwali_ank/hda_2007/node/597.html
संघमित्राचं साहित्य या कथेआधी फारसं वाचलं नव्हतं. छान वाटली ही एकदम !

जुन्या मायबोलीवर एक एलिझाबेथ की कोणीतरी लेखिका होती. तिने एका सायकिअ‍ॅस्ट्रीस्टबद्दल गोष्ट लिहिली होती. मला कथा पूर्ण आठवते आहे. पण नाव आठवत नाहिये आणि लिंक सापडत नाहिये. कोणाला माहीत असेल तर सांगा.

तीन पत्त्यांचा तमाशा : http://www.maayboli.com/hitguj_diwali_ank/hda_2007/node/570.html
टिपीकल टण्या ! ही पण कथा खूप अंगावर आली...

पुन्हां एकदा शब्द : http://www.maayboli.com/node/17033
नंदिनीची ही कथा योग्य दिवसांमध्ये वाचली आणि आवडली.. Proud

इन्व्हाइट : http://www.maayboli.com/node/13608
द ग्रेट साजिरादा...! ह्या कथेतला दिवसातल्या काही घटना दुरुस्त करायचा फंडा खूप आवडला. खास साजिरा शैली आहेच.

ग्रुप - ३ : नांगराचा फंडा : http://www.maayboli.com/node/2697
आधीच्या ग्रुप कथानकात नांगराचा फंडा दादने मस्त गोवला आहे.

चमनची ती दोन मित्रांच्या संवादाची एक कथा होती. ती त्याच्या पाऊलखुणामध्ये सापडत नाहिये !!

आणि http://vishesh.maayboli.com/node/906 इथल्या सगळ्याच कथा एकसे एक आहेत !!! अनेकदा वाचल्या आत्तापर्यंत. Happy

त.टी.: शोनूने ती 'वर्षाची गोष्ट' पूर्ण केली तर ती पण ह्या यादीत अ‍ॅड करायचा विचार आहे !!

-------------------------------------------------------------------------------------------------------
अगो आणि पूनमने सांगितलेल्या

नीरजाची एक होती वैदेही :
http://www.maayboli.com/node/21291

-------------------------------------------------------------------------------------------------------

फारेंडाने दिलेल्या काही लिंक्स :

दाद ची मला अत्यंत आवडलेली, "साधी माणसं"
http://www.maayboli.com/hitguj/messages/75/125611.html?1178875632

संघमित्रा ने लिहीलेल्या (पण अजून ज्याचे पुढचे भाग टाकलेले नाहीत अशा) सॉफ्टकथा

क्र.१
http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/119939.html?1164860791

क्र.२
http://www.maayboli.com/hitguj/messages/75/125257.html?1177725825

आणि पूनम ची होम मिनिस्टर
http://www.maayboli.com/node/5897

--------------------------------------------------------------------------------------------------
सिंडरेलाने दिलेली एक लिंक :

स्वातीची कथा 'उत्तर' : http://www.maayboli.com/node/5306

---------------------------------------------------------------------------------------------------
रैना आणि रूनी ने सुचवलेल्या काही :

कौतूकची : दे कॉल मी इ. झेड : http://www.maayboli.com/node/13598 (ह्यातच पुढच्या दोन भागांच्या लिंक आहेत)
साजिर्‍याची : गावशीव : http://www.maayboli.com/node/5438

विषय: 
प्रकार: 

सॉरी डेलिया. करायचे आहे पूर्ण कधीचेच. पूर्ण करुन टाकेन इथे.
नंद्या/मंजू- लिंकसाठी खूप खूप धन्यवाद. भाग ७ तर माझ्याकडेही नव्हता.
सायो/हिम्या गेनची आठवण इतकी वर्षे काढत राहिल्याबद्दल थँक्यु. Happy

एवढ्यात धन्स नको.. कथा पूर्ण झाल्यावर म्हण तिला. नाहीतर धन्स म्हटल्यावर तिला गोष्ट पूर्ण केल्यासारखंच वाटेल. Proud

ह्या धाग्यासाठी अनेक आभार Happy

पूनमची - मार्ग - http://www.maayboli.com/node/2143 अन् तिच्या ब्लॉगवरची 'तुझ्या नसा नसात मी' अन् 'प्रथम तुज पाहता' ह्या माझ्या ऑलटाईम फेव्ह आहेत. मंगळागौर, बोली ह्याही एकदम सह्हीच आहेत.

http://kathapournima.blogspot.com/search/label/%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE तसेच नव र्‍याच आडनाव पण भारीये. Happy

दादची - नक्ष फरियादी है - http://www.maayboli.com/node/7281, ग्रूप, सोबत.

सध्या तरी येवढंच Happy

*लिंक्स रिपीट होण्याची शक्यता आहे तसं झालं असल्यास सांगा म्हणजे मग डिलीटता येईल.

एक कथा शोधतोय
- एक मुलगा - आपला बाबा आपला जन्मदाता नाही हे कळल्यावर त्याच्या आयुष्यात आलेले वादळ - हॉटेलमधील जन्मदात्याशी भेट - आणि मग शेवट

कुणाला आठवते आहे का? लिंक आहे का?

हे असले सुंडर धागे काढायची आयडीया आल्याबद्दल अभिनंदन आणि ते रंगीबेरंगी पानावर काढ;ल्याबद्दल राग. Happy

यातल्या बर्‍याचशा कथा वाचलेल्या नाहीत. आता बसून निवांत वाचेन. जुन्या माबोमधे ज्यांच्या कथा आहेत त्यांनी ताबडतोब्नवीन माबोमधे घेऊन या. हुकुमावरून.

आता ललिताप्रीतीची "सरणार कधी" वाचली. अफाट लिहिली आहे.... हृदयाची अगदी धडधड वाढेल इतका ताण आणते ही कथा. डोक्याला शॉट लागलाय....

तू आत्तापर्यंत सरणार कधी वाचली नव्हतीस ??? कु.फे.ही.पा !!!!
आता प्रायश्चित्त म्हणून हेडर मधल्या सगळ्या कथा किमान दोनदा वाचून काढ.. Wink

पराग, खरंच वाचली नव्हती. दिवाळी अंकामधल्या कथा एरवी शोधामधे अथवा त्या त्या लेखकाचा पाऊलखुणांमधे तरी दिसायला हव्यात अशी अ‍ॅडमिनच्या चरणी विनंती करायला हवी... जुन्या मायब्लीवरचं बरंचसं चांगलं लिखाण नवीन माय्बोलीवर आणण्यासाठी पण काहीतरी करायला हवंय.

माझं गेले दोन दिवस या बीबीवरच्या बहुतेक कथा वाचन चालू आहे.

ललिची ती कथा वाचताना आणि वाचून झाल्यावर जे काही झालं ते शब्दांत लिहिणं अशक्य आहे.

can anyone help mi with good morning madam link ...
i have completed till part 5 .. rest 6 & 7 parts are not available :(
Pls help me if sumone can give link for full story....PLs Pls....

प्रिय ADM
---------------
माझ्या " कामथे काका " ही कादंबरी सुचवली असतीत तर बरं वाटलं असतं. ही माझी तक्रार नाही. विनंती समजावी.

Pages