Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 16, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » फाल्गुन » कथा कादंबरी » मधुमिलन » Archive through March 16, 2007 « Previous Next »

Ajjuka
Wednesday, March 14, 2007 - 8:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माफ कर बडे.. मला अजिबात आवडली नाही कथा. खूपच गुडीगुडी आणि वरवरची वाटली. (आता पब्लिक पेटणार माझ्यावर..)

Milindaa
Wednesday, March 14, 2007 - 9:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि वरवरची वाटली <<< अज्जुका, LOL . अजून काय काय लिहायला पाहिजे होतं? :-)

Ajjuka
Wednesday, March 14, 2007 - 10:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नानाची टांग मिलिंदा!! ही ही ही


Adi787
Wednesday, March 14, 2007 - 11:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

milindaa.... khi khi khi...

Badbadi
Wednesday, March 14, 2007 - 11:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माफ कर बडे >> तू माफि मागावीस किंवा मी द्यावी असं काय घडलं आहे अज्जुका? प्रत्येकाची मतं मांडायाला जो तो मोकळा आहे.

खूपच गुडीगुडी >> आता पहिल्या रात्री जर गुडीगुडी नसतील लोक तर काय कचाकचा भांडतील का?? "माझ्या अंगाला हात लावलास तर याद राख" टाईप??

वरवरची वाटली >> अजून खोलात जाणे मलातरी शक्य नव्हते :-)

(आता पब्लिक पेटणार माझ्यावर..) >> पेटायला काय इथे मल्लिका शेरावत आणि इम्रान हाश्मी आले आहेत का?

मिलिंदा, disclaimer च्या पोस्ट बद्दल मंडळ आपलं आभारी आहे :-)



Limbutimbu
Wednesday, March 14, 2007 - 11:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>>> पेटायला काय इथे मल्लिका शेरावत आणि इम्रान हाश्मी आले आहेत का?
ते नाही, पण मी आलो हे! DDD

गोष्ट, "कथा" नव्हे, गोष्ट खुपच छान लिहिली हे! पण का कोण जाणे अज्जुका म्हणते तसे मलाही ती वरवरची आणि गुडीगुडी वाटली!
अर्थात पहिल्यारात्रिचा विषय नाजुक असल्याने हाताळणे अवघड अन त्यावर "प्रॅक्टिकल" किन्वा वास्तवाला धरुन भाष्य/टिका करणे त्याहून अवघड!
वरल्या गोष्टीचा प्रयोग जमलाय, पण राहुन राहून अपुरेपण वाटतय! कदाचित पुरेशी नाट्यमयता किन्वा उत्कण्ठा वाचकाच्या (म्हन्जे माझ्याच हो) मनात जाग्रुत होत नसल्याने तसे वाटत असेल! :-)
किन्वा वास्तव हे स्वप्नाहुन अधिक भीषण असते या उक्तीला धरुन असेल, वरल लिहिलेल मला वास्तव म्हणुन स्विकारणे "जड" जात असेल (स्वानुभव व इतरान्च्या वास्तव गोष्टी यामुळे असेल) अन त्यामुळे ते "गुडिगुडि" वाटत असेल.
एनिवे,
खुपच चान्गला प्रयत्न हे! आणि "गुडिगुडी" लिहायचे जरी असेल, तरीही असा नाजुक विषय सहजतेने सुन्दर पणे साकारण ही अवघड बाब हे

Bee
Thursday, March 15, 2007 - 12:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बडे, मला पण ही कथा अतिगोड झाली. पण तू नमूद केलेलेच आहे की ही फ़क्त तुझी कल्पना आहे :-)

Meenu
Thursday, March 15, 2007 - 1:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बडे ये बात कुछ हजम नही हुई .. मला अजिबात नाही आवडली ही तुझी कथा .. हे माझं प्रामाणिक मत हं ..
कथा असं काहीच वाटलच नाही ..
तू लिहायला नको होतीस असही वाटलं ..
तू इथे लिहायला नको होतीस असही ..
अर्थात हे माझं मत ..
किती महत्व द्यायचं ते तु ठरवशीलच ..



Manutai
Thursday, March 15, 2007 - 2:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बडबडे, तू टीकेकडे अजिबात बघू नकोस. छानच होती तुझी कथा. आणि भाषा ही पकड घेणारी. पुढची कथा येऊ दे.

Limbutimbu
Thursday, March 15, 2007 - 2:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> पुढची कथा येऊ दे.
आता या कथेपुढची कथा कसली असेल बर??????? (विचारात पडलेला चेहरा) DDD * 1000

Manutai
Thursday, March 15, 2007 - 2:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारीच वात्रट बाई काही काही माणसे! अहो लिम्बुटिम्बुजी, दुसरी प्रेमकथा आता असण्याची शक्यता कमी नाही का?

Abhiyadav
Thursday, March 15, 2007 - 2:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

vyavasthit romantic katha aahe. pratyekachi awad vegvegli asate tasha pratikriya yetat. Keep it up.

Ajjuka
Thursday, March 15, 2007 - 3:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>आता पहिल्या रात्री जर गुडीगुडी नसतील लोक तर काय कचाकचा भांडतील का?? "माझ्या अंगाला हात लावलास तर याद राख" टाईप??<<
भांडणार नाहीत पण इतके गुडगुडणार पण नाहीत. माझा आणि मैत्रिणींचा अनुभव तरी असंच सांगतो.

>>वरवरची वाटली >> अजून खोलात जाणे मलातरी शक्य नव्हते <<
इथे तपशीलात जाणे अपेक्षित नाहीये. व्यक्तिरेखा कळत नाहीत. केवळ पहिल्या रात्रीचं गोडगुलाबी वर्णन एवढंच ते रहातं. त्यामुळे उद्देश फक्त चाळवण्यापुरता आहे असं वाटतं.
’कोणी काही म्हणालं तरी तू लिहित रहा’ याबद्दल.. तू लिहित रहावंस म्हणून एवढा सगळा प्रपंच. तुझी भाषा चांगली आहे. तुला प्रवाह कळतोय पण चुकीच्या दिशेने जाते आहेस असं वाटलं. आणि तुला थोडीशी ओळखते त्यावरून कदाचित तू ह्या कॊमेंटस चा सकारात्मक उपयोग करून घेशील असे वाटले म्हणून लिहिले. एरवी अनेक हळदीकुंकू कथा येत असतातच की मायबोलीवर.. एकाला तरी काही कॊमेंट दिलीये का? तुझा गैरसमज झालाय असं वाटतय म्हणून हे सगळे स्पष्टीकरण.

Sandeep_bodke
Thursday, March 15, 2007 - 5:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा आणि मैत्रिणींचा अनुभव तरी असंच सांगतो >> Ajjukka, mug tuzya anubhavaawar lihi ki katha ithe ek :-)

Maku
Thursday, March 15, 2007 - 7:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sandeep hihihahahhahahahha hahahha hahahha

Ajjuka
Thursday, March 15, 2007 - 9:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय आहे बोडक्या.. असलं चाळवाचाळवी करणारं लिहायला आणि वाचायलाही मला आवडत नाही. आणि तुला दुसऱ्यांच्या खाजगी भानगडीमधे का एवढा interest?

Bee
Thursday, March 15, 2007 - 9:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, पहिली रात्र ही भानगडीची असते हे मला नव्यानी कळते आहे :-) दिवे घे हो..

Ajjuka
Friday, March 16, 2007 - 3:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्पष्ट बोलणं सगळ्यांनाच झोंबलेलं दिसतंय. म्हणजे मायबोलीवर आता फक्त वा छान, अय्या किती छान एवढेच म्हणायचे नाहीतर ही असली फडतूस बडबड..

Bee
Friday, March 16, 2007 - 5:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरच HG वर प्रामाणिक प्रतिक्रिया देण्याचे धाडस होत नाही आणि त्या छान छान म्हणून गौरव करणार्‍यांच्या समूहामधे शिरायलाही मन तयार होत नाही. फ़क्त गप्प बसून वाचणेही जमत नाही. काहीतरी सतत कुढत राहते डोक्यात.

Ajjuka
Friday, March 16, 2007 - 6:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोकांना आवडायला नको अशी सक्ती?? हे कधी केलं मी? मी चुकूनही कुणाला काय आवडावं हे सांगितलं नाहीये. उगाच काहीही आरोप नकोत कृपया. तुम्हाला आवडलं हे जसं एक मत आहे तसंच मला नाही आवडल हे माझं मत आहे. मी माझं मत सांगितलं. तेही अतिशय साध्या शब्दात. आता आवडलं नाही तर मत सांगू नका ही सक्तीच नाही का?




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators