Submitted by स्वाती_आंबोळे on 9 September, 2010 - 12:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
थालीपिठाची भाजणी
कांदा - मध्यम बारीक चिरलेला
फोडणीचं साहित्य
लाल तिखट
मीठ
चिंचेचा किंवा आमसुलाचा कोळ
गूळ
(सर्व साहित्य चवीनुसार)
क्रमवार पाककृती:
भाजणीत तिखट, मीठ, हिंग, हळद, चिचेचा कोळ (मी आगळ घालते) आणि गूळ हे चवीनुसार घालावे.
हळूहळू पाणी मिसळत थालीपिठांसाठी भिजवतो त्यापेक्षा सैल मिश्रण भिजवावे.
थोड्या जास्त तेलाच्या फोडणीवर कांदा परतून मग त्यावर हे मिश्रण घालावे.
अधून मधून परतत आधणाचे झाकण ठेवून वाफेवर मोकळे होईपर्यंत शिजवावे.
खातांना वरून खोबरे, कोथिंबीर आणि तूप घालून घ्यावे.
अधिक टिपा:
थालीपिठाच्या भाजणीचं माझ्या आईचं प्रमाण :
२ भांडी तांदूळ
१ भांडं ज्वारी
१ भांडं बाजरी
१ भांडं चणाडाळ
अर्धं भांडं उडीदडाळ
पाव भांडं गहू
अर्धं भांडं धने
१ टेबलस्पून जिरं
१ टीस्पून मेथी
अर्धी वाटी पोहे
सर्व जिन्नस भाजून (कणकेपेक्षा सरसरीत) दळून घेणे.
माहितीचा स्रोत:
आई
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझी भाजणी अनिंद्य यांच्या
माझी भाजणी अनिंद्य यांच्या भाजणीसारखी दिसत होती.
हिचं सोप्पं पुडिंग करायचंय का?
माझ्याकडच्या छापील कृतीत बारीक चिरलेले कांदा मिरची घालून पीठ सैल भिजवायाचं आहे. मग-
जाड बुडाच्या कढईत फोडणीवर भाजणी थोडी थोडी टाकावी आणि ते पीठ चमच्याने सारखं परतून घ्यावं आणि कढईवर झाकण ठेवावं. थोड्या वेळाने झाकण काढून पुन्हा परतावं. अर्थवट शिजल्यावर कडेने तेल सोडावं. भाजणी मोकळी होईपर्यंत मंद आचेवर परतत राहावी.
माझी पण मोकळ भाजणी. फडफडीत
माझी पण मोकळ भाजणी. फडफडीत मोकळी नाहीये. मऊ आहे पण मला आवडतं ते टेक्श्चरही.

अर्रे वा, छान दिसते आहे.
अर्रे वा, छान दिसते आहे. गॅसवर केलीस की मायक्रोवेव्हमध्ये?
गॅसवर.
गॅसवर.
छान दिसतेय मला ह्यावर बारीक
छान दिसतेय मला ह्यावर बारीक चिरलेला कच्चा कांदा आवडतो.
काल केली होती. जरा जास्तीच
काल केली होती. जरा जास्तीच मोकळी झाली!
कदाचित केप्रची विकतची असल्याने असेल! पण म्हणजे, रवाळ दळलेली असणे इज द की!
चवीला छान लागत होती. मी चिंच गूळ न घालता आंबट ताक आणि साखरेची चव ( साखर जरा सढळ हस्ते!) घातली. ( पण या विकतच्या भाजण्यांमधे धने जरा जास्तच प्रमाणात असतात आणि त्याने दाताखाली सालपट लागते!)
सायो ची छान दिसतेय भाजणी...
सायो ची छान दिसतेय भाजणी... मऊ सूत texture आलंय
घरून आणलेल्या ताज्या भाजणीची
घरून आणलेल्या ताज्या भाजणीची केली आणि एवढी छान झाली होती की हे सांगण्यासाठी पुनर्जन्म घ्यावा लागला. पण आमची घरची भाजणी छान मउसूत आहे त्यामुळे ती आता थालिपिठांसाठी राखीव. मोकळ भाजणीसाठी केप्रंची वापरेन पुढल्या वेळी. खमंग चवीच्या पदार्थांमध्ये गूळ घातला की घरातले इस्टर्न इंडियन आणि नॉर्थ अमेरिकन नागरीक कावतात त्यामुळे गूळ घातला नाही, आणि गुळाशिवाय नुसती चिंच कशी लागेल म्हणून ती पण नाही.
कोथिंबीर नाही म्हणून तक्रार
कोथिंबीर नाही म्हणून तक्रार करू नका, भाजणीच्या मोकळपणाशी नीट नजरानजर व्हावी म्हणून खोबरं-कोथिंबीर घालण्याआधीच फोटो काढला.
फोडणीची पोळी/ झुणका टाईप दिसत
फोडणीची पोळी/ झुणका टाईप दिसत आहे, सायो ची उपम्या सारखी दिसतेय.
१ दा करून बघेल.
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/DGk4FpnSP0y
इन्स्टावरचा व्हिड्यू
अरे धन्यवाद!
अरे धन्यवाद!
पण त्याची भिजवलेली भाजणी फारच कोरडी दिसते आहे, मी इतका घट्ट गोळा नाही भिजवत - जास्त घालते पाणी, आणि मऊसर करते.
फोमो होतोय आता मला.. करावंच
फोमो होतोय आता मला.. करावंच लागणार

घरातले (ज्याला त्याला) नाकं मुरडणारे मेंबर हे खात नाहीत. मग जेव्हा त्यांच्यासाठी थालिपिठं लावली जातात त्यात मी गोळा माझ्यासाठी उरवते आणि मोकळ भाजणी करते. अशीच ज्वारीची पण आवडते मला.
फुड विडीओत कोणी काळे ग्लोव्हज घातलेले बघितले की मर्डर करायला जात आहेत असं वाटतं.
Pages