मोकळ भाजणी

Submitted by स्वाती_आंबोळे on 9 September, 2010 - 12:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

थालीपिठाची भाजणी
कांदा - मध्यम बारीक चिरलेला
फोडणीचं साहित्य
लाल तिखट
मीठ
चिंचेचा किंवा आमसुलाचा कोळ
गूळ

(सर्व साहित्य चवीनुसार)

क्रमवार पाककृती: 

भाजणीत तिखट, मीठ, हिंग, हळद, चिचेचा कोळ (मी आगळ घालते) आणि गूळ हे चवीनुसार घालावे.
हळूहळू पाणी मिसळत थालीपिठांसाठी भिजवतो त्यापेक्षा सैल मिश्रण भिजवावे.
थोड्या जास्त तेलाच्या फोडणीवर कांदा परतून मग त्यावर हे मिश्रण घालावे.
अधून मधून परतत आधणाचे झाकण ठेवून वाफेवर मोकळे होईपर्यंत शिजवावे.
खातांना वरून खोबरे, कोथिंबीर आणि तूप घालून घ्यावे.

अधिक टिपा: 

थालीपिठाच्या भाजणीचं माझ्या आईचं प्रमाण :

२ भांडी तांदूळ
१ भांडं ज्वारी
१ भांडं बाजरी
१ भांडं चणाडाळ
अर्धं भांडं उडीदडाळ
पाव भांडं गहू
अर्धं भांडं धने
१ टेबलस्पून जिरं
१ टीस्पून मेथी
अर्धी वाटी पोहे

सर्व जिन्नस भाजून (कणकेपेक्षा सरसरीत) दळून घेणे.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल केली ही. मायक्रोवेव्हमध्येच केली. मी चकली भाजणी वापरली. चव मस्त आली. याआधीही ही पाककृती अन्यत्र (छापील) वाचली होती. तेव्हा हा प्रश्न डोक्यात आला नाही. मायबोली इफेक्ट - मोकळ भाजणी का? मोकळी भाजणी का नाही?

माझी भाजणी गिच्च गोळा नाही आणि सांज्या उपम्याइतकी मोकळी नाही , मोकळे मोकळे लहान लहान गोळे (?) अशी मधली झाली होती. तशीच अपेक्षित आहे का?

>>> तशीच अपेक्षित आहे का?
हो. भाजणी किती बारीक दळलेली आहे आणि तुम्ही किती मऊ शिजवता (पाण्याचं प्रमाण) यावर ते फायनल टेक्स्चर उकड ते भगर या रेन्जमधलं होतं. नीट पूर्ण शिजली असली की झालं. Happy

>>> मोकळ भाजणी का? मोकळी भाजणी का नाही?
नेमकी कल्पना नाही. म्हणजे यात 'मोकळ' हे विशेषण नाही, नाम आहे. 'ती मोकळ' असं म्हणतात. पण म्हणजे आणखी कशाची 'मोकळ' करतात का याची कल्पना नाही.
जसं 'उकडा' तांदूळ म्हणतात - 'उकडलेला' नाही - त्यातलाच प्रकार दिसतो. Happy

छान रेसिपी. फोटो असता तर नेमके समजले असते.

ही तुमच्या रेसिपीची चुलत-मावस- सावत्र बहीण. भाजणीच्या पिठाची उकडपेंडी.

b47d1a34-af3f-4955-8c47-467a040f68c8.jpeg

स्वाती, आता करतच होते. पण मोकळ ऐवजी ढेकळ व्हायची चिन्हं दिसत आहेत. कृतीचे तंतोतंत पालन केले. तू लवकर रेस्क्यू केलं नाहीस तर तशीच खाऊन टाकेन, चव चांगलीच आहे आणि व्यवस्थित शिजली आहे.

Happy पाककृतींची हेल्प लाईन असायला हवी. कशी दिसायला हवी कल्पना येत नाही. भरत म्हणतात तसे छोटे गोळे होता होत नव्हते. पण काही मोठे आणि काही छोटे असल्याने सेमी मोकळ- 'मोकळढेकळ' झाली आहे बहुधा. माझा रोजचा स्वयंपाकही बऱ्यापैकी चमचमीतच असतो. तेल, तिखट, मीठ कमी वगैरे नसते त्यामुळे यात जास्त घालताना काहीही वाटले नाही. शेंगदाणे आणि कोथिंबीर फोडणीत घातली होती हा एवढाच बदल. चव आवडली आहे. Happy
IMG-20250214-WA0001.jpg

खूप मारले हबके पण ते बधले नाही. Lol

मस्त दिसते आहे की! अनिंद्यंचाही फोटो भारी आहे!
शेंगदाण्यांची आयडिया मस्त आहे. आता मीही घालेन पुढच्या वेळी. Happy
(आणि फोटोही काढून लावेन पाककृतीवर! Proud )

कसले सुरेख फोटो. आमच्याकडे मोकळी भाजणी म्हणतात. भाजणी सरसरीत दळलेली जास्त छान. कणकेसारखी असेल तर मऊसर होते उकडीसारखी. कधी कधी दळण दळणारे सरसरीत करत नाहीत, तेव्हा उकड होते त्याची.

मी पण एक दोनदा try केली आहे ही रेसिपी.पण अस्मिता म्हणते तसे ढेकळ च जास्त झाली Sad
Perfect consistency काय जमली नाही मग नाद सोडून दिला

केया व माझ्यासारख्या ढेकळ-फ्रेंडली लोकांसाठी मला एक सोपा उपाय सुचला आहे. कणकेचा शिरा मला चांगला जमतो. भाजणीच्या पिठाचे टेक्स्चरही साधारण रव्याच्या अलिकडचे व कणकेच्या पलिकडचे असते. निदान माझ्या भाजणीचे तरी तसेच आहे. त्यामुळे फोडणीत घालताना पाणी वगळता बाकी सगळे घटक पिठात कालवून कोरडेच पीठ घालून मंद आचेवर कोमट पाणी एकावेळी थोडेथोडे घालून फुलवत नेऊन पूर्ण फुलल्यावर दणदणीत वाफ काढून घेतली तर अपेक्षित मोकळ पणा येईल असे माझे मन सांगतेय.

हो, मनच कारण करून बघितले नाही. पण आयडिया लिहायला काय जातंय. मी कधी केलीच पुन्हा तर असे करून बघेन. एकदम पाणी ओतलेल्या कणकेच्या शिऱ्याच्या चिकट आठवणी आहेत. त्यामुळे ह्या दोन्ही पाठी एकच शास्त्र वाटतंय. स्वयंपाक कला कमी विज्ञानच जास्त वाटतो म्हणून डोकं असं चालतं. करून बघणार असाल तर बघा व कळवा. Happy

मस्त फोटो अनिंद्य आणि मंजूताई. Happy
उकडपेंडी माहिती आहे, मराठवाड्यात कॉमन आहे पण आमच्याकडे आजारपणात खायचे. त्यामुळे तिची इमेजच तशी झाली.

ढेकळे का होत आहेत? Happy मायक्रोवेव्ह मधे ठेवायच्या आधी पेस्ट करून घ्यायची आहे ना त्यात ढेकळे राहू द्यायची नाहीत. नीट मिक्स करून घ्या. आणि दोन -तीनदा मायक्रोवेव करतो तेव्हा मधे मधे फोर्क ने हलवून घ्यायची व्यवस्थित. अजिबात ढेकळे नाही होत.

Happy कालवलेले पीठ एकदम स्मूद होते , नंतर गोळा सुटत नव्हता. हा प्रकार कढीसारखा नाही, शिऱ्यासारखा आहे. ही टिप कढीची आहे. मी गॅसवर केलेय.

मैत्रेयीसारखंच मलाही आश्चर्य वाटलं. प्रत्येक हीटिंग सायकलनंतर नीट ढवळून घेतलं तर माझीही नाही होत ढेकळं.

गॅसवरही परतत राहिलं तर व्हायला नकोत खरंतर. उपमा करताना नाही का फोडणीच्या पाण्यात भाजलेला रवा वैरला तर हळूहळू मोकळा (मऊ, पण मोकळा) होतो, तसंच होतं. भाजणी फाईन दळलेली असेल तर उकडीसारखी होईल.
त्यामुळेच मला असं वाटतंय की पाणी किंवा तेल किंवा दोन्ही कमी पडत असेल का?
अस्मिता, तू म्हणतेस तसा पुढच्या वेळी हळूहळू पाणी घालत फुलवून घ्यायचा प्रयोग केलास तर कसा होतो सांग. मलाही उत्सुकता आहे.

फोडणीच्या पाण्यात भाजलेलीरवा वैरला तर हळूहळू मोकळा
>>> ही स्टेप खास करून 'हळूहळू' येतच नाही ना यात. कारण आधीच कालवलेय पाणी.

मग ही उकडच झाली असेल बहुतेक. Happy

हो सांगेन, कारण तसे पर्फेक्शन सध्या तरी हमखास आणि सोपे वाटतेय. Happy

नाही नाही, ‘हळूहळू वैरला’ नाही म्हणत आहे, एकदम घातला तरी शिजतो तसा मोकळा होत जातो ना, तसं म्हणते आहे.

येस, नक्की सांग. Happy

मस्त प्रकार! वाचूनच मस्त वाटले.

=====

टीपापा वरील प्रतिसादांचीही रेसिपी असावी असेही वाटले. (हळूहळू पाणी मिसळत वगैरे)

केया, आता पुन्हा करेन तेव्हा नक्की - निदान स्टेप बाय स्टेप फोटो तरी टाकेन. Happy

बेफी, तुम्ही 'म्हणजे चांगलं म्हणतो आहे' असा डिस्क्लेमर देत जा बुवा - वाचून समजत नाही. Proud

जास्त काळजी करू नका, उकड झाली तरी खा, टेस्टी लागेल ती ही. सारखं परतत रहाणं हा वर सांगितलेला उपाय योग्य वाटतो.

>>> एका दगडात दोन पक्षी 'मोकळ' होतील
नको, गाण्याच्या नादात दोन्ही ढेकळ झाले तर टागोर माफ करायचे नाहीत मला. Proud

अंजूताई - बघा ना साधी रेसिपी किती कॉम्प्लिकेट करताहेत उगाच! Happy

एवढी चर्चा इस्रोवाले चांद्रयानासाठी सुद्धा करत नसतील. अर्थात त्यांची रेसिपी सोपी असणार.

अन्जूताई, Happy
स्वाती, Lol

मंजूताई, Happy हो.
लेखनापेक्षाही अदबशीर वागणं महत्त्वाचं आहे. आंतरिक सौंदर्याला महत्त्व देते नेहमी, त्यामुळे मनही रमत नाही अशा गोष्टींत. पिंडे पिंडे मतिर्भिन्ना ! Happy

केया, आता पुन्हा करेन तेव्हा नक्की - निदान स्टेप बाय स्टेप फोटो तरी टाकेन. >>>Okay च

सारखं परतत रहाणं हा वर सांगितलेला उपाय योग्य वाटतो.>>>>अस्मिता.. उचलूया का चॅलेंज? Happy

Pages