क्रिकेट

Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07

सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला १ गोष्ट कळत नाही आहे की सगळॅजण आपण जिंकायचा प्रयत्न करावा असे का म्हणतायत ?
>>

केदार हा लुकआउट मधील वा वैयक्तीक विचारसरणी मधील फरक आहे. रियालिटी चेक वगैरे सगळ्यांना माहित आहे. ३४० अशक्य आहेत पण विचारसरणी, अरे मेलो रे, अशी केली तर १५० ऑलाऊट होईल. जे भारताचे बरेचदा झाले आहे. मग टेस्ट द स्ट्रेन्थ हा एकच ऑप्शन राहतो. आणि + माईंडसेट असेल तर + एनर्जी पैदा होते.
रियालिटी सगळ्यांना माहिती असली तरी - एनर्जी ठेवून खेळू नये. टेस्ट ड्रा करणे हा उत्तम रिझल्ट असला तरी ड्राचे लक्ष ठेवले तर हारणार, जिंकायचे लक्ष ठेवले तर ड्रॉ होण्यास मदत होऊ शकते. Happy
आणि हा आशावाद एक मॅच जिंकल्यामुळेच आलेला आहे. त्यांचे होम पिच असले तरी आपण त्यांना त्रास दिला आहे.

पहिले सेशन बरे गेले. पण स्कोअर ७५ असायला हवा.

केदार , मी फक्त मायबोली बद्दल म्हणत नाहीये रे , एकूणच सगळ्या मिडियाने आता ड्रॉ साठी भारत च जबाबदार हा ओरडा चालू केलाय त्याबद्दल म्हणतोय .
काल अफ्रिकेने डाव घोषित न करता ३४० केल्या तेव्हा त्यानीच ही मॅच ते जिंकणार वा ड्रॉ (Batting India out of the Match) या लेवल ला आणून ठेवली हे याना कळत नाहीये की न कळल्याचे नाटक करतायत ?
हेच धोनीने केल असत तर कसला Defensive approach म्हणून सगळे ठो ठो बोंबलले असते .

केदार करेक्ट पोस्ट... हे समजवायला कोणी तरी सायको पाहिजे टीम बरोबर...
आणि बर्‍याच वेळेस "अटॅक इस बेस्ट डीफेन्स" असा विचार करुन खेळल्यास जास्त धावा होऊ शकतील.. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर धावा झाल्या तर आपोआपच द आफ्रिकेवर दडपण वाढू शकते. पण आपले बॅट्समन तसे करणार नाहीत..

काल अफ्रिकेने डाव घोषित न करता ३४० केल्या तेव्हा>> बरोबर तेंव्हाच आपला विजय झाला. स्वतःच्या गल्लीत स्मिथ चक्क घाबरला.हॅटस ऑफ टू फॅब फोर, त्यांचा दरारा आहेच तसा. (हे जरा जास्ती आणि लवकर होउ नये ही सदिच्छा). पाचव्या दिवशीही या विकेट्वर भारताला लवकर आउट करणे शक्य नाही असे त्याला वाटत असेल.
अर्थात याला कॅलिस जखमी असण, तसेच खूप गर्मी असण अशी पण कारणे असू शकतात. शेवटी नंबर एक टीम विरूद्ध सिरिज ड्रॉ केली याचाही आनंद असेल त्यांना. सो, विन विन फॉर बोथ. मार्केट साईड्वेज आहे असे म्हणायला हरकत नाही. काय केदार राव. Happy

विक्रम थोडा वेगळा विचार केला तर... स्मिथच्या मते पाचव्या दिवशी खेळपट्टी अजुन खराब होणार आहे त्यामुळे ९० ओव्हर्स इंडियन टीमला बाद करायला पुरे असेही असू शकते.. कारण स्टेन आणि मॉर्कल दोघीही भन्नाट गोलंदाजी करतायेत आणि त्यांना त्सोत्सोबे साथ पण तितकीच देतोय.. अ‍ॅक्च्युली बघाता कुठलीही थेअरी कधीही बुमरँग होऊ शकते हेही तितकेच खरे...

गंभीरचं परत एक अर्ध शतक... ह्यावेळेस री शतक व्हायला पाहिजे...

सामना अनिर्णीत होण्याच्या दिशेने चाललेला आहे. उरलेल्या ४८ षटकात २५४ धावा अशक्य आहेत. क्रिकेटविश्वातल्या पहिल्या २ संघांनी इतका बचावात्मक खेळ करणे हे त्यांच्या स्थानाला शोभत नाही. स्मिथने डाव वेळेत घोषित केला नाही व भारतही जिंकण्याचा प्रयत्न करताना कधीही दिसला नाही.

Pavan Aditya: "I rather feel yesterday was an anti climax when the Proteas continued to bat till the day end. We have no choice left for today.">>>> espncricinfo

>> उरलेल्या ४८ षटकात २५४ धावा अशक्य आहेत
मास्तर, ९० ओव्हरीत ३४० सुद्धा अशक्यच होत्या... म्हणजे ३.५ पेक्षा जास्त रनरेट झाला. या सामन्यात आत्तापर्यंतच्या कुठल्याही इनिंगमधे इतका रनरेट गाठलेला नाही.

मला १ गोष्ट कळत नाही आहे की सगळॅजण आपण जिंकायचा प्रयत्न करावा असे का म्हणतायत ? >> खरय भाउ. तसे करताना हरले "Safety First" एव्हढे कळत नाही का?" असे म्हणणारेही असतील. जर स्टेन मॉर्केल असताना स्मिथ रिस्क घेत नाही ह्यातच सगळे आले. शेवटची इन्निंग म्हणून स्टेन चवताळला तर १-२ विकेट्स अशाच जाऊ शकतात असा तेंव्हा त्या गेल्या आहेत असा विचार करून आपण खेळत असू शकू.

पहाटे बघता बघता शंभर दीडशे धावा झाल्या होत्या. फक्त चेंडू टाकायची खोटी की गेलाच तडी पार! कधी सगळ्यांच्या डोक्यावरून लेग ला तर कधी जमिनीवरून ऑफ ला. दुर्दैवाने एका उसळत्या चेंडूला मारायच्या नादात तोल गेला, खाली पडलो, नि नि

जाग आली!

लगेच बघतो तो काय. सेहवाग, द्रविड आउट नि धावा फक्त १०८!

जाउ दे. परत जाउन झोपावे झाले!!

सामना अनिर्णित राहिला तर द. आफ्रिका आनि स्मिथला कालचा किमान एक तास भारताला फलंदाजी द्याविशी न वाटता स्वतःची बाजू भक्कम करावीशी वाटली यात भारतीय संघाचा नैतिक विजय आहे असे म्हणायचे, आणि द. अफ्रिका जिंकले तर स्मिथचा आपल्या गोलंदाजांवर ते भारताला एका दिवसात सर्वबाद करतील असा विश्वास होता असे म्हणायचे.
देखे ऊंट किस करवट बैठता है|

साहेब आले आणि बचावात्मक खेळतायेत... कदाचित जाणार शिंपल्याच्या आत. मग संपलेच सगळं... पुढच्यांना प्रचंड अवघड होऊन बसते अश्या वेळेस.. बॉलर डोक्यावर बसतात..

३४ कशाला अजून साधारण २५ षटकं... काहीच घडत नाही असे वाटले तर अंपायरच मॅच ड्रॉ घोषित करतील...

३४ षटकात २२६. २०४ चेंडूत २२६.
बेसबॉलमधे पिंच हिटर असतो, तसे इथे कोहलि, युवराज सिंग यांना आणता येईल का? ३४ ऐवजी २० षटकात २२६. हाकानाका! फार तर ३० षटकात.

>>> मास्तर, ९० ओव्हरीत ३४० सुद्धा अशक्यच होत्या...

जिंकायचा पुसटसा सुध्दा प्रयत्न या प्रथम क्रमांकाच्या संघाने केला नाही याचे वाईट वाटते.

जिंकायचा पुसटच्या प्रयत्नात घसघशीत हार नको म्हणून असेल कदाचित.. कारण मॅच हारली तर सिरीज जातीये..
रच्याकने ३ गेले... आता मॅच बचाव स्पेशालिस्ट आलेत.. ते काय करतात ते बघायचं.. साहेब फारच शिंपल्याच्या आत घुसलेत... कधी शिंपला बंद होईल सांगता येत नाहीये..

>>जिंकायचा पुसटसा सुध्दा प्रयत्न या प्रथम क्रमांकाच्या संघाने केला नाही याचे वाईट वाटते.

खरच.... सहवागसकट सगळे आज रवी शास्त्री, गावस्कर स्टाईलचे क्रिकेट खेळतायत Sad
एका दिवसात ३००+ टारगेट असताना २२-२५ च्या घरात स्ट्राईक रेट सगळ्यांचे.... श्या!

गंभीर गेला.... आता लक्ष्मण झिंदाबाद!

अहो गुरुजी.. पीच बघा... बॉलींग अटॅक बघा आणि मग बोला... तो स्टेन तिकडे स्टेनगन सारखा थडथडतोय... थोडा जरी वाकडातिकडा गेला की दांडी गुल व्हायची.. अर्थात भज्जीचं नशीब लई जोरावर होतं म्हणून तो वाचला परवा.. अर्थात सुरुवातीलाच धडाकेबाज फलंदाजी केली असती तर कदाचित मॅच जिंकण्याचे प्रयत्न पुढेही चालू ठेवता आले असते.. वनडे असो वा टेस्ट.. एका बॉलर खच्ची केला की त्याला परत लायनीत यायला वेळ लागतोच.. पण आपल्या लोकांनी ते ही केले नाही हे फार वाईट..

मास्तर, तुला काय वाटतं? मुद्दामहून जिंकायचा प्रयत्न नाही केला? मला नाही वाटत तसं. विकेट्स हातात ठेवून वेगाने धावा काढणं जवळपास अशक्य आहे त्यांच्या बोलिंगसमोर आणि त्या पीचवर. तो स्मिथ बोलिंगला आल्यावर धुतलाच की त्याला. उगीच वाटेल तो बॉल मारायला गेले तर हाराकिरीच होईल ना? आणि आपण पूर्वी शक्य होतं तेव्हा जिंकायचा प्रयत्न केला आहे आणि जिंकलो पण आहोत काही वेळा. माझ्या मते योग्यच खेळले आहेत. आपली पूर्वीची टीम असती तर सामना ३/४ दिवसात आपण हरलो असतो.

ओव्हरमध्ये सरासरी २ धावा सुध्दा करता येऊ नये इतकी बॉलिंग भेदक होती का?

हॅरिस (२३-१४-२२-०) आज बापू नाडकर्णीचं कानपूरमधलं रेकॉर्ड (Kanpur 32-24-23-1) मोडणार बहुतेक.

लक्ष्मण आणि सचिन ह्यांना त्या पॉल हॅरीस ने जवळच्या क्षेत्रात ६ खेळाडू ठेवावेत आणि त्या दोघांनी कंडिशन न डिक्टेट करता हे चालवून घ्यावे. ह्या प्रकाराने मन उद्विग्न झाले आहे.

एक नक्की .. पीच अतिशय अवघड आहे हाणामारी करण्यासाठी.. बाउंस पाहिला का? कसाही उडतोय ... वेगात ब्याट वर पण येत नाहीये..

तरीही वाटतंय थोडंसं की आपण जरा जास्तच बचावात्मक खेळतोय.. जिंकण्यासाठी खेळलो नाही तरी अजून थोडा वेग वाढवू शकलो असतो... २ चा पण रन रेट नाही.. मेडन वर मेडन...

अरे त्या हॅरिस सारख्या स्पिनरची बोलिंग पण मारता येत नाहीये यावरून काय ते ओळख ना! आपण स्पिन बोलिंग तर नक्कीच चांगलीच खेळतो.

हॅरिस निलाजर्‍यासारखा सतत "वाईड" रेषेजवळ नकारत्मक गोलंदाजी करत होता यावर कुणालाच कांही बोलायचे नाही का ? तसल्या चेंडूंच्या मागे धावून आपले खेळाडू बाद झाले कीं "हॅरिस ह्याना टेंप्ट करतोय हेही ह्यां मूर्खांच्या लक्षत आलं नाही" म्हणायला आपण मोकळे !आणि हो, कृपया बापू नाडकर्णी व हॅरिसची तुलना नका करू;बापू पर्फेक्ट गुड लेंग्थवर, पेर्फेक्ट फ्लाईट देवून अचूक व सतत चेंडू टाकून फलंदाजाना हतबल करत असे.वाईड टाकून नव्हे !!

Pages