Submitted by बागुलबुवा on 3 August, 2010 - 13:43
मला मोबाईल हॅन्डसेट घ्यायचा आहे. माझ्या अपेक्षा अश्या आहेत.
1. दोन सिम्स, एकदम चालु असलेली.
2. नेट कनेक्टिव्हीटी असावी.
3. कॉर्पोरेट / सोबर लुक
4. फोनबुक, समस व इतर बॅकअप घेण्याची सोय.
5. फेसबुक, जीटॉक व मेल्स पहाण्याची सोय.
6. क्लिअर साउंड.
7. एक्स्पान्डेबल मेमरी
8. वर्ड, एक्सेल व इतर ऑफिस फाईल्स बघता येण्याची सोय.
9. चांगला सर्व्हीस बॅकअप
मला चांगले मॉडेल सुचवू शकाल काय ? साधारण काय बजेट ठेवावे ?
नेट वापरण्यासाठी (सोशल साईट्स व मेल्स साठी) कोणत्या सर्व्हिस प्रोव्हायडरची सर्व्हीस चांगली आहे ?
यापूर्वी तत्सम प्रश्न विचारला गेला असल्यास कृपया त्याची लिंक द्यावी.
तसेच घरी वापरण्याकरता नेट सर्व्हीस कुणाची घ्यावी ?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इथे कुणीच Xiomi M3 बद्दल कसे
इथे कुणीच Xiomi M3 बद्दल कसे काय बोलत नाही आहे. १४००० रुपयात मिळत असलेल एकदम हॉट्ट सेलिंग फोन असुनही.
केपी तो फोन मिळतच नाहिये
केपी तो फोन मिळतच नाहिये म्हणून कोणी बोलेना.
झिओमी आता नवा स्मार्टफोन -
झिओमी आता नवा स्मार्टफोन - झिओमी रेडमी १S लाँच करत आहे. किंमत Rs. ५९९९. फोन खरेदीसाठी फ्लिपकार्टवर नोंदणी करावी लागणार.
आजचा देखील स्टॉ़क संपला
आजचा देखील स्टॉ़क संपला म्हणुन मेसेज आलाहे नेमकं किती फोण विकत आहेत हेच कळेना.
गोलमाल है भाइ
शिओमि रेडमि 1S विषयी इथेवाचा.
शिओमि रेडमि 1S विषयी
इथेवाचा.
easily मिळतो का?
4.4.4 kitkat madhe update kay
4.4.4 kitkat madhe update kay ahe??? Mhanje kay navin features ahet ka?
बरेचसे फिचर्स इकडेतिकडे
बरेचसे फिचर्स इकडेतिकडे वाढवलेत, सुधारलेत, स्ट्रीमलाईन केलेत. माझ्यामते ओएस ची फूटप्रिंटही कमी आहे. रॅम मॅनेजमेंट सुधारलं आहे. हे ऐकलेलं. अनुभव नाही.
कोणताही मोबाइल घेताना सर्विस
कोणताही मोबाइल घेताना सर्विस सेंटर हा क्रायटेरिया बघू नका. बंगळुरू मध्ये सॅमसंग सारख्या कंपन्यांच्यी सर्विस सेंटरची बोंब आहे, तिथं बाकिच्यांचं काय. त्यापेक्षा कोपर्यावरच्या मोबाईल शॉपीमध्ये कमी पैश्यात, खात्रीपुर्वक दुरुस्ती होते.
मी घेतलेला धडा. वॅल्यु फॉर मनी म्हणत दहा-बारा हजार किंवा त्यापेक्षा कमी किमतीचा स्मार्ट फोन घेउ नका. त्यात वापरलेले सगळे पार्ट्स हाय एंड प्रिमियम फोनच्या (एचटीसी, आयफोन, लिनोव्हो, सॅमसंग, सोनी, एल्जी) प्लांटने रिजेक्ट केलेली किंवा तिथंली क्वालिटी मेंटेन न केलेले असतात. हे पार्टस अॅपल सोडून जवळ जवळ सगळ्या कंपन्या वापरात. सॉफ्टवेअर्स बीटा वर्जन्स असतात, सपोर्ट नसतो आणि मार्केटींगसं असं तंत्र हिंदी चित्रपटा प्रमाणे असतं ज्यात फोन कसाही असला तरी पहिल्या दोन-तीन आठवड्यात कमितकमी मुद्दलतरी निघेल एव्हडी शाश्वती असते.
हे फोन शाळा-कॉलेज मधल्यांसाठी किंवा तत्सम लोकांसाठी ठिक असतात. पण आपण जर सिरीयस युजर्स असाल तर एकवेळ बटणं असलेला मोबाईल घ्या पण असले फोन घेउ नका. फोन मध्ये अगदी कमी फिचर्स असली तरी ती खणखणीत चालणारी असावीत. उदाहरण म्हणून, कॅमेरा असेल तर तो कमीतकमी १० एम्पीचा असावा. ७२० पीचा विडिओ रेकॉर्ड करता येणारा असावा, एलीडी फ्लॅश असावा, ऑटो फोकस असावा. (म्हणजे थोडक्यात मोबाईल स्टॅडबाय मोड मध्ये असेल तर चांगला फोटो काढायाला दोन-तीन सेकंदापेक्षा जास्त वेळ लागू नये).
मी वनप्लसवन घेण्याचा विचार करतोय.
कैमऱ्याची खरी चाचणी फोटोची
कैमऱ्याची खरी चाचणी फोटोची प्रिँट काढल्यावरच होते .अथवा मोठ्या स्क्रिनवर पाहिल्यावर होते .कैमरा बटण असणे फारच फायदेशिर असते विशेषत: स्वत:चा फोटो पटकन काढता येतो .रेल्वेतून फोटो काढताना ऑटोफोकसपेक्षा फिक्सफोकस कामी येतो .
मोटो जी घ्यायला गेले तर विजय
मोटो जी घ्यायला गेले तर विजय सेल्सवाले म्हणालेकी ते ,मोटो जी ठेवत नाहीत. एल जीचा एल ९० कसा आहे?
LG L90 बद्दल मागच्या पानावर
LG L90 बद्दल मागच्या पानावर मी लिहिलं आहे... पैसा वसूल अनुभव आतापर्यंत
मला माझ्या सासर्यांचा फोन
मला माझ्या सासर्यांचा फोन गिफ्ट करायचा आहे.
१२००० -१३००० बजेट आहे...
उत्तम कॅमेरा , उत्तम साउंड क्वालिटी आणि बेसिक व्हॉट्स अॅप वगैरे साठी लागतो त्याना.
कॅमेरा चांगला असणे हीच मुख्य अपेक्शा आहे...
मला प्लीज सुचवा चांगला फोन.
मोटो, सॅमसंग मध्ये
मोटो, सॅमसंग मध्ये मिळेल.
मोटो जी (सेकन्ड जनरेशन) आला आहे. ऑर्डर इथे करता येईल.
Micromax cha octa core
Micromax cha octa core processor असलेला 13000 ला मिळतोय
मोटो जी स्वतः साठी ,आणि
मोटो जी स्वतः साठी ,आणि आईसाठी मोटो ई घेतला.
अतिशय सुंदर फोन.
व्हॅल्यु फॉर मनी.
शीओमी /वनप्लसवन वाले वाट बघत
शीओमी /वनप्लसवन वाले वाट बघत बसा कधी मोबाईल येतो आणी कधी त्यांचा नंबर येतो त्याची..
मुग्धानंद, मोटो ई घ्यावा असं
मुग्धानंद, मोटो ई घ्यावा असं इथली चर्चा वाचून नक्की करावंसं वाटतं आहे. कसा आहे तुझा फीडबॅक?
सहज ट्राय करत होतो तर शीओमी
सहज ट्राय करत होतो तर शीओमी रेड मी अलॉट झालाय आणी आज रात्री १२ पर्यंत कार्ट मध्ये राहील असा मेसेज आलाय पण मला नकोय तो, एम आय ३ येईल परत तेव्हा बघु
वरदा, वर मी दिलेल्या लिंक
वरदा, वर मी दिलेल्या लिंक मधला मोटो जी २ ही पाहा एकदा. त्याच किंमतीत जास्त फिचर्स आहेत.
मोटो ई ७००० चा आहे ना?
मोटो ई ७००० चा आहे ना? मोटोजी२ जास्त किंमतीचा दिसतोय
samsung s4 मिनी कसा आहे?
samsung s4 मिनी कसा आहे? तुलनेने S4 पेक्षा स्वस्त आहे आणि मुख्य म्हणजे साईझ लहान आहे (हातात किंवा जीन्सच्या खिश्यात मावण्याइतका)
वेदिका, एस४ मिनी ज ब र द स्त
वेदिका, एस४ मिनी ज ब र द स्त फोन आहे. १.५ जीबी रॅम, १६ जेबी मेमरी, १.७ की तसला ड्युअल कोअर प्रोसेसर. एकदम परवडेबल डील १४५००/- ला. ऑफिसात वापरतोय एकजण.
मोटो जी ... मोटोरोलाने
मोटो जी ...
मोटोरोलाने त्यांची भारतातली मार्केटिंग हपिसे दोन चार वर्षांपूर्वीच बन्द केलीत. त्यामुळे त्यांणा विकायला एजन्ट नाहीत. म्हणून त्यांची सर्व विक्री ऑनलाईन होते.
त्यामुळे मोटो, सॅमसंग मध्ये मिळेल. या योकु यांच्या विधानाशी असहमत
मोटो जी आणि ई ची अधिकृत
मोटो जी आणि ई ची अधिकृत विक्री फक्त ऑनलाईन फ्लिपकार्ट मार्फत होते. दोन्ही अतिशय उत्तम फोन आहेत. स्वानुभव.
मला ब्याकअप फोन म्हणून एक
मला ब्याकअप फोन म्हणून एक साधा फोन घ्यायचा आहे , बजेट जास्त नाही रु 3000 पर्यंत. मला ही फिचर्स मिळाली तर हवी आहेत. (यादी प्राधान्य क्रमाने)
एखादे मॉडेल सुचवा.
आय फोन ६ भारताबाहेर घेतला तर
आय फोन ६ भारताबाहेर घेतला तर भारतात येउन अनलॉक करता येतो का? करावा का? कसा ?
कुठल्याही सिंध्याच्या मोबाईल
कुठल्याही सिंध्याच्या मोबाईल दुकानात जा. करून मिळेल.
पण अनलॉक केल्यावर अपडेट
पण अनलॉक केल्यावर अपडेट करता येतो का
जेलब्रेक केलेला परत जेलमधे
जेलब्रेक केलेला परत जेलमधे घालून अपडेट करता येईल. पण दरम्यान कोअरमधे केलेल्या (केल्या असतील तर) सर्व काड्या रोल बॅक कराव्या लागतात.
ते एक राज म्हणून आहेत. त्यांना आयफोन व अॅपल प्रॉडक्ट्सची चांगली माहिती आहे असे त्यांच्या प्रतिसादांवरून वाटते. अधिक माहिती ते साम्गू शकतील.
मी काड्या करायला लागणारे
मी काड्या करायला लागणारे सल्ले देत नाहि.
इन्ना, तुमच्या प्रश्नांची उत्तरं - हो; नाहि; नॉट वर्थ अँट द कॉस्ट ऑफ फ्युचर अपडेट्स...
इन्ना .. इतकं झंझट नको म्हणुन
इन्ना .. इतकं झंझट नको म्हणुन अनलॉक्डच घेतला होता मी .. आता ६ पण घेणारेय
इब्लीस , राज धन्यवाद चनस इथे
इब्लीस , राज धन्यवाद
चनस इथे जपानात १९९ $ किंमत पाहून मोह झाला.
अनलॉ़क्ड चौपट आहे.
अजून एक बेसिक शंका , जीएसएम अन सीडीएमे अॅपल च्या कोणत्याही मॉडेल वर चालतात का ?
सेम हिअर..
सेम हिअर..
ऑनेस्टली, १९९ डॉलर्स म्हणजे
ऑनेस्टली,
तेव्हा, बिन्धास्त घेऊन टाका अन जेलब्रेक करून वापरा. नवं अपडेट येईपर्यंत फेकून दिलात तरी परवडेल.
)
१९९ डॉलर्स म्हणजे १२ हजाराच्या आसपास.
तेवढ्यात मायक्रोमॅक्स कॅनव्हास एचडी येतो.
(फेकाल तेव्हा व्यनि करा, मज गरीबाचा पत्ता कळवतो.
इब्लिसकाका .. गुड डील
इब्लिसकाका .. गुड डील

मला वाटतं कॉल रेकॉर्डीँग बंद
मला वाटतं कॉल रेकॉर्डीँग बंद झाले आहे. कॉनफ्रँन्स कॉलसाठी मात्र आहे. कार्बनच्या अगोदरच्या K20+, K9, K52 जंबोमध्ये आहे (WAV file). स्पष्ट आहे. खात्रीशिर वायफाइ हॉटस्पॉटसाठी नोकिआच गाठावा लागेल आणि तो ३हजारात मिळणे कठीण आहे.
>>>> मला ब्याकअप फोन म्हणून
>>>> मला ब्याकअप फोन म्हणून एक साधा फोन घ्यायचा आहे , बजेट जास्त नाही रु 3000 पर्यंत. मला ही फिचर्स मिळाली तर हवी आहेत. (यादी प्राधान्य क्रमाने)
वाय फाय म्हणजे फोन वरुन इंटर नेट लॅपटॉप / पीसी मध्ये घेता आले पाहीजे.
अॅटोमॅटिक कॉल रेकॉर्डींग
ड्यएल सीम <<<<
सापडला रे... लेनेवो 269 रु 3000 (3.5इंच,जिंजरब्रेड) आणी लेनेवो 369 4200 (4 इंच,जे512/4 जीबी जेलीबीन)... सग्ळ आहे , कॉल रिकार्डींग एकाद्या अॅपच्या माध्यमातून होईल, 369 ऑर्डरला उद्या मिळणार...
>>>> मला ब्याकअप फोन म्हणून
>>>> मला ब्याकअप फोन म्हणून एक साधा फोन घ्यायचा आहे , बजेट जास्त नाही रु 3000 पर्यंत. मला ही फिचर्स मिळाली तर हवी आहेत. (यादी प्राधान्य क्रमाने)
वाय फाय म्हणजे फोन वरुन इंटर नेट लॅपटॉप / पीसी मध्ये घेता आले पाहीजे.
अॅटोमॅटिक कॉल रेकॉर्डींग
ड्यएल सीम <<<<
सापडला रे... लेनेवो 269 रु 3000 (3.5इंच,जिंजरब्रेड) आणी लेनेवो 369 4200 (4 इंच,जे512/4 जीबी जेलीबीन)... सग्ळ आहे , कॉल रिकार्डींग एकाद्या अॅपच्या माध्यमातून होईल, 369 ऑर्डरला उद्या मिळणार...
Suhasg अनुभव लिहाल का ?
Suhasg अनुभव लिहाल का ?
>> Suhasg अनुभव लिहाल का ?
>> Suhasg अनुभव लिहाल का ? <<<
एस.आर.डी. : आज ( ३ आक्टो) संध्याकाळी डिलीव्हरी देणार असे अमेझॉन वाले म्हणताहेत. रिव्हूज चांगले आहेत.
२ मेगापिक्सल चा दळभद्री क्यामेरा आहे : राम कमी आहे , गोरिला ग्लास नाही हे नाही आणि ते नाही पण रु ४००० किंमत आहे तेव्हा त्या हिषेबातच सर्व पहायचे , १०/१५/४०/४५ हजाराच्या फोन्सची तुलना करायची नाही म्हणजे झाले.
पण ड्युएल कोर , ५१२ / ४ जिबी , माय्क्रो एस्डी , वायफाय , ४ इंच स्क्रिन , द्युएल सिम (नेहमीचा साइज) , दणकट बाडी, , अन्डोइइड जेलीबीन, लेनेवो ब्र्यान्ड ! ४००० मध्ये मिळतेय , बास झाले.की . नाहीतरी मला हा फोन ब्याक अप म्ह्णूनच वापरायचाय.
या फोनचाच एक लहान भाऊ A269 रु 3000 (3.5इंच,जिंजरब्रेड) आहे, आधी तोच घेणार होतो पण थोडे बजेट वाढवले (होऊदे खर्च!) . मी जो सर्च केला त्यानुसार 3/4 हजारात इतके सर्व देणारे ब्रांडेड फोन नाहीतच.सोणी, नोकीया , शामसिंग मध्ये तर नाहीच नाही .
फोन हातात पडला की थोडा वापरुन आणखी अपडेट्स देतो.
suhasg आता तुमचे कॉल
suhasg आता तुमचे कॉल रेकॉर्डीँग अॅप डाऊनलोड केल्यावर होणार. कोणत्या फॉर्मेटमध्ये होते आणि ती क्लीप इमेल करता येते का ते पाहा. शिवाय तो फोन सिक्यु० लॉक ठेवावा लागेल कारण हे संभाषण खासगी स्वरुपाचे असणार. रेकॉर्डीँगला प्राधान्य आहे नाहीतर नोकिआचे ५२५, ५३० आणि अॅँड्रॉ वाला X2 घेऊन एक चांगला कैमरा म्हणूनही यांची किंमत पूर्ण मोबदला देते.
एस.आर.डी. : धन्यवाद. तसे कॉल
एस.आर.डी. : धन्यवाद. तसे कॉल रेकॉर्डिंग माझ्या सध्याच्या शामसिंग ओमनिया या विंडोज फोन मध्ये होते आहेच, दर्जा उत्तम आहे, त्या शिवाय माझ्या कडे लॅन्ड्लाईन वरचे कॉल्स रेकॉर्ड करायचे उपकरण आहे , त्याचा दर्जा तर लै भारी, अतिउत्तम (प्रोफेशनल ग्रेड) पण रेकॉर्डिंग ऑडिओ कॅसेट वरच होते , नंतर ते डिजीट्ल फॉरमॅट मध्ये आणावे लागते सध्याअ तोच एक महा उपद्व्याप होऊन राहीला आहे. पूर्वी हौसेने हा उपद्व्याप करत होतो (त्यासाठी लागणारी खास सॉफ्ट्वेअर्स ही आहेत माझ्या कडे) पण आता तेव्हढा वेळ मिळत नाही, पण आजही महत्वाच्या कॉल साठी तेच वापरतो.
आपण सुचवलेले नोकिया 525,530 , X2 चांगलेच आहेत पण बजेट्चा विचार ही करावा लागला. आखूड शिंगी , , बहु दुधी , कमी खाणारी वर जास्त शेण देणारी अशी गाय / म्हैस बघत होतो , पण नाय भेटली , जाव दे.
कॉल्स रेकॉर्ड साठीचा एक नवाच सेट अप उसगावातून आणण्याची तयारी करत आहे .जरा खर्चिक आणि वेळकाढू प्रस्ताव आहे , बघुया कसे काय जमते ते.
जुना सिरिज वाय चा सॅमसंग
जुना सिरिज वाय चा सॅमसंग वापरत होते इतके दिवस. सॅमसंग व्हॉईस क्वालीटी अत्युत्तम आहे. आता नवीन सॅम्संग हवाय पण स्वस्तात स्वस्त. स्क्रीन मोठा नसलेला चालेल. कॅमेरा पण भारी नको. स्मार्ट फोन कोणता घ्यावा?
suharg धन्यवाद. लैंडलाइन
suharg धन्यवाद. लैंडलाइन स्पिकरवर टाकून शेजारी ओम्निआचा साउंड रेकॉर्डर चालू करून पाहा कसे रेकॉर्डिँग होते ते. AMR पेक्षा WAV फॉर्मेटचे चांगले होते. थेट डिजिटलच मिळेल. नंतर सा०रे० ची शॉर्टकट की केलीत तर प्रत्येकवेळी मेनू-ऑप्शन करावे लागणार नाही.
कार्बन टायटॅनिअम ऑक्टेन कसा
कार्बन टायटॅनिअम ऑक्टेन कसा आहे?
आणि टायटॅनिअमचाच एस ७?????
मेड इन चायना फोन घेताय? जरा
मेड इन चायना फोन घेताय? जरा हे वाचा....
मी नुकतेच दोन फोन खरेदी केले , लेनेवो आणि जिओनी ( Gionee ) . त्यातला जिओनी बाबतचा हा अनुभव.
हा जिओनी फोन घ्यायच्या आधी फक्त 4 दिवस आधी मी 'आयडिया' चे एक नवीन सिम कार्ड पण घेतेले होते, माझ्या नेहमीच्या (शामसिंग) फोन मध्ये हे सिम कार्ड घालून 'आयडिया टेलीफोन व्हेरीफिकेशन' द्वारा हे कार्ड चालू (अॅक्टीवेट) करुन घेतले व हे सिम काढून बाजूला ठेवले होते. .
जिओनी चा फोन घेतल्यावर हे नवे कोरे सिम कार्ड त्यात घातले.फोन नवा असल्याने काही वेळ त्यातली फिचर्स तपासण्यात वेळ गेला, फिचर फोन असल्याने जुजबी इंटर्नेट ही होते , ते तपासले. माझा मराठी ब्लॉग व्यवस्थित (मराठीतून) दिसला . छान !
फोन चार्जिंग ला लावला, पाच मिनीटात एक एसेमेस आला " वेलकम टू जिओनीज वर्ल्ड , ....." मला आश्चर्य वाटले, जिओनीकडून आलेला अधिकृत मेसेज आहे, पण जीओनीला माझा नंबर कसा मिळाला?
कारण हे सिम कार्ड एकदम नवे, एकही कॉल केला / घेतला नाही, (आयडिया टेलीफोनीक व्हेरिफिकेशन चा एक कॉल वगळता) , एकही एसेमेस केला / घेतला नाही, कोणालाही (मी स्वत: सोडून) हा नंबर माहीती असायची सुतराम शक्यता नाही. ज्या दुकानातून हा फोन घेतला त्याला हा नंबर दिला नव्हता. मग एसेमे पाठवायला , जिओनी ला माझा हा नवा कोरा फोन नंबर मिळालाच कसा?
हा नंबर माहीती असल्याची शक्यता असलेले दोघेच एक मी स्वत: , दुसरी शक्यता 'आयडिया' पण हे सिम कार्ड मी जिओनी फोन मध्ये टाकणार आहे असे स्वप्न 'आयडिया' ला नक्कीच पडले नसणार ,आयडीया जिओनि ला माझा हा नवा नंबर कळवणार नाही.
जिओनि ला माझा हा नवा नंबर कळायचा एकच मार्ह असू शकतो , मी जेव्हा इंटरनेट वापरले तेव्हा माझ्या ह्या जिओनी फोन ने माझी माहीती (फोन नंबर) जीओनी कंपनीला ला कळवली असणार !
हे जर असे असेल तर हा मोठा धोका आहे ! आज माझा नंबर मला न विचारता परस्पर कळवला गेला , उद्या माझ्या फोन मधील ईतर माहीती (कॉन्टॅक्ट्स, कॉल लॉगज , एसेमेस इ) पण कळवली जाईल !!!!
असाच संशय दुसर्या चायना फोन कंपनी 'झिओमी' बद्दल व्यक्त केला होता आणि 'झिओमी' नेही ते मान्य केले आहे असे वाचल्याचे आठवते.
कोणाला हा अनुभव आला आहे का? जिओनी ला माझा फोन नंबर अवगत व्हायचा दुसरा कोणता मार्ग असू शकेल का? या बद्दल आपल्याला योग्य त्या अॅथोरिटी कडे तक्रार करता येईल का? तुमचे काय मत आहे !
फोन सुरु केल्यावर त्यात एक
फोन सुरु केल्यावर त्यात एक लायसेन्स अॅग्रीमेंट येते ते सगळे वाचले गेले होते कां??
कार्बनचे फोन एकूणात कसे आहेत?
कार्बनचे फोन एकूणात कसे आहेत? सर्विस सेंटर वगैरे?
Karbonn Titanium S29 Elite आणि Karbonn Titanium Octane हे मॉडेल्स बरे वाटतायत. S29 ची बॅटरी चांगली आहे.
Karbonn Titanium Octane
Karbonn Titanium Octane मलाही चांगला वाटला.
आमच्या घरी २ कार्बन आहेत. पैकी आईचा फोन आणल्या दिवसापासून मस्तय .
बहिणीचा तिने इतक्यांदा पाडलाय की आता त्याची आवाज कमी जास्त करायची बटणं पडून हरवलीयेत.
बॅटरी खराब झालीये
एकंदरीतच मायक्रोमॅक्स
एकंदरीतच मायक्रोमॅक्स ,कार्बन, झोलो, लावा या कंपन्यांनी नोकिया सॅमसंग सोनी मोटोरोला एपल आयफोन इत्यादी ब्रँडच्या नावाखाली नफेखोरी करणार्या कंपन्यांना' ईमानदारीत' किंमती ठेवायला भाग पाडले आहे. सॅमसंगची मस्ती जास्त उतरलेली नाही ,पण सुधारले नाहित तर त्यांचा लवकरच नोकिया होणार आहे.
Pages