गणेशोत्सव २०१० स्वयंसेवक घोषणा

Submitted by रूनी पॉटर on 27 July, 2010 - 15:49

मायबोली गणेशोत्सव २०१० साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी या धाग्यावर आपली नावे कळवा. गणेशोत्सवासाठी साधारण महिनाभर दिवसातली काही मिनिटे ते काही तास इतका वेळ द्यावा लागेल. इथे नाव दिलेल्या सभासदांशी संयोजक संपर्क साधतील.
गणेशोत्सवातील कामाचे साधारण स्वरूप हे वेगवेगळ्या स्पर्धा तसेच कार्यक्रम आयोजित करणे, त्यासाठी प्रवेशिका मागवणे, स्पर्धेचा निकाल जाहीर करणे असे असेल.
या उपक्रमांत मर्यादित सदस्यांची आवश्यकता असल्याने सर्व इच्छुक सभासदांना एकाच वेळी सहभाग घेता येईल असं नाही. या आधी अश्या उपक्रमात भाग न घेतलेल्या सभासंदांनी जरूर सहभागी व्हावे, त्यांना मंडळात प्राधान्य दिले जाईल.

*******************

मायबोली गणेशोत्सव २०१० संयोजक मंडळ खालील प्रमाणे असेल

मुख्य संयोजक - आऊटडोअर्स
इतर संयोजक मंडळ - अंजली, ज्ञाती, पूर्वा, मन-कवडा, मिनी, मिनोती.

संयोजक मंडळाचे अभिनंदन आणि गणेशोत्सव संयोजनासाठी हार्दिक शुभेच्छा. Happy
|| गणपती बाप्पा मोरया ||

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुब्बी.. त्यालाच स्पेशल शुभेच्छांची गरज आहे.. Proud

पन्ना बघा अजून मु.सं. गिरी करत लोकांना कामाला लावत्ये.. Proud
रच्याकने, पुढच्यावर्षी सायो का मु.सं. ???
घराणेशाही हाय हाय !! Proud

मुख्य संयोजक, अभिनंदन Happy
आम्हीही हाकेच्या अंतरावर आहोत....
........ प्रसादाच्या वेळी बोलवा..

उपसंयोजकांचेही अभिनंदन + शुभेच्छा!

संयोजक मंडळाचे अभिनंदन....
छान छान स्पर्धांची वाट बघतोय Happy

संयोजंकासाठी काही नम्र(?) सुचना.

१. रोज रात्री १० वाजल्यावर बॅन्ड बदं करणार असाल तर सामुहिक (म्हणजे मी एकटाच) मायबोली गणेशोत्सवावर बंदी घालनेत येईल. बॅन्ड वाजलाच पाहिजे. हवे असेल तर नाशिक ढोल ताशाची फाईल मी उपलब्ध करुन देईन.
२. नाच करन्याचा स्मायली ह्या १० दिवसात उपलब्ध करुन देण्यात याव्यात. त्यात पारंपारीक गणपती डान्स सामील असावा.
३. मिरवणूकीत गुलाल जास्त उधळला गेला तरी कुरबुर ऐकन्यात येणार नाही. गुलाल उधळण्याचा स्मायली पुरवण्यात याव्यात.

Happy

गणपती बाप्पा

किश्या, सगळ्यात वरचं वाचा बघू>>>
कश्या साठी? मला अस म्हनायच आहे कि मला स्वयंसेवक व्हायला आवडेल? म्हानुन मि माझे नाव दीले आहे?

संयोजंकासाठी काही नम्र(?) सुचना >>> Lol

वाट पाहतोय आता धमाल गणेशोत्सवाची. नवीन स्पर्धा घ्या पण ते छायाचित्रांचा झब्बू प्रकरण तेवढं असू द्या बरं का संयोजक Happy

सर्व संयोजकांचे अभिनंदन Happy

आता संयोजकांनी "प्रकाशचित्र" स्पर्धेचे विषय लवकर जाहिर करा Happy
जर नसतील फोटो तर काढता येतील आणि जर असतील तर ते स्पर्धेपर्यंत राखुन ठेवता येतील Wink (एकदा प्रदर्शित झालेले फोटो परत स्पर्धेसाठी देता येत नाहीत ना :().

नमस्कार
गणेशोत्सवाच्या काळात संयोजक मंडळात काम करण्यासाठी भारतातील कोणी तयार असेल तर एका स्वयंसेवकाची आवश्यकता आहे. नाव देणार्‍या आयडीने गणेशोत्सवाचे १२ दिवस (भारतातल्या) दिवसभर गणेशोत्सवाच्या कामासाठी मायबोलीवर ऑनलाईन असणे अपेक्षित आहे.
धन्यवाद

Pages