गणेशोत्सव २०१० स्वयंसेवक घोषणा

Submitted by रूनी पॉटर on 27 July, 2010 - 15:49

मायबोली गणेशोत्सव २०१० साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी या धाग्यावर आपली नावे कळवा. गणेशोत्सवासाठी साधारण महिनाभर दिवसातली काही मिनिटे ते काही तास इतका वेळ द्यावा लागेल. इथे नाव दिलेल्या सभासदांशी संयोजक संपर्क साधतील.
गणेशोत्सवातील कामाचे साधारण स्वरूप हे वेगवेगळ्या स्पर्धा तसेच कार्यक्रम आयोजित करणे, त्यासाठी प्रवेशिका मागवणे, स्पर्धेचा निकाल जाहीर करणे असे असेल.
या उपक्रमांत मर्यादित सदस्यांची आवश्यकता असल्याने सर्व इच्छुक सभासदांना एकाच वेळी सहभाग घेता येईल असं नाही. या आधी अश्या उपक्रमात भाग न घेतलेल्या सभासंदांनी जरूर सहभागी व्हावे, त्यांना मंडळात प्राधान्य दिले जाईल.

*******************

मायबोली गणेशोत्सव २०१० संयोजक मंडळ खालील प्रमाणे असेल

मुख्य संयोजक - आऊटडोअर्स
इतर संयोजक मंडळ - अंजली, ज्ञाती, पूर्वा, मन-कवडा, मिनी, मिनोती.

संयोजक मंडळाचे अभिनंदन आणि गणेशोत्सव संयोजनासाठी हार्दिक शुभेच्छा. Happy
|| गणपती बाप्पा मोरया ||

Group content visibility: 
Public - accessible to all site users

I'm in Happy

आहाहा!
गणेशोत्सव.......... छायाचित्रांचा झब्बू ............ स्पिन द यार्न ........... धमाल! Happy
शुभेच्छा!

मायबोली गणेशोत्सव २०१० संयोजक मंडळ खालील प्रमाणे असेल

मुख्य संयोजक - आऊटडोअर्स
इतर संयोजक मंडळ - अंजली,चिंगी, ज्ञाती, पूर्वा, मन-कवडा, मिनी, मिनोती.

संयोजक मंडळाचे अभिनंदन आणि गणेशोत्सव संयोजनासाठी हार्दिक शुभेच्छा. Happy
गणपती बाप्पा मोरया !!!!

अरे वा.. मंडळाला शुभेच्छा.. Happy
कुठलीही मदत लागली तर सांगा..

आमच्या शहराचे स्ट्राँग प्रतिनिधीत्त्व आहे की.. !!

मन-कवडा, तुला खास शुभेछा.. Proud

मन-कवडा, तुला खास शुभेछा..>>>> Lol
संयोजक मंडळाचे अभिनंदन. मदत लागली तर पन्ना, सिंडी, पग्याला वेळीअवेळी कधीही हाक मारा. मुळ्ळीच नाही म्हणणार नाहीत ते. Biggrin

सगळ्या संयोजक मंडळाचे हार्दिक अभिनंदन आणि मनापासून शुभेच्छा!
कुठलीही मदत लागली तरी नि:संकोच हाक मारा. Happy
(सायो अन सिंडीला तुमच्या तैनातीस लावेन Wink पग्या तर तसाही कामसूच आहे Wink )

Pages