वर्षाविहार २०१० (यू.के.'ज रिसॉर्ट) : वृत्तांत आणि प्रतिक्रिया

Submitted by ववि_संयोजक on 19 July, 2010 - 05:23

DSC01541-compressed.JPG

वर्षाविहार-२०१० यशस्वी केल्याबद्दल सर्व उपस्थितांचे तसेच संयोजन समिती आणि सांस्कृतिक समितीच्या सदस्यांचे आभार.
वर्षाविहार-२०१० चे फोटो, वृत्तांत आणि प्रतिक्रिया इ. साठी हा धागा सुरू करत आहोत. जास्तीत जास्त लोकांनी (विशेषतः वर्षाविहारास प्रथमच हजेरी लावलेल्या मंडळींनी) वृत्तांत लिहावेत अशी आग्रहाची विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन वेळा हा डान्स वेगवेगळ्या लोकेशनला झाला. दुसर्‍या कुणाकडे दुसर्‍या लोकेशनच रेकॉर्डींग आहे का ?
तुमचा काउंट चुकतोय.. Happy डान्स तिन वेळा झालाय.. Proud

..खरतर ववी.. ववी... सारख महिनाभर चालु होतं..
हे ववी काय असतं???
म्हणुन एक प्रकारचं कुतुहल मनात होतं.
शेवटी ठरवलंच कि काहिहि झालं तरी जायचचं...
एकतर पहिल्यांदाच चाललो होतो त्यात
आगोदर कुणाचीच ओळख नव्हती.
त्यामुळेकोणकोण कसं असेल आपण त्यांच्यात मिक्स होऊ का नाही याचीहि मनात थोडी धुकधुक होती.
पण जेव्हा गाडीत पहिलं पाऊल टाकलं..तेव्हा सगळी भिती फोल ठरली....
गाण्याच्या भेंड्या चालु होत्या आणि आम्ही त्यांच्यात कधी मिसळलो आम्हालाच कळालं नाही. सोबत चिमण्या...आणि निळुभाऊ होतेच...
त्यातल्या त्यात पल्लीच्या मुलीनं श्रावणीनं मस्त सोबत दिली.....(खुप क्युट आहे ती...)
आमच्या लाडक्या चिमण्याला जेव्हा 'चष्मेवाला गुंड' म्हणून त्याचा छानसा सत्कार केला तेव्हा मात्र हसता हसता पुरेवाट लागली....
रिसोर्ट आलं आणि आम्ही प्रसन्न मनाने गाडीतुन उतरलो.
एव्हाना पोटात कावळे ओरडत होतेच....मग नाश्त्यावर तुटुन पडलो.....
नाश्ता झाला आता चला पोहायला...रेन डान्स मध्ये नाच नाच नाचलोत....
जेवण झाल्यावर मनोरंजनाचे कार्यक्रम झाले....
आमची 'मुसळधार टिम'(काहि नावं विसर्लो बर का गड्यांनो....)राजा...गणेश..नितिन..आमची कॅप्टन योगिता..आणि एतर सगळेच...
भौमितिक आकॄत्यांनी वस्तुंची नावे सांगा... समद्विभुज त्रिकोण, . 'त्रिकोण जिथे एकमेकांना छेदतात तिथे दोन बाजूंना अर्धवर्तुळे काढा' असे घारुआण्णांनी सांगताच, दोन त्रिकोण एकमेकांना तीन बिंदूत छेदतात; त्यातल्या कोणत्या दोन बाजूंना कोणत्या दिशेला तोंड करुन अर्धवर्तुळे काढू? असा प्रश्न पल्लीला पडला ....
त्यावेळी तिने मारलेल्या उड्या ....अहाहा...
अजुनही लक्षात आहेत बरं का पल्ले.....
मजा मात्र तेव्हा आली जेव्हा
खजिना म्हणुन 'स्टार खिडकीजवळ'
बसमधल्या खिडकीतला खजिना(छोट्यांचा अधिक मोठ्यांचा खाऊ) लुटला ...
ओरडतचं बाहेर आलो..
खजिना सापडला....खजिना सापडला....
सगळिकडे बोभाटा केला...
गणेशराव आणि आमच्या काही सवंगड्यांनी तोवर तो अर्धाअधिक लुटलादेखील होता...संयोजकांनी नंतर हा खजिना नाही असं सांगितल्यावर मात्र आमचे चेहरे खरचं पाहण्यासारखे झाले...
पण काहीही म्हण तिथल्या वातावरणातुन
मनं अजुनही निघत नाही एवढं मात्र खरं....
मल्लि ,विशाल...सुर्या..पल्ली...सुमेधा...
संयोजकांचे आभार मानावे तितके कमीच...
जाताना एकटा गेलो होतो येताना असं काही
सोबत होतं जे कधीच दुरावणार नव्हतं...
एक मात्र खरं की हे सगळं मला आयुष्यभर कधीच विसरता येणार नाही आणि हो बर कां पल्ले तुझी क्युट... क्युट..श्रावणीसुद्धा.....

अरे मित्रांनो "तो मी नव्हेच" रे, मला साधी भाताची लावणी करता येत नाही तर ही तमाशातली लावणी कशी करू . तो आपला "यो रॉक्स". >>> सॉरी रे योगेश , गलतीसे मिष्टेक हो गया .
यो रॉक्स रियली रॉक्स ,
विशाल लिंक बद्दल थँक्स .
विडिओ घर जाको देखता.
आगाऊ आणि असुदे ने आश्चर्याचे धक्के दिले .

मयुरेश, माहितीबद्दल मनःपूर्वक धन्यवाद Happy जुन्या आठवणी जाग्या झाल्या - २००३ ते २००५ असे सलग तिन वर्षे ठरवुनही मला वैयक्तिक कारणान्मुळे येता आले नव्हते (साडेसाती सुरु होती Proud )
नन्तर मोदीबाग अन सगुणाबागेच्या वेळेस जाऊ शकलो, त्यानन्तर या वर्षी.
(अर्थातच, माझ्या गैरहजेरीतही, या ना त्या रुपात मी तिथे हजर असल्यातच जमा होतो हा भाग निराळा Lol )
आठ पैकी सात वविन्ना तू हजर म्हणजे खर तर तुझा स्पेशल सत्कार करायला हवा Happy
या प्रत्येक वविचे सन्योजक्-सा.स.-हजर माबोकरान्ची सन्ख्या/आयडीज-बदलत गेलेले/भर पडलेले नविन उपक्रम जसे की टीशर्ट्-मदत वगैरेची माहिती थोडक्यात मुद्देसूदपणे कुठेतरी एका ठिकाणी शब्दबद्ध करुन ठेवायला हवी. आता तूच हे मनावर घे. मायबोलीची वाटचाल अशा काहीशा अर्थाचा एक धागा आहे त्याच धर्तीवर मायबोली वविची वाटचाल असा एक मॉडरेटेड धागा उघड Happy दरवर्षी त्यात भर पडत जाईल

अरे कसले एकापेक्षा एक वृ. आहेत.. Lol पुन्हा आठवणी जागृत ! नितीन यांनी म्हटल्याप्रमाणे झिंग Proud
सगळ्यांनी आपापले अनुभव छानपैंकी शेअर केलेत... Happy

माझा हा सलग पाचवा ववि होता.. धमालमस्ती नेहमीसारखीच.. मी वृत्तांत नाहि लिहीत यावेळी.. सगळेच ववि नेहमीच यशस्वीरित्या पार पडलेत.. अनुभवदेखील नेहमीप्रमाणे मस्तच होते.. तरीपण मला आवडलेल्या वविंचे क्रम खालीलप्रमाणे देतोय....

नंबर १ =
२००६ मोदी - हा माझा पहिलाच ववि..त्यामुळे सर्वात आवडता.. त्यात आतापर्यंतच्या ववितले सर्वोत्कृष्ट असे खेळ या ववित पाहिले.. अजुनही ते क्षण, धमालमस्ती डोळ्यासमोर आहेत.. ह्याचवेळी वविच्या प्रेमात पडलो ! ह्याच ववित मिल्या, राफा, परदेसाई, वाकड्या उर्फ...... Proud सारख्या मायबोली दिग्गजांना भेटलो.. पुनमने म्हटलेली मिल्याची विडंबने अजुनही लक्षात आहेत.. ह्याच ववित पावसाची मस्त हजेरी होती.. त्यातच ह्याच ववित धमालमस्तीची गाणी कशी गायची ते आनंदसुजू नि आनंदमैत्री कडुन शिकलो..

नंबर २=
२०१० युकेज रिसॉर्ट - माझा हा पाचवा ववि.. जाणार होतो ट्रेकला.. पण का माहित नाही.. अचानक वविचे चित्र समोर उभे राहिले.. नि वविलाच जावेसे वाटु लागले.. तळ्यात मळ्यात होतो.. वविला तीन दिवस शिल्लक असताना विन्याला फोन केला.. विचारणा केली की मला जमलेच तर आलो तर चालेल का. ? अपेक्षेप्रमाणे त्याने "तू येच" म्हटले.. नि तेव्हाच मी नक्की केले ! विन्या.. ऐनवेळी केलेल्या विनंतीचा स्विकार केल्याबद्दल थॅन्क्स रे !! नि हो माझा अजुन एक जीवलग मायबोलीकर (जल्ला तसे बरेच जीवलग आहेत !) "आनंदमैत्री"ने माझे वविकडे मन वळवण्यासाठी केलेले प्रयत्न (केलेले फोन, लेक्चरबाजी) यांकडे दुर्लक्ष करण्याइतका मी इतका वाईट मायबोलीकर नाहीच.. बरेच महिने जिटीजीला गेलो नसल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात नविन माबोकरांशी भेट झाली ! वर्षातून फक्त एकदाच भेटणारे पुणेकरांशी गप्पाटप्पा झाल्या.. रिसॉर्टमधील खाणेपिणे आतापर्यंतच्या माझ्या ववितले बेष्ट होते.. पाण्यातली धमाल पण आतापर्यंतची बेष्ट ! एवढ्या मोठ्या जनसमुदयासमोर ड्यान्स करण्याची पहिलीच वेळ.. सांस्कृतिक समितीने ठेवलेले खेळ माझ्यामते आतापर्यंतच्या ववित दोन नंबरवर ! इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या जवळपास सगळ्यांना खेळात सहभागी करुन घेतले हे मोठे यश म्हणेन ! नि बसमधील धमाल एक नंबरी.. वैभवची ढोलकी, असुदेंचा बाजा नि घारुअण्णांनी आणलेला बांगो !! मग काय दे धमाल.. प्रवास सुरु करतानाचा असलेल्या आवाजापेक्षा दुप्पटीने मोठा असा आवाज प्रवास संपताक्षणी होता.. !! एकदम झकास !

नंबर ३ =
२००७ सगुणाबाग : आजुबाजूचे निसर्गसौंदर्य, ओळखपरेडचा अनोळखी खेळ, मस्त धबधबा, म्हैसराईड, जिवंत माश्यांची ओळख नि परतीच्या प्रवासात बसमधील माझा कोळीडान्स.. एकूण खूप धमालवाला ववि !

नंबर ४ =
२००८ हेगडे : हा पण ववि जबरदस्तच ! ही जागा पण सही.. चारि बाजुंनी डोंगर. या ववित स्विमींग पुलमधील साकारलेली दहिहंडी मस्तच ! ववितला सगळ्यांचा पहिला रेन डान्स इथेच झाला..

नंबर ५ =
२००९ मावळसृष्टी: हा ववि केवळ बसमधली धमालमस्तीची गाणी नि मावळसृष्टीतल्या पिटुकल्या धबधब्यामुळे लक्षात राहिल.. लांबच्या प्रवासामुळे बरिच घाईगडबड झाली होती.. पण त्यातही शक्य तेवढे कार्यक्रम धमाल करत आटपले हेसुद्धा कौतुकास्पदच ! जितके वाटले होते तेवढी धमाल मात्र इथे करता आली नव्हती..

यो रॉक्स.....सह्हीच अनुभव..मीही ठरवुन टाकलेलं यापुढे एकही व.वि मिसायचा नाही..तुझ्या अनुभवांनी शिक्कामोर्तब झाली Happy

मल्ल्या, पल्ली ने कधी उडी मारलेली रे?

मी पण मिसणार नाही ववि आता कधी
सुमे भौमितिक आक्रुतिच्या सहाय्याने चित्र ओळखा परेड चालू असताना काय आणि कुठे काढायच यावर एकमत न झाल्याने पल्लीने ती ऐतिहासिक उडी मारली. कशी लक्षात नै राहिली तुझ्या???

पल्लीने ती ऐतिहासिक उडी मारली. कशी लक्षात नै राहिली तुझ्या???
कित्त्त्ती कित्त्ती क्युट उडी होती.... अशी कशी विसरलीस तु ?

कित्त्त्ती कित्त्ती क्युट उडी होती.... अशी कशी विसरलीस तु ?>>>>

नशीब ते युकेज चे पाटील नव्हते समोर, नाहीतर पहिल्यांदा त्यांनी खालची लादी चेक केली असती आणि माबोकरांसाठी जाहीर केलेली १०% ची सुट त्यांच्या मनातसुद्धा आली नसती Proud

विशल्या, अशा लाद्या चेक करायच्या तर आधी स्विमिंग पूलच्या साईड च्या चेक केल्या असतील त्या पाटलांनी... Wink

तु एक गोष्ट ऑब्जर्व्ह केलीस का आत्ये? पल्ली पाण्यात उतरली नव्हती Proud
बहुदा पाटलांनी आधीच सांगुन ठेवलं असावं तिला Wink काय माते?

पल्ली पाण्यात उतरली नव्हती>>>>> आरे पण मुंबईकरांच्या फडाला सवाल जवाब करायला नव्हती का मैदानात उतरली???

लिंब्या,तू म्हणतोयस तसे करायला हवे रे.. मायबोलीचा अनमोल ठेवा आहे तो. फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की हे जुनं सगळं आता सविस्तर आठवणं कठीणच आहे. पण जुने वृत्तांत आणि त्या त्या वेळेस उपस्थित असलेल्या मायबोलीकर लोकांच्या मदतीने अगदी सगळे नव्हे तरी बर्‍याच गोष्टी आपल्याला मायबोली ववि बखरीच्या नावाखाली साठवता येतील.. म्हणजे नविन लोकांनाही ते वाचता येईल..

यो,तू थोडक्यात घेतलेला ५ वविंचा आढावा मस्तच... मोदी वविच्या वेळेसच खर्‍या अर्थाने ववि सांस्कृतीक समितीचा जन्म झाला.. त्यावेळी राफा,राकु आणि मिल्या हे सासचे संयोजक होते.. धमाल आली होती तेव्हा.. पण या वेळच्या सासचेही कौतुक करायलाच हवे.. कारण पहिलीच वेळ असुनही अतिशय नेटके आणि नियोजनबध्द संयोजन त्यांनी केले आणि मुख्य म्हणजे सर्व उपस्थित वविकरांना खेळांमध्ये सहभागी करून घेतले.. अजुन एक चांगली गोष्ट म्हणजे विनय भिडेसारखा चांगला मुख्य वविसंयोजक लाभल्याने माझ्या आणि घारूच्या डोक्यावरचा भार कमी झाला.. Happy

पल्ली पाण्यात उतरली नव्हती
>>
विशल्याने बहुतेक पुलाच्या बाहेरचं पाणी पाहीलं नसणार... Proud

पल्लीची ऐतिहासिक उडी मी पण पाहिली. Happy

मिसेस असुदेंनी मला झार्‍याचं वर्णन इतकं अचूक सांगितलन् (६-७ सेमी लांबीचा आडवा आयत वै. Wink ) की मी अगदी बरोब्बर draw केलं Happy

यो, मागच्या वविंचे उल्लेख वर केलेस ते वाचून आता सगळ्याच वविंना हजेरी लावायचं नक्की केलंय मी Happy

विशल्या, तू दिलेली लिंक घरनं बघेन रे Happy

वरती आगाऊ या आयडी विषयी लिहिलंय. तो नक्की शाळेत शिकतोय की शिकवतोय ? Uhoh
मला आश्चर्य वै. नाही वाटले त्याला बघून. Uhoh

Pages