वर्षाविहार २०१० (यू.के.'ज रिसॉर्ट) : वृत्तांत आणि प्रतिक्रिया

Submitted by ववि_संयोजक on 19 July, 2010 - 05:23

DSC01541-compressed.JPG

वर्षाविहार-२०१० यशस्वी केल्याबद्दल सर्व उपस्थितांचे तसेच संयोजन समिती आणि सांस्कृतिक समितीच्या सदस्यांचे आभार.
वर्षाविहार-२०१० चे फोटो, वृत्तांत आणि प्रतिक्रिया इ. साठी हा धागा सुरू करत आहोत. जास्तीत जास्त लोकांनी (विशेषतः वर्षाविहारास प्रथमच हजेरी लावलेल्या मंडळींनी) वृत्तांत लिहावेत अशी आग्रहाची विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुंबईकरांतर्फे कोण लिहितंय वृत्तांत?
यंदा अनेक पहिलटकर होते. Wink त्यांच्यापैकी कुणाचा तरी वृत्तांत येऊ द्या. Happy

'बाबा आणि मी... दोन दोन मायबोली'
सकाळी घरातून निघताना मायबोली टि-शर्टवरचा लोगो आजीला दाखवताना श्रीशैलचा उत्साह ओसांडून वाहत होता... ठरल्या वेळेपेक्षा १० मिनेट गाडी उशिराने धावत होती... आणि आली ती थेट १० पावले पुढे जाऊन थांबली... स्वागताला किरू आणि श्वास मोकळा करायला बाकिची मंडळी पाय उतार झाली... गाडीत आधीच धूमशान सुरू होतं... गवळण, लावणी, भूपाळी सगळ्यांची भेळ सुरू होती... नवि मुंबईतील शिल्लक मंडळींना (ए कोण शुल्लक म्हणतयं त्यांना Wink ) घेऊन गाडी expressला लागली आणि विसच मिनिटांत सगळ्यांच्या धूमशानावर विरजण पडलं... अहो काय म्हणून काय विचारात... अंताक्षरी रंगायच्या आतच समोर UKचा वेलकम बोर्ड!!!

पुणेकर संयोजकांना वविची आठवण करून देण्यासाठी फोन केला तेव्हा ते घाटात असल्याचे कळ्ळे... तोच संपुर्ण मायबोलीवर घरंगळणारा लिंब्या UKत येऊन टपकला... (सोबतीला एक आव़ळा पण होताच... :p) मुंबईच्या मंडळीचा अल्पोपहार पार पडे पर्यंत पुण्याची गाडी आली... आणि मग सालाबाद प्रमाणे पुन्हा एकदा तो 'भरत भेटीचा' सिन रंगला... Happy

चावी एक... रूम दोन... असा काहीसा अजब प्रकार या वेळी पहावयास मिळाला... कोणी चहा सांडून तर कोणी ग्लास तोडून (विकांताचा परिणाम) आपला निषेध नोंदवला...

एकीकडे तुडुंब भरलेली पोटे किक्रेट खेळू लागली तर दुसरीकडे तुडुंब भरलेल डबकं रिकाम करण्याची शर्यंत सुरू झाली... शेवटी दोन रूमच्या दोन वेगवेगळ्या चाव्या मिळाल्यावर मल्ल मंडळी (मल्ली नाही) त्यांच्यासाठीच्या राखिव डबक्यात उतरली... जल्ला काय तो नजारा होता... आम्हीSSS सारेSSSS पवैय्येSSS... सोबतीला व्हॉलीबॉलची पण फोडणी होतीच... योगेश(डजनभर)२४ कॅमेर्‍यांतून एक एक हरकत टिपत होता... त्यातच अस्मादिकांचा कार्टा बापाला पाण्यात ढकलून भावी आयुष्यातील ढकलगाडीची झलक पेश करत होता...

पावसाने पाठ फिरवली होती पण त्याची कमी रेनडान्सने भरून निघत होती... यार्डातून धूऊन निघालेल्या ट्रेन प्रमाणे अचानक त्या रेन डान्स मधून साफसाईला गेलेली मायबोलीकरणींची आगिनगाडी बाहेर पडली (:बालवाडी: पर्‍या उभाच आपलं उवाच) आणि शेजारच्या छोट्या डबक्यात विसावली... बच्चे कंपनी पण काय मागे नव्हती... लिंब्याच्या घरंगळण्याची प्रात्यक्षिके हुबेहुब दाखवत होती... Light 1

'बोल बजरंग बली की जय'च्या घोषात गोविंदाचा खेळ सुरू झाला... पण थरथरत्या पायांना काही केल्या थर लावणे जमेना... एव्हाना डिजेही चांगलाच थिरकायला लागला होता... आणि बघता बघता ती आली... नाचली... आणि जिंकली... अप्सरा आलीSSS बोरिवलीतून खालीSSS

याची देही याची डोळा आम्ही तो अप्सरा (सरफरोश मधला नाही) पाहिला... 'नटरंग' चित्रपटातील 'वाजले की बारा'च्या तालावर Yo Rocksने ज्या काही अदा पेश केल्या त्या पाहून प्रेकक्षकातील सुनिल परचुरेही नाचू लागले... Once मोर्‍यांच्या किंकाळ्या येऊ लागल्या... ते पाहून UKचे पाटिल हजर झाले... (*खा.बा. पाटलांनी योग्याला सुपारी ऑफर केलियं अस ऐकीवात आहे... :p )

पोहून दमलेले सगले पोहे जेवणासाठी माघारी परतले... अतिशय रुचकर जेवण दिल्या बद्दल पाटलांचे विशेष आभार मानले पाहिजेत... जेवणा नंतर बरेच जण वाममार्गी जाण्याच्या प्रयत्नात असताना संयोजक त्वरीत काममार्गी झाले आणि चौकोनी तुकड्यांचे वाटप करून सगळ्यांना तुकड्यात विभागले... अस्मादिकांचा betterतुकडा मुसळधार मधे गेलामुळे अस्मादिक मात्र झिम्माड झाले :p पण सुपूत्र वाममार्गी लागल्या कारणाने जुईने खेळात सहभागी होणे टाळले...

कट्ट्यावरील मालक आणि मालकिण बाईंनी माईकचा ताबा घेऊन सां.स.च्या सुपिक डोक्याचे चटके देण्यास सुरवात केली... जल्ला एक ऊ-खाण्यार्‍याला एक गुण... Uhoh

पंजारिंग, भौमितीक भाषा, मायबोली ?मंजुषा, किराणा माल (पर्‍याचा आवाज :d), ऊखाणे असे टाईमपास खेळ खेळून विट आला म्हणून की काय डूआय चक्क विट घेऊन उभा 'पाऊले चालती पंढरीची वाट'... या खेळातही झिम्माड टिमनेच बाजी मारली... आत्ता पर्यंत टॉपर असलेल्या वैनीलाच पैठणी मिळणार असाच सगळ्यांचा समज होता... आणि शेवटी सुरु झालो तो असंभव खेळ... 'शोध खजिन्याचा'... जल्ला वहिनींची सगळी मेहनत 'पावसात'... Uhoh

गरमा गरम पकोडे आणि चहात खजिना गेल्याच दु:ख बुडवून आम्ही हलके झालो... 'झिम्माड'चे कष्टपैलूत्व पाहून संयोजकांनी फूल नाय फुलाची बशी भेट देऊन आमचा कौरव केला... Happy संधीप्रकाशात ग्रुप फोटोसाठी विजा लखलखल्या... पहिलटकरांनी पुन्हा एकदा भेटून आयडींची खात्री करून घेतली आणि पुढल्या वर्षी भेटीची वचने गोळा करत प्रत्येक वविकराने आनंदात निरोप घेतला... परतीच्या प्रवासातही कोलाकार मंडळीचे बस मधे गळे काढणे सुरूच होते... :d

(*खाजगितील बाब)

तटी: आयुष्यात अनमोल क्षण तसे फार कमी येतात... मायबोलीचा वर्षा विहार हा त्यापैकी एक... Happy

हा नाच मात्र मी मिसला Sad

इंद्रा, आमच्याकडेही सेम मायलेकींचा माबो टिशर्ट म्हणून सानिका खुष होती. Happy

सगळ्या बच्चे कंपनीला टिशर्ट खूपच गोड दिसत होते Happy

इन्द्रा, >>>>> तेव्हा ते घाटात असल्याचे कळ्ळे... तोच संपुर्ण मायबोलीवर घरंगळणारा लिंब्या UKत येऊन टपकला... (सोबतीला एक आव़ळा पण होताच... ) <<< या वाक्क्याला स्ट्रॉन्ग ऑब्जेक्शन! Proud
मी आधीपासूनच तिथे आलेलो होतो, अर्थातच आधी पुणेकरच पोचले! तुमची गाडी आम्ही पोचल्यानन्तर तब्बल बारा मिनिटान्नी आली.... जीमधुन पहिल्यान्दी घारू उतरला व त्याने माझ्याकडून दारातच स्वागताचा स्विकार केलान, हव तर खात्री करुन घे!

इन्द्रा, भारीच ..... आत्ता कुठे सुरुवात होतीये वाचायला तर लगेच क्रमशः??? असं नाही चालणार. (कवे, असं नॉ चॉलबे म्हणायची परवानगी दे ना :प्लीज प्लीज:)
ए हो हो, लिंब्या सगळ्यात आधी दाखल झाला होता तो सुद्धा एक जाडजुड सोटा हातात घेऊन Lol

>>>>> त्यातच अस्मादिकांचा कार्टा बापाला पाण्यात ढकलून भावी आयुष्यातील ढकलगाडीची झलक पेश करत होता...<<<<<
हाच का तो खोड्याळ? की असाच कुणीसा?

जीमधुन पहिल्यान्दी घारू उतरला >>> मी 'जीप'मधून असं वाचलं. आणि आठवायला लागले की मुलुंडहून निघताना तर घारू बशीत होता. मग तो जिपीत कवा ग्येला? Lol

हाच का तो खोड्याळ? की असाच कुणीसा? >>> हो हाच.
फक्त फोटोत तो ज्याला ढकलतोय तो त्याचा बाप नाहीय Lol (मुलं निरागस असतात ती अशी... :फिदी:)

फक्त फोटोत तो ज्याला ढकलतोय तो त्याचा बाप नाहीय>>>>>> घरून निघताना इंद्रानेच त्याला बजावून ठेवलं होतं मला ढकलायचं नाही, दुसर्‍या कुणाला तरी बकरा करायचा. सुकीच्या फोटोतल्या चेहर्‍यावरून त्याला मागे काय वाढून ठेवलंय माहीती नाहीये Biggrin

मला आमची 'धोधो' टीम जिंकली एवढाच तपशील लक्षात आहे Proud
आणि यो-रॉक्स ची जबरा लावणी.,
दुपारनंतर सुरु झालेला मस्त पाऊस,
चारी ठाव आयतं मिळणारं खाणं,
संध्याकाळच्या चहा बरोबरची पटापट संपणारी भजी,
शेवटचा जंगी ग्रुप फोटो,
जय भवानी-जय शिवाजी आणि आवाज कोणाचा-मायबोलीचा चा जयघोष,
पुणे बस चा ड्रायव्हर गायब झाला होता तेव्हाचे पुण्याच्या बशीत बसणार्‍यांचे चेहरे,
रिसॉर्टला पोहोचेपर्यंतची बशीतली अंताक्षरी,
जिग सॉ पझल लावतानाची कसरत,
खोलीच्या सारख्या हरवणार्‍या किल्ल्या,
बच्चे कंपनीची मस्त धमाल,
उखाण्यांचा कार्यक्रम,
विटांची शर्यत,
गेम्सचं आयोजन,
१०% डिस्काउंट,
बारीक झालेली दक्षिणा,
परत जाताना पुणे बशीत कंटाळून बसलेले असताना बशीच्या मागच्या भागात गायली जाणारी सुमधूर गाणी, आणि शेवटी गुजराथ कॉलनीतून बस घेणार की नाही घेणार यावरून झालेला काथ्याकूट,
राज्याचं दारात अडकलेलं बोट,
पल्ली आणि मल्ली ची पुण्याला पोहोचेपर्यंतची अविरत बडबड,
परेश ची दोन विडंबनात्मक गाणी (खास पुणे बसमधली)
संयोजकांनी वाटलेली क्युट बक्षिसं

असे काही ठळक मुद्दे लक्षात आहेत....... अजून काही आठवलं तर अ‍ॅडिन Happy

मी मायबोलीवर तशी नवीनच. मी माझ्या बहीणीमुळे म्हणजेच निंबुडामुळे id create केला आणी तयार झाले माबोच्या ववीसाठी. खुप दिवसांपासुन मी excited होते तयारीही तशी अगोदरच करुन ठेवली होती. आम्ही तीघे म्हणजेच मी+नींबुडा+मोदक सकाळी मुलुंडला माबोच्या बसमध्ये चढलो. बसमध्ये सगळेच अती उत्साहात होते त्यातच गाण्यांची अंताक्षरी चालु होती. सुरुवातीला माझं active participation नव्हतं. नंतर हळुहळु मजा-मस्करी, गप्पा-गोष्टी, ओळखी-पाळखी होउ लागल्या. ९- ९.१५ पर्यंत आमची बस U. K. Resort ला पोहोचली.
Resort ला पोहोचल्यावर नाश्ता झाला. लगोलग कपडे बदलुन सगळ्यांनी पाण्यात उड्या मारल्या. पाण्यात मुलांनी तर basket ball खेळायला सुरुवात केली तर मुलीनींही महिला वेशेष train सुरु केली. rain dance ही झाला. पाण्यात खेळुन झाल्यावर सगळ्यांनाच मजबुत भुक लागली. १२.३०-१.०० पर्यत सगळ्यांनी जेवणावर ताव मारला. जेवण झाल्यावर मला आणी मोदक रावांना अशी काही झोप यायला लागली की काही विचारु नका. त्यानंतर games आयोजन होतं. यात सगळ्यांच छान participation होतं. यात ४ गट करण्यात आले होते. - रिमझिम, धो-धो, मुसळधार, झिम्माड. मी रिमझिम या गटात होते. मी ही उखाणा घेतला तेही घारु अण्णांनी एनवेळी तयार करुन दिलेला- पाउस कधी पडेल याचा नाही नेम मी नन्या१० माझे मायबोलीवर खुप खुप प्रेम. मी कधी ही न बोलणारी अबोल चक्कं उखाणा घेतला मलाच थोड्यावेळ वीश्वासच बसेना. शीवाय वीटेवरुन चालण्याचा पराक्रम ही केला. खुपच मजा आली. सगळ्यांशी ओळखी झाल्या. ५ पर्यत कार्यक्रम आटोपात आला. संध्याकाळी पाऊसही सुरु झाला. त्या पावसात गरम गरम कांदा-बटाटा भजी खाण्यात काही वेगळीच मजा आली. विजेत्यांना बक्षीसांचे वाटप करण्यात आले. संध्याकाळी ६.०० वाजता माबोची बस मुंबई कडे रवाना झाली. परत पुर्ण जोशात मायबोलीकरांची अंताक्षरी चालु झाली आणी ती मुलुंड येईपर्यत चालुच होती.

एकंदरीतच माझा पहीला अनुभव खुपच छान होता, लक्षात ठेवण्यासारखा होता.

मायबोलीची ही वर्षा-वीहार चांगल्या रितीने आणी यशस्वीरीत्या पार पाडल्याकरिता ववी-संयोजकांचे मनापासुन आभार आणी खुप शुभेछ्छा Happy Happy Happy

Pages