वविची टुरटुर, आमची हुरहुर

Submitted by लाजो on 20 July, 2010 - 08:53

Happy

आला आला पावसाळा, दवंडीवाला पिटाळा
माबोच्या वविची बातमी कळवा हो सकळां...

पटापट वर्गणी भरा, तयारी लगेच सुरु करा
त्याआधी विकत घ्या, माबोचा चहा सदरा...

काय काय करणार, कोण कोण येणार
येतो म्हणुन न येणार्‍याला टांगारु म्हणणार... Proud

तारिख जुलैची अठरा, युकेवर भरली जत्रा
आयुष्यातल्या चिंतांवर वविची हमखास मात्रा...

मस्तीचे सगळेच दिवाणे, गप्पांचे मारले फकाणे
सांसची सुरुवात केली आयड्यांचे घेऊन उखाणे... Happy

खेळ खेळलो भरपुर, हादडलो फुटेस्तोवर ऊर
वविच्या या अनोख्या क्षणांचा, आनंद घेतला पुरेपुर..

यो दगडाने नाचली लावणी, घसा दुखेस्तोवर गायली गाणी
निघताना मात्र डोळेच काय ढगांनीही पाझरले पाणी... Sad

सोमवारी माबोवर एकच सुर, फोटो आणि वृत्तांताचा आला महापुर
आनंदाच्या या सोहळ्याला मात्र मुकलो आम्ही कारण, रहातो खुप दुर..................

लाजो Happy

<सोमवारी माबोवर एकच सुर, फोटो आणि वृत्तांताचा आला महापुर
आनंदाच्या या सोहळ्याला मात्र मुकलो आम्ही कारण रहातो दुर..................>

पाठिंबा आमचाही.. Sad
मस्त मज्जा केलीये लोक्सनी Happy

Happy

सोमवारी माबोवर एकच सुर, फोटो आणि वृत्तांताचा आला महापुर
आनंदाच्या या सोहळ्याला मात्र मुकलो आम्ही कारण रहातो दुर......... Sad खरंय माझ्यापण बाबतीत...

कविता खुपच मस्त! शेवटच्या ओळी वाचेपर्यंत वाटत होतं की लाजो वविला हजेरी लाऊन आली आहे आणि आम्हाला वृत्तांत देतेय. Happy

सोमवारी माबोवर एकच सुर, फोटो आणि वृत्तांताचा आला महापुर
आनंदाच्या या सोहळ्याला मात्र मुकलो आम्ही कारण, रहातो खुप दुर..................

लाजो... मस्तच गं .... काव्यवृतांत ते ही हजर नसताना.. ____/\____

लाजो मस्त गं....
असु दे. टेन्शन नाही ववी अभी बाकी आहे.
पुढच्या वर्षी नक्की यायचं बर का...आत्ताच निमंत्रण...

लाजो खास तुझ्यासाठी प्रतिसाद

नको बाळगु मनी खंत
येतील ववी असे अनंत
असशिल जरी तू दूर
तरी मनाने माबोवर

लाजो ब्येश्टच Happy
वविचं वर्णन वाचून तू आली नव्हतीस हे कुणालाही खरं वाटणार नाही. (आमच्या वृत्तांत-लिखाणाची ही अचिव्हमेंट समजावी काय? ;))

हा हा हा!!
लाजो एकदमच मस्त!!
वाचून वविचा त्या सुंदर क्षणांची भरभरून आठवण पुन्हा एकदा उसळून आली.

लय झाक.

लाजोजी वविला न येताही फक्त वृत्तांत वाचून इतकी सुरेख कविता रचलिस.. Happy
शेवटच्या दोन ओळी अक्षरश: मनाला भिडल्या...
सेम असंच वाटलं होतं की हा ववि संपूच नये. Sad

तु कविता अतिशय सुंदर लिहीली आहेस..
पुढच्या वर्षी दूर दूर न राहता जवळ जवळ रहायला ये आणि वविची मजा लूट. Happy

Pages